विनायक माळी जीवन परिचय Vinayak Mali Biography in Marathi

Vinayak Mali Biography in Marathi – Vinayak Mali information in Marathi विनायक माळी जीवन परिचय, आगरी किंग, दादुस, शेठ, इत्यादी नावांनी प्रसिद्ध असणारे युट्युब वरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून नावाजले जाणारे विनायक माळी यांच्याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. विनायक माळी हे युट्युब वर आगरी कोळी भाषेमध्ये कंटेंट तयार करून व्हिडीओ अपलोड करतात मुख्यतः लोकांना हसवण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेले असतात. युट्युब वर त्यांचा चाहता वर्ग आहे जो नेहमी आतुरतेने त्यांच्या वेगवेगळ्या विनोदी व्हिडिओजची वाट पाहत असतो.

vinayak mali biography in marathi
vinayak mali biography in marathi

विनायक माळी जीवन परिचय – Vinayak Mali Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)विनायक माळी
जन्म (Birthday)२२ सप्टेंबर १९९५
जन्म गाव (Birth Place)रायगड जिल्ह्यातील पनवेल
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)युट्युबर

Vinayak Mali information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

संपूर्ण नाव विनायक माळी. विनायक माळी यांचा जन्म २२ सप्टेंबर १९९५ रोजी झाला. त्यांचा मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पनवेल आहे परंतु त्यांचे वडील सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना ठाणे येथे राहावं लागतं. त्यांच्या आई उत्तम गृहिणी आहेत. विनायक माळी यांनी त्यांचं पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शाळेतून पूर्ण केलं पुढील शिक्षण हायस्कूलमधून पूर्ण करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कॉमर्स या साईडने त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

पुढे त्यांनी फायनान्शिअल मार्केटिंग मध्ये बॅचलर ऑफ कॉमर्स ची पदवी संपादन केली आणि आता हल्ली ते कायद्याचा अभ्यास करत आहेत. विनायक माळी यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म हा मध्यमवर्गीय आणि टिपिकल मराठी फॅमिली मध्ये झाला. शालेय शिक्षण ठाण्यातून पूर्ण केलं ठाण्यामध्ये त्यांचं बालपण गेलं.

कारकीर्द

विनायक माळी हे प्रसिद्ध तरुण युट्यूबर आहेत. प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे एक संघर्षमय कथा असते हे जितकं खरं आहे तितकीच विनायक माळी यांचा संघर्ष आणि त्यांचे यश खरं आहे. ते युट्युब वर कॉमेडी कन्टेन्ट तयार करून लाखो लोकांचे मनोरंजन करत आहेत. जगामध्ये फार कमी लोक असतात ज्यांच्या मध्ये इतरांना हसवण्याची कला हि आतून तयार झालेली असते ना कि सराव करून. खूप कमी लोक आहेत ज्यांना इतरांना मनमोकळेपणे हसवता येतं आणि त्यातीलच एक म्हणजे विनायक माळी.

विनायक माळी हे युट्यूब वरती आगरी-कोळी भाषांमध्ये विनोदी व्हिडिओ अपलोड करून त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. परंतु एक युट्यूबर व्हायचं असं त्यांनी कधीच स्वप्न बाळगलं नाही. परंतु त्यांना त्यांच्या मजबूरी मुळे एक युट्युबर व्हावं लागलं पुढे त्यांच्या याच कलेमुळे ते आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ओळखले जाऊ लागले आहेत. जर आपल्या अंगी एक उत्तम कला असेल आणि त्या कलेच्या माध्यमातून जर आपण लोकांचे मनोरंजन करू शकलो तर याच्यासारखा आनंद दुसरा कुठेच मिळणार नाही.

जर युट्युबवर जायचं असेल किंवा युट्युब वर वेगवेगळे कंटेंट अपलोड करायचे असेल तर माणसाने नेहमी क्रिएटिव राहणे गरजेचे आहे क्रिएटिव्हिटी कधीच संपत नाही आणि आपल्यातील हीच क्रिएटिविटी विनायक माळी यांनी ओळखली. त्यांना ठाऊक होतं की त्यांच्यामध्ये लोकांना हसवण्याची कला आहे आणि त्यांनी त्यांच्या या कलेचा उत्तम असा उपयोग केला.

आता हल्ली संपूर्ण जगाला covid-19 या महामारी ने घेरलं आहे परंतु अशा नकारात्मक वातावरणामध्ये आपण नेहमीच एक नवीन सकारात्मक उर्जेचा स्त्रोत शोधत असतो आणि असा स्त्रोत्र आपल्याला नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या आवडीचं काम करण्यातून मिळतो. परंतु अशावेळी जर एखादा कॉमेडी कन्टेन्ट बघितलं किंवा मनोरंजक व्हिडिओ बघितली तर तरी सर्वांना सकारात्मक वाटतं. असेच मनोरंजन व्हिडिओ बनवण्याचे काम विनायक माळी करत आहेत.

विनायक माळी हे प्रेक्षकांसाठी हास्याचा खजिना बनले आहेत. लोकांना आज ग्लॅमर जगाचं फारच आकर्षण आहे क्वचितच लोक आहेत ज्यांना साधेपणा आवडतो अशातच विनायक माळी एक प्रतिभावान आणि डाऊन टू अर्थ असा मुलगा आहे जो आपल्या साधेपणाच्या जोरावर अनेक लाखो लोकांचे मन जिंकत आहे. त्याचे चाहते अगदी पाच सहा वर्षांच्या मुलांपासून ते अगदी पन्नास साठ वर्षांच्या म्हातारं पर्यंत आहेत. लोकांनी त्याला सेलिब्रिटी किंवा दादुस अशी वेगवेगळी नावे दिली आहेत.

विनायक माळी यांचे व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावरती प्रसिद्ध आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे विनोद करण्याची शैली आहे. त्यांची विनोद करण्याची उत्तम शैली आणि आगरी-कोळी भाषा यांचा संगम लोकांना अधिक आवडलेला आहे.. सुरुवातीला विनायक माळी पनवेलचा एक साधा अतिसामान्य मुलगा होता परंतु जेव्हा पासून त्यांनी यूट्यूब चैनल उघडलेल आहे तेव्हापासून अतिशय कमी कालावधी मध्ये सर्वत्र त्यांचे व्हिडिओ वायरल झाले आणि बघताच लाखो लोक त्यांना फॉलो करायला लागले.

त्यांचा हा प्रवास नक्कीच संघर्षमय आणि अंगावर काटे आणणारा आहे. त्यांच्या अनेक चहात्यांपैकी तरुण चाहत्यांचा वर्ग मोठा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला विनायक माळी त्यांच्या चाहत्यांसाठी शेठ, कॉमेडी किंग, सेलिब्रेट आणि डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनायक माळी यांनी जाहिराती आणि पीआर व फ्री लान्स, शॉर्ट फिल्म व्हिडिओ एडिटर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं.

त्याने अभिनयाची आवड असल्यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिल्या परंतु त्याला अपयश मिळाला त्याची निवड झाली नाही. म्हणूनच विनायक यूट्यूब चैनल कडे वळाला यु ट्यूब वरती स्वतः कंटेंट अपलोड करून भरपूर पैसे कमवता येतात. म्हणूनच त्याने एक आवड म्हणून यूट्यूब चैनल सुरू केलं.

परंतु कालांतराने त्याला विप्रो या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि त्याने थोड्या दिवसाने त्याचे यूट्यूब चैनल थांबवलं कारण नोकरी च्या नादामध्ये यूट्यूब साठी वेळ द्यायला मिळत नव्हता परंतु कालांतराने तो पुन्हा यूट्यूब चैनल कडे वळाला. आगरी कोळी भाषा हि सर्वांच्याच आवडीची आहे परंतु त्यावेळी प्रादेशिक युट्युब कंटेंट जास्त चालायची नाहीत. परंतु तरीही विनायक ने आगरी कोळी भाषेमध्ये युट्यूब व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

हळूहळू त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होऊ लागले कारण की उत्तम विनोद आणि अभिनय शैली आणि त्यामध्ये ठसकेदार आगरी कोळी भाषा हे कॉम्बिनेशन लोकांच्या पसंतीस पडलं आणि बघता बघता त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि तो यूट्यूब ऍक्टर बनला. त्याचा साधेपणा हा मनाला भावणारा आहे बघता बघता त्याने १.३४ दशलक्ष इतके युट्यूब फॉलोवर्स मिळवले. त्याने तयार केलेल कंटेंट, त्यामध्ये त्याचा साधा विनोद, नम्र स्वभाव हे त्याच्या चाहत्यांच मुख्य आकर्षण ठरल आहे.

व्हिडिओमध्ये आगरी-कोळी भाषेचा वापर करून शहरी भाषा आणि आगरी कोळी भाषा असे एक वेगळं आणि सुंदर मिश्रण त्याने तयार केल आहे. जे लोकांना ऐकायला भरपूर आवडते तो त्यांच्या चाहत्यांशी मनाने जोडला गेला आहे. त्याच्या चाहत्यांना काय आवडतं, त्यांच्या भावना, त्यांचे विचार प्रक्रिया,‌त्यांची परिस्थिती या सगळ्या गोष्टी त्याला आपल्या चाहत्यांच्या अधिक जवळ नेतात त्यामुळेच बऱ्याच लोकांमध्ये तो प्रसिद्ध आहे. कोणतंही लेबल नसतानादेखील तो अनेकांसाठी सेलिब्रेटी आहे.

त्याने आजवर दादुस सिरीज, माझी बायको सिरीज, शेठ माणूस, वाकडे गुरुजी असे वेगवेगळे पात्र वेगवेगळ्या मालिका तयार केलेल्या आहेत. आता त्याचे यु ट्यूब वरती २.५ दशलक्ष फॉलोवर्स म्हणजेच सबस्क्रायबरस आहेत. त्याला युट्युब मुळे मिळालेले यश ही गोष्ट त्याच्यासाठी अभिमानास्पद आहे. या गोष्टीमुळे त्याच्या कुटुंबालाही त्याचा अभिमान वाटतो त्याने मिळवलेले यश हे एका रात्रीत आलेल नाही आहे. त्यासाठी त्याने फार संघर्ष केला आहे तो त्याच्या व्हिडिओज मधून अनेक वेळा सांगत असतो की त्याच्या कुटुंबाचा व त्याच्या चहात्यांचा त्याच्यावर असणारा विश्वास व त्याला सतत मिळणारे प्रेम त्याच्या यशाचं खरं गुपित आहे.

बहुतेकांना यश मिळाले की त्यांचा रुबाब बदलतो परंतु विनायक च्या बाबतीत तसं नाही आहे त्याचा साधेपणा हा आधीही तसाच होता आणि यश मिळाल्यावरती ही तसाच आहे. येणाऱ्या काळामध्ये चाहात्यांनी त्याच्याकडून आणखीन अपेक्षा ठेवल्या आहेत. त्याच्या चाहत्यांनाच्या अपेक्षा आहेत की तो अजून विनोदी कंटेंट अपलोड करेल. त्याच्या व्हिडिओज ना लाखोच्या घरामध्ये लाईक्स आणि वियूज असतात. युट्युब वरून मिळणारी कमाई ही नियमित नसते परंतु तरीही साधारणता विनायक माळी ची दोन व तीन लाख रुपये कमाई होते.

लोकांना तो आपलासा वाटतो. प्रेक्षक त्याचे व्हिडिओज बघताना अगदी पोटावर हात ठेवून हसत असतात. विनायक माळी हे नाव ऐकू जरी आलं तरी लोकांच्या चेहर्‍यावर एक स्माईल येते. दुःखात, सुखात, आजारपणात लोक त्याचे व्हिडिओज बघतात आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याचे व्हिडिओज प्रत्येक अडचणी वरचं उत्तर आहे. हसायला कोणाला नाही आवडत आणि त्यामध्ये विनायक माळी यांचे युट्युब व्हिडीओज तर कमालच असतात.

आम्ही दिलेल्या Vinayak Mali Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विनायक माळी जीवन परिचय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Vinayak Mali information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Vinayak Mali in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vinayak mali wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!