Essay On Tree in Marathi – Importance Of Trees Essay in Marathi झाडांचे महत्त्व निबंध मराठी झाडा विषयी निबंध आपल्या आयुष्यामध्ये झाडांचं महत्त्व अमूल्य आहे. परंतू मित्रांनो, आजकाल माणूस केवळ विकासाच्या नावाखाली औद्योगिकीकरण करण्यासाठी झाडांची बेसुमार हत्या करत आहे आणि तेही नैसर्गिक संपत्तीच्या किंमतीवर. जर झाडे तोडण्यासोबतच मानवाने नवीन रोपांची लागवड केली नाही तर, आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी संकटात येईल आणि सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. आपणा सर्वांना माहीत आहे, की कित्येक शतकानुशतके झाडे सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहेत.
खरंतर, झाडे म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेले वरदान आणि बहुमोल अशी भेटचं आहे. शिवाय, झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. झाडे आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची आहेत की त्यांच्याशिवाय आयुष्य जगण्याची कुणीही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे झाडे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देतात.
झाडाचे महत्व निबंध मराठी – Essay On Tree in Marathi
झाडा विषयी निबंध – Marathi Nibandh on Trees
मित्रांनो, ऑक्सिजन शिवाय कोणताही जीव या सृष्टीत जिवंत नाही राहू शकत, म्हणजेच प्रत्येक जीवाला जगण्यासाठी ऑक्सिजन हा घटक अत्यावश्यक आहे. याखेरीज, झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजनच देत नाहीत. ऑक्सिजन शिवाय ते आपल्याला अनेक गोष्टी देतात. वनस्पतींमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या कित्येक गोष्टी असतात.
निरनिराळ्या वेली, रोपं, वनस्पती आणि झाडे फक्त आपल्यासाठीच उपयोगी नसतात तर आपल्याशिवाय ते प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी देखील तितकीच महत्वाची असतात. माणसांप्रमाणे कित्येक प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे निवासस्थान, त्यांचे भोजन यांचा प्रमुख आधार झाडेचं आहेत.
मित्रहो, आपण सर्वांनी शाळेत असल्यापासून “झाडे लावा, झाडे जगवा” हा सुविचार अनेक वेळा ऐकला आहे. पण कधी आपण सर्वांनी या सुविचाराचा अर्थ समजून घेतला आहे का? या सुविचारातून आपल्याला हाच बोध मिळतो की झाडे आपल्या जीवनाचा सार आहेत. झाडांशिवाय पृथ्वीवरील सजीवसृष्टीची कल्पना करणे देखील व्यर्थ ठरेल.
सर्व वनस्पती या पृथ्वीवरील अमूल्य ठेवा आहेत. शिवाय, वृक्षांमुळेच माणसाला त्याच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेली संसाधने प्राप्त होतात. जर झाडे नसतील तर पर्यावरणाचा सगळा समतोल बिघडेल आणि सगळ्या गोष्टींचा विनाश होईल. सजीवांच्या श्वासासाठी लागणारा ऑक्सिजन देखील झाडापासून मिळतो, त्यामुळे तो जर मिळाला नाही तर जीवन जगणे अशक्य होईल.
याशिवाय हिरव्या भाज्या, फळे-फुले, वेगवेगळ्या उद्देशाने वापरल्या जाणार्या वुड्स, झाडांच्या सालींपासून बनवल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, मजबूत दोऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडांपासून मिळणारा गारवा इत्यादी गोष्टी मिळणं कठीण होईल. एकंदरीत मित्रांनो, झाडे आपल्या जीवनाइतकीच मौल्यवान आहेत.
कारण, वृक्षांचा अस्तित्वाचा मानवी जीवनावर खोल परिणाम होतो. संपूर्ण पृथ्वीवरील कोणत्याही दुसऱ्या गोष्टींशी झाडांची तुलना कधीही होऊ शकत नाही, म्हणूनच सर्व झाडांना आणि वनस्पतींना ‘हिरवं सोनं’ असंदेखील म्हणतात.
मानवजातीला निसर्गाने केलेली ही कृपा कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपात कधीचं फेडता येणार नाही. पण, अमानुष आणि कृतघ्न बनलेले आजचे मानव झाडाची अंधाधुंध तोड करतात. परंतू, वृक्षतोड करताना प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत की जर आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर प्रथम वृक्षाचे जतन करणे आवश्यक आहे.
आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर जीवन जगणे शक्य होण्याचे मुख्य कारण निसर्ग आहे. पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव असा ग्रह आहे, जिथे चहूबाजूंनी झाडे आणि वनस्पती यांची हिरवळ आहे. त्यामुळेच तर केवळ पृथ्वीवर जीवन जगणे शक्य झाले आहे. याशिवाय, झाडे हे आपल्या सर्वांचे खरे मित्र आहेत. ते आपल्याला सर्व गोष्टी निस्वार्थीपणे देतात, आपण केलेला अत्याचार सहन करतात. पण, मदत करण्याची भावना ते कोणत्याही परिस्थितीत कधीच सोडत नाहीत.
झाडांचे उपयोग आणि फायदे – Importance of Trees in Marathi
वरील माहितीवरून आपल्या लक्षात आलं असेल की, माणूस पूर्णपणे झाडांवर आणि वनस्पतींवर आधारित आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी झाडे आणि वनस्पती देवाचे निवासस्थान म्हणून पूजल्या जातात. आपणा सर्वांना हे मान्य करावं लागेल की मानवजातीच्या विकासामध्ये निसर्गाने सर्वाधिक योगदान दिले आहे.
अगदी प्राचीन काळाच्या पाषाण युगापासून ते आजच्या विज्ञान युगापर्यंत सर्व जीव हे वनस्पतींवर अवलंबून आहेत. आपल्याला अनेक मौल्यवान वस्तू झाडांपासून मिळतात. शिवाय, काही झाडे औषधे म्हणून देखील वापरली जातात आणि हीच औषधे बाजारात मात्र सर्वांत जास्त दराने विकली जातात. तुळशी, आवळा आणि कडुनिंब या वनस्पतींना आज उत्तम औषधांचा दर्जा मिळाला आहे.
पृथ्वीवर पावसाचे आगमन होण्याचे मुख्य कारण म्हणजे झाडे. आपल्याला माहीत आहे की पावसामुळे शेतीसाठी आणि इतर घरगुती कामांना विपुल प्रमाणात पाणी मिळते.
झाडे आपल्या सजीवसृष्टीला मोफत ऑक्सिजन प्रदान करतात. त्यामुळे, पृथ्वीवरील सर्व सजीव श्वासोच्छवासाद्वारे ऑक्सिजन घेऊन जगू शकतात. यामुळेच, ऑक्सिजनला जीवनशक्ती असेदेखील म्हणतात. शिवाय, पाणी, हवा आणि आवाज इत्यादींचे प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे आपल्याला खूप उपयुक्त ठरतात.
त्याचबरोबर, आपल्याला झाडांपासून बर्याच प्रकारची हंगामी फळे, औषधी पाने, मजबूत साली आणि भाज्या मिळतात. एकंदरीत, झाडे संपूर्ण जगाचे आयुष्य हे एकप्रकारे अन्नाच्या रूपाने घेऊन जगत असतात. विशेषत: वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी वृक्ष आणि झाडे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत. कारण, वृक्ष म्हणजे पक्ष्यांचे घर आणि अन्नाचे एकमात्र माध्यम आहे.
याखेरीज, व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील वनस्पती मानवाला खूप उपयुक्त आहेत. कारण बरेच लोक लाकूड, सागवान, आबनूस, सखू, पाइन, महुआ, देवदार इत्यादी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करुन आपले जीवन आनंदमय पद्धतीने जगतात.
वृक्षतोडीचे तोटे
आजकाल अवकाळी पडणारा पाऊस, अचानकपणे येणारे वादळी-वारे, समुद्राला येणारी भरती-ओहोटी, हवामानातील बदल, इत्यादी अनेक गोष्टींवरून आपल्या लक्षात येईल की निसर्गाचे चक्र कुठंतरी विस्कटत चालले आहे. आजच्या काळातील झाडांच्या अभावामुळे खासकरून आपल्या देशाच्या हवामानात सुस्तपणा आणि कोरडेपणा आला आहे.
त्यामुळे, याचा थेट परिणाम वर्षाचक्रावर होत आहे. ज्यामुळे पाऊस योग्य वेळी किंवा योग्य प्रमाणात पडत नसल्याचे आपल्याला दिसते. मित्रांनो, हेच कारण आहे की ज्यामुळे आपल्या भारतातील अनेक भागांमधील लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे तर, दुसरीकडे मात्र याउलट काही ठिकाणी दुष्काळ पडत आहे.
बर्याच भागांत मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केल्यामुळे, भूजल पातळी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचली आहे. ज्यामुळे केवळ सिंचन समस्या नाही तर, पिण्याच्या पाण्याची देखील मोठी समस्या लोकांसमोर निर्माण झाली आहे.
याखेरीज, अनेक पर्वतरांगाच्या ठिकाणी जंगलतोडीमुळे होणारी कित्येक भूस्खलन हीदेखील वृक्षतोडीचाच परिणाम दर्शवतात. शिवाय, झाडांची बेसुमार हत्या केल्याने दगडांची घसरण होते आणि त्यामुळे सुपीक जमीन वाहून जाते. मित्रांनो, पाणी, हवा, माती आणि ध्वनी यांच्या प्रदूषणात वाढ होण्याचे कारण देखील जंगलांचा अभाव हेच आहे.
प्रदूषणामुळे मनुष्यासह पृथ्वीवर राहणाऱ्या संपूर्ण सृष्टीला, सर्व प्राण्यांना आणि पक्ष्यांना जीवघेण्या अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. झाडे तोडल्यामुळे आज बरीच हिरवळ आणि समृद्ध क्षेत्रे मोठ्या वाळवंटात बदलली आहेत. त्याचबरोबर, झाडे नसल्यामुळे आज अनेक ठिकाणी जमीन नापीक आणि ओसाड होण्यास सुरवात झाली आहे.
झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यामुळे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक वन्यजीव प्रजाती नामशेष झाल्या आहेत. आजकाल झाडांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे, जमिनीची सुपीकता कमी होत आहे आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त होताना आपल्याला दिसत आहेत.
तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या essay on tree in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर झाडाचे महत्व निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi nibandh on trees या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि importance of trees essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on importance of trees in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट