मसाले भात रेसिपी मराठी Masale Bhat Recipe in Marathi

Masale Bhat Recipe in Marathi – Masala Bhat Recipe in Marathi मसाले भात रेसिपी मराठी मसाले भात हि एक मराठी डिश आहे जी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सणाला, घरगुती कार्यक्रमांना किंवा लग्न समारंभ आणि इतर समारंभांना बनवली जाते. मसाले भात देखील वेज बिर्याणी किंवा वेज पुलाव इतकच स्वादिष्ट असतो पण या दोन्ही पदार्थांच्या बनवण्याच्या पध्दती आणि शिजवण्याच्या पध्दती मसाले भातापेक्षा वेगळ्या असल्यामुळे याला मसाले भात म्हंटले जाते. मसाले भात हा फ्लॉवर, मटार, वांगी, बटाटा, गाजर, टोमॅटो, कांदा, कोबी यासारख्या भाज्या वापरल्या जातात. आणि या भातामध्ये जो मसाला वापरला जातो त्यामुळे भाताला एक वेगळीच चव येते.

या मसाल्यामुळे भाताला तिखटपणा येत नाही कारण हा गोड मसाला असतो. मसाले भात करण्याची पध्दत खूप सोपी आहे आणि हा भात २५ ते ३० मिनिटामध्ये तयार होऊ शकतो.

masale bhat recipe in marathi
masale bhat recipe in marathi

मसाले भात रेसिपी मराठी – Masale Bhat Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ कुकर मध्ये७ ते ८ मिनिटे
भांड्यामध्ये१५ ते १६ मिनिटे
एकूण लागणार वेळ३० मिनिटे
वाढणी४ ते ५ व्यक्ती

मसाले भातातील मुख्य साहित्य – key ingredients 

  • तांदूळ : तांदूळ हा मसाले भातातील महत्वाचा आणि मुख्य घटक आहे कारण तांदळाशिवाय भात बनू शकत नाही. मसाले भात बनवताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ वापरू शकतो जसे कि बासमती, फॉरचून, कोहिनूर, दिल्ली राईस या प्रकारचे वेगवेगळे तांदूळ वापरले जातात.
  • गोडा मसाला : भातामध्ये घरगुती पध्दतीने तयार केलेला किंवा बाजारातून विकत आणलेला मसाला वापरला जातो ज्यामुळे भाताला चांगली चव आणि स्वाद येतो आणि म्हणून गोडा मसाला हा मसाले भातातील मुख्य घटक आहे.
  • काही भाज्या : मसाले भात बनवण्यासाठी काही भाज्या देखील आवश्यक असतात जसे कि मटार, गाजर, बटाटा, फ्लॉवर इत्यादी.

मसाले भात कसा करायचा – how to make masale bhat recipe in marathi 

आता आपण घरामध्ये अत्यंत उत्कृष्ट आणि स्वादिष्ट मसाले भात कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लागते. चला तर मग जाणून घेवूयात मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि करावी लागणारी कृती.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ कुकर मध्ये७ ते ८ मिनिटे
भांड्यामध्ये१५ ते १६ मिनिटे
एकूण लागणार वेळ३० मिनिटे
वाढणी४ ते ५ व्यक्ती

मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make masale bhat 

  • २ वाटी लांब बासमती तांदूळ.
  • १ छोटा वाटी गाजर ( चिरलेले ).
  • १ वाटी फ्लॉवर.
  • १/२ वाटी मटार.
  • १ वाटी बटाटा ( फोडी करून ).
  • १ मोठा कांदा ( उभा आणि पातळ चिरलेला कांदा ).
  • २ मोठे चमचे ओला नारळ आणि कोथिंबीर पेस्ट.
  • १/२ मोठा चमचा आलं लसून पेस्ट.
  • ३ ते ४ चमचे गोडा मसाला ( घरगुती किंवा बाजारातून आणलेला ).
  • १/२ चमचा हळद.
  • २ ते ३ पाने तमाल पत्री.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १ मोठा चमचा काजू तुकडे.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • ३ मोठे चमचे तेल.
  • १ चमचा तूप.

