Tern Bird Information in Marathi टर्न पक्षी हा एक टोकदार चोच, काळी पांढरी पिसे असणार एक छोटा सागरी पक्षी आहे. टर्न या पक्ष्याच्या जवळ जवळ ४० प्रजाती आहेत. हे पक्षी शक्यतो समुद्रकिनारी किवा अंतर्देशीय पाण्यामध्ये वास्तव्य करतात आणि टर्न हे पक्षी जगभरामध्ये आढळतात. टर्न या पक्ष्याच्या सर्वात जास्त प्रजाती ह्या महासागरामध्ये आढळतात. हे पक्षी बऱ्याचदा स्तलांतर करतात पण ते जवळच्या अंतरावर स्थलांतरित होतात. स्थलांतरासाठी खूप लांबचे अंतर निवडत नाहीत. टर्न या पक्ष्यातील सर्वात प्रसिध्द आणि उल्लेखनीय जात म्हणजे आर्क्टिक टर्न होय हे पक्षी अंटार्क्टिक प्रदेशामध्ये आढळतात. गुल्सच्या तुलनेत हे पक्षी अधिक बारीक, लहान पाय व लांब पंक असतात आणि या पक्ष्याची लांबी सुमारे २५ ते ५५ सेंटी मीटर असू शकते.
टर्न पक्षाची माहिती – Tern Bird Information in Marathi
4 टर्न या पक्ष्याचे प्रकार ( types of tern bird )
टर्न या पक्ष्याच्या जवळ जवळ ४० प्रजाती आहेत आणि या वेगवेगळ्या जातींप्रमाणे त्यांचे आकार, रंग, रूप वेगवेगळे आहे. काही लोकप्रिय टर्न पक्ष्याच्या जाती आपण जाणून घेवूयात.
नक्की वाचा: कोकिळा पक्षी माहिती
आर्क्टिक टर्न ( arctic tern Information in Marathi )
आर्क्टिक टर्न या पक्ष्याचे स्थानिक नाव सी स्वालन असे आहे. या पक्ष्याच्या डोक्यावर काळा रंग असतो जो टोपी घातल्या सारखा दिसतो आणि हे पक्षी पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे असतात. हे पक्षी बहुतेकदा अंटार्क्टिक प्रदेशामध्ये किनारपट्टीवर आढळतात. या पक्ष्यांचा निरोगीपणा हा सागरी वातावरणावर अवलंबून असतो आणि हे पक्षी जेथे माश्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते तेथेच आपला निवारा करतात. आर्क्टिक टर्न हे अंतर्देशीय प्रवासी आहेत जे ग्रीष्ममध्ये युकेचे रहिवासी असतात आणि हिवाळ्यामध्ये हे पक्षी अंटार्क्टिक प्रदेशामध्ये राहतात.
- लांबी/आकार : या पक्ष्याची लांबी ३२ ते ३५ सेंटी मीटर असते.
- वजन : आर्क्टिक टर्न या पक्ष्यांचे वजन ९० ते १२० ग्रॅम असते.
- निवारा : सागरी किनारपट्टी किवा वेटलँड.
- आहार : ह्या पक्ष्यांना मुख्यता मासे खाण्यास खूप आवडते पण हे काही वेळेला कीटक आणि क्रस्टेशियन्सहि खातात.
- शास्त्रीय नाव : स्टेर्ण पॅराडीसीया
ब्लॅक टर्न ( black tern bird information in Marathi )
ब्लॅक टर्न हे पक्षी एक लहान पक्षी आहेत आणि या पक्ष्याचे डोके आणि संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असते आणि पंख आणि शेपूट हि राखाडी रंगाची असते. हे पक्षी पाण्यामध्ये जावून आपले अन्न शोधतात. या पक्ष्यांचे पंख उन्हाळ्यामध्ये गडद राखाडी रंगाचे असतात आणि हिवाळ्य मध्ये या पक्ष्यांच्या पंखाचा रंग फिकट राखाडी होतो.
- लांबी/आकार : ब्लॅक टर्न या पक्ष्याची लांबी २२ ते २४ सेंटी मीटर असते.
- वजन : ब्लॅक टर्न या पक्ष्यांचे वजन ७० ते ७५ ग्रॅम असते.
- निवारा : ब्लॅक टर्न हे पक्षी रेव खड्डे, छोटे तलाव आणि जलाशयाच्या अवतीभोवती राहतात.
- आहार : हर पक्षी लहान मासे, कीटक इंवरटेब्रेट्स या प्रकारचे अन्न खातात
- शास्त्रीय नाव : ब्लॅक टर्न या पक्ष्याचे शास्त्रीय नाव क्लीडोनिआस नायजर असे आहे.
कॉमन टर्न ( common tern bird information in Marathi )
कॉमन टर्न हे एक रमणीय चांदी राखाडी आणि पांढऱ्या रंगाचे असतात आणि या पक्ष्याची शेपूट लांब असते. या पक्ष्याचे सी स्वालन हे टोपण नाव आहे. हे आनंदायक आणि मोहक पक्षी आहेत आणि हे पाण्यावरून मासे पकडण्यासाठी सतत फेऱ्या मारत असतात. कॉमन टर्न हि अंतर्देशीय आढळणारी प्रजाती आहे.
- लांबी/आकार : कॉमन टर्न या पक्ष्याची लांबी ३१ ते ३५ सेंटी मीटर असते.
- वजन : कॉमन टर्न या पक्ष्यांचे वजन १०० ते १५० ग्रॅम असते.
- निवारा : कॉमन टर्न हे पक्षी शिंगल किनारे, शिंगल बार असणाऱ्या नद्या. खडकाळ बेट, अंतर्देशीय खडीचे खड्डे, गोड्या पाण्याच्या ठिकाणी किवा कोणत्याही जलाशयाच्या आसपास राहतात.
- आहार : ह्या पक्ष्यांचा शक्यतो मासे हा आवडता आहार आहे.
- शास्त्रीय नाव : कॉमन टर्न या पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्टर्ना हिरुंडो असे आहे.
लिटील टर्न ( little tern )
लिटील टर्न हे पक्षी आनंददायक आणि खूप गोंगाट करणारे एक समुद्री पक्षी आहे आणि हा युके मधील सर्वात छोटा पक्षी आहे. या पक्ष्याची शेपूल लहान असते आणि हे सर्वात वेगवान उड्डाण करतात. नर पक्षी मादा पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी मासे पकडून घेवून जातात. हे पक्षी जंगलांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये आढळतात
- लांबी/आकार : लिटील टर्न या पक्ष्याची लांबी २२ ते २४ सेंटी मीटर असते.
- वजन : लिटील टर्न या पक्ष्यांचे वजन ४९ ते ६३ ग्रॅम असते.
- निवारा : लिटील टर्न हे पक्षी उंच टेकडीवर राहतात आणि हे पक्षी इंग्लंडच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवर आढळतात.
- आहार : लिटील टर्न ह्या पक्ष्यांचा शक्यतो मासे हा आवडता आहार आहे.
- शास्त्रीय नाव : लिटील टर्न या पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्टेरनुला अल्बीफ्रोन्स असे आहे.
टर्न पक्ष्याबद्दल तथ्ये ( facts of tern bird )
- हे पक्षी दरवर्षी ३५००० किलो मीटरचा प्रवास करतात.
- टर्न हे पक्षी आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या भागामादेह आढळतात.
- टर्न या पक्ष्यांना स्थलांतरित समुद्री पक्षी म्हणून ओळखले जाते कारण हे पक्षी समुद्र किनारपट्टीवर राहतात.
- एका टर्न वसाहतीमध्ये साधारणता २००० पक्षी असतात.
- मादा टर्न पक्षी एका वेळी २ ते ३ अंडी देतात.
- आर्क्टिक टर्न हे पक्षी ताशी ३५ ते 40 किलो मीटर वेगाने उडू शकतात.
- नक्की वाचा: ससाणा पक्षाची माहिती
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा टर्न पक्षी tern bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. arctic tern bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about arctic tern bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही टर्न पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या tern bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट