va pu kale information in marathi व पु काळे मराठी माहिती, वसंत पुरुषोत्तम काळे, आपल्या मराठी भाषेच्या साहित्यामध्ये अनेक वेगवेगळे लेखक होवून गेले ज्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण करून आपल्या मराठी साहित्यामध्ये मोलाची भर पाडली तसेच व. पु. काळे हे देखील एक प्रसिध्द मराठी लेखक होते आणि आज आपण या लेखामध्ये त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व. पु. काळे यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये २५ मार्च १९३२ मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे असे आहे, परंतु त्यांना व. पु. काळे ह्या नावानेच जास्त लोक ओळखतात.
व. पु. काळे हे एक लोकप्रिय कथाकार, लेखक आणि कादंबरीकार होते आणि त्यांनी त्यांच्या या कारकीर्दीमध्ये मराठी साहित्यामध्ये चांगली आणि मोलाची भर पडली होती. त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तोडे दिवस मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत होते आणि त्यांचे शिक्षण हे आर्किटेक्चर (Architecture) मधून झाले होते परंतु त्यांना लेखनाची आवड असल्यामुळे त्यांचा काळ हा लेखनाकडेच कायम होता.
त्यांच्या लेखनाबद्दल असे मत झाले आहे कि मराठी साहित्यामध्ये अनेक लेखक होवून गेले परंतु त्यापैकी विशेष म्हणून घेतलं जाणारे नाव किंवा लगेच लक्षात येणारे नाव म्हणजे व. पु. काळे. व. पु. काळे हे असे लेखक आहेत ज्यांच्या काही कथा, कविता किंवा कोट्स वाचायला घेतले तर आपल्यामध्ये एक धाडस येते किंवा आपल्यामध्ये एक चांगली उमेद जागी होते आणि हीच त्यांच्या लिखाणाची ताकद आहे. त्यांनी त्यांच्या मराठी साहित्य लेखनामध्ये अनेक कविता, कथा, कोट्स, ललितप्रकार, कादंबरी, व्यक्तिचित्र, पत्रसंग्रह या सारखे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले.

व पु काळे मराठी माहिती Va Pu Kale Information in Marathi
नाव | वसंत पुरुषोत्तम काळे |
टोपणनाव | व. पु. काळे |
जन्म | २५ मार्च १९३२ |
वडिलांचे नाव | पुरुषोत्तम काळे |
ओळख | कथाकार, लेखक आणि कादंबरीकार |
निधन | २६ जून २००९ |
व. पु. काळे यांची मराठी साहित्यातील कामगिरी – vasant purushottam kale information in marathi language
व. पु. काळे हे जरी वास्तूविशारद असले तरी त्यांना लेखनाची खूप आवड होती त्यामुळे त्यांचा कल हा जास्त लेखनाकडे होता आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करून मराठी साहित्यामध्ये मोलाची भर पाडली आहे. व. पु. काळे यांनी त्यांच्या मराठी साहित्यातील कारकीर्दीमध्ये कथा, कादंबरी आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेखन लिहिले आणि यांचे लेखन असे आहे कि त्यांचे कोणतेही लेखन वाचले कि आपल्यालामध्ये नवी उमेद जागी होते.
त्यांनी कविता, कथा, कोट्स, ललितप्रकार, कादंबरी, व्यक्तिचित्र, पत्रसंग्रह यामधील सर्व साहित्यप्रकारामध्ये लि:खाण केले. मी माणूस शोधतोय, गुलमोहोर, माझ्या माझ्यापाशी, आपण सारे अर्जुन, माणूस, वपुर्झा, गोष्ट हातातली होती आणि रंग मनाचे असे कथासंग्रह, ललितप्रकार आणि पत्रसंग्रह लिहिले आहेत.
व. पु. काळे हे एक लोकप्रिय कथाकार होते आणि त्यांच्या कथा लोकांना खूप आवडायच्या आणि आज देखील खूप आवडतात त्यांनी त्यांच्या या लेखन प्रकारामध्ये एकूण सोळाशे पेक्षा अधिक कथा लिहिल्या आहेत आणि त्यांचे कार्यक्रम देखील सादर झाले आहेत.
- कथासंग्रह : गुलमोहर, तप्तपदी, दोस्त, ऐक सखे, का रे भुललास, महोत्सव, कर्मचारी, मायबाजार, मी माणूस शोधतोय, घर हरवलेली मनसे, भुलभुलैय्या, हुंकार, सखी, स्वर आणि गोष्ट हातातली होती हे काही त्यांनी लिहिलेले कथा संग्रह आहेत.
- कादंबरी : हि वाट एकटीची, ठिकरी, पार्टनर, तू भ्रमत आहासी वाया ह्या काही त्यांच्या लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत.
- ललित प्रकार : दुनिया तुला विसरेल, फॅन्टसी ( एक प्रेयसी ), कथा कथनाची, वपुर्झा, रंगपंचमी आणि माझ माझ्यापाशी हे त्यांनी काही ललित प्रकार देखील लिहिले आहेत.
- प्लेयर बॉक्स भाग हा त्यांच्या पत्रसंग्रह आहे आणि मानस आणि संगे वडिलांची कीर्ती हे व्यक्तिचित्र आहे.
व. पु. काळे यांनी लिहिलेले काही सुविचार – vp kale thoughts in marathi
त्यांनी त्यांच्या या कारकीर्दीमध्ये असे लेखन केले होते कि जर एखाद्याने त्यांचे लेखन वाचले तर त्यांच्या मनामध्ये नवी आणि एक चांगली उमेद निर्माण होत होती. चला तर खाली आपण काही त्यांचे चांगले सुविचार पाहूया.
- आपल्या वाचून कुणाचतरी अडत हि भावना सौख्यदायक असते – व.पु.काळे यांचा हा सुविचार वपुर्झा या ललित प्रकारातील आहे.
- ज्यावेळी कोणताही स्वार्थ नसतो, त्यावेळीच माणूस शांतपणे दुसर्य्नच्या समस्या ऐकतो – हा चांगला सुविचार हा डेली त्यांनी लिहिलेल्या वपुर्झा या ललित प्रकारातील आहे.
- अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि आपला हि हात असाच कोणाला तरी हवा असतो – व.पु.काळे
- ज्या व्यक्तीजवळ सावरण्याची शक्ती असते तो कोणाला आवरत बसत नाही – व.पु.काळे
- माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनयेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमच कौतुक करेल – व.पु.काळे
- खर्च झाल्याच दुखः नसते दुखः असत ते होशोब न लागल्याच – व.पु.काळे
- सेन्स ऑफ पझेशन इज अ प्लेझर इटसेल्फ – व.पु.काळे
- ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याचे सदैव पोकळी जाणवत असते – व.पु.काळे
- अश्रू फक्त स्वताची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वताच्या चुका दिसत नाहीत – व.पु.काळे
व. पु. काळे यांचा मृत्यू – death
व. पु. काळे यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाचे काम केले आणि अश्या या चांगल्या लेखकाला, कथानकाला २६ जून २००९ रोजी आपल्या देशाने गमावले म्हणजेच व. पु. काळे यांचा मृत्य हृदय विकाराच्या झटक्याने २६ जून २००९ मध्ये झाला आणि ते मृत्युच्या अगोदर २ वर्ष चांगल्या मन स्थितीमध्ये नव्हते असे सांगितले जाते.
आम्ही दिलेल्या va pu kale information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर व पु काळे मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या va pu kale poem in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि vp kale thoughts in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट