tsunami information in marathi त्सुनामी विषयी माहिती, नैसर्गिक बिगाडामुळे निसर्गाला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते आणि त्यामधील एक नैसर्गिक आपत्ती म्हणजे त्सुनामी आणि आज आपण या लेखामध्ये त्सुनामी विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्सुनामी होण्याचे कारण म्हणजे भूकंप किंवा समुद्राखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे समुद्रातील निर्माण होणाऱ्या लाटांच्या मालिका म्हणजे त्सुनामी. त्सुनामी लाटांचा वेग हा लाटांच्या उगमापासून अंतरापेक्षा समुद्राच्या खोलीवर अवलंबून असतो.
आणि हा लाटा विमानाच्या वेगाने प्रवास करू शकतात आणि उथळ पाण्यामध्ये पोहचल्यानंतर त्याला मंदावतात. त्सुनामी हि सर्वात शक्तिशाली आणि विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आहे, ज्याला भरती ओहोटी म्हणून देखील ओळखले जाते.
त्सुनामी हा एक जपानी शब्द असून याला इंग्रजीमध्ये हार्बर व्हेव असे म्हणतात आणि याला पूर्वी भूकंपाच्या लाटा किंवा आहोटीच्या लाटा म्हणून ओळखले जात होते आणि जरी त्सुनामीचा समुद्र किनाऱ्यावर होणारा परिणाम हा त्सुनामी अडलाण्याच्या वेळी भरतीच्या पातळीवर अवलंबून असला तरी त्सुनामी भरती ओहोटीशी संबधित नसतात.
त्सुनामी विषयी माहिती – Tsunami Information in Marathi
त्सुनामी म्हणजे काय – tsunami meaning in marathi
- त्सुनामी हि लाटांची मालिका आहे, ज्यामध्ये समुद्राच्या मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.
- त्सुनामी होण्याचे कारण म्हणजे भूकंप किंवा समुद्राखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे समुद्रातील निर्माण होणाऱ्या लाटांच्या मालिका म्हणजे त्सुनामी.
त्सुनामीची कारणे – reasons
त्सुनामी होण्याची काही नैसर्गिक कारणे आहेत ती म्हणजे भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक, स्फोट, उल्का, भूकंप, इत्यादी कारणे आहेत.
त्सुनामीविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- त्सुनामाची जी पहिली लाट असते ती केंव्हाही मजबूत आणि शक्तिशाली नसते, परंतु त्याच्या लागोपाठ ज्या लाटा असतात त्या लाटांच्यामध्ये खूप शक्ती असते आणि त्या मजबूत देखील असतात आणि ह्या लाटा विनाशकारी नैसर्गिक आपत्ती देखील अनु शकतात.
- त्सुनामी हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, भूकंपामुळे आणि भूस्खलनामुळे या सारख्या कारणांच्यामुळे होते. महासागरासह महाकाय उल्का आघाताने त्सुनामी निर्माण होऊ शकते आणि या लाटा १०० फुटापेक्षा जास्त उंचीवर पोहचू शकतात.
- त्सुनामी सुमारे ५०० मैल ते ८०५ किलो मीटर वेगाने प्रवास करू शकतात.
- पाण्याची खोली हि एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणाचे अन्तर आणि भूकंप किंवा इतर घटना घडलेल्या वेळेचा वापर करून केलेल्या मोजणीच्या आधारे शास्त्रज्ञ जगभरामध्ये जवळपास कुठेही त्सुनामी कधी येईल याचा अचूक अंदाज लाऊ शकतात.
- हवाईला त्सुनामीचा नेहमीच मोठा धोका असू शकतो आणि त्यांना दरवर्षी सुमारे १ आणि दर ७ वर्षांनी एक गंभीर धोका असतो. हवाई या ठिकाणी सर्वात मोठी सुनामी हि १९४६ मध्ये झाली होती आणि हि हिलो बेटाच्या किनारपट्टीवर ५०० मैल प्रतितास वेगाने ३० फुट लाटा वर उंचावल्या होत्या आणि त्या उसळल्या होत्या.
- तरंग ज्या दराने तिची उर्जा गमावते त्याचा त्याच्या तरंगलांबीशी विपरीत संबध असतो आणि त्सुनामीची तरंगलांबी खूप मोठी असल्याने, ती पसरत असताना थोडी उर्जा गमावेल. अशाप्रकारे, खूप खोल पाण्यात त्सुनामी उर्जा कमी न होता उच्च वेगाने प्रवास करेल. उदाहरणार्थ : जेंव्हा महासागर ६१०० मीटर खोल असतो तेंव्हा त्सुनामी सुमारे ८९० किमी / तास वेगाने प्रवास करते.
- त्सुनामी हा जपानी शब्द आहे आणि याचा अर्थ हार्बर वेव्ह असा होतो.
- २००४ भारतीय त्सुनामीचा रिश्टर स्केलवर ९.० तीव्रतेचा केंद्रबिंदू होता आणि त्याच भारतीय त्सुनामीचे थायलंड ते आफ्रिकेपर्यंत चौदा वेगवेगळ्या देशांना धडक दिली होती आणि यामध्ये जवळजवळ २५०००० लोक मरण पावले होते.
त्सुनामी विषयी घ्यावयाची सावधगिरी – precaustions
- जर सखल किनारपट्टी भागामध्ये असलेली घरे आणि इतर इमारती सुरक्षित नाहीत आणि त्सुनामीचा इशारा असल्यास त्या किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारच्या इमारती आणि घरे बांधणे योग्य नाही आणि लोकांनी त्या ठिकाणी राहणे देखील योग्य नाही.
- त्सुनामी आणीबाणीच्या वेळी तुमच्या स्थानिक रेडीओ किंवा टेलिव्हिजन स्टेशनशी संपर्कात रहा.
- आपत्कालीन सेवांच्याद्वारे all clear सुचना जारी होईपर्यंत धोक्यापासून दूर रहा.
सर्वात प्राणघातक त्सुनामी कोणकोणत्या देशामध्ये झाली होती ?
सर्वात प्राणघातक त्सुनामी कोणकोणत्या देशांच्यामध्ये झाली होती ते आपण खाली पाहणार आहोत.
इटली (१७८३)
इटली मध्ये १७८३ मध्ये झालेला भूकंप हा कॅलाबिया या प्रदेशामध्ये झाला आणि यावेळी या ठिकाणी भूकंपाचा पाच वेळा एका पाठोपाठ एक क्रम झाला होता आणि या भूकंपामुळे नैसर्गिक आपत्तीला तर सामोरे जावे लागलेच परंतु या त्सुनामीमध्ये ३०००० ते ५०००० लोकांचा मृत्यू झाला होता.
सुमात्रा (२००४)
इंडोनेशिया मधील सुमात्रा या ठिकाणी देखील २००४ मध्ये भूकंप झाला होता आणि हि सुनामी आधुनिक काळातील सर्वात विनाशकारी त्सुनामी होती आणि या त्सुनामीमुळे १४ देशातील २३०००० लोक मृत्युमुखी पडले होते आणि आतापर्यंत नोंदवलेल्या हा तिसरा सर्वात मोठा भूकंप होता आणि ज्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी ८ ते १० मिनिटे झाला होता.
लिस्बन (१७५५)
लिस्बन या ठिकाणी सर्वात मोठी त्सुनामी १७५५ मध्ये झाली होती आणि लिस्बन हे जवळजवळ संपूर्णपणे नाश पावले होते आणि यामध्ये १०००० ते १००००० लोकांचा मृत्यू झाला होता.
जपान (२०११) – japan tsunami information in marathi
२०११ मध्ये जपानच्या ईशान्य किनारपट्टीला ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि या भूकंपामुळे एक प्रचंड त्सुनामी आली होती जी अंतर्देशात पसरली होती.
आम्ही दिलेल्या tsunami information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर त्सुनामी विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tsunami meaning in marathi या tsunami in india information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about tsunami in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tsunami information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट