विमान निबंध मराठी Essay on Aeroplane in Marathi

Essay on Aeroplane in Marathi विमान निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये विमान या विषयावर निबंध लिहिणार आहोत आणि या लेखामध्ये केंव्हा शोधले गेले, ते कोणी शोधून काढले, त्याचा पूर्वी कसा वापर केला जात होता आणि त्याचा वापर कसा केला जातो आणि विमानाचे फायदे काय आहेत आणि त्याची रचना कशी होते या सर्व गोष्टींच्या बद्दल आपण आज या निबंधामध्ये पाहणार आहोत. चला तर मग विमान या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात. आपण असे ऐकले आहे जी पूर्वीच्या काळी म्हणजेच ज्यावेळी देव पृथ्वीवर राहत होते त्यावेळी देखील विमान होते आणि त्या विमानाचे नाव पुष्पक असे होते आणि देव पृथ्वीवरून स्वर्गामध्ये जाण्यासाठी विमानाचा उपयोग करत होते.

पण आता आपल्या आधुनिक जगामध्ये असे म्हटले जाते कि विमानाचा शोध हा राईट ब्रदर्स यांनी लावला आणि हा एक अद्भुत चमत्कारच मनाला पाहिजे. सध्या विमान हे एक वाहतुकीचे साधन आहे जे आकाशामध्ये उडते आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी खूप कमी वेळेमध्ये पोहचवते.

जसे बस थांबण्यासाठी जशी बस स्थानका असतात तसेच विमान थांबवण्यासाठी किंवा टेक ऑफ करण्यासाठी विमानतळे असतात आणि तेथून विमानांचे उड्डाण होते तसेच ती आकाशातून खाली देखील विमानतळावर उतरते. विमाने हे विमानतळाद्वारे चालवली जातात आणि भारतामध्ये देखील अनेक विमानतळे आहेत आणि भारतातील अनेक लोक विमानाने प्रवास करतात.

विमान चालवण्याचे प्रशिक्षण हे पायलटला दिलेले असते आणि ज्यावेळी विमान आकाशामध्ये उड्डाण करत असते त्यावेळी त्या विमानामध्ये दोन पायलट असतात एक विमान चालवणारा आणि दुसरा असतो तो सहाय्यक पायलट. विमान हे टेक ऑफ करतेवेळी खूप काळजी पूर्वक केले जाते आणि प्रवाश्यांच्या संरक्षणासाठी प्रवाश्यांना सीट बेल्ट घालावा लागतो.

essay on aeroplane in marathi
essay on aeroplane in marathi

विमान निबंध मराठी – Essay on Aeroplane in Marathi

Aeroplane Essay in Marathi

विमानाचे मुख्यता दोन प्रकार असतात आणि ते म्हणजे प्रवासी विमान आणि दुसरे म्हणजे लष्करी विमान आणि या दोन्हीही प्रकारच्या विमानांचा मानवी विकासामध्ये हातभार आहे कारण जर आपण लांबचा प्रवास करणार असू आणि आपण बसने किंवा कारणे गेलो तर जाण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यामुळे आपला वेळ वाया जातो. परंतु आपण विमानाने खूप कमी वेळेमध्ये लांबचे अंतर गाठू शकतो आणि त्यामुळे वेळ वाचतो आणि त्यामुळे आपली कामे लवकर होतात.

तसेच लष्करी विमानाचा विचार केला तर हे विमान युद्धामध्ये वापरले जाते आणि यामुळे युद्धामध्ये देखील खूप फायदे होतात. विमान चालवणाऱ्याला मराठी मध्ये वैमानिक म्हणतात आणि इंग्रजीमध्ये विमान चालवणाऱ्याला पायलट म्हणतात. विमान चालवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला प्रशिक्षण घ्यावे लागते आणि मग प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला पायलट म्हणून ओळखले जाते आणि जर एकदा व्यक्ती पायलट म्हणून कामाला लागला तर त्यांना खूप पगार देखील असतो.

असे म्हटले जाते कि विमानाचा शोध हा अमेरिकेतील राईट ब्रदर्स यांनी लावला नसून भारताने लावला आहे आणि ते सर्वप्रथम मुंबई चौपाटीवर फिरवण्यात आले होते. राईट ब्रदर्स यांनी जे विमान उडवले होते ते १९०३ मधील होते पण त्याच्या अगोदर आठ वर्षापूर्वी एक मराठी माणसाने म्हणजेच शिवकर बापुजी तळपदे यांनी त्यांच्या पत्नीची मदत घेवून १५०० फुटावर उडणारे विमान शोधून काढले होते. शिवकर बापुजी तळपदे यांना लहानपणी पासूनच म्हणजेच ज्यावेळी ते शिक्षण घेत होते.

त्यावेळी पासूनच विमान बनवण्याबद्दल जाणून घेण्याची आणि अभ्यास करण्याची आवड होती आणि त्यांच्या शिक्षणापासूनच विमान बनवण्याचे निश्चित केले होते. शिवकर बापुजी तळपदे यांचे विमान हे बडोद्याचे तात्कालिक राजे सयाजीराव गायकवाड आणि मुंबई प्रमुख लालजी नारायण यांच्या समोर उडवले होते पण दुर्दैवाने त्यांची पत्नी निधन पावली त्यामुळे ते देखील उदास झाले आणि थोड्या दिवसाने ते देखील मरण पावले आणि त्यामुळे हे विमानाचे तंत्रज्ञान पुढे जावू शकले नाही.

आणि शेवटी १९०३ मध्ये राईट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावला. भारतामध्ये अनेक विमान सेवा तैनात आहेत परंतु भारताची राष्ट्रीय विमान वाहतूक कामापानी हि एअर इंडिया हे आहे आणि हि कामापानी वाहतुकीसाठी माल वाहून नेण्यासाठी एक उत्कृष्ट कंपनी आहे आणि हि भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

तसेच त्याच्या खालोखाल असणारी भारतातील दुसरी कंपन्या म्हणजे इंडिगो आणि जेट एअरवेज ह्या आहेत. त्याचबरोबर भारतातील मोठी आणि लोकप्रिय विमानतळ म्हणजे छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ जे मुंबई मध्ये आहे त्याचबरोबर इंदिरा गांधी विमानतळ जे दिल्ली मध्ये आहे आणि तसेच चेन्नई मध्ये असणारे चेन्नई अंतर राष्ट्रीय विमानतळ आणि नेताजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे कोलकत्तामध्ये आहे.

हि विमानतळ खूप लोकप्रिय आहेत आणि भारतातील मोठी विमानतळ आहेत आणि येथून आपल्याला कोणत्याही देशामध्ये जाण्यासाठी विमान मिळतात तसेच आपण आपल्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जावू शकतो आणि ते देखील कमी वेळेमध्ये. लष्करी विमाने हे देशासाठी खूप महत्वाची असतात आणि या विमानांना लढाऊ विमान म्हणून देखील ओळखले जाते आणि हि विमाने हवे मध्ये राहून हवेतील,

समुद्रामध्ये असणारे आणि जमिनीवर असणाऱ्या शत्रूंवर हल्ला करतात आणि हवेतून जमिनीवर हल्ला करणारी विमाने वेगळी असतात तसेच पाण्यामध्ये हल्ला करणारी विमाने वेगळी असतात तसेच हवे मध्ये हल्ला करणारी विमाने वेगळी असतात म्हणजे विमानाची रचना हि त्याच्या लढण्याच्या प्रकारावरून केली जाते. त्यामुळे देशासाठी लढाऊ विमाने देखील खूप महत्वाची असते.

विमानाबद्दल बोलायचे म्हंटले तर विमान हे लांब असते आणि त्याला दोन पंख असतात. विमानाच्या खिडक्या ह्या तीन अवरानानी बनवल्या असतात. आतील आणि बाहेरील आवरण हे हवेचे नियंत्रण करतात तसेच विमानाच्या खिडकीला एक छोटेसे छिद्र असते जे हवेचे नियंत्रण करते तसेच त्यामुळे धुक्यामध्ये खिडकीची सुरक्षा होते आणि अश्या प्रकारे अनेक सुरक्षित सुविधा विमानामध्ये असतात.

तसेच विमानाचे अनेक प्रकार आहेत जसे कि जम्बो पॅसेंजर जेट्स, प्रवासी टर्बोप्रॉप्स, सैन्य टर्बोप्रॉप्स आणी कार्गो विमान असे अनेक प्रकार आहेत. अश्या प्रकारे हे खूप फायदेशीर आहे आणि जर आपण प्रवास विमानने केला तर आपण खूप कमी वेळेमध्ये आपल्या ठिकाणी पोहाची शकतो.

आम्ही दिलेल्या essay on aeroplane in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विमान निबंध मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aeroplane essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि airplane essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!