व्हेज पुलाव रेसिपी मराठी Veg Pulao Recipe in Marathi

Veg Pulao Recipe in Marathi – Pulav Recipe in Marathi व्हेज पुलाव रेसिपी मराठी पुलाव हि एक भारतामध्ये बनवली जाणारी आणि खाल्ली जाणारी लोकप्रिय डिश आहे जी कमी वेळेत बनते पण या डिशच्या स्वादामुळे मन अगदी तृप्त होऊन जाते. ही रेसिपी सोपी, झटपट आणि व्यस्त लोकांच्यासाठी लगेच बनणारी डिश आहे तसेच ती आठवड्याच्या रात्रीच्या जेवणासाठी योग्य आहे. खरं तर, ही पुलाव रेसिपी प्रेशर कुकर किंवा पॉटमध्ये बनवली जाते आणि या पोस्टमध्ये मी प्रेशर कुकरमध्ये आणि पॉटमध्ये पुलाव कसा बनवला जातो या दोन्ही पध्दती शेअर करणार आहे. चिकन पुलाव हा बासमती, काही भाज्या आणि काही मसाल्यांनी बनवलेला एक चविष्ट, स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे.

आणि पुलाव हा बिर्याणीसारखा फारसा मसालेदार नसतो तो हलका मसालेदार बनवलेला असतो. पुलाव हा कमी वेळेत बनणारा पदार्थ आहे जो सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांच्यासाठी एक डिनर बनू शकतो तसेच हि रेसिपी झटपट बनणारी रेसिपी आहे जी आपण गडबडीच्या वेळी जेवण म्हणून खावू शकतो. चला तर मग पुलाव रेसिपी कशी बनवायची हे आपण आज या लेखामध्ये पाहूयात.

veg pulao recipe in marathi
veg pulao recipe in marathi

व्हेज पुलाव रेसिपी मराठी – Veg Pulao Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
वाढणी३ ते ४ व्यक्ती
पाककलाभारतीय

पुलाव म्हणजे काय – Pulav Recipe in Marathi

पुलाव हा बासमती तांदूळ, भाज्या आणि मसाल्यांनी बनवले जाते आणि मसाले पुलावला सुगंधित चव देतात. पुलाव या रेसिपीमध्ये कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, बटाटा, बिन्स, मटार यासारख्या काही भाज्या घातल्या जातात आणि यामध्ये खडे मसाले ( दालचिन. लवंग, बदाम फुल, वेलदोडे ) घालून बासमती तांदूळ शिजवला जातो.

पुलाव कसा बनवतात – how to make veg pulav recipe in marathi

पुलाव हा एक लोकप्रिय भाताचा प्रकार असून हा पदार्थ लोक खूप आवडीने खातात. पुलाव हा शक्यतो काही छोट्या मोठ्या समारंभसाठी, बर्थडे पार्टीसाठी किंवा कोणत्याही छोट्या पार्टीसाठी आपण व्हेज  पुलाव बनवणे योग्य ठरू शकते. व्हेज पुलाव आपल्याला काही भाज्या आणि खडे मसाले लागतात ते शक्यतो आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असू शकतात. पुलाव बनवण्याची रेसिपी हि खूप सोपी आणि कमी वेळेमध्ये बनणारी रेसिपी आहे म्हणून आज आपण या लेखामध्ये व्हेज पुलाव रेसिपी पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजवण्यासाठी लागणारा वेळ२० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
वाढणी३ ते ४ व्यक्ती
पाककलाभारतीय

व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make veg pulao 

  • १ वाटी बासमती तांदूळ.
  • १ मोठा चमचा तेल.
  • २ वाटी पाणी.
  • १ मध्यम आकाराचा कांदा ( उभा चिरलेला ).
  • १ टोमॅटो ( लांब किंवा उभा चिरलेला ).
  • ३ हिरव्या मिरच्या ( उभा अर्धा भाग केलेल्या ).
  • १ शिमला मिरची ( उभी चिरलेली .
  • १ छोटी वाटी गाजर ( चौकोनी चिरलेले .
  • १ मोठा चमचा मटार.
  • दीड चमचा आले लसूण पेस्ट.
  • अर्धा चमचा वेलची पावडर.
  • २ चमचे काजू तुकडे.
  • २ मोठे चमचे कोथिंबीर (बारीक चिरलेली).
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • मीठ (चवीनुसार).

पुलाव बनवण्यासाठी वापरले जाणारे खडे मसाले 

  • १ बदाम फुल
  • १ मसाला वेलदोडा.
  • २ तमालपत्र तमाल पत्री पाने.
  • ३ ते ४ लवंग.
  • अर्धा चमचा जिरे.
  • २ साधे वेलदोडे.

पुलाव बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make pulao recipe 

पुलाव कुकर बनवण्याची पध्दत 

  • सर्वप्रथम तांदूळ एका भांड्यामध्ये घेवून ते स्वच्छ धुवून घ्या.
  • आता तांदूळ १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा आणि मग त्यानंतर तांदळामधील पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा (भिजवल्याने तांदळाचे दाणे अधिक फुगीर होण्यास मदत होते).
  • आता कुकर मध्यम किंवा मोठ्या आचेवर गरम करा आणि कुकर गरम झाला कि त्यामध्ये तेल घाला.
  • तेल गरम होताच त्यामध्ये सर्व खडे मसाले घाला जसे कि बदाम फुल, तमालपत्र, लवंग, जिरे, मसाला वेलदोडा आणि साधे वेलदोडे आणि हे सर्व मसाले छान वास येईपर्यंत परतून घ्या
  • आता यामध्ये कांदा, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कांदा तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
  • त्यानंतर यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि मटार घालून त्या भाज्या चांगल्या भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये गरम मसाला, मीठ ( चवीनुसार ) घालून चांगले मिक्स करा.
  • नंतर त्यात धुतलेले व भिजवलेले बासमती तांदूळ घालून पुन्हा चांगले मिक्स करावे.
  • पाणी घालून कुकरचे झाकण झाकून भात १० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या (किमान ३ ते ४ शिट्ट्या द्या).
  • आता वरती तळलेले काजू घाला आणि ते सर्व्ह करते वेळी मिक्स करा.
  • पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
  • सर्व्हिंग डिशमध्ये पुलाव काढून कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.

पुलाव कढईमध्ये बनवण्याची पध्दत – tawa pulao recipe in marathi 

  • सर्वप्रथम तांदूळ एका भांड्यामध्ये घेवून ते स्वच्छ धुवून घ्या.
  • आता त्यामध्ये पाणी, २ ते ३ काळी मिरी आणि एक दालचिन तुकडा घालून ते तांदूळ ८० टक्के शिजवून घ्या आणि बाजूला ठेवा.
  • तसेच कढईतील तेलामध्ये काजू तळून घ्या आणि ते प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.
  • आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्य आचेवर गरम करून त्यामध्ये तेल घाला.
  • त्यामधील तेल गरम झाले कि तेलामध्ये जिरे, बदाम फुल, लवंग, जिरे, मसाला वेलदोडा आणि साधे वेलदोडे आणि हे सर्व मसाले छान वास येईपर्यंत परतून घ्या.
  • आता यामध्ये कांदा, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कांद्याला तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि मटार घालून त्या भाज्या चांगल्या भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये गरम मसाला, मीठ ( चवीनुसार ) घालून चांगले मिक्स करा आता या मध्ये ८० टक्के शिजवून घेतलेला भात घाला आणि ते झाकण लावून ते ८ ते १० मिनिटासाठी चांगले वाफवून घ्या. त्यामुळे आपल्या भाज्या देखील मऊ होतील आणि ८० टक्के शिजलेला भात देखील पूर्णपणे शिजून जाईल.
  • आता या भातामध्ये तळलेले काजू आणि कोथिंबीर घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • तुमचा चमचमीत व्हेज पुलाव तयार झाला.

पुलाव आपण कश्या सोबत खाऊ शकतो – serving suggestions 

आपण हा पुलाव टोमॅटो सॉस, कांदा रायता, दही किंवा डाळ तडक्यासोबत खावू शकतो.

टिप्स ( Tips ) 

  • बासमती तांदूळ नेहमी किमान दोनदा धुवा.
  • पुलावमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता.
  • हिरव्या मिरच्या घालून केलेला पुलाव जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरची पावडर घालू शकता.

आम्ही दिलेल्या pulao recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज पुलाव रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg pulao recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pulav recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pulav bhat recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!