वर्ल्ड वाईड वेब World Wide Web Information in Marathi

World wide web information in marathi वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब हे आपण कोणत्याही वेबसाईटच्या समोर www वापरलेले असते त्याचे संक्षिप्त स्वरूप आहे आणि हे एक वेब म्हणून ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये वर्ल्ड वाईड वेब विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. वर्ल्ड वाईड वेब हे एक वेब म्हणून ओळखले जाते आणि हे एक जगभरातील वेगवेगळ्या वेबसाईटचा संच आहे आणि ज्याची सुरुवात १९८९ मध्ये युरोपियन लायब्ररी फॉर न्युक्लिअर रिसर्च ने केली.

वर्ल्ड वाईड वेब हे वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित काम करते आणि वेगवेगळ्या वेब पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी हा वेब ब्राउझर वापरला जातो आणि वेब ब्राउझर हे असे प्रोग्राम म्हणून परिभाषित केले जाऊ शकते जे इंटरनेटवर चित्रे, अॅनिमेशन व्हिडीओ आणि मजकूर प्रदर्शित करते.

वर्ल्ड वाईड वेब हे इंटरनेटवर लिंक केलेल्या वेबसाईटचा एक संच आहे ज्याचा वापर जगभरातील अनेक लोक हे माहिती शोधण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी करतात आणि याला डब्ल्यू ३ (W3) किंवा वेब म्हणून ओळखले जाते. चला तर खाली आपण वर्ल्ड वाईड वेब विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

world wide web information in marathi
world wide web information in marathi

वर्ल्ड वाईड वेब – World Wide Web Information in Marathi

वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय ?

वर्ल्ड वाईड वेब याला www, डब्ल्यू ३ ( W3 ) किंवा वेब या नावाने ओळखले जाते आणि हे सर्व सार्वजनिक वेबसाईट्स किंवा पृष्ठांचा संदर्भ देतात ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या स्थानी संगणकावर आणि इंटरनेट द्वारे इतर उपकरणांच्यावर प्रवेश करू शकतात.

वर्ल्ड वाईड वेबचा इतिहास – world wide web history in marathi

वर्ल्ड वाईड वेब या संकल्पनेविषयी असे म्हटले जाते कि १९८९ मध्ये युरोपियन लायब्ररी फॉर न्युक्लिअर रिसर्च मध्ये ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ टीम बर्नर्स यांनी याचा शोध लावला. टीम बर्नर्स हे युरोपियन लायब्ररी फॉर न्युक्लिअर रिसर्च मधील सहकाऱ्यांच्यासोबत १९८९ पासून या संकल्पनेवर काम करत होते.

आणि पुढे १९९० मध्ये टीम बर्नर्स यांनी वर्ल्ड वाईड वेब ची कल्पना स्पष्ट करण्यासाठी पहिले वेब सर्व्हर आणि ब्राउझर प्रदर्शित केले होते आणि पुढे १९९१ मध्ये ते लोकांच्या परिचयात आले आणि ते आता मोठ्या आणि चांगल्या प्रकारे जगभरामध्ये कार्यरत आहे.

वर्ल्ड वाईड वेबची वैशिष्ठ्ये – features

  • वर्ल्ड वाईड वेब चे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे हे जगभरातील वेगवेगळ्या वेबसाईटचा संच आहे.
  • त्याचबरोबर यामध्ये अनेक सेवांच्यासाठी एकाच इंटरफेस वापरण्यासाठी हे वेब ब्राउझर वापरते.
  • वर्ल्ड वाईड वेबमध्ये हायपरटेक्स्ट माहिती प्रणाली वापरली जाते.
  • प्रमुख वैशिष्ठ्यामधील एक प्रमुख म्हणजे हे ओपन स्टँडर्ड्स आणि ओपन सोर्स आहे.
  • त्याचबरोबर वर्ल्ड वाईड वेब हे परस्परसंवादी, डायनॅमिक आणि विकसित होत चालले आहे.
  • वर्ल्ड वाईड वेब हे मुक्त स्त्रोत आहे.

वर्ल्ड वाईड वेबचे घटक – Elements

वर्ल्ड वाईड वेबचे एकूण तीन घटक आहे आणि ते घटक काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

HTTP

एचटीटीपी (HTTP) हे वर्ल्ड वाईड वेबच्या तीन मुख्य घटकांच्यापैकी एक आहे आणि याचे पूर्ण स्वरूप हायपरटेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल असे हे आणि हा घटक ब्राउझर आणि सर्व्हरचे संप्रेषण निर्दिष्ट करते.

URL

युआरएल (URL) चे पूर्ण स्वरूप युनिफॉर्म लोकेटर असे आहे आणि हे संसाधनांसाठी एक विशिष्ट अशी प्रणाली म्हणून काम करते. युआरएल हे फाईल्सची विनंती करणारा क्लायंट म्हणून काम करते.

HTML

एचटीएमएल (HTML) म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज जे वेबपेजची रचना, सामग्री आणि संस्था परिभाषित करते. हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅग्स म्हणजेच परिच्छेद, टेबल आणि इतर घटकांच्या मदतीने वेब पानांची रचना करते.

वर्ल्ड वाईड वेबचे फायदे आणि तोटे – advantages and disadvantages

फायदे – advantages

  • वर्ल्ड वाईड वेबमुळे मोठ्या प्रमाणात माहितीची देवाणघेवाण झाली त्याचबरोबर व्यावसायिक संपर्काची स्थापना झाली.
  • यामुळे व्यावसायिक संपर्काची स्थापना सुलभ केली गेली.
  • वर्ल्ड वाईड वेब हे जागतिक मध्यम म्हणून काम करते.
  • हे माहितीच्या विविध स्तोत्रांच्यामध्ये प्रवेश सुलभ करते जी सतत अध्यतनित केली जाते.
  • यामुळे माहितीची मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली म्हणजेच तुम्ही कुठूनही माहिती मिळवू शकता आणि जगभरातून मित्र बनवू शकता.

तोटे – diadvantages

  • हे वापरण्यासाठी कार्यक्षम माहिती शोध धोरण वापरण्याची आवश्यकता असते.
  • त्याचबरोबर शोधाची गती हि मंद असू शकते.
  • मोठ्या संखेने वापरकर्ते असल्यामुळे नेट देखील ओव्हरलोड होऊ शकते.
  • वर्ल्ड वाईड वेबमध्ये माहिती फिल्टर करणे आणि प्राधान्य देणे कठीण होऊ शकते.

वर्ल्ड वाईड वेबविषयी विचारले जाणारे काही प्रश्न – questions

वर्ल्ड वाईड वेब हे महत्वाचे का आहे ?

वर्ल्ड वाईड वेब हे महत्वाचे आहे कारण हे शास्त्रज्ञांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी इंटरनेट उघडण्यासाठी उपयोगी आहे आणि या वेबने जगाला असेल जोडले आहे कि लोकांना माहिती पाठवणे, माहिती शोधणे संवाद करणे खूप सोपे झाले आहे. यामुळे लोकांना व्हिडीओ शेअरिंग, ब्लॉग्स, नेटवर्किंग साईट्सच्या मार्फत बरेच काही शेअर करता येत आहे.

वर्ल्ड वाईड वेबचे जनक कोणाला म्हणतात ?

वर्ल्ड वाईड वेबचे जनक टीम बर्नर्स यांना म्हणतात कारण त्यांनी युरोपियन लायब्ररी फॉर न्युक्लिअर रिसर्च मध्ये त्यांनी १९८९ मध्ये त्यांनी याचा शोध लावला.

वर्ल्ड वाईड वेब हे केंव्हा सुरु झाले ?

वर्ल्ड वाईड वेब हे ३० एप्रिल १९९३ मध्ये सार्वजनिक डोमेनमध्ये लाँच झाले आणि ते तेंव्हापासून जगातील प्रत्येक लोकांच्यासाठी माहिती शोधण्यासाठी आणि पाठवण्यासाठी कार्यरत आहे.

आम्ही दिलेल्या world wide web information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वर्ल्ड वाईड वेब माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या world wide web meaning in marathi या World wide web information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about world wide web in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!