व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी Veg Manchurian Recipe in Marathi

Veg Manchurian Recipe in Marathi व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी व्हेज मंचुरियन हि डिश एक इंडो चायनीज डिश आहे आणि हि वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून, त्याचे गोळे बनवून ते तळून त्याला सॉसचा फ्लेवर दिला जातो. व्हेज मंचुरियन हि एक पर्यायी डिश आहे जे चिकन पासून बनवलेली मंचुरी खाऊ शकत नाहीत. भारतामध्ये इंडो चायनीज पदार्थांना एक विशेष स्थान आहे आणि त्यामधील एक लोकप्रिय डिश म्हणजे व्हेज मंचुरियन. भारतामध्ये तिखट, गोड आणि आंबट पदार्थांचे कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडते आणि व्हेज मंचुरियन मध्ये तिखट, गोड आणि आंबट अशे तिन्ही स्वाद एका वेळी चाखायला मिळतात त्यामुळे भारतातील लोक व्हेज मंचुरियन अगदी आवडीने खातात.

veg manchurian recipe in marathi
veg manchurian recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी – Veg Manchurian Recipe in Marathi

व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी – Veg Manchurian Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास
पाककलाइंडो चायनीज पाककृती

भारतामध्ये इंडो चायनीज पाककृती उदयास कशी आली ? 

भारतामध्ये इंडो चायनीज पाककृती उदयास येण्यापाठीमागे असे म्हंटले जाते की १९ व्या शतकात कामाच्या शोधामध्ये असणारे चीनी लोक कलकत्ता येथे आले जी त्यावेळी भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य होते आणि कलकत्ता हे शहर त्यांची राजधानी होती. त्यावेळी चीनी स्तलांतरित लोकांना त्याचे स्वदेशी अन्न खावेसे वाटत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वयंपाक पध्दती वापरून भारतीय पदार्थांच्यामध्ये काही बदल केले किंवा नवीन डिश बनवल्या आणि त्यावेळी पासून भारतामध्ये इंडो चायनीज पाककृती जन्माला आली.

व्हेज मंचुरियन रेसिपी कशी बनवतात – how to make veg manchurian recipe in marathi

तयारीसाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
तळण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१ तास
पाककलाइंडो चायनीज पाककृती

मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make machuriyan recipe 

मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • ३ वाटी कोबी ( चिरलेला किंवा खिसलेला )
  • २ मध्यम आकाराची गाजर ( खिसलेली )
  • कांदा ( बारीक चिरलेला ).
  • १ वाटी खिसलेला दुधी भोपळा.
  • १/२ वाटी फ्लॉवर ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १/२ वाटी मक्याचे पीठ ( कॉर्न फ्लावर )
  • १/२ वाटी तांदळाचे पीठ.
  • तेल (तळण्यासाठी).
  • मीठ ( चवीनुसार ).

मंचुरियन सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • १ चमचा खाद्य तेल
  • ११ ते १२ पाकळ्या लसून ( बारीक चिरलेला ).
  • १ कांदा ( उभा चिरलेला ).
  • २ हिरव्या मिरच्या ( मोठ्या आकारामध्ये चिरलेल्या ).
  • १ ढब्बू मिरची ( उभी चिरलेली ).
  • १ चमचा हॉट चिली सॉस.
  • २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस.
  • ३ चमचे सोया सॉस.
  • २ ते ३ चमचे मक्याचे पीठ.
  • १/२ वाटी कोबी मोठा चिरलेला
  • मीठ ( चवीनुसार ).

