महाराणी ताराबाई माहिती Maharani Tarabai Information in Marathi

Maharani Tarabai Information in Marathi महाराणी ताराबाई माहिती मराठी महाराणी ताराबाई एक यशस्वी व कर्तव्य वान स्त्री होत्या त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना तोंड दिलं त्यासोबतच पतीच्या निधनानंतर स्वराज्य संरक्षणाचा विडा उचलला आणि स्वराज्याचे रक्षण केलं कपटी दुष्ट मुघलांना तोंड दिलं. महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर येणाऱ्या संकटा पासून स्वराज्याचा बचाव केला. महाराणी ताराबाई यांचा उल्लेख इतिहासातील कर्तुत्वान राजस्त्रीमध्ये केला जातो. औरंगजेबाशी सात वर्षे लढा दिला अशा महान महाराणी ची कथा आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

maharani tararani महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर येणाऱ्या संकटा पासून स्वराज्याचा बचाव केला. महाराणी ताराबाई यांचा उल्लेख इतिहासातील कर्तुत्वान राजस्त्रीमध्ये केला जातो.

maharani tarabai information in marathi
maharani tarabai information in marathi

महाराणी ताराबाई माहिती मराठी – Maharani Tarabai Information in Marathi

नाव (Name)महाराणी ताराबाई
जन्म (Birthday)14 एप्रिल १६७५
जन्मस्थान (Birthplace)सातारा जिल्ह्यात
वडील (Father Name)सरसेनापती हंबीरराव मोहिते
पती (Husband Name)छत्रपती राजाराम राजे
मुले (Children Name)शिवाजी दुसरा
मृत्यू (Death)९ डिसेंबर १७६१
लोकांनी दिलेली पदवीमहाराणी

महाराणी ताराबाई जन्म:

महाराणी ताराबाई यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर म्हणजेच छत्रपती राजाराम राजे यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न केला. या थोर महिलेचा जन्म 14 एप्रिल १६७५ रोजी झाला. ही शूर कन्या हंबीरराव मोहिते यांची मुलगी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यात ताराबाई यांचे देखील श्रेय आहे. त्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्यारत्न असल्यामुळे महाराणी ताराबाई यांना लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं.

महाराणी ताराबाई विवाह:

महाराणी ताराबाई यांचा विवाह स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा राजाराम यांच्याशी झाला. राजाराम राजे यांच्यापासून महाराणी ताराबाई यांना शिवाजी नामक पुत्र झाला जो पुढे जाऊन स्वराज्याच्या गादीवर बसला.

महाराणी ताराबाई इतिहास:

महाराणी ताराबाई यांचा उल्लेख इतिहासातील कर्तुत्वान राजस्त्रीमध्ये केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचा कारभार राजाराम राजे यांच्या हाती आला होता. परंतु १७०० साली राजाराम महाराज यांचा जिंजी वेढ्यामध्ये पराभव झाला पराभव होण्या आधीच ते तिथून निसटून पुन्हा महाराष्ट्रात आले होते आणि प्राकृतिक कारणांमुळे ३ मार्च १७०० मध्ये राजाराम राजे यांचा मृत्यू झाला.

पतीच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी स्वराज्य कारभार सांभाळण्याचा निर्णय घेतला. एक स्त्री देखील स्वराज्य सांभाळू शकते हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं. त्यांनी बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कानोजी आंग्रे, पिलाजी गोळे, गिरजोजी यादव अशा धाडसी सैनिकांचा आपल्या सैन्यात समावेश करून घेतला आणि स्वराज्यावर येणाऱ्या संकटांवर मात करायला त्यांनी सुरुवात केली. महाराणी ताराबाई यांनी स्वराज्य रक्षणाचा दृढ वसा घेतला.

पन्हाळा किल्ला हा मोगलांच्या ताब्यात गेला होता १७०५ मध्ये तो पुन्हा हस्तगत करून कारंजा ही राजधानी बनवली आणि महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीस सुरुवात झाली. खरंतर राजाराम राजे यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी पद छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू राजे यांच्या कडे जायला हवे होते.

