सुतार पक्षाची माहिती Woodpecker Information in Marathi

Woodpecker Information in Marathi या पक्ष्याला मराठीमध्ये सुतार पक्षी म्हंटले जाते. सुतार पक्षी sutar pakshi हा picidae या कुळातील असून सुतार पक्ष्याच्या जगभरामध्ये १८० जाती आहेत. ह्या पक्षाची विशेषता म्हणजे आपल्या मजबूत आणि बळकट चोचीने झाडाला होल पाडून घर बनवतो आणि या साठी हा पक्षी लोकप्रिय आहे आणि या पक्ष्याला सुतार नाव हे या कारणामुळेच पडले आहे. सुतार हा पक्षी ऑस्ट्रोलीया आणि न्यू गिनी सोडून जगभरामध्ये सगळीकडे आढळतात तसेच हे पक्षी आग्नेय आशिया आणि दक्षिण अमेरिका मध्ये जास्त प्रमाणात आढळतात. सुतार पक्षी हा आकाराने साळुंखी पक्ष्यापेक्षा थोडा मोठा आणि कावळ्या पेक्षा लहान असतो.

सुतार पक्ष्याचे मानेपासून खालचे पूर्ण शरीर काळ्या रंगाचे असते आणि मान आणि चेहऱ्यावर काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात तसेच या पक्ष्याचा डोक्यावरचा भाग लाल रंगाचा असतो आणि चोच लांब आणि मजबूत तसेच या पक्ष्याची शेपू थोडी छोटी असते आणि ताठ असते. सुतार या पक्ष्यांचा मार्च ते ऑगस्ट हा विणीचा हंगाम असतो आणि मादी सुतार पक्षी एका वेळी २ ते ३ अंडी देते. घरटे बनवणे, अन्न गोळा करणे, अंडी उबवाने हे काम नर आणि मादी दोघेही करतात.

woodpecker information in marathi
woodpecker information in marathi / sutar pakshi

सुतार पक्षाची माहिती – Woodpecker Information in Marathi

नाव सुतार (woodpecker in marathi)
इंग्रजी नाव (sutar pakshi in english)Woodpecker
प्रकारपक्षी
वैज्ञानिक नावपिकीडे ( picidae )
वजन५०० ते ५६० ग्रॅम
लांबी४५ ते ५० सेंटी मीटर
आयुष्य५ ते १२ वर्ष

सुतार पक्षी कुठे व कसे राहतात ( habitat )

सुतार पक्षी हा शक्यतो जंगलामध्येच राहतात त्याचबरोबर या पक्ष्यांच्या काही जाती बांबूच्या जंगलामध्ये राहतात तर काही पक्षी वाळवंटा मध्ये सुध्दा राहतात. सुतार हा पक्षी आपल्या चोचीने झाडाला होले पडून आपले घरटे बनवतो.

सुतार पक्ष्याचा आहार ( food ) 

सुतार पक्षी हा सर्वभक्षी पक्षी आहे आणि तो धान्य, बिया, शेंगदाणे, झाडाची वाळवी, मुग्या, कीटक आणि बेरी या प्रकारचा आहार खातात.

सुतार पक्ष्याचे 7 प्रकार ( types of woodpecker )

सुतार पक्षी हा त्याचे घरटे बनवण्याच्या कलेसाठी खूप प्रसिध्द आहे. सुतार या पक्ष्याच्या जगभरामध्ये १७५ ते १८० जाती आढळतात आणि त्यामधील काही जाती भारतामध्येही आढळतात. या पक्ष्याचे काही प्रकार सविस्तर खाली दिले आहेत.

1.रुफस सुतार पक्षी ( rufous woodpecker bird )

रुफस सुतार पक्षी हा एक अतिशय नाजूक आणि सुंदर गडद तपकिरी शेड असलेला पक्षी आहे जो भारतामधील दक्षिणेकडील जंगलामध्ये पाहायला मिळतो. रुफस सुतार पक्षी हा शक्यतो मुंग्या, वाळवी किवा फळे या प्रकारचा आहार खातो. हे पक्षी आपल्या चोचीने झाडावर मध्यम आकाराचे घरटे बनवतात.

2.यल्लो क्रावुन्ड सुतार पक्षी ( yellow crowned woodpecker bird )

डोक्यावर पिवळ्या रंगाचा मुकुट असलेला सुतार पक्षी हा एक उपरोधिक सुतार पक्षी आहे जो भारतीय उपखंडामध्ये आढळतो आणि हा एक लहान आकाराचा लाकूड काम करणारा प्रजाती आहे. यल्लो क्रावुन्ड सुतार पक्षी सुतार पक्ष्याला महारट्टा सुतार पक्षी या नावानेही ओळखले जाते. या पक्ष्याचे पाय खूप छोटे असतात आणि या पक्ष्याच्या मागच्या बाजूला पांढरे ठिपके असतात.

3.हार्ट स्पॉटेड सुतार पक्षी ( heart spotted woodpecker bird )

भारतीय हिमालय आणि आग्नेय आशियातील पर्वत रंगामध्ये सापडलेली हि जात हृदयाचे स्पष्टीकरण करतो. हार्ट स्पॉटेड सुतार पक्षी हा बांगलादेश, विएटनाम च्या पश्चिम घाट ते भारताच्या मध्यवर्ती जंगलांमध्ये नर आणि मादी हार्ट स्पॉटेड सुतार पक्षी एकत्र पाहायला मिळतात.

4.स्पिकलेड पिक्युलेट सुतार पक्षी ( speckled piculet woodpecker bird )

स्पिकलेड पिक्युलेट हि एक लहान सुतार पक्षी आहे आणि हि जात भारतीय उपखंडामध्ये सापडलेल्या पिकीडे कुटुंबातील एक भाग आहे. सुतार पक्ष्याच्या इतर जाती प्रमाणेच स्पिकलेड पिक्युलेट हे सुतार पक्षी घनदाट जंगलामध्ये किवा खडकाळ डोंगरावर राहणे पसंत करतात. हे पक्षी झाडाची वाळवी किवा मुंग्या खातात.

5.व्हाईट नेप्ड सुतार पक्षी ( white naped woodpecker bird )

व्हाईट नेप्ड सुतार पक्षी हा पंपाने गडद हिरव्या रंगाचा पक्षी आहे आणि या पक्ष्याच्या गालापासून चोचीपर्यंत पांढऱ्या रंगाची चोच असते त्याचबरोबर या पक्ष्याला डोक्याच्या पाठीमागे शेडी सारखे पिवळ्या रंगाचे केस असतात आणि ते मानेपर्यंत असतात. या पक्ष्याची चोच लहान, पाय आखूड, शेपूट लहान आणि ताठ असते. व्हाईट नेप्ड सुतार पक्षी दक्षिण मध्य भारत आणि श्रीलंका येथे विपुल प्रमाणात आढळतात. व्हाईट नेप्ड सुतार पक्षी हि एक भारतीय उपखंडातील प्रजाती असून हे पक्षी खुल्या जंगलामध्ये राहणे पसंत करतात.

6.कॉमन फ्लेमबॅक सुतार पक्षी ( common flame back woodpecker bird )

कॉमन फ्लेमबॅक सुतार पक्षी हि पिकीडे ( picidae ) कुटुंबातील आणखी एक सुतार पक्ष्याची जात आहे. या पक्ष्यांना उष्णदेशीय प्रदेशात राहायला आवडते. हे पक्षी सिंगापूर, भारत, इंडोनेशिया आणि मॅग्रोव्ह जंगलामध्ये आढळतात आणि आग्नेय आशियामध्ये या प्रकारचे सुतार पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात.

7.ग्रेटर फ्लेमबॅक सुतार पक्षी ( greater flameback woodpecker bird )

हिमालयाच्या पायथ्यापासून ते पश्चिम घाटा पर्यंत भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात आढळणारी हि फ्लेमबॅक सुतार पक्ष्याची एक मोठी प्रजाती आहे. ग्रेटर फ्लेमबॅक सुतार पक्ष्याला ग्रेटर गोल्डनबॅक या नावानेही ओळखले जाते. या जातीचे नर आणि मादी आकाराने एकसारखेच असतात पण त्यांच्या रंगामध्ये साधारण फरक असतो.

सुतार पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of woodpecker )

  • पिक्युलेट्स हि सुतार पक्ष्याची जात सर्वात लहान जात आहे.
  • या पक्ष्याला सुतार हे नाव त्याच्या घर बनवण्याच्या कामावरून पडले आहे.
  • तपकिरी रंगाचे केस असलेला पिग्मी वूडपीकर फक्त श्रीलंका, भारत आणि नेपाळ मध्ये आढळतात.
  • हे पक्षी जेव्हा झाडावर आपल्या चोचीने घर बनवत असतात त्याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू येतो.
  • सुतार पक्ष्याला संस्कृतमध्ये काष्ठकुट असे म्हणतात.
  • सुतार पक्षी एका मिनिटामध्ये २० वेळा आपली चोच झाडावर मारतो.
  • ग्रे स्लेटी सुतार पक्षी हा जगातील सर्वात मोठा सुतार पक्षी आहे ज्याचा अकरा २० इंचापर्यंत असतो.
  • सुतार पक्षी ताशी २४ किलोमीटर वेगाने उडू शकतात.
  • अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि युरोप या देशांमध्ये सुतार पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • सुतार पक्ष्याच्या एक पायाला ४ बोटे असतात २ बोटे पुढे असतात आणि २ बोटे पाठीमागे असतात त्यामुळे हे पक्षी झाडावर चांगल्या प्रकारे पकड राखू शकतात.
  • या पक्ष्याच्या काही जाती हूदहूद या नावाने ओळखल्या जातात.
  • या आवाज कर्कश असल्यामुळे दूरपर्यंत ऐकू येते.
  • या पक्ष्याला हिंदीमध्ये काठफोडवा म्हणतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुतार पक्षी woodpecker information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. woodpecker information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about woodpecker bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सुतार पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या woodpecker in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!