मंचुरियन बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make manchurian recipe 

कृती १ : मंचुरियन गोळे बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्वप्रथम कोबीज खिसून किंवा खवून घ्या आणि मग लागणाऱ्या भाज्या जसे कि गाजर खिसून घ्या. त्याचबरोबर कांदा आणि मिरच्या चिरून घ्या.
  • मग एक मोठ्या आकाराचा बाऊल घ्या आणि त्यामध्ये सर्व चिरलेल्या आणि खिसलेल्या भाज्या एकत्र करा जसे कि कोबी, खिसलेल गाजर, खिसलेल दुधी भोपळा, बारीक चीरलेला फ्लॉवर, बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या एकत्र करा आणि त्याला मीठ ( आवश्यकतेनुसार ) लावा. आणि ते ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • ५ ते १० मिनिटाने त्या भाज्यांच्या मिश्रणाला पाणी सुटेल मग त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि मक्याचे पीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, आलं लसून पेस्ट, हळद आणि परत पीठ घातल्यानंतर मीठ लागत असेल तर मीठ घाला आणि ते मिश्रण चांगले घट्ट मळून घ्या. ( टीप : यामध्ये पाणी घालू नका भाज्यांना मीठ टाकल्यानंतर पाणी सुटते म्हणून त्यामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढेच पीठ घालून घट्ट पीठ मळा).
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये मंचुरियन गोळे टाळण्यासाठी तेल घाला.
  • तेल गरम होईपर्यंत पीठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या आणि एकदा तेल गरम झाले कि तेलामध्ये बसतील इतके गोळे घालून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
  • आपले मंचुरियन गोळे तयार झाले आणि आता मंचुरियन सॉस कसा बनवायचा ते पाहूयात.

कृती २ : मंचुरियन सॉस बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सॉस बनवण्यासाठी कढई गॅसवर उच्च आचेवर ठेवावी आणि आणि मग कढई गरम झाली कि गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये तेल घाला.
  • मग गरम तेलामध्ये लसून घाला आणि काही सेकंदासाठी चांगला परतावा.
  • त्यानंतर त्यामध्ये लगेचच कांदा, ढब्बू मिरची आणि हिरवी मिरची घाला आणि ते काही वेळासाठी भाजा.
  • आता या मध्ये १ चमचा हॉट चिली सॉस, २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस आणि ३ चमचे सोया सॉस घाला आणि हे मिश्रण चांगले एकत्र करू घ्या. मग त्यामध्ये मक्याच्या पिठामध्ये थोडेसे पाणी घालून त्याचे बॅटर बनवा आणि ते बॅटर त्यामध्ये घाला त्याचबरोबर मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करून ४ ते ५ मिनिटे शिजवा आणि मग त्यामध्ये मंचुरियन गोळे घालून ते चांगले एकत्र करून चांगले परतवा त्यामुळे गरम गरम मंचुरियन सर्व्ह करता येईल.
  • आता मंचुरियन प्लेटमध्ये काढून त्यावर चिरलेला कोबी घालून सर्व्ह करा.

व्हेज मंचुरियन कशासोबत खावे – serving suggestion

  • व्हेज मंचुरियन आपण नुडल्स किंवा व्हेज फ्राईड राईस सोबत खावू शकतो.

उत्तम व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत – tips to make perfect veg manchuriyan 

  • आपण ज्या भाज्या व्हेज मंचुरियन मध्ये वापरणार आहोत त्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या.
  • व्हेज मंचुरियन ज्या भाज्या वापरल्या जातात त्या ताज्या असाव्यात.
  • मंचुरियन बनवण्यापूर्वी मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या जवळ जमवून ठेवा त्यामुळे रेसिपी बनवताना आपला गोंधळ होणार नाही आणि आपले कोणतेही साहित्य रेसिपीमध्ये घालायचे राहणार नाही.
  • व्हेज मंचुरियन मध्ये तुम्ही भाज्या मिक्स व मॅश करू शकता (हि पध्दत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा कारण काही लोकांना मंचुरियन मध्ये चिरलेल्या भाज्या आवडतात तर काही लोकांना मॅश केलेल्या आवडतात ).
  • व्हेज मंचुरियन बनवताना सर्व भाज्या एकत्र करा आणि त्यामध्ये मीठ घाला ते १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. १० ते १५ मिनिटांनी भाज्यांना पाणी सुटलेले असेल. मग त्यामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढेच घाला आणि ते चांगले घट्ट मळा (यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही).

आम्ही दिलेल्या veg manchurian recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्हेज मंचुरियन रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या manchurian veg recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dry manchurian recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cabbage manchurian recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!