इंटरनेट म्हणजे काय व इतिहास Internet Information in Marathi

internet information in marathi – internet history in marathi इंटरनेट म्हणजे काय व इंटरनेटचा इतिहास. सध्याच्या घडीला संपूर्ण विश्व इंटरनेट शिवाय अपूर्ण आहे असा म्हणायला काही हरकत नाही. इंटरनेटचे महत्त्व इतके वाढत चाललेले आहे की दैनंदिन जीवनामध्ये एकही असा दिवस जात नाही जिथे इंटरनेटचा वापर होत नाही खरतर इंटरनेट शिवाय पानच हलत नाही. प्रत्येक कामासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. शिक्षण, व्यापार, बँकिंग, मनोरंजन असे अनेक क्षेत्र आहेत जे इंटरनेटच्या बळावर चालत आहेत. एकंदरीतच इंटरनेट हे मुख्य केंद्र बनल आहे. परंतु ह्या इंटरनेटचा शोध कोणी लावला व कधी लावला व आज संपूर्ण जगाला इंटरनेटचे काय फायदे होत आहेत याविषयी संबंध माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

internet information in marathi
internet information in marathi

इंटरनेट म्हणजे काय – Internet Information in Marathi

Internet Meaning in Marathi 

इंटरनेट या शब्दाला मराठीमध्ये आंतरजाल किंवा महाजाल असे म्हटले जाते. इंटरनेटला वर्ल्ड वाइड वेब म्हणून देखील ओळखले जाते. ही परस्पर जोडलेल्या संगणक नेटवर्कची एक जागतिक प्रणाली आहे. जी जगभरातील अब्जावधी उपकरणांशी लिंक करण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल सुट नावाचं प्रोटोकॉल वापरते. इंटरनेट मुळे आज माहितीची देवाण-घेवाण करणे अधिकच सोपे व जलद झाले आहे. आता संगणकाचे महत्व तर संपूर्ण जगाला माहीत आहेत.

इंटरनेटचा शोध कोणी लावला – internet cha shodh koni lavla

इंटरनेटचा इतिहास – Internet History in Marathi

इंटरनेट चा शोध लावण्यामध्ये बऱ्याच लोकांचे योगदान होत. सर्वात प्रथम लियोनार्ड क्लेरॉक यांनी इंटरनेट बनवण्याचे नियोजन केले, त्यानंतर १९६२ मध्ये लिकलीडर यांनी रॉबेर्ट टेलर समवेत त्या योजनेमध्ये एक नेटवर्क बनवले. ज्याचे नाव ARPANET असे होते. १९७४ मध्ये ARPANET चा व्यावसायिकरित्या TELNET या नावाने वापर केला गेला. तसेच १९९० च्या दरम्याने संगणकतज्ज्ञ टिम बर्नर्स-ली ह्यांनी वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला.

असं कोणतही ठिकाण नाही जिथे संगणकाचा वापर होत नाही प्रत्येक घरात प्रत्येक क्षेत्रात संगणक वापरलं जात. कारण संगणकांमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती साठवली जाऊ शकते. मग ती माहिती शब्द स्वरूपात असो किंवा चित्र स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असो. एक संगणक दुसऱ्या संगणकाला जोडले जाते व दुसर संगणक तिसऱ्या संगणकाला जोडले जाते अशाच प्रकारे अनेक संगणक एकमेकांना जोडले जातात व त्यांचे एक जाळं तयार होतं.

ज्याच्या माध्यमातून संगणक एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि अशा प्रकारे संपूर्ण जगभरातील अशी सर्व जाळी जोडली जाऊन त्याचे इंटरनेट तयार होते. एकोणिसाव्या शतकामध्ये इंटरनेट ची कल्पना अमेरिकेने मांडली. अमेरिकन लष्कराने आर्पानेट या नावाचे नेटवर्क वापरून इंटरनेटचा पाया घातला. खरंतर अमेरिकेला अशी भीती वाटत होती की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होईल या चिंतेने अमेरिकेने १९६९ रोजी चार केंद्रे स्थापन करून ती एकमेकांना जोडली.

त्यातील कोणतही एक केंद्र नष्ट झालं तर बाकीचे तीन केंद्र सुरक्षित राहतील आणि संदेशवहनाच्या कामांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पुढे युद्ध संपल्यानंतर आर्पानेट सारख्या नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा अमेरिकेतील विद्यापीठांकडून देण्यात आली आणि त्यानंतर पुढे या नेटवर्कचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. माहितीची देवाण-घेवाण करणे व नवीन संशोधन करण्यासाठी अनेक क्षेत्रातील लोकांनी या नेटवर्कचा वापर करायला सुरुवात केली आणि १९९५ पर्यंत ५० लाख केंद्रे स्थापित केली गेली.

आता फक्त अमेरिकेतच नाही तर इंटरनेट मध्ये लक्षावधी नेटवर्क असून जवळपास ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशांमध्ये आहेत. १९८८ मध्ये इंटरनेटचे पाऊल भारतात पडले आणि भारतामध्ये एज्युकेशन आणि रिसर्च यासाठी इंटरनेटचा वापर सुरू झाला. इंटरनेटमुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे असं बोललं जातं त्याचे एकमेव कारण म्हणजे इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे विशाल नेटवर्क असून ते जगातील संगणकाशी जोडले गेले आहे.

ज्याच्यामुळे संगणकाच्या माध्यमातून कोणतीही माहिती आपण सहज रित्या मिळवू शकतो शिवाय इंटरनेटमुळे आपण एखादी माहिती दुसर्यासोबत शेअर करू शकतो. ते ही जगातील कुठल्याही कोपऱ्यातून आपण कोणाशीही संवाद साधू शकतो. आधीच्या काळामध्ये आपल्याला जर आपल्या नातेवाईकांशी संवाद साधायचा असेल तर त्यासाठी देखील आपल्याला पत्रव्यवहार करावा लागायचा परंतु इंटरनेट मुळे आपण क्षणभरात आपल्या नातेवाईकांशी मित्र-मैत्रिणींशी कोठूनही संवाद साधू शकतो.

भारतामध्ये इंटरनेटचा वापर हा फक्त शिक्षण व संशोधन संस्था करू शकतात. भारतात उपलब्ध असणार्‍या सर्व आयटी, संशोधन संस्था किंवा विज्ञान संस्था या इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत व ते नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडले गेले आहे. परंतु १९९५ पासून अमेरिकेतील कंपनीने इंटरनेटची सेवा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता प्रत्येक देशामध्ये कोणालाही जागतिक इंटरनेटचा वापर करणे शक्य होऊ शकतं.

व्ही.एस.एन.एल या कंपनीने इंटरनेट एक्सेस सर्विस ही स्वतंत्रपणे सेवा देण्यास सुरुवात केली आहे व या कंपनीचे मुख्य केंद्र मुंबई स्थित आहे आणि सोबतच दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर, पुणे ही भारतातील मुख्य शहरे अमेरिकेतील इंटरनेटला जोडली गेली आहेत व येणाऱ्या भविष्यामध्ये भारतातील प्रत्येक शहर हळूहळू या नेटवर्कला जोडलं जाईल.

इंटरनेट कसं काम करत इंटरनेटवर जेव्हा आपण एखादी माहिती पाठवतो तेव्हा त्या प्रत्येक माहितीचा सांकेतिक क्रमांक तयार होतो आणि ही माहिती एका एका छोट्या भागांमध्ये रूपांतरित केले जाते आणि हे छोटे भाग रुटर या नावाच्या विशिष्ट संगणकाद्वारे एका नेटवरून दुसऱ्या नेटवर पाठवले जातात. ही सर्व माहिती पाठविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असतात आणि ही माहिती ज्या वेळी पाठवली जाते किंवा घेतली जाते त्या वेळी अनेक मार्गांनी माहितीची पाकीट येत असतात.

त्यामुळे ही माहिती कोणत्या मार्गाद्वारे कमी वेळामध्ये पोचू शकेल याचा विचार करून कोणत्या मार्गावर रहदारी कमी आहे हे बघून हे प्रत्येक पॅकेज पाठवले जातात. परंतु ही सगळी प्रक्रिया अतिशय अल्प वेळामध्ये होते आणि त्यामुळेच समोरून आलेली माहिती आपल्यापर्यंत क्षणभरात पोहोचते.

इंटरनेट मुळे जगाला माहितीचे महासागर प्राप्त झाले आहेत. कोणत्याही विषयावरील माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होते. दररोजच्या घडामोडी, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, कंपन्यांच्या जाहिराती, कोणत्याही वस्तूच्या किमती, शिक्षण, ग्राहक सेवा, पर्यावरणाविषयी माहिती अशा प्रत्येक प्रकाराची माहिती इंटरनेटवर विनामूल्य मिळते.

इंटरनेट चे फायदे व तोटे

इंटरनेट आपल्याला अनेक प्रकारचे सेवा पुरवत जसे की ईमेल. ई-मेलच्या माध्यमातून आपण आपल्या माहितीची देवाण-घेवाण करू शकतो आपण आपल्याकडे असणारी माहिती आपण आपल्या जगभरातील नातेवाईकांना, मित्रांना, सहकार्‍यांना पाठवू शकतो. जगातील कोणतीही वृत्तपत्रे, मासिके, कोणत्याही लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम संगीत, सगळ्या विषयाची माहिती आपण इंटरनेटद्वारे मिळवू शकतो. शिवाय इंटरनेट मुळे मनोरंजनाचे साधन देखील उपलब्ध केले आहे.

इंटरनेटमुळे व्यापारपेठ जागतिक पातळीवर खुली झाली आहेत. आपण आपल प्रॉडक्ट सर्व जगभर इंटरनेटच्या माध्यमातून पाठवू शकतो. इंटरनेट मुळे ई-कॉमर्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्यामध्ये आपण ऑनलाइन मोडमध्ये स्वतःचे दुकान स्थापन करून आपल्या वस्तूंची आणि सेवांची विक्री करू शकतो. ॲमेझॉन, मिंत्रा, ओला यांसारखी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत जे बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक सेवा ऑनलाइन प्रदान करतात. इंटरनेटमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती घडून आली आहे. कारण आधी कोणत्याही कारणासाठी बँकेत जाऊन मोठ्या लांब रांगा लावायला लागायच्या परंतु इंटरनेट मुळे आता आपण घर बसल्या नेट बँकिंग करू शकतो.

नेट बँकिंग म्हणजे आपण घरी बसून आपल्या मोबाईल वरुन किंवा लॅपटॉप वरून व संगणकावरून बँकचे सगळे व्यवहार करू शकतो. प्रत्येक बँक स्वतःचे ॲप्लिकेशन तयार करते ज्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतो आणि आपल्याला बँकेच्या शाखांमध्ये जाण्याची गरज भासत नाही. इंटरनेट मुळे डिजिटल पेमेंट करणे देखील सोपे झाले आहे. घरबसल्या आपण कोणत्याही गोष्टी मागवू शकतो आणि आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो. जसं की गुगल पे, फोन पे, इत्यादी.

यांचा वापर करून आपण कोणालाही पैसे पाठवू शकतो. विद्युत बिल, टेलिफोन बिल आणि इतर बिल भरू शकतो. पर्यावरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंटरनेटचा वापर करून आपण पर्यावरणात होणारे बदल लक्षात घेऊ शकतो. शिवाय पर्यावरण संरक्षणाचे उपाय, नवीन घातक द्रव्ये, त्यांचा वापर इत्यादी ची माहिती देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे.

इंटरनेटवर इतकी माहिती उपलब्ध आहे की कधी कधी या माहितीच्या सागरातून आपल्याला हवी असणारी माहिती मिळवणे मुष्कील होते. म्हणूनच विविध प्रकाराचे ब्राउजर बनवण्यात आले आहेत. ज्यांचा वापर करून आपण आपल्याला हवी ती माहिती इंटरनेटवर शोधू शकतो. याला सर्च इंजिन असे देखील म्हटले जाते आणि आता संपूर्ण जगभरात गुगल, याहू असे सर्च इंजिन वापरले जातात.

इंटरनेटचा वापर करण्यासाठी आपल्याला संगणक किंवा फोन आणि या दोघांना जोडणारे मॉडेम नावाचे उपकरण लागतं. हे मॉडेम नावाचे उपकरण वापरण्याचे कारण म्हणजे या माॅडेमची क्षमता बाॅड रेट मध्ये बिट्स पर सेकंड इतकी असते. म्हणजेच अगदी काही सेकंदात माहितीची देवाण-घेवाण केली जाते.

आम्ही दिलेल्या internet information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या internet history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि internet information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!