तवा पुलाव रेसिपी मराठी Tawa Pulao Recipe in Marathi

Tawa Pulao Recipe in Marathi तवा पुलाव रेसिपी मराठी तवा पुलाव हि एक भारतीय डिश असून असून हि डिश कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, लग्न आणि वाढदिवस अश्या कार्यक्रमामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे. तवा पुलाव हि एक अशी रेसिपी आहे कि ज्यामध्ये सुंगधी तांदूळ, वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळे मसाले वापरले जातात. तवा पुलाव हि रेसिपी आपण तव्यामध्ये बनवतो त्यामुळे ह्या रेसिपीला तवा पुलाव असे नाव दिले आहे. तवा पुलाव बनवताना सर्वप्रथम एका भांड्यामध्ये भात शिजवला जातो आणि मग तव्यामध्ये इतर मसाले आणि भाज्या घालून फोडणी दिली जाते आणि मग तो शिजवलेला भात सुट्टा करून त्यामध्ये मिक्स केला जातो.

तवा पुलाव हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जाते आणि हि रेसिपी खूप लोकांना आवडते. तवा पुलाव घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. चला तर मग आता आपण तवा पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात.

tawa pulao recipe in marathi
tawa pulao recipe in marathi

तवा पुलाव रेसिपी मराठी – Tawa Pulao Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणार वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

तवा पुलाव कसा बनवला जातो – how to make tawa pulao

तवा पुलाव बनवताना सर्वप्रथम एका भांड्यामध्ये भात शिजवला जातो आणि मग तव्यामध्ये इतर मसाले आणि भाज्या घालून फोडणी दिली जाते आणि मग तो शिजवलेला भात सुट्टा करून त्यामध्ये मिक्स केला जातो.

तवा पुलाव बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • तांदूळ : तवा पुलाव बनवण्यासाठी तांदूळ हा महत्वाचा घटक आहे आणि आपण तवा पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ वापरले तर ते चांगले ठरेल.
  • भाज्या : तवा पुलाव मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात ज्यामुळे पुलावला वेगळीच टेस्ट येते.
  • खडे मसाले : तवा पुलाव मध्ये बदाम फुल, जिरे, दलाची यासारखे काही खडे मसाले वापरलेले असतात आणि भाताला खमंग वास येतो.

तवा पुलाव रेसिपी – tawa pulao recipe 

तवा पुलाव हि एक सोपी रेसिपी आहे जी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकतो. आता आपण घरामध्ये अत्यंत उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि झटपट तवा पुलाव कसा  बनवायचा आणि हा बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागते ते पाहुअयात . चला तर मग जाणून घेवूयात तवा पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि करावी लागणारी कृती.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणार वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

तवा पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make tawa pulao recipe 

तवा पुलाव बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि इतर काही साहित्य लागते जे सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही कारण आपल्याला काही साहित्य बाजारातून देखील आणावे लागते. चला तर मग आता आपण पुलाव बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी बासमती तांदूळ.
  • २ ते ३ वेलदोडे.
  • १ दालचिन तुकडा.
  • १ तमाल पत्री पान.
  • १ बदाम फुल.
  • १/२ चमचा जिरे.
  • १ वाटी फ्लॉवर ( सुट्टा केलेला ).
  • १/२ वाटी गाजर ( चिरलेले ).
  • १/३ वाटी ढबू मिरची ( चिरलेली ).
  • १/२ वाटी मटार ( ताजे ).
  • १ मोठा कांदा ( उभा चिरलेला ).
  • १/२ हळद.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ चमचा भाताचा मसाला.
  • ४ ते ५ चमचे बटर किंवा तूप.
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • मीठ ( चवीनुसार ).

तवा पुलाव बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make tawa pulao recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून तवा पुलाव लासा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तांदळामध्ये १ वाटी पाणी घालून ते अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवा.
  • जोपर्यंत तांदूळ भिजतील त्या वेळेमध्ये सर्व भाज्या चिरून घ्या.
  • अर्ध्या तासानंतर तांदळामधील पाणी गाळून घ्या आणि ते काही वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये २ वाटी पाणी घालून ते मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवा पाणी गरम झाले कि त्यामध्ये तांदूळ त्यामध्ये घाला आणि भात चांगला शिजवून घ्या.
  • शिजलेला भात गार करण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढा आणि गरम असताना त्याला १ चमचा बटर किंवा तूप लावून घ्या आणि तो भात थोडा सुट्टा करा ( सुट्टा करतेवेळी भात मोडणार नाही याची काळजी घ्या ).
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक नॉनस्टिक तवा ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचे बटर किंवा तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका आणि जिरे चांगले फुलले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ते तुपामध्ये थोडा वेळ परतून घ्या मग त्यामध्ये कांदा घाला आणि तो लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • आता यामध्ये फ्लॉवर, गाजर ( चिरलेले ), ढबू मिरची ( चिरलेली ), मटार ( ताजे ) घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • भाज्या चांगल्या भाजल्या कि त्या एका बाजूला करा आणि तव्याच्या रिकाम्या भागामध्ये तूप घाला आणि मग त्यामध्ये खडे मसाले जसे कि वेलदोडे, तमाल पत्री, बदाम फुल आणि दलाची घाला आणि ते भाजून घ्या. मसाल्यांचा खमंग वास सुटला कि भाज्या आणि मसाले एकत्र करा आणि भाजा.
  • आता यामध्ये भाताचा मसाला, हळद, लाल मिरची पावडर घाला आणि मिक्स करा.
  • आता यामध्ये शिजवून ठेवलेला भात घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करा.
  • आपला तवा पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.

तवा पुलाव कश्यासोबत सर्व्ह करतात – serving suggestions 

  • तवा पुलाव आपण टोमॅटो सॉस, दही कांदा किंवा कोणत्याही रायात्यासोबत खूप छान लागतो.

आम्ही दिलेल्या tawa pulao recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तवा पुलाव रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tawa pulao recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि veg tawa pulao recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये paneer tawa pulao recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!