Vithal Kamat Information in Marathi – Vithal Kamat Biography in Marathi विठ्ठल कामत यांची मराठी माहिती व्यवसाय म्हटलं तर जोखीम आलीच आणि त्यासोबतच प्रबळ इच्छाशक्ती देखील. असंच काहीतरी नवीन व विलक्षण करण्याचं स्वप्न विठ्ठल कामत यांनी पाहिलं आणि व्यवसायिक क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज विठ्ठल कामात एक सुप्रसिद्ध व्यवसायिक आहेत जे कामत हॉटेल्स ग्रुप लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. विठ्ठल कामत हे जगातील सुप्रसिद्ध हॉटेल आहे. आजचा लेखामध्ये आपण विठ्ठल कामत यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
विठ्ठल कामत यांची मराठी माहिती – Vithal Kamat Information in Marathi
पूर्ण नाव (Name) | विठ्ठल कामत |
जन्म (Birthday) | सन १९५३ |
जन्म गाव (Birth Place) | मुंबईतील ग्रँड रोड |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | सुप्रसिद्ध व्यवसायिक |
जन्म – Vithal Kamat Biography in Marathi
सन १९५३ मध्ये विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतील ग्रँड रोड येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत अस आहे. विठ्ठल कामत हे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला एक डिश वॉशर आणि बस बॉय म्हणून काम करत होते. जोखीम उचलून त्यांचे वडील व्यंकटेश कामत यांनी १९५२ मध्ये सात्कर हे पहिले रेस्टॉरंट उघडले.
हे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी व्यंकटेश यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले होते. विठ्ठल त्यांच्या वडिलांना त्यांच्या या व्यवसायामध्ये मदत करत असे. विठ्ठल कामत यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. विठ्ठल यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी अतिशय चांगले संस्कार केले ज्यामुळे त्यांचे बालपण चांगलं गेलं.
सुरुवातीचे आयुष्य
एक उत्तम उद्योजक, जाणकार लेखक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी, पक्षीविद्यातज्ज्ञ असं मराठमोळं व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल कामत होय. विठ्ठल यांच व्यवसाय क्षेत्रातील पदार्पण त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या हॉटेल मधून झाल. विठ्ठल कामत यांच्या विचारांवर त्यांचे वडील व्यंकटेश कामत यांचा प्रभाव आहे. आई-वडिलांनी विठ्ठल यांच्यावरती अतिशय उत्तम संस्कार केले. विठ्ठल कामत अगदी आवडीने सांगतात की त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची तु जे काम पहिलं करशील ते अतिशय चांगलं करण्याचा प्रयत्न कर.
तसेच जर एखादं काम करताना त्यातून आपल्याला समाधान मिळत असेल तर त्यातून मिळणारा नफा किंवा तोटा वर लक्ष देऊ नकोस आणि तू तुझ्या वडिलां पेक्षा देखील मोठा हो. आईचे हेच शब्द लक्षात ठेवून विठ्ठल कामत यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. पुढे ते लंडन येथे एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करू लागले तिथे त्यांनी हॉटेल व्यवसायात कौशल्य मिळवले आणि कालांतराने भारतात परत आले.
भारतात परत आल्या नंतर विठ्ठल कामत यांनी आर्किड हे इको फ्रेंडली होटेल उघडलं. विठ्ठल कामत यांच्या मते ज्याच्या मनगटात मध्ये बळ असेल आणि मनामध्ये काही तरी वेगळं विलक्षण करून दाखवण्याची धमक असेल तर अशक्य गोष्ट देखील शक्य आहे आणि ही गोष्ट आपण सर्वच करू शकतो. विठ्ठल कामत यांच्या एका मित्राचं गुजरात येथील वापी येथे एक हॉटेल होतं जे गेले पाच वर्षे सलग तोट्या मध्ये होतं.
विठ्ठल कामत यांनी तिथे जाऊन आपल्या मित्राला मदत करण्याचं ठरवलं ज्यावेळी ते वापी येथे गेले जेव्हा त्यांनी हॉटेलची दशा पाहिली आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात एक ट्यूब पेटली विठ्ठल कामत यांच्या मते जर ग्राहकांना आकर्षित करायचं असेल तर हॉटेल च्या नावाखाली एक मजेशीर टॅग लाइन किंवा पंच लाईन हवी. त्यांच्या मित्राचा हॉटेल हायवेलगत होतं आणि म्हणूनच विठ्ठल कामत यांनी अतिशय चातुर्याने आपल्या काही मित्रांच्या दहा बारा गाड्या आणून हॉटेल समोर उभ्या केल्या.
त्या अशाप्रकारे उभ्या केल्या की बाहेरून जाणाराऱ्यांना वाटेल की या हॉटेलमध्ये किती गर्दी आहे म्हणजे हॉटेल नक्की चांगल असणार. आणि या त्यांच्या युक्तीमुळे बरेच ग्राहक हॉटेलमध्ये येण्यास सुरुवात झाली. हॉटेलमधील नोकरचाकर ग्राहकांच्या गाड्या पुसून देत असत यामध्ये देखील विठ्ठल कामत यांनी एक युक्ती केली त्यांनी नोकरांना गाड्यांची आधी को ड्रायव्हर वाली बाजू साफ करायला सांगितली जेणेकरून ड्रायव्हरची बाजू साफ करायला अधिक वेळ लागेल आणि त्या वेळामध्ये ग्राहक हॉटेलमध्ये जाऊन विश्रांती घेतील आणि फक्त बसण्यापेक्षा काहीतरी खातील देखील.
विठ्ठल कामत यांचं हे गणित कामाला आलं त्यांच्या मित्राचा धंदा व्यवस्थित सुरू झाला. जेव्हा विठ्ठल कामत यांना व त्यांच्या परीवाराला लोक हा एक हॉटेलवाला आहे असं बोलायचे तेव्हा विठ्ठल कामात त्यांना फार राग यायचा त्याच वेळी त्यांनी काहीतरी जगावेगळं करून दाखवण्याचा ठरवलं. एकदा मुंबईतील एक हॉटेल विक्रीसाठी निघालं होतं. विठ्ठल कामत यांना जगावेगळे हॉटेल सुरू करायचं होतं आणि ते त्यांचे स्वप्न त्यांनी द ऑर्किड या हॉटेल च्या माध्यमातून सत्यात उतरवलं.
द ऑर्किड हे हॉटेल इको फ्रेंडली हॉटेल आहे या हॉटेलमध्ये झिरो गार्बेज म्हणजेच अजिबात कचरा बघायला मिळणार नाही. या हॉटेल ला ३७४ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. व्यवसाय क्षेत्र म्हंटल तर त्यामध्ये मराठी लोक फार क्वचित दिसून येतात. परंतु मराठी माणसाकडे शिक्षण, बुद्धी आहे आणि आपण या व्यवसायात पाऊल ठेवून स्वतःचा व समाजाचा फायदा करू शकतो असा विश्वास विठ्ठल कामत यांना आहे.
विठ्ठल कामत यांनी आतापर्यंत सत्कार, ऑर्किड, सम्राट यांसारखी विविध खाद्यसंस्कृतींची परिपूर्ण अशी उपाहारगृह सुरू केली आहेत. अर्थातच इतक मोठे यश मिळवताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अपयश आले परंतु कठीण परिस्थिती मधूनही त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. असंच जेव्हा त्यांनी ऑर्किड हे हॉटेल सुरू केलं तेव्हा काही कारणास्तव हे हॉटेल विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यांच्या डोक्यावर करोडचं कर्ज झालं होतं.
परंतु तेविसाव्या मजल्यावर एक पेंटर कुठलाही प्रकारचा सुरक्षाकवच न वापरतात इमारतीचे रंग काम करत होता त्याच्याकडे बघून विठ्ठल कामत प्रेरित झाले. जर एखादी व्यक्ती आपल्या जीवावर बेतेल तशी इतकी मोठी जोखीम उचलू शकतो तर मी देखील आलेल्या परिस्थितीला नक्की सामोरे जाऊ शकतो. आज द ऑर्किड संपूर्ण जगातील फाईव्ह स्टार हॉटेल आहे जे इको-फ्रेंडली हॉटेल आहे. विठ्ठल कामत यांचे पर्यावरणावर देखील भरपूर प्रेम आहे.
आज पर्यंत त्यांनी ६० लाखांहून अधिक झाडे लावलेली आहेत. शंभर एकर पेक्षा जास्त टेकडीचे वनीकरण यासाठी औषधी वनस्पती आणि स्थानिक झाडांमध्ये रूपांतर केलेले आहे. एक पक्षी शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ऑर्किड जवळ रघु आणि पोपट गल्ली देखील तयार केली आहे. त्यांना प्राचीन वस्तू गोळा करण्याचा देखील छंद आहे आणि त्यासाठी त्यांनी मुंबई आणि जाधव गड येथे आई संग्रहालयाची उभारणी केली आहे. या संग्रहालयामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनासाठी ठेवल्या आल्या आहेत.
कामत यांचा हा हॉटेल व्यावसाय आज संपूर्ण जगभरामध्ये पसरला आहे. विठ्ठल कामत यांना आज वर ११० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ज्यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार. २०१२ साली जर्मनीतील जीवनगौरव पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीएर पुरस्कार.
२०१० मध्ये राजीव गांधी पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. आणि या सोबतच आर्किड या त्यांच्या संपूर्ण पर्यावरण पूरक हॉटेलला इकोटेल हा किताब देखील मिळाला आहे. विठ्ठल कामत हे महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. सोबतच हॉटेल आणि रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष देखील होते.
या व्यतिरिक्त त्यांनी अनेक शैक्षणिक, औद्योगिक समित्यांवर सल्लागार म्हणून कार्य केलं आहे. आयआयएम आमदाबाद आणि इतर व्यवसायिक महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य देखील केल आहे. हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस काम करून यशस्वी होऊ शकतो कींवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोक उद्योजक बनण्याचं किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात.
आणि अशा लोकांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेली वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘उद्योजक होणारच मी’ आणि ‘इडली ऑर्किड आणि मी’ या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजक बनू पाहणाऱ्या लोकांसाठी प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. जर एक यशस्वी उद्योजक व्हायचंय असेल तर त्यासाठी ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड असेल असं क्षेत्र व्यवसायासाठी निवडा.
आपल्या जीवनामध्ये एक गुरु शोधायचा जो तुम्हाला तुमच्या चुका लक्षात आणून देईल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. तुमच्या चुका लक्षात घ्या आणि त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करा. आपला अनुभव हाच आपल्या पाठीशी उभा राहतो त्यामुळे भरपूर अनुभव घ्या आणि हा अनुभव घेताना जर कोणी तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देत असेल तर त्या निमूटपणे सहन करा आणि त्यातून शिकून यशस्वी व्हा आणि यशस्वी झाल्यावर आपल्याला मिळणाऱ्या नफ्यातील थोडासा भाग समाजासाठी आणि पर्यावरणासाठी दान करा.
आम्ही दिलेल्या vithal kamat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर विठ्ठल कामत यांची मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vithal kamat biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of vithal kamat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vithal kamat interview in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Mr. Vitthal Kamat sir che shikshan kontya madhyamatun zale ahe??