vedhshala information in marathi वेधशाळा माहिती, आपल्याला पुढचे हवामान कसे होणार आहे. हे अगोदरच समजते किंवा त्याचा अंदाज समजतो आणि हे फक्त वेधशाळेमुळेच शक्य झाले आहे आणि आज आपण या लेखामध्ये वेधशाळेविषयी माहिती घेणार आहोत. वेधशाळा ह्या निसर्गातील वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्थापीत झाल्या आहेत आणि ह्या शाळा हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि समुद्रशास्त्र अश्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात.
वेधशाळा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात म्हणजेच खगोलशास्त्रीय वेधशाळा हि खगोलशस्त्राचा अभ्यास करते, हवामान वेधशाळा हि हवामानाचा अभ्यास करते, अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वेधशाळा अभ्यास करते.
बहुतेक वेधशाळा ह्या पृथ्वीवर स्थित आहेत तर काही अंतराळामध्ये देखील स्थित आहेत. खाली आपण वेधशाळा या विषयी आणखीन सविस्तर आणि संपूरणे माहिती घेणार आहोत .
वेधशाळा माहिती – Vedhshala Information in Marathi
वेधशाळा म्हणजे काय – what is observatory?
वेधशाळा हि पृथ्वी किंवा अवकाशातील घटक आणि परिस्थितीचे निरीक्षण करते म्हणजेच हवामान, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र या सारख्या गोष्टींचा अभ्यास करते किंवा निरीक्षण करते आणि पुढील अंदाज मांडते.
वेधशाळेचे प्रकार – types
वेधशाळेचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याविषयी खाली आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
ऑप्टीकल वेधशाळा
या प्रकारच्या बहुतेक वेधशाळा ह्या सूर्यमालेच्या बाहेरील खगोलीय पिंडांचा अभ्यास करण्यासाठी रचलेल्या आहेत. यामध्ये तारे, आकाशगंगा आणि तेजोमेघ या सारख्या घटकांचा अभ्यास केला जातो. ऑप्टीकल वेधशाळा ह्या अनेक इतर उपकरणांनी सुसज्ज आहेत जे प्रचंड परवर्तीत दुर्बिणीद्वारे गोळा केलेल्या प्रकाशाचे विश्लेषण करतात किंवा वाढवतात.
अंतराळ आधारित वेधशाळा
अंतराळ अधरित्त वेधशाळा ह्या अंतराळामध्ये कार्यरत असतात म्हणजेच अंतराळामध्ये प्रक्षेपित केलेली उपकरणे अंतराळातील अभ्यास करतात आणि सर्व माहिती गोळा करून नंतर पृथ्वीवर स्थित रेडीओ स्टेशनवर प्रसारित केली जातात.
या प्रकारची वेधशाळा पृथ्वी आणि सूर्यादरम्यान थेट सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीपासून सुमारे एक दशलक्ष मैल दूर असलेल्या एका बिंदूभोवती फिरते आणि हे सूर्याचे अखंड दृष्य देते.
रेडीओ वेधशाळा
रेडीओ वेधशाळा ह्या ऑप्टीकल वेधशाळेपेक्षा थोड्या कमी विशिष्ट असतात. यामध्ये सूर्यमालेतील ग्रहांच्या रडार मॅपिंगसाठी किंवा अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या क्वासाराच्या तपशीलवार अभ्यासासाठी दुर्बिणीचा वापर केला जातो.
भू आधारित वेधशाळा
भू आधारित वेधशाळा ह्या विशिष्ट प्रकारच्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी सुसज्ज आहेत. या प्रकारच्या वेधशाळेमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर अवकाशातून येणारे बहुतेक किरणोत्सर्ग पृथ्वीच्या वातावरणाच्या सहाय्याने शोषले जातात. रेडीओ आणि ऑप्टीकल वेधशाळा ह्या भू आधारित वेधशाळा आहेत.
भारतातील वेधशाळा – indian vedhshala information in marathi
आपला भारत देश हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्या देशाने तंत्रज्ञान आणि आधुनिकिकरणा मध्ये देखील चांगले काम केले आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेधशाळा आहेत त्या वेधशाळांची माहिती खाली आपण घेवूया.
