Tulja Bhavani History in Marathi आई तुळजा भवानी इतिहास तुळजाभवानी मंदिर हे देवी पार्वती यांना समर्पित एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थित आहे. या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हे मंदिर सुमारे बाराव्या शतकामध्ये महामंडलेश्वर मर्ददेव कदंब यांनी बांधले होत. हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक मानले जाते जे सोलापूर पासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावरती वसलेले आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी व महाराष्ट्रातील लाखो घरांचे कुलदैवत असणारी तुळजाभवानी आई यांचे क्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्यपीठ मानले जाते.
वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तुळजाभवानी देवीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तुळजा, तुराजा, त्वरिता, दुर्गा, पार्वती, अंबा, जगदंबा.. अशी तुळजा भवानी आईची वेगवेगळी रूपे आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी ही लोकांच्या नवसाला पावणारी आहे. लाखो भक्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळजापूर येथे गर्दी करतात. संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या देवीचे हे स्थान जागृत आहे.
आई तुळजा भवानी इतिहास – Tulja Bhavani History in Marathi
Shri Tulja Bhavani
महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर होय. हे गाव समुद्रसपाटीपासून २७० फूट उंचावर आहे. आधी हा भाग एक डोंगराळ व घनदाट अरण्याने व्यापलेला होता. तुळजाभवानी हे देवी पार्वती चे एक रूप मानले जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात या देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्राबाहेर देखील तेलंगणा, उत्तर कर्नाटक व नेपाळमध्ये देखील या देवीची पूजा केली जाते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानी देवीचे निस्सीम भक्त होते. प्रत्येक युद्ध, लढाईला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे येऊन आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. त्यांची भवानी देवी वरती अपार श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती बघून देवी तुळजा भवानी प्रसन्न झाली आणि तिने छत्रपती संभाजी महाराज यांना भवानी तलवार दिली. ज्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक युद्धात केला आणि ते यशस्वी झाले अस इतिहासात सांगितले गेले आहे.
तुळजाभवानी मंदिर हे या डोंगराळ भागात वसलेले आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन मोठे प्रवेशद्वार आहेत. हाजी महाद्वार असं एका प्रवेशद्वाराचे नाव आहे तर दुसर्या प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. या दोन महाद्वाराच्या द्वारे मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायर्या उतरून खाली गेल्यावर उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यालय पहायला मिळेल.
पुढे गोमुख तीर्थ आहे जिथे भाविक देवीचे दर्शन करण्यापूर्वी स्नान करतात आणि त्याच्या अगदी समोरच कल्लोळ तीर्थ आहे. मंदिराजवळ इतर देवदेवतांचे देखील मंदिर आहे जसं प्रमुख मंदिराच्या मुख्य दाराजवळ उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक गणपतीचे मंदिर आहे. पुढे आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही बाजूलाच आहे. हे प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरले आहे. देवीचे दर्शन करण्यासाठी सरदार निंबाळकर या प्रवेशद्वारातून पुढे मंदिराच्या आवारात जावे लागते जिथे भाविकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे आणि याच जागेवरून श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते.
देवीचे मंदिर हे भक्तांना अधिक आकर्षित करतं हे मंदिर बालाघाट डोंगराच्या वरील यमुनाचल या डोंगरावर बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष सापडले आहेत. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लोळ तीर्थ, गोमूख इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषांवरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधले गेले असावे असे इतिहासकार सांगतात. मंदिर हेमाडपंथी असून त्यावरती कोरिव काम केले गेले आहे. मंदिराबद्दल सांगायचं झालं तर चांदीच्या पत्राने मंदिराचा मुख्य गाभारा घडविला आहे व त्यावरती अगदी बारीक असे सुरेख नक्षीकाम केले गेले आहे.
श्री तुळजाभवानी देवीची काळा पाषाणाची मूर्ती देखील याच ठिकाणी आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंचीची आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी देवीच ते सिंहासनावरती उभ असणार तेजस्वी रूप, आईच्या आठ हातांमध्ये त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या पाठीवरती बाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. देवी आईचा उजवा पाय महिषासुर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे.
आणि या दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. मार्केंडेय ऋषी व सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती डाव्या बाजूला पाहायला मिळते. माहूर येथील रेणुका, कोल्हापूर येथील महालक्ष्मी आणी वखणी येथील सप्तशृंगी या मंदिरांसह तुळजापूर येथील भवानी मंदिर हे महाराष्ट्रातील चार महान शक्तिपीठे आहेत. येथील देवीची मुर्ती चलमुर्ती आहे देवीच्या उत्सवामध्ये श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती प्रत्यक्षात पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते.
वर्षातून तीन वेळा मुर्ती हलवली जाते. सिंहासनावरून हलवून ती गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव, शांकभरी नवरात्र उत्सव, अश्विनी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा इत्यादी उत्सव साजरे केले जातात. तुळजाभवानी देवीची महती सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा उपलब्ध आहे तसेच अनेक पुराणांमध्ये तुळजाभवानी देवीची माहिती मिळते. देवीने वेगवेगळे रुपांन मधून आपल्या भक्तांना आशीर्वाद किंवा मार्गदर्शन व त्यांचे संरक्षण केले आहे.
स्कंदपुराणात देवीची एक अवतार कथा प्रसिद्ध आहे. कर्दम ऋषी त्यांची पत्नी अनुभूती व त्यांचा मुलगा असं एक कुटुंब कृतयुगात राहत होते. अनुभूती या सुंदर व सुशील होत्या. कर्दम ऋषी मरण पावले आपल्या पतीच्या निधनानंतर अनुभूती यांनी सती जाण्याची इच्छा दर्शवली परंतु त्यांच्यासोबत त्यांचे लहान मुल देखील होते म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला आणि त्या मंदाकिनी नदीच्या काठी आपल्या लहान मुलासोबत तपश्चर्येला बसल्या.
गोकुळ नावाचा राक्षस त्यावेळी तिथे आला आणि त्याने अनुभूती यांच्यावरती वाईट नजर टाकत त्यांना त्रास दिला तिचे पतिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला या राक्षसाच्या तावडीतून सुटण्यासाठी अनुभूती ने तुळजा भवानी जवळ प्रार्थना केली आणि आपल्या भक्तांच्या हाकेला धावणारी आई तुळजाभवानी तिथे प्रकट झाली. देवीने राक्षसाचा वध केला तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमी म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला.
यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरुन यमुनाचल उर्फ बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव केले. ज्यावेळी प्रभु रामचंद्र वनवासात होते त्यावेळी सीतामाईच्या शोधामध्ये श्री भगवती ने दर्शन देऊन सीतामाईचा लवकरच शोध लागेल असा आशीर्वाद भगवान राम यांना दिला होता. अखंड भारतामध्ये त्रिगुणात्मक आदिशक्तीची महाकाली, श्री महालक्ष्मी व महासरस्वती अशी तीन स्थान आहेत व श्री भवानी चे स्थान या त्रिगुणात्मक अंशांचे अधिष्ठान मानले जाते.
तुळजाभवानी देवीचे दुसरे रूप म्हणजे महिषासुरमर्दिनी आहे. देवीच्या ह्या रूपाबद्दल देखील एक कथा प्रचलित आहे. महिषासुर नावाचा राक्षस देवी-देवतांना त्रास देत होता तेव्हा सर्व देव एकत्र आले व त्यांनी ब्रम्हा विष्णू व महेश यांच्याकडे त्यांना या राक्षसापासून वाचवण्यासाठी विनंती केली. ब्रह्मा विष्णू व महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने श्री तुळजाभवानी देवी साकर झाली देवीने महिषासुर राक्षसा बरोबर युद्ध केले.
सर्वप्रथम देवीने राक्षसाचे सैन्य संपवले. म्हणून महिषासुर राक्षस महिषाचे रूप धारण करून देवीशी युद्ध केलं देवीने पाशाचा वापर करून महिषासुराला बांधून टाकले. महिषासुरा ने सिंहाचे रूप धारण केले तर देवीने सिंहास तलवारीने ठार मारले राक्षसाने पुन्हा महिषाचे रूप धारण केलं तेव्हा त्याने देवी वर आपल्या शिंगांनी पर्वताचा वर्षाव केला देवीने आपल्या बाणाचा वापर करून पर्वताचे तुकडे केले.
महिषासुर राक्षस वेगवेगळी रूप धारण करून देवीशी युद्ध करत होता. अखेर त्याने अर्ध राक्षस आणि अर्ध मनुष्य असे रूप धारण केलं त्यावेळी तुळजाभवानी देवीने महिषासुर राक्षसाला आपल्या तलवारीने ठार मारून टाकले म्हणूनच देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. वीर वरदायिनी, इंद्रवरदायनी, रामवरदायनी, महिषासुरमर्दिनी म्हणून श्री तुळजाभवानी प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र तुळजापूर हे जागृत देवस्थान आहे.
आम्ही दिलेल्या tulja bhavani history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आई तुळजा भवानी इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tulja bhavani temple history in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of tulja bhavani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shri tulja bhavani Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट