विश्वनाथन आनंद मराठी माहिती Viswanathan Anand Information in Marathi

Viswanathan Anand Information in Marathi विश्वनाथन आनंद मराठी माहिती जगज्जेता पदक मिळवणारे बुद्धिबळाच्या पटावरील राजा विश्वनाथन आनंद हे भारताचे बुद्धिबळ‌ खेळाडू आहेत. भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांची विशेष ओळख आहे. बुद्धिबळ मध्ये तरबेज असणारे विश्वनाथन आनंद आपल्या बुद्धीच्या बळावर प्रतिस्पर्ध्याला एकाच डावा मध्ये हार स्वीकारायला लावणारे विश्वनाथन आनंद यांना बुद्धिबळाचा राजा, शहंशाह आणि जादूगार देखील म्हटलं जातं. या लेखामध्ये आपण विश्वनाथन आनंद यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

viswanathan anand information in marathi
viswanathan anand information in marathi

विश्वनाथन आनंद मराठी माहिती – Viswanathan Anand Information in Marathi

पूर्ण नाव विश्वनाथन आनंद
जन्म११ डिसेंबर १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलविश्वनाथन अय्यर
आईसुशिलादेवी
जन्मगावतमिळनाडूमधील मयिलाडूथराई या शहरात

जन्म

मयिलाडूथराई हे तमिळनाडूमधील एक छोटसं शहर आहे. ११ डिसेंबर १९६९ रोजी विश्वनाथन आनंद यांचा जन्म मयिलाडूथराई या शहरात झाला. पण लहानाचे मोठे ते चेन्नई येथे झाले. आनंद यांचे वडील विश्वनाथन अय्यर हे दक्षिण रेल्वेतून रिटायर झालेले मॅनेजर होते. आनंद विश्वनाथन यांना बुद्धिबळाची आवड त्यांच्या आईमुळे निर्माण झाली.

आनंद विश्वनाथन यांची आई सुशिलादेवी या एक बुद्धिबळ प्रशिक्षक आणि समाजसुधारक होत्या. विश्वनाथन आनंद सहा वर्षाचे असल्यापासून त्यांची आई त्यांना बुद्धिबळाची शिकवणी द्यायची. विश्वनाथन आनंद यांना एक मोठा भाऊ आणि बहीण देखील आहे.

शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्य

विश्वनाथन आनंद यांचा जन्म जरी तामिळनाडू येथे झाला असला तरी, ते लहानाचे मोठे चेन्नईमध्ये झाले. त्यामुळे चेन्नईमध्ये त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. चेन्नईमधील एग्मोरे शहरातील डॉन बॉस्को मॅट्रिक्यूलेशन हायर सेकंडरी स्कूल येथून विश्वनाथन आनंद यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढील पदवी शिक्षण घेण्यासाठी विश्वनाथन आनंद यांनी चेन्नईमधील लोयोला कॉलेजमध्ये प्रवेश केला.

या कॉलेजमधून विश्वनाथन आनंद यांनी कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या शाखेमध्ये पदवी घेतली. विश्वनाथन आनंद यांना त्यांच्या आईने लहानपणापासूनच बुद्धिबळ खेळायला शिकवलं होतं आणि या खेळामध्ये विश्वनाथन आनंद पारंगत देखील झाले होते. त्यामुळे त्यांना बुद्धिबळाची देखील आवड निर्माण झाली होती. अरुणा आनंद या विश्वनाथन आनंद यांच्या पत्नी आहेत. या दाम्पत्यांना २०११ मध्ये पुत्र प्राप्ति देखील झाली.

बुद्धिबळ मधील विश्वनाथन आनंद यांचे करियर

आईचं मार्गदर्शन हे कधीच चुकीचं नसतं हे संपूर्ण जगाला दाखवून देणारे विश्वनाथन आनंद भारताचे बुद्धिबळ खेळाडू आहेत. विश्वनाथन आनंद यांनी लहानपणी त्यांच्या आईकडून शिकून घेतलेले बुद्धिबळाचे डाव पेज त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उपयोगी ठरले. विश्वनाथन आनंद हे गेल्या तीन दशकांपासून बुद्धिबळ खेळाचे राजा आहेत. विश्वनाथन आनंद यांनी चार वेळा जगज्जेताच पद मिळवलं आहे.

विश्वनाथन आनंद हे पाच वेळा ऑस्कर विजेते आहेत. इसवी सन २००० ते २००२ या कालावधी मध्ये विश्वनाथन आनंद यांनी फिडे बुद्धिबळ चॅम्पियनशिप आपल्या नावावर करत, आपल्या कौशल्याने संपूर्ण जगाला चकित करून ठेवलं आहे. इसवी सन २००७ मध्ये विश्वनाथन आनंद यांनी वर्ल्ड चेस चंपियनशिप जिंकली आणि संपूर्ण जगामध्ये त्यांच्या विजयाचा वाहवाह झाला.

सन २००८ च्या वर्ल्ड चेस चंपियनशिप आनंद विश्वनाथन आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवून पुन्हा एकदा विजयी ठरले. या स्पर्धेमध्ये त्यांचा सामना ब्लादिमीर कैमिनिक नावाच्या खेळाडूशी झाला. ही स्पर्धा जिंकल्यावर विश्वनाथन आनंद हे चेस चॅम्पियनशिप नॉकआउट, टूर्नामेंट आणि मॅच जिंकणारे जागतिक बुद्धिबळ मध्ये इतिहासातील पहिले खेळाडू ठरले.

२०१० मध्ये आयोजित केलेल्या वर्ल्ड चेस चंपियनशिप मध्ये विश्वनाथन आनंद हे एका महान प्रतिस्पर्ध्याशी सामना करणार होते. सन २०१० मध्ये घडलेल्या या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये विश्वनाथन आनंद यांनी दिग्गज वेसेलिन टोपालव या खेळाडूला हरवून पुन्हाएकदा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

जसं राजाचं आपल्या राज्यावर आणि प्रजेवर वर्चस्व असतं तसंच विश्वनाथन आनंद यांचादेखील बुद्धिबळाच्या खेळांमध्ये आपल वर्चस्व वाढू लागलं होतं. बुद्धिबळ खेळून खेळून विश्वनाथन आनंद यांची बुद्धीत इतकी तल्लक बनली होती. की समोरचा आता कुठलं डाव खेळणार आहे हे त्यांना आधीच कळूनं जायचं आणि आपल्या बुद्धीचा वापर करून ते समोरच्याला चुका करण्यास भाग पाडायचे.

याच प्रकारे विश्वनाथन आनंद यांनी २०१२ साली घडलेल्या वर्ल्ड चेस चंपियनशिप मध्ये पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये विश्वनाथन आनंद यांनी बोरिस गेलफैंड या प्रतिस्पर्धकाचा पराभव करून आपला विजय प्राप्त केला. पुढील दोन वर्ष विश्वनाथन आनंद यांना विजेतेपद मिळवता आले नाही.

सन २०१८ मध्ये विश्वनाथन आनंद यांनी कोलकत्ता येथे पहिला टाटा स्टील बुद्धिबळ भारत ब्लिट्ज टूर्नामेंट मध्ये सहभाग घेऊन हा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये विश्वनाथन आनंद हे पहिला फेरीमध्ये चौथ्या स्थानावर होते. तर विश्‍वनाथन यांनी शेवटच्या सामन्यांमध्ये सहा फेऱ्या जिंकल्या. इसवी सन १९८८ मध्ये विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले.

सन २००० मध्ये विश्वनाथन आनंद यांनी फिडे चेस चंपियनशिप जिंकली. ही चॅम्पियनशिप जिंकणारे हे भारताचे पहिले खेळाडू आहेत. संपूर्ण इतिहासात ९ खेळाडू असे आहेत ज्यांनी फिडे चेस चॅम्पियनशिपमध्ये जिंकून नवीन रेकॉर्ड उभे केले आहेत. या नऊ खेळाडूंच्या यादीमध्ये विश्वनाथन आनंद यांचे देखील नाव आहे.

सलग एक वर्ष आणि नऊ महिने विश्वनाथन आनंद हे संपूर्ण विश्वातील नंबर वन खेळाडू होते. विश्वनाथन आनंद हे सन १९९७, सन १९९८, सन २००३, सन २००४, सन २००७, सन २००८ मध्ये बुद्धिबळाच्या ऑस्कर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आपल्या आईने दाखवून दिलेल्या मार्गावर विश्वनाथन आनंद यांनी वाटचाल केली आणि आज ते यशाच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचले आहेत.

वर्ल्ड चेस चंपियनशिप विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा जगज्जेता पद मिळवलं आहे. (सन २०००, सन २००७, सन २००८, सन २०१०, सन २०१२). आपल्या करिअरमध्ये इतके यश मिळवणारे विश्वनाथन आनंद हे पहिलेच महान व्यक्तिमत्व आहेत.

विश्वनाथन आनंद यांनी आपल्या सोबतच भारताचे नाव देखील बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये पुढे नेलं आहे. विश्वनाथन आनंद हे आज बऱ्याच बुद्धिबळ प्रेमींचे आदर्श बनले आहेत. विश्वनाथन आनंद यांच्याकडे खरंच काहीतरी अद्भुत कौशल्ये आहेत ज्यामुळे त्यांना बुद्धिबळाच्या खेळातील जादूगार म्हटलं जातं.

पुरस्कार

प्रत्येक वेळी बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व करणारे व भारताला यशाचे डोंगर चढायला लावणारे विश्वनाथन आनंद. यांना भारतामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोच्च मानला जाणारा भारत सरकारचा खेळ पुरस्कार म्हणजेच अर्जुन अवॉर्ड मिळाला. इसवी सन १९८५ मध्ये विश्वनाथन आनंद यांना अर्जुन‌ अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

विश्वनाथन आनंद यांनी बुद्धीबळ खेळा मध्ये दिलेल्या योगदानाचा मुळे भारत सरकारने १९८७ मध्ये विश्वनाथन यांना “पद्मश्री” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. सन २००० मध्ये विश्वनाथन यांना भारत सरकार द्वारे “पद्मभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. इसवी सन २००७ मध्ये विश्वनाथन आनंद हे “पद्मविभूषण” या पुरस्काराचे मानकरी ठरले.

भारत सरकारद्वारे दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी पुरस्कार. हा पुरस्कार मिळवणारे विश्वनाथन आनंद हे पहिले भारतीय आहेत. सन १९९१ मध्ये विश्वनाथन आनंद यांना राजीव गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विश्वनाथन आनंद यांचे बुद्धिबळ खेळा मधील कौशल्य आणि विश्वनाथन आनंद यांचा विजय आता फक्त भारतासाठीच मर्यादित राहिला नव्हता.

तर, विश्वनाथन आनंद हे संपूर्ण जगभरात बुद्धिबळा मध्ये अव्वल क्रमांक मिळवणारे स्पर्धक बनले होते. त्यांची ख्याती आता देश-विदेशात पोहोचली होती. २५ एप्रिल २००१ मध्ये विश्वनाथन आनंद यांना स्पेन सरकार तर्फे स्पेन देशामध्ये सर्वोच्च मानला जाणारा “JAMEO DE ORO” हा पुरस्कार जाहीर झाला.

पाच वेळा जगज्जेता पदाचे मानकरी

सन २००० मध्ये विश्वनाथन आनंद यांनी फीडे स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावून जगज्जेतेपद जिंकले. स्पेनच्या अलेक्सी शिरोवला चा ३.५ – ०.५ असा पराभव करून विजयी झाले. सन २००७ मध्ये मेक मेक्सिकोमध्ये घडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून विश्वनाथन आनंद यांनी २९ सप्टेंबर २००७ रोजी जगज्जेता पद मिळवलं.

सन २००८ मध्ये विश्वनाथन आनंद यांनी रशियाच्या ब्लादिमीर कैमिनिकला हरवून तिसऱ्यांदा जगज्जेता पद मिळवलं. इसवी सन २०१० मध्ये विश्वनाथन आनंद यांनी टोपोलोव या प्रति स्पर्धकाला हरवून चौथ्यांदा जगज्जेता पद मिळवलं. इसवी सन २०१२ मध्ये विश्वनाथ आनंदन यांनी पुन्हा ही स्पर्धा जिंकून जगज्जेता परत आपल्याकडे सदोदित ठेवलं.

आम्ही दिलेल्या viswanathan anand information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि Viswanathan Anand Mahiti in Marathi email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विश्वनाथन आनंद मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या viswanathan anand information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about viswanathan anand in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chess player viswanathan anand information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!