पण त्यावेळी ते वयाने फारच लहान होते आणि पुढच्या काळामध्ये ते मोगलांच्या कैदेत होते. म्हणून महाराणी ताराबाई‌ यांनी त्यांचा मुलगा शिवाजी यांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य कारभारास सुरुवात केली.

महाराणी ताराबाई कार्य:

महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर येणाऱ्या संकटा पासून स्वराज्याचा बचाव केला. नाही नाही बोलता एका स्त्रीने मोगलांशी लढा दिला इतकच नव्हे तर औरंगजेबासारख्या बलाढ् बादशहाशी जवळपास सात वर्ष लढा दिला.‌ स्वराज्यावर आलेल्या अनेक संकटानंतर स्वराज्य कारभार सुरळीत चालू राहील अशी आशा जनतेला दिली त्यासोबतच जनतेचे संरक्षण केलं.

सैन्यांमध्ये देखील आत्मविश्वास जागा केला. शाहू महाराज वयाने लहान असल्यामुळे ते स्वराज्याच्या गादीवर बसू शकत नव्हते त्यामुळे महाराणी ताराबाई हिने आपला मुलगा शिवाजी यांना गादीवर बसवलं‌. परंतु औरंगजेबाच्या निधनानंतर शाहू महाराज कैदेतून सुटून बाहेर आले. आणि स्वराज्याच्या गादीवर बसण्याचा खरा मान शाहू महाराजांचा आहे.

असं काही दरबारातील सरदारांना वाटू लागलं आणि त्यामुळे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई असे दोन वेगवेगळे संघ निर्माण झाले. खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव असे सरदार आधी महाराणी ताराबाई यांच्या संघामध्ये होते ते शाहू महाराजांना जाऊन मिळाले.

शाहू महाराजांनी १७०७ मध्ये महाराणी ताराबाई आणि त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध युद्ध घोषित केलं आणि बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑक्टोंबर १७०७ मध्ये खेड येथे लढाई केली आणि त्यात विजय शाहू महाराजांचा झाला. आणि हळूहळू करत महाराणी ताराबाई यांच्या वर्चस्वाखाली असलेले किल्ले शाहू महाराजांना मिळाले.

इतकच नव्हे तर बाळाजी विश्वनाथ यांनी महाराणी ताराबाई यांच्या पक्षातील विश्वासू सरदार यांनादेखील शाहू महाराज यांच्या पक्षात सामील करून घेतले. शाहू महाराजांनी आपल्या स्वतंत्र सत्ता सातारा येथे स्थापित केली त्यामुळे ताराबाई यांनी पराभव पत्करून आपलं कोल्हापूर मध्ये राज्य स्थापन केला.

सरदेशमुखी म्हणजे काय:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या मध्ये कर लादले जायचे. त्यापैकी सरदेशमुखी आणि चौथ हे दोन महत्त्वाचे कर होते. हे कर दोन भागाततून वसूल केले जायचे. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्चस्वाखाली आहेत ते आणि दुसरे तर मोगलांचे भाग पण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्चस्वाखाली होते. सरदेशमुखी हा कर उत्पन्नाच्या १० टक्के असायचा.

शिवाजी महाराजांच्या मध्ये सरदेशमुख त्यावेळेचे प्रमुख असल्यामुळे त्यांना लोकांच्या भल्यासाठी त्यांचं संरक्षण केल्यामुळे कर म्हणजेच महसूल जमा करण्याचा अधिकार होता. चौथ हा लष्करी कर होता. चौथ हा कर तिसऱ्या शत्रूच्या हल्ल्यापासून सौरक्षण पुरवण्यासाठी जमा केला जायचा. हा कर जिंकलेल्या भागातुन गोळा केला जायचा.‌ हा कर विजयी झालेल्या राज्यांकडून वसूल केला जायचा या राज्यांच्या उत्पादनातील चौथा भाग म्हणजे हा कर.

