umaji naik information in marathi उमाजी नाईक यांची माहिती मराठी, आपल्या सर्वांना माहित आहे कि आपल्या भारतावर कित्येक वर्ष भारताने राज्य केले आणि भारतातील लोकांच्यावर अन्याय केले तसेच देशातील ऐतिहासिक स्मारके देखील उद्वस्त करून टाकले आणि परंतु ब्रिटिशांना देश सोडून जाण्यासाठी किंवा त्यांच्या पासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले होते आणि उमाजी नाईक यांनी देखील आपल्या देशाला ब्रिटीशांच्या पासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. आज आपण या लेखामध्ये उमाजी नाईक यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या ठिकाणी ७ सप्टेंबर १७९१ मध्ये झाला आणि ते रामोशी कुटुंबातील होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी आणि आईचे नाव लक्ष्मीबाई खोमणे असे होते. आपल्या पैकी अनेकांना असे माहित आहे ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीच्याविरुध्द सर्वप्रथम आवाज हा १८५७ मध्ये उटवला होता परंतु हे खरे नाहीत तर ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीच्याविरुध्द सर्वप्रथम आवाज क्रांतिकारक हे उमाजी नाईक हे होते.
उमाजी नाईक यांची माहिती – Umaji Naik Information in Marathi
पूर्ण नाव | उमाजी नाईक |
जन्म | ७ सप्टेंबर १७९१ |
ठिकाण | पुणे जिल्ह्यातील भिवडी गावामध्ये झाला. |
आईचे नाव | लक्ष्मीबाई |
वडिलांचे नाव | दादोजी खोमणे |
उमाजी नाईक यांचे कुटुंब आणि बालपण
उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या ठिकाणी ७ सप्टेंबर १७९१ मध्ये झाला आणि ते रामोशी कुटुंबातील होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी आणि आईचे नाव लक्ष्मीबाई खोमणे असे होते. दादोजी खोमणे हे पुरंदर या ठिकाणी वास करत होते आणि पुरंदर किल्ल्याची जबाबदारी हि त्यांच्या वडिलांच्या कडे होती.
उमाजी हे लहानपणी पासूनच हुशार होते आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी लहानपणी पासूनच सर्व समकालीन मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण दिले होते. ते लवकरच तलवारबाजी, धनुष्यबाण आणि भालाफेक या सारखी वेगवेगळे शस्त्रे कशी वापरायची हे शिकले होते त्यांनतर जस जसे मोठे होऊ लागले त्यांची सामाजिक व्यवहारामध्ये देखील ओळख वाढू लागली होती.
उमाजी नाईक यांचा इतिहास – umaji naik history in marathi
इंग्रजांनी १८ व्या शतकामध्ये भारतामध्ये पाऊल टाकले आणि भारताचा अनेक भाग घेण्यास त्यांना यश मिळाले आणि त्यांनी भारतामध्ये त्यांचे साम्राज्य बळकट बनवले तसेच त्यांनी मराठी साम्राज्याचा भाग देखील घेण्यास सुरुवात केली आणि तसेच त्यांनी पुणे देखील आपल्या ताब्यात घेतले आणि बाजीराव दुसरा याला आपला प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले आणि स्थानिक प्रतिकाराचे जाले उद्वस्त करण्यासाठी आपल्या विश्वासू लोकांची नेमणूक हि पुणे भागातील किल्ल्यांच्यावर केली.
पुरंदर हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये होते आणि ब्रिटिशांनी पुरंदर किल्ल्याची जबाबदारी रामोशी कुळाकडून काढून घेतली आणि यामुळे उमाजी नाईक दुखी झाले परंतु ते पाठीमागे वळले नाहीत कारण ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मनात होते आणि म्हणून त्यांनी स्वराज्यासाठी घोषणा देण्यासाठी सुरुवात केली आणि त्यांनी पूर्वजांच्या भूमीवर परीकीयांना राज्य करू देणार नाही असा निशाचं देखील केल.
त्यांनी त्याचे साथीदार कृष्ण नाईक, विठुजी नाईक आणि बापुजी सोळसकर यांच्यासोबर जेजुरी येथील प्रसिध्द आणि पवित्र मंदिरामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी शपथ घेतली आणि ते ब्रिटीशांच्याविरुध्द आवाज उठवणारे पहिले सैनिक बनले. त्यांनी प्रथम इंग्रज आणि स्थानिक श्रीमंत लोकांना लोटले आणि त्यातून गरीब लोकांना मदत करण्यास सुरुवात केली तसेच महिलांच्या वर कोणत्याही प्रकारचा छळ होऊ नये म्हणून देखील खबरदारी घेतली.
परंतु त्यावेळी भारतामध्ये इंग्रजांची राजवट असल्यामुळे चोरी कारण हा गुन्हा आहे म्हणून इंग्रजांनी त्यांना एक वर्ष्याच्या करावासामध्ये टाकले. उमाजी नाईक हे करावासामध्ये एक वर्षाचा हा काळ त्यांनी पुस्तके वाचण्यामध्ये किंवा लेखन करण्यामध्ये घालवला. एक वर्षानंतर त्यांची कारावासाची शिक्षा संपल्यानंतर त्यांनी पुढे इंग्रजी राजवटीविरुध्द लढण्यास सुरुवात केली आणि त्यांचा हा लढ पुढच्या पातळीवर देखील नेला.
उमाजी नाईक यांचा हा इंग्रजी राजवटीविरुध्चा लढा हा त्याच्या स्वतासाठी नव्हता तर हा लढा भारतातील लोकांच्यासाठी होता त्यामुळे या लढ्याच्या चळवळी मध्ये लोक सामील होऊ लागले आणि यामुळे उमाजी नाईक यांची लोकप्रियता वाढू लागली आणि त्यामुळे ब्रिटीश त्यांना परत आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यांनी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंगटॉश यांना नेमण्यात आले आणि त्याने उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी अनेक सैन्य जमवले.
उमाजी नाईक आणि इंग्रजान्च्यामध्ये एक भयंकर युध्द झाले आणि उमाजी नाईक यांना इंग्रजांचा पराभव करण्यास यश मिळाले त्यांनी या लढाईमध्ये इंग्रजांच्या पाच सैनिकांचा शिरच्छेद केला आणि त्यांची मुडकी इंग्रजांना परत पाठवली त्यामुळे इंग्रजांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले.
त्याचबरोबर १८२४ मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्यामधील भांबुर्डा या ठिकाणी असणाऱ्या खजिन्यावर छापा टाकला आणि तो पैसा मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आणि गरिबांना मदत करण्यासाठी वापरला त्याचबरोबर १८३० मध्ये आणखीन एक ब्रिटीश तुकडीचा पराभव करण्यास त्यांन यश मिळाले आणि हे युध्द सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्यामधील मंदारदेवी टेकडी जवळ चालू होते. १८ फेब्रुवारी १८३१ मध्ये भारतामध्ये संपूर्ण क्रांतीची घोषणा केली आणि लोकांना सरकारी नोकऱ्या सोडण्यासाठी आव्हाहन केले आणि मोठ्या प्रमाणात चळवळी सुरु केल्या.
त्यांनी भारतातील लोकांना इंग्रजांच्या खाजीन्यांच्यावर छापा टाकण्यासाठी आव्हाहन दिले तसेच परीकीय राजवट संपुष्टात आणण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे कारण न भरने या सारखी आव्हाहन दिली. उमजीच्या कारवाया ह्या अश्या पातळीवर गेल्या होत्या कि इंग्रजांना त्याकडे दुर्लक्ष करणे खूप महागात पडणार होते. काही काळापूर्वी काळोजी नाईक याला एक महिलेचे अपहरण आणि अत्याचार केल्याबद्दल त्याला उमाजी नाईक यांनी शिक्षा केली होती आणि याचा बदला घेण्यासाठी काळोजी नाईक याने इंग्रजांशी हातमिळवणी केली.
आता दहा हजार आणि ४०० बिघा जमिनीचे आमिष दाखवून उमाजी नाईक यांच्या गोटात दगाबाजी सुरु झाली आणि अनेक विश्वासू इंग्रजांच्या सैन्यामध्ये पक्षांतर करू लागले. कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंगटॉश याने पुण्याजवळ भोर जिल्ह्यातील उत्रोली गावामध्ये उमजींना अटक करण्यात आले आणि इंग्रजांनी त्यांची अतिशय कठोरपणे चौकशी केली तसेच त्यांना महिनाभर एका अंधाऱ्या खोलीमध्ये कैद देखील करून ठेवले.
३ फेब्रुवारी १८३२ मध्ये उमाजी नाईक पुण्यामध्ये फाशी देण्यात आली आणि या त्यांच्या लढ्याबद्दल असे म्हटले जाते कि त्यांचा हा लढा जर यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य हे त्याच वेळी मिळाले असते.
आम्ही दिलेल्या umaji naik information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर उमाजी नाईक यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या krantiveer umaji naik information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि umaji naik wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट