व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी Veg Biryani Recipe in Marathi

Veg Biryani Recipe in Marathi – Veg Dum Biryani Recipe in Marathi व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी व्हेज बिर्याणी हि एक भारतीय पारंपारिक डिश असून हि डिश कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, लग्न आणि वाढदिवस अश्या कार्यक्रमामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे. व्हेज बिर्याणी हि एक अशी रेसिपी आहे कि ज्यामध्ये सुंगधी तांदूळ, वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळे मसाले वापरले जातात. अस्सल दम व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो तसेच हि डिश बनवण्यासाठी काही तज्ञांची गरज असते. व्हेज बिर्याणी मी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण म्हणून या रेसिपीचा आनंद घेतो आणि काहीवेळा मी व्हेज बिर्याणी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गरम करून आदल्या दिवसाप्रमाणेच आनंदाने खातो.

veg biryani recipe in marathi
veg biryani recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी – Veg Biryani Recipe in Marathi

व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी – Veg Biryani Recipe in Marathi

 

व्हेज बिर्याणी कशी बनवतात – How to Make Veg Biryani in Marathi

आपण रेस्टॉरंट सारखी व्हेज बिर्याणी घरी देखील बनवू शकतो त्यासाठी लागणारे साहित्य आणि बिर्याणी कशी बनवायची याबद्दल खाली माहिती दिली आहे.

व्हेज बिर्याणी करण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make veg biryani

मुख्य साहित्य – main ingredients

  • २ वाटी बासमती तांदूळ.

भात शिजवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients for cooking rice

  • १ मसाला वेलदोडा.
  • ३ ते ४ वेलदोडे.
  • ३ ते ४ लवंग.
  • १ दालचिन तुकडा.
  • १ तमाल पत्री पान.
  • ५ वाटी पाणी.
  • १ चमचा मीठ.

व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या – veggies needed to make biryani 

  • १ वाटी बटाटा ( चिरलेला ).
  • २ वाटी फ्लॉवर ( सुट्टा केलेला ).
  • १/२ वाटी गाजर ( चिरलेले ).
  • १/४ वाटी बिन्स ( चिरलेले ).
  • १/३ वाटी ढबू मिरची ( चिरलेली ).
  • १/२ वाटी मटार ( ताजे ).
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या.
  • १ वाटी उभा चिरलेला कांदा.
  • २ मोठे चमचे आलं आणि लसून.

बिर्याणी ग्रेवी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients for biryani gravy 

  • १ चमचा जीरा.
  • १ तमाल पत्री.
  • १ मसाला वेलदोडा.
  • ३ वेलदोडे.
  • ३ ते ४ लवंग.
  • १ वाटी दही ( फेटलेले ).
  • ४ मोठे चमचे तूप.
  • १/२ हळद.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ वाटी पाणी.
  • २ चमचे काजू आणि १ चमचा बेदाणे.
  • मीठ ( चवीनुसार ).

बिर्याणी सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य

व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – veg biryani recipe in marathi step by step

  • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तांदळामध्ये १ वाटी पाणी घालून ते अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवा.
  • जोपर्यंत तांदूळ भिजतील त्या वेळेमध्ये सर्व भाज्या चिरून घ्या.
  • अर्ध्या तासानंतर तांदळामधील पाणी गाळून घ्या आणि ते काही वेळासाठी बाजूला ठेवा.
  • आता एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये ५ वाटी पाणी घालून ते मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवा. पाणी गरम झाले कि त्यामध्ये १ मसाला वेलदोडा, ३ ते ४ वेलदोडे, ३ ते ४ लवंग, १ दालचिन तुकडा, १ तमाल पत्री पान आणि १ चमचा मीठ घाला आणि पाणी उकळेपर्यंत वाट पहा, एकदा पाणी उकळले कि त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घाला. तांदूळ घातल्यानंतर सर्व खडे मसाले आणि तांदूळ चांगले मिक्स करा आणि ते शिजण्यासाठी ठेवा.
  • तांदूळ ८० टक्के शिजल्यानंतर गॅस बंद करा.
  • आता २ लिटरचा कुकर घ्या आणि तो कुकर मध्यम आचेवर कुकर गरम करा आणि त्यामध्ये तूप घाला आणि त्यामध्ये खडा मसाला घाला जसे कि जीरा, तमाल पत्री, लवंग आणि वेलदोडे घाला आणि ते काही वेळासाठी ( २ ते ३ सेकंद ) भाजा.
  • मग त्यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि ते मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यामध्ये आलं लसून पेस्ट आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि ते चांगले भाजा आणि त्यानंतर त्यामध्ये काजू आणि बेदाणे घाला आणि ते चांगले भाजा.
  • मग त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घालून ते मिश्रण चांगले एकत्र करा.
  • त्यानंतर त्या मिश्रणामध्ये चिरलेल्या सर्व भाजा घाला आणि ते २ ते ३ मिनिटासाठी चांगले भाजून घ्या.
  • मग गॅसची आच कमी करून त्यामध्ये फेटलेले दही घाला आणि चांगले एकत्र करा. मग त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) घाला आणि मग त्यामध्ये शिजवलेला भात घाला ते चांगले मिक्स करून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटासाठी ठेवा किंवा कुकरला एक शिटी येईपर्यंत बिर्याणी शिजवा.
  • आपली व्हेज बिर्याणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
  • बिर्याणी सर्व्ह करतेवेळी बिर्याणी प्लेटमध्ये घाला आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा घाला आणि सर्व्ह करा.

घरच्या घरी परफेक्ट व्हेज बिर्याणी बनवण्याच्या टिप्स – tips to make perfect veg biryani 

  • मसालेदार आणि सुगंधी व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ, ताजे मसाले आणि ताजे तूप वापरा.
  • उत्कृष्ट परिणामासाठी प्रीमियम दर्जाचा बासमती तांदूळ वापरा.
  • बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये किंवा भांड्यात बनवली जाते ( तांदूळ मऊ न शिजवला जातो ).
  • चांगल्या दर्जाचे अख्खे मसाले आणि मसाले पावडर वापरा ज्यामुळे व्हेज बिर्याणीला चांगली चव येते.

बिर्याणी बनवण्यासाठी उत्तम बासमती तांदूळ कोणते ?

  • झीबा प्रीमियम बासमती तांदूळ

झीबा प्रीमियम तांदूळ लांब तांदूळ आहेत आणि लांब तांदूळ बिर्याणी साठी योग्य आहे. हे तांदूळ बिर्याणी आणि पुलावसाठी उत्तम आहे.

  • कोहिनूर बासमती तांदूळ

कोहिनूर बासमती तांदूळ हे बिर्याणीसाठी सर्वात योग्य आहेत.

  • इंडिया गेट

इंडिया गेट हे तांदूळ सर्व भातांच्यासाठी चांगले आहेत.

  • दावत बिर्याणी बासमती तांदूळ

मी हा तांदूळ बिर्याणीसाठी सुचवतो कारण हा बिर्याणी बनवायचा तांदूळ आहे आणि तो चिकट नसतो आणि हे तांदूळ जास्त लांब असतात.

  • फॉर्च्यून बिर्याणी स्पेशल बासमती तांदूळ

हा बिर्याणी स्पेशल तांदूळ आहे आणि हा सर्वात लांब बासमती तांदूळ आहे.

आम्ही दिलेल्या veg biryani recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी माहिती hyderabadi veg biryani recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या veg layered biryani recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि veg biryani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vegetable biryani recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!