महाराणी ताराबाई यांनी स्वतंत्र राज्य कोठे स्थापन केले:

शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून पुन्हा परतल्यावर शाहू महाराज हेच स्वराज्याचे खरे राजे आहेत असं काही सरदारांना वाटू लागलं महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या मध्ये मतभेद सुरू झाले. महाराणी ताराबाई यांचे काही विश्वासू सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले आणि त्यानंतर शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई यांच्या विरुद्ध युद्ध केलं आणि विजय प्राप्त केला त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी आपला स्वतंत्र राज्य कोल्हापूर मध्ये स्थापन केलं.

महाराणी ताराबाई कोणाची मुलगी होती:

महाराणी ताराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. वडिलांसारखच त्यादेखील शूर व धाडसी कर्तुत्ववान होत्या आणि स्वराज्य बद्दल त्यांची असलेली एकनिष्ठा त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना मिळाली होती.

महाराणी ताराबाई यांचा भद्रकाली असा उल्लेख कोणी केला:

महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमामुळे त्यांनी फक्त स्वराज्यच नाही तर मोगल, आदिलशहा, निजामशहा, दिल्ली पर्यंत आहाकार माजवून ठेवला होता. कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाई यांचे चरित्र, त्यांनी गाजवलेला पराक्रम हे खूप छान प्रकारे एका कवितेच्या माध्यमातून दर्शवले आहेत.

त्यामध्ये ताराबाई यांचा भद्रकाली असा देखील उल्लेख केला आहे. महाराणी ताराबाई यांनी मोगलांना दिलेला लढा इतिहासात महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीचा ठसा उमटवतो.

दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशहाचे गेले पाणी

ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली.

ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते

खचो लागली तेवि मते

कुराणेही खंडली रामराणी भद्रकाली

राणरंगी कृद्ध झाली

प्रलयाची वेळ आली मोगलहो सांभाळा.

महाराणी ताराबाई इतर माहिती:

महाराणी ताराबाई या इतिहासातील एक यशस्वी स्त्री होत्या. त्यांनी स्वराज्य रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूंना लढा दिला. महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाची गाथा अनेक साहित्यामध्ये पाहायला मिळेल. महाराणी ताराऊसाहेब हे पुस्तक अशोकराव शिंदे यांनी लिहिले आहे. त्यासोबतच दुसरे पुस्तक म्हणजे क्षेत्राणी शिवस्नुषा ताराराणी हे पुस्तक रमेश शांतिनाथ भिवरे यांनी लिहिले आहे. या दोन पुस्तकांद्वारे महाराणी ताराबाई यांचे चरित्र, व्यक्तिमत्व तसेच त्यांच्या धाडसाचे व पराक्रमाचे अचूक वर्णन केलेला आहे.

महाराणी ताराबाई मृत्यू :

महाराणी ताराबाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप मोठे पराक्रम करून दाखवले शिवाय एक स्त्री असून त्या काळामध्ये औरंगजेबासारख्या कपटी पुरुषाला आणि पूर्ण मोगल समाजाला पाणी पाजले या थोर महाराणीचा निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झालं. सातारा मधील अजिंक्यतारा किल्ल्यावर महाराणी ताराबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी ताराबाई यांची समाधी क्षेत्र माहुली येथे आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, महाराणी ताराबाई यांची प्रतिमा कशी होती. maharani tarabai information in marathi language त्यांचा जन्म, विवाह तसेच त्यांनी केलेली कार्ये काय आहेत? त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. maharani tarabai information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about maharani tarabai in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही महाराणी ताराबाई यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या rani tarabai माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

7 thoughts on “महाराणी ताराबाई माहिती Maharani Tarabai Information in Marathi”

  1. वरील माहीतीत ताराराणीसाहेबांच्या मृत्यूची तारीख चुकीची आहे असे वाटते…वर्ष 1707 होते असे पुर्वी मझ्या वाचण्यात आले होते.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!