मसाले भात करण्यासाठी केली जाणारी कृती – process to make masale bhat 

  • सर्वप्रथम भातासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या चिरून घ्या तसेच आलं लसून पेस्ट, ओले खोबरे आणि कोथिंबीर पेस्ट मिक्सरवर करून घ्या.
  • तसेच फोडणीसाठी लागणारे मसाला, हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, काजू तुकडे हे सर्व भातासाठी लागणारे साहित्य काढून घ्या.
  • त्याचबरोबर काजूचे तुकडे तळून घ्या आणि ते प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा.
  • मग एका भांड्यामध्ये ४ ते ५ वाट्या म्हणजेच तांदळ्याच्या दुप्पट पाणी गरम करण्यासाठी ठेवा आणि ते गरम झाले कि गॅस बंद करा.
  • आता दोन वाटी तांदूळ शिजतील असे एक स्वच्छ धुतलेले भांडे घ्या आणि ते मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
  • ते भांडे गरम झाले कि त्यामध्ये तेल घाला, एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि तो कांदा लालसर होईपर्यंत भाजा मग त्यामध्ये तमाल पत्री, आलं लसून पेस्ट घाला आणि ते चांगले भाजा मग त्यामध्ये मटार, गाजर, फ्लॉवर आणि बटाटा घालून ते चांगले २ मिनिटे भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये खोबरे आणि कोथिंबीर पेस्ट घाला आणि ती सर्व मिश्रणामध्ये चांगली एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून ते तांदूळ त्या सर्व भाज्यांच्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घेवून ते ३ ते ४ मिनिटासाठी भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये गोडा मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर घाला आणि ते चांगले हलवून घ्या मग त्यामध्ये गरम केलेले पाणी घाला आणि मग मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले एकत्र करा आणि त्यावर झाकण घालून ते मध्यम आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
  • थोड्या थोड्या वेळामध्ये भात उघडून बघा आणि जर भात शिजण्यासाठी आणि पाणी लागत असेल तर पाणी घाला.
  • भात शिजत आल्यानंतर त्यावर तूप सोडा.
  • भात मऊ आणि सुट्टा होवूपर्यंत शिजवा आणि भात शिजवताना तो खाली करपणार नाही याची देखील काळजी घ्या.
  • भात शिजल्यानंतर त्यावर तळलेले काजू घाला.
  • तुमचा मसाले भात खाण्यासाठी तयार झाला.

टीप

जर तुम्हाला भात कुकर मध्ये शिजवायच असल्यास तांदळामध्ये अगदी मापून पाणी घाला म्हणजे तांदूळ २ वाटी असतील तर त्यामध्ये ४ आणि १/२ वाटी पाणी घाला त्यामुळे भात मऊ आणि सुट्टा होतो.

मसाला भात कश्यासोबत खाल्ला जावू शकतो – serving suggestions 

मसाले भात आपण तसाच देखील खाऊ शकतो तसेच आपण मसाले भात लोणचे, सॉस किंवा सांबर सोबत देखील खाऊ शकतो.

घरगुती पध्दतीने गोडामसाला किंवा भाताचा मसाला कसा बनवायचा

घरगुती पध्दतीने भाताचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला वेगेवेगळ्या प्रकारचे मसाले लागतात आणि ते आपण खाली पाहू.

  • गोडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
  • २ चमचे जिरे.
  • १ रामपत्री.
  • १ बदाम फुल.
  • १ चमचा धने.
  • १ तुकडा दालचिन.
  • १ तमाला पत्री पाण.
  • ३ ते ४ वेलदोडे.

गोडा मसाला बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्वप्रथम मध्यम आचेवर कढई ठेवून ती चांगली गरम होऊ द्या.
  • मग त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घाला.
  • त्यानंतर त्यामध्ये जिरे, रामपत्री, दालचिन, बदाम फुल, धणे, तमाल पत्री आणि वेलदोडे घालून चांगले ४ ते ५ मिनिटे भाजून घ्या. ते सर्व मसाले चांगले भाजले की गॅस बंद करून घ्या आणि ते मसाले थोडे गार होऊ द्या.
  • ते सर्व मसाले थोडे गार झाले कि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते मिक्सरला लावून त्याची एकदम बारीक पावडर करून घ्या आणि जर मसाल्यामध्ये जर मोठे मोठे मसाले राहिले असतील तर चाळणीने चाळून घ्या.
    तुमचा घरागुती पध्दतीने बनवलेला गोडा मसाला तयार झाला.

आम्ही दिलेल्या masale bhat recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मसाले भात रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या masale bhat in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lagnatil masale bhat recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये masale bhat maharashtrian recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!