खगोलशास्त्रीय वेधशाळा, नैनिताल
नैनितालमध्ये खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे जी नैनिताल मधील मनोरा या शिखरावर वसलेली आहे. या ठिकाणी दुर्बिणीच्या मदतीने खगोलीय पिंड, चंद्र, तारे आणि इतर स्वर्गीय पिंड पहिले जातात आणि त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून खगोलशास्त्रीय बदलांचे भविष्य वर्तवले जाते.
सौर वेधशाळा, कोडाईकनाल
सौर वेधशाळा हि कोडाईकनालच्या सुंदर आणि निसर्गरम्य टेकडीवर दक्षिणेकडील टोकावर वसलेली आहे आणि हि वेधशाळा १८९९ मध्ये स्थापन केलेली आहे आणि हि भारतीय खगोल भौतिकि संस्थेच्या मालकीची आणि संचालित आहे. या वेधशाळेमध्ये सौर माहितीचा विस्तृत संग्रह आहे आणि असे म्हटले जाते कि हा १९ व्या शतकातील आहे.
उदयपुर सौर वेधशाळा
भारतील हि सौर वेधशाळा उदयपुरमधील एका बेटावर आहे ज्या ठिकाणी जाण्यासाठी बोटींचा वापर केला जातो. या वेधशाळेची स्थापना हि सध्याची म्हणजेच १९७६ ची आहे जी डॉ अरविंद भटनागर यांनी बांधली आहे. उदयपुर सौर वेधशाळा हि आशियातील सर्वोत्तम सौरनिरीक्षक स्थळ मानले जाते. या वेधशाळेमध्ये खगोलशास्त्रीय निरीक्षणाची अपवादात्मक गुणवत्ता प्रदान करण्यासाठी दुर्बिणींच्या विस्तृत श्रेणी आहेत.
मद्रास वेधशाळा, चेन्नई
मद्रास वेधशाळा हि एक मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे ज्याची स्थापन १७८६ मध्ये विल्यम पेट्रीने केली होती आणि या वरून असे समजते कि हा वेधशाळेची स्थापना हि ब्रिटीशांच्या काळामध्ये झाली होती आणि हि इस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यवस्थापित होती.
या वेधशाळेचा मुख्य उद्देश हा अक्षांश रेकॉर्ड आणि त्यावरून वेळेचे मानक राखून नेव्हिगेशन आणि मॅपिंगमध्ये मदत करणे. ह्या वेधशाळेने जागतिक साम्राज्य स्थापनेचे स्वप्न पहिले आणि त्या दिशेने पावले देखील उचलली.
गौरीबिदानूर रेडीओ वेधशाळा
गौरीबिदानुर रेडीओ वेधशाळा हि बेंगलोर या शहरापासून १०० किलो मीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदानूर या ग्रामीण भागामध्ये वसलेली आहे. हे शहर इलेक्ट्रॉनिक आवाजांच्यापासून मुक्त असल्यामुळे ते रेडीओ निरीक्षणासाठी उत्तम मानले जाते आणि या वेधशाळेची स्थापन १९७० मध्ये झाली आहे. हि भारतातील अशी एकमेव वेधशाळा आहे जी कमी फ्रिक्वेन्सीवर निरीक्षणे नोदावू शकते.
वेधशाळेविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- वेधशाळा ह्या सहसा उंच टेकडी, डोंगर आणि पर्वत अश्या ठिकाणी वसलेल्या असतात आणि ह्या शक्यतो ज्याठिकाणी स्वच्छ आणि कोरडे हवामान आहे त्या ठिकाणी कार्यरत असतात.
- खगोलशास्त्रीय वेधशाळेमध्ये मोठ्या दुर्बीण असतात तसेच काही लहान अनेक दुर्बिणी असतात.
- वेधशाळा हि पर्यावरण, पृथ्वी, अवकाश आणि हवामानातील घटकांचे निरीक्षण करते.
- १७२४ ते १७३० च्या दरम्यान उत्तर भारतामध्ये एकूण पाच वेधशाळा बांधल्या.
- वेधशाळेतील निरीक्षण कक्षेला विषुववृत्तीय कक्ष म्हणून ओळखले जाते.
आम्ही दिलेल्या vedhshala information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वेधशाळा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या all vedhshala information in marathi या bhartatil vedhshala information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about vedhshala in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये indian vedhshala information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट