जलचक्र निबंध मराठी Water Cycle Essay in Marathi

Water Cycle Essay in Marathi जलचक्र निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये वॉटर सायकल म्हणजेच ज्याला मराठीमध्ये जलचक्र (water cycle essay)असे देखील म्हणतात या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. जलचक्र म्हणजे काय हे सर्वांना माहीतच आहे कारण आपण विज्ञानमध्ये शाळेमध्ये असताना शिकलो आहोत. जलचक्र म्हणजे हे एक पाण्याचे चक्र आहे ज्यामध्ये पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन होते आणि पाण्याची वाफ ढगामध्ये जावून ढग निर्माण होतात आणि मग त्याचा पावूस पडतो आणि परत जमिनीवर / पृथ्वीवर पाणी साठते आणि अशे हे चक्र सतत चालूच राहते.

water cycle essay in marathi
water cycle essay in marathi

जलचक्र निबंध मराठी – Water Cycle Essay in Marathi

जलचक्र म्हणजे काय ?

आपण निबंधाला सुरुवात करण्याअगोदर जलचक्र ( water cycle ) म्हणजे काय हे समजावून घेवूया. सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन कोरडी पडते, त्याचे तापमान वाढते आणि यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होऊ शकतात आणि बाष्पीभवन झालेले पाणी जलस्रोतांतून किंवा मातीतून येऊ शकते किंवा वनस्पतींद्वारे बाष्पीभवन होऊ शकते. बाष्पीभवन झालेले पाणी ढग बनवते आणि बनलेले ढग पावसाच्या रुपामध्ये परत पृथ्वीवर पडतात आणि परत असेच चक्र चालू असते आणि या चक्राला जलचक्र म्हणतात.

हे आपल्या पृथ्वीवरच्या जीवांच्यासाठी, प्राण्यांच्यासाठी आणि मनुष्यासाठी खूप गरजेचे आहे म्हणजेच हे जलचक्र पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी खूप महत्वाचे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर आणि खाली, एक किंवा दुसर्या मार्गाने आणि कोणत्या ना कोणत्या स्त्रोताद्वारे पाणी सतत फिरत असते. सर्व क्षेत्रांमधून पाण्याची ही हालचाल पृथ्वीचे अस्तित्व सुनिश्चित करत आहे. पृथ्वीवरील अंतहीन नैसर्गिक जलचक्राला जलविज्ञान चक्र म्हणतात.

Essay on Water Cycle in Marathi

आपल्या ह्या पृथ्वी वर ७० टक्के पाणी आणि उरलेले ३० टक्के जमीन आहे. आपल्या संपूर्ण पृथ्वीचा मोठा भाग पाण्याने व्यापला आहे पण दुःखाची गोष्ट अशी आहे की पृथ्वीवरील फक्त ३ टक्के पाणी मानव वापरू शकतात म्हणजेच ३ टक्के पाणी हे गोडे पाणी आहे आणि राहिलेले पाणी हे खारे पाणी ( समुद्र ) आहे. आपल्या पृथ्वीवर गोड्यां पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे आणि गोड्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे तलाव, नद्या,  बर्फ , हिमनदी आणि इतर पाण्याची स्त्रोत्र आहेत.

मी पृथ्वीवरील पाण्याबद्दल चर्चा केली कारण पाणी हा जलचक्रा चा महत्वाचा भाग आहे आणि जलचक्र हे बहुतेकदा महासागरातील पाण्यामध्ये चालते. तसेच जलचक्रामध्ये नद्या देखील महत्वाच्या भूमिका बाज्वातात कारण पावसाने येणारे पाणी हे प्रथम ओड्यातून किंवा नाल्यातून हे नदीमध्ये येते आणि मग नद्या हे पाणी समुद्रापर्यंत न्यायचे काम करतात.

निःसंशयपणे, पृथ्वीवरील पाणी वातावरण,  लिथोस्फीअर आणि हायड्रोस्फीअर या तीनही क्षेत्रांमध्ये फिरत राहते आणि या आपल्या पृथ्वीच्या पाण्याच्या या नैसर्गिक अभिसरणाला जलचक्र (water cycle) म्हणतात आणि महत्वाचे म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टी अस्तित्वासाठी जलचक्र ही एक आवश्यक प्रक्रिया आहे.

आपल्या वातावरणात आढळणारा बहुतेक ओलावा हा महासागर, समुद्र, सरोवरे इत्यादींमधून होणाऱ्या बाष्पीभवनाचा परिणाम आहे. बाष्पीभवन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पाणी द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत बदलते. बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे ओलावा सोडण्यात वनस्पती देखील भूमिका बजावतात. झाडे त्यांच्या मुळांद्वारे जमिनीतून पाणी घेतात आणि पानांवर असलेल्या लहान छिद्रांच्या मदतीने ते वातावरणात सोडतात. बर्फाच्या उदात्तीकरणामुळे काही प्रमाणात बाष्पही तयार होते.

जलचक्र हे पृथ्वीसाठी खूप महत्वाचे आहे म्हणजे यामुळे अनेक फायदे होतात जसे कि जलीय परिसंस्था चांगल्या प्रकारे राखण्यासाठी जलचक्र महत्वाची कामगिरी करते. वनस्पती, प्राणी, मानव आणि इतर सजीव प्रजातींसह सर्व सजीवांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करून जलविज्ञान चक्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते त्याचबरोबर हे जीवनाच्या देखरेखीसाठी पृथ्वीवरील एक आवश्यक जैव-रासायनिक चक्र आहे.

आता आपण खाली जलचक्राचे चार पायऱ्या आहे आणि जलचक्र हे त्या प्रमाणे चालते. चला तर आता आपण जलचक्राच्या चार पायऱ्या कोणकोणत्या आहेत ते पाहूयात आणि आणि आणि जलचक्र प्रत्येक पायरीमध्ये कसे काम करते ते पाहूया.

  • बाष्पीभवन : ज्यावेळी सूर्याचे कडक ऊन किंवा किरणे समुद्रातील, नदीमध्ये, तलावामधील, हिमनद्यांच्या पाण्यामध्ये पडते आणि त्यावेळी पाण्याची वाफ तयार होते आणि ती हवेच्या मार्फत वर जाते आणि त्याचे डाग तयार होतात.
  • संक्षेपण : ज्यावेळी वातावरणातील वाफ हि हि थंड होते आणि द्रव पाण्यात परत येतात त्याला संक्षेपन म्हणतात.
  • पर्जन्य : जेव्हा वाफेमुळे तयार झालेला ढग ज्यावेळी पाऊस, बर्फ आणि गारा या सारख्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर पडतो आणि या टप्प्याला पर्जन्य टप्पा म्हणतात.
  • संकलन : ज्यावेळी पाऊस, गारा, बर्फ हे सर्व पृथ्वीवर पडते त्यावेळी नद्या, तलाव, महासागर यामध्ये पावसाचे पाणी साठते किंवा स्थिरावते त्याचबरोबर बहुतांश पाणी हे जमिनीमध्ये मुरते किंवा भूजल म्हणून एकत्रित होते.

अश्या प्रकारे जलचक्र काम करते आणि हे जलचक्र कोणतीही समस्या न येत चालले राहिले पाहिजे कारण जलचक्रा मुळे पाऊस पडतो तसेच पृथ्वीवर असणाऱ्या झाडांना पाणी मिळते तसेच झाडे हिरवी गार राहतात तसेच शेतातील पिक चांगले पिकते आणि जीवसृष्टी देखील चांगली चालते आणि मनुष्याचे जीवन देखील सुरळीत चालते.

पण सध्याच्या काळामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण वाढवले आहे आणि त्यामुळे मोठ मोठ्या कारखान्यातून पडणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषन होते आणि प्रदूषणाचा चा परिणाम हवामानावर तसेच ओझोनच्या थरावर आणि जलचक्रावर होतो आणि त्याचा परिणाम प्रत्यक्षपणे मनुष्याच्या जीवनावर होतो म्हणून आपण मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत.

आम्ही दिलेल्या water cycle essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जलचक्र निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on water cycle in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!