Wilbur Wright and Orville Wright Information in Marathi विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट, आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून जगामध्ये नाव कमावले आणि तसेच राईट बंधू देखील त्यामधील एक आहेत ज्याच्या परिचयाची गरज नाही असे मला वाटते कारण त्यांच्या विषयी माहित नाही असे नाही हे शास्त्रज्ञ सर्वांना माहित आहेत ज्यांनी विमानाचा शोध सर्वप्रथम लावला आणि आज आपण या लेखामध्ये राईट बंधू (wright brothers) म्हणजेच विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.
विल्बर राईट (१८६७ ते १९१२) आणि ऑरव्हील राईट (१८७१ ते १९४८) हे दोन भाऊ अमेरिकेमधील शास्त्रज्ञ होते ज्यांनी जगातील पहिले यशस्वी विमान तयार केले आणि ते जगासमोर प्रदर्शित केले तसेच त्यांनी पहिले नियंत्रित, शक्तिशाली आणि सतत हवेपेक्षा जड मानवी उड्डाण करण्यासाठी ते प्रसिध्द बनले.
आणि त्यांना त्यांच्या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये राईट ब्रदर्स (wright brothers) म्हणून ओळखले जाते. विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांचे शिक्षण झाले नव्हते तरी देखील त्यांना लिहिता वाचता येत होते. चला तर खाली आपण विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांच्या विषयी सविस्तर माहिती घेवूया.
विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट – Wilbur Wright and Orville Wright Information in Marathi
विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांची वैयक्तिक माहिती – information about wilbur wright and orville wright in marathi
विल्बर राईट : विल्बर राईट हे दोघा भावांच्यामधील थोरले किंवा मोठे भाऊ होते आणि त्यांचा जन्म १६ एप्रिल १८६७ या दिवशी अमेरिकेतील इंडियाना येथील मेलव्हील या ठिकाणी झाला होता आणि त्यांच्या आईचे नाव सुसान कॅथरीन कोर्नर असे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव मिल्टन राईट असे होते जे चर्च ऑफ युनायटेड मंत्री होते.
नाव | विल्बर राईट |
जन्म | १६ एप्रिल १८६७ |
पालक | मिल्टन राईट आणि आई सुसान कॅथरीन कोर्नर |
कार्यकाळ | (१८६७ ते १९१२) |
मृत्यू | ३० मे १९९२ |
ऑरव्हील राईट : ऑरव्हील राईट हे विल्बर राईट यांचे लहान भाऊ होते ज्यांचा जन्म १९ ऑगस्ट १८७१ रोजी झाला आणि वर सांगितल्याप्रमाणे त्यांचे वडील मिल्टन राईट हे चर्चचे धर्मगुरू म्हणजेच मंत्री होते. मिल्टन राईट यांचा कार्यकाळ १८७१ ते १९४८ इतका होता आणि ह्या दोन्हीहि भावांना कोणतेही औपचरिक शिक्षण मिळाले नाही.
नाव | ऑरव्हील राईट |
जन्म | १९ ऑगस्ट १८७१ |
पालक | मिल्टन राईट आणि आई सुसान कॅथरीन कोर्नर |
कार्यकाळ | ( १८७१ ते १९४८ ) |
मृत्यू | ३० जानेवारी १९४८ |
राईट ब्रदर्स आणि विमानाचा शोध
विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट या दोघांना देखील लहानपणी पासूनच पतंग आकाशामध्येउडवण्याची खूप आवड होती आणि ते त्यांच्या छंद अगदी आवडीने जोपासत देखील होते आणि त्यांना पतंग उडवताना असे वाटत होते कि जर मानवाला देखील आकाशात जाता आले तर किती चांगले होईल त्यावेळी पासून त्यांच्या मनामध्ये एक इच्छा उमटली कि आपण त्यासाठी काही तरी करू शकतो.
राईट बंधू यांनी १८९२ मध्ये सायकलचे आणि प्रिंट शॉपचे दुकान सुरु केले आणि त्यांनी त्यामध्ये व्यवसायामध्ये मिळालेला नफा त्यांनी वैमानिक प्रयोगांच्यामध्ये घातला आणि त्यांनी त्यांच्या चाचणी आणि त्रुटीद्वारे त्यांच्या विमानाच्या प्रयोगामध्ये यश मिळाले आणि त्यांनी प्रथम विमानाचा शोध लावला आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरामध्ये प्रथम विमानाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.
विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांच्या विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- १७ डिसेंबर १९०३ हा दिवस राईट ब्रदर्ससाठी एक महत्वाचा दिवस होता कारण या दिवशी त्यांनी १०.३५ वाजता त्यांनी विमानाने पहिले उड्डाण केले होते.
- ३० मे १९९२ मध्ये विल्बर टायफॉइडमुळे विल्बर राईट यांचा मृत्यू झाला होता.
- १८८९ मध्ये ह्या दोन भावांनी स्वताचे वृत्तपत्र सुरु केले ज्याचे नाव वेस्ट साईन न्यूज असे होते
- ऑरव्हील राईट यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची तीन दशके एरोनोटीक्सशी संबधित बोर्ड आणि सामित्यांच्यावर सेवा देण्यात घालवले.
- ३० जानेवारी १९४८ मध्ये ऑरव्हील राईट यांना दुसरा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
- विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट या दोघाही भावांनी लग्न केले नव्हते आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे विमान तंत्रज्ञान शोधून काढण्यास घालवले आणि म्हणून त्यांना विमान तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते.
- राईट ब्रदर्स यांनी लावलेल्या विमानाच्या शोधला २० व्या शतकातील सर्वात महत्वाच्या घटनांच्यापैकी एक शोध म्हणून ओळखले जाते.
- विल्बर राईट हे फक्त ४५ वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे धाकटे भाऊ ऑरव्हील राईट यांचा मृत्यू ७७ व्या वर्षी झाला.
- विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट या दोघांना आणखीन ५ भावंडे होती. विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांना एक छोटी बहिण होती जिचे नाव कॅथरीन असे होते आणि दोन मोठे भाऊ होते.
- ते लहान असताना त्यांनी पतंग आणि यांत्रिक खेळणी बनवून आणि ती विकून त्या पासून पैसे कमवले.
- राईट ब्रदर्सनी सर्वप्रथम वृत्तपत्र छपाईचा व्यवसाय सुरु केला आणि पुढे त्यांनी १८९२ मध्ये डेटन या ठिकाणी राईट एक्स्चेंज नावाचे सकाळ विक्री आणि दुरुस्तीचे दुकान सुरु केले होते.
आम्ही दिलेल्या wilbur wright and orville wright information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर विल्बर राईट आणि ऑरव्हील राईट यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wilbur wright and orville wright in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about wilbur wright and orville wright in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये wilbur wright and orville wright information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट