indian radio history in marathi – radio information in marathi भारतीय रेडीओ इतिहास, आज आपण या लेखामध्ये भारतीय रेडीओ (Radio) विषयी माहिती आणि रेडीओ चा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. ज्यावेळी टेलेफोन, मोबाईल फोन आणि इंटरनेट याच्या खूप आधी रेडीओ हे संवादाचे एक मुख्य साधन होते. १९२० मध्ये डेट्रॉईट, मिशिगन या ठिकाणी पहिला रेडीओ बातम्यांचा कार्यक्रम सुरु झाला आणि या नंतर रेडीओ वर क्रीडा कार्यक्रम तसेच मैफिली देखील प्रसारित होऊ लागल्या. १९२० च्या मध्यापर्यंत बातम्या आणि खेळापासून ते संगीत आणि विविध कार्यक्रमापर्यंत सर्व काही प्रसारित करणारी ५०० हून अधिक रेडीओ स्टेशन्स होती. १९३० मध्ये युनायटेड स्टेट्स मध्ये आणि युरोप या देशामधील बहुतेक घरामध्ये रेडीओ होताच.
रेडीओ तंत्रज्ञानाचा खूप झपाट्याने विस्तार झाला आणि इतर अनेक उपयोगांच्यासाठी रेडीओचा वापर हा वाढू लागला. विमानचालन आणि समुद्रपर्यटन या क्षेत्रामध्ये याचा वापर हा लक्षणीय झाला. तसेच नेव्हिगेशनसाठी ते एक मौल्यवान साधन बनले आणि याची वापर हा अनेक व्यवसाय क्षेत्रामध्ये तसेच कल्पनीय हेतूसाठी रेडीओ चा वापर केला जावू लागला.
२१ व्या शतकाच्या सुरुवातीस रेडीओ मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि रेडीओला इंटरनेट आधारित ऑडीओ सेवा आणि डीजीटल सेवांच्याकडून स्पर्धात्मक दबावाचा सामना करावा लागला. चला तर आता आपण खाली रेडीओ विषयाचा इतिहास काय आहे ते पाहूया.
भारतात आकाशवाणी ची सुरुवात केव्हा झाली – Indian Radio History in Marathi
भारतीय रेडीओ चा इतिहास – radio information in marathi
मद्रास प्रेसिडन्सी क्लब रेडीओने १९२४ मध्ये भारतामध्ये रेडीओ ब्रॉडकास्टिंग कंपनी सुरु केली आणि क्लबने ३ वर्ष ब्रॉडकास्टिंग सेवा केली आणि त्यांनतर काही आर्थिक अडचणींच्यामुळे १९२७ मध्ये हि सेवा बंद झाली. त्याच वर्षी म्हणजेच १९२७ मध्ये मुंबई मधील काही उद्योगपती मुंबई आणि कलकत्ता येथे स्टेशन्ससह इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी सुरु केली.
हि कंपनी १९३० मध्ये अपयशी ठरली आणि १९३२ मध्ये भारत सरकारने हे प्रसारण आपल्या ताब्यात घेतले आणि भारतीय सरकार मार्फत भारतीय प्रसारण सेवा म्हणून ओळखले जाणारे वेगळे विभाग उघडण्यात आले. भारतीय प्रसारण सेवेला नंतर ऑल इंडिया रेडीओ म्हणून ओळखले जाऊ लागले. हे प्रसारण एका वेगळ्या मंत्रालयाच्या अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत ठेवण्यात आले.
आकाशवाणीचे नियंत्रण एका महासंचालकाद्वारे केले जाते ज्याला अनेक उपसंचालक आणि मुख्य अभियंता मदत करतात. ब्रॉडकास्टिंग हे भारतामध्ये जन्सावादाचे एक शक्तिशाली साधन बनले. तसेच माहिती आणि शिक्षणाचे मध्यम म्हणून रेडीओचे महत्व हे भारतासारख्या विशाल आणि विकसनशील देशामध्ये विशेषता वाढले. भारतातील प्रसारण सेवा हि एक राष्ट्रीय सेवा आहे.
जी भारतसरकार द्वारे विकसित आहे आणि चालवली जाते. ऑल इंडिया रेडीओ हि सेवा देशभरामध्ये पसरलेल्या ब्रॉडकास्टिंग स्टेशनच्या नेटवर्कवर चालते. ऑल इंडिया रेडीओ हा आपल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यक्रमांमध्ये, सर्व भारतीय लोकांच्या मनोवृत्ती आकांक्षा आणि प्राप्ती याचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करते.
इंडियन रेडीओ तथ्ये – facts about indian radio
- १९५६ पासून अधिकृतपणे आकाशवाणी म्हणून ओळखले जाणारे हे जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठे रेडीओ नेटवर्क आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार आकाशवाणीने देशातील ९९ टक्के पेक्षा कव्हर केली आहे. इंडियन रेडीओचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि प्रसार भरतीच्या अंतर्गत दूरदर्शनची भगिनी सेवा आहे.
- १९३९ मध्ये पश्तो भाषेतील प्रसारणासह बाह्य सेवा सुरु झाली. स्वातंत्र्याच्यावेळी भारतामध्ये दिल्ली, मद्रास, बॉम्बे, कलकत्ता, लखनौ, तीरुचीरापल्ली अशी सहा रेडीओ केंद्रे होती.
- जसजसे वर्ष पुढे जातील तसतशी आकाशवाणीने संगीत कार्यक्रम, वृत्तपत्रे, आणि नाटके सुरु केली. अनेक वर्ष भारतामध्ये मनोरंजनाचे हे एकमेव साधन बनले.
- १९९९ मध्ये रेडीओने अखाती प्रदेशासाठी मल्याळमध्ये दैनिक सेवा सुरु केली तसेच २००२ मध्ये भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियाला सेवा देण्यासाठी पहिली डिजिटल सॅटेलाईट होम सेवा सुरु करण्यात आली. २००४ मध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीची डिटीएच सेवा सुरु झाली.
- मद्रास प्रेसिडन्सी रेडीओ क्लबने १९२४ मध्ये सुरु झाला. जून १९२७ मध्ये भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी इंडियन ब्रॉडकास्ट कंपनीचे उद्घाटन केले होते.
- ऑल इंडिया रेडीओ हि प्रसार सेवा भरतीचा एक विभाग आहे आणि भारताची राष्ट्रीय सार्वजनिक रेडीओ प्रसारण सेवा आहे.
- १९२० च्या मध्यापर्यंत बातम्या आणि खेळापासून ते संगीत आणि विविध कार्यक्रमापर्यंत सर्व काही प्रसारित करणारी ५०० हून अधिक रेडीओ स्टेशन्स होती.
- २१ व्या शतकाच्या सुरुवातीस रेडीओ मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि रेडीओला इंटरनेट आधारित ऑडीओ सेवा आणि डीजीटल सेवांचा दबाव सहन करावा लागला होता.
- दिल्ली आणि मुंबई येथे खाजगी पक्षांना एफएम चॅनलवर टाइम स्लॉट १९९३ मध्ये सुरु झाला आणि भारतातील एफएम रेडीओ स्टेशन्समध्ये क्रांती सुरु झाली.
- २३ जुलै १९७७ रोजी मद्रास म्हणजेच जे आत्ताचे चेन्नई आहे तेथून प्रथम एफएम सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
- जून १९३८ ते जुलै १९५३ पर्यंत आकाशवाणी मद्रासचे स्टुडीओ ज्या इमारतीमध्ये होते ती इमारत म्हणजे इस्ट नुक. हि इमारत आता अस्तित्वात नाही.
- जिना यांनी ऑल इंडिया रेडीओवरून पाकिस्थानच्या निर्मितीची घोषणा केली.
- ज्यावेळी टेलेफोन, मोबाईल फोन आणि इंटरनेट याच्या खूप आधी रेडीओ हे संवादाचे एक मुख्य साधन होते.
आम्ही दिलेल्या indian radio history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भारतात आकाशवाणी ची सुरुवात केव्हा झाली माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट