zopadpatti information in marathi झोपडपट्टी माहिती, सध्या जगामध्ये आणि भारतामध्ये अनेक मोठ मोठ्या प्रकारच्या बिल्डींग्स आणि घरे असली तरी अजून देखील काही लोक हे झोपडपट्टी मध्ये राहतात आणि झोपडपट्टी हे अनेक लोकांचे शहरामध्ये राहण्याचे एक निवास क्षेत्र आहे. आज भारतामध्ये देखील काही शहरांच्यामध्ये आपल्याला एक भाग पहायला मिळतो कि ज्या ठिकाणी संपूर्णपणे झोपडपट्टीची वस्ती असते आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पायाभूय सुविधा नसतात तसेच हे पूर्णपणे गरिबीशी संबधित आहे.
झोपडपट्टीची हि वस्ती आपल्याला विकसनशील देशांच्यामध्ये देखील पाहायला मिळते आणि वर सांगितल्याप्रमाणे आपल्याल भारत देशामध्ये देखील अनेक शहरांच्यामध्ये आपल्याला झोपडपट्टी वस्ती पहायला मिळते आणि खास करून मुंबई या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वस्ती आहे. चला तर खाली आपण या लेखामध्ये झोपडपट्टी विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.
झोपडपट्टी माहिती – Zopadpatti Information in Marathi
झोपडपट्टी म्हणजे काय ?
- झोपडपट्टी हे एक प्रकारचे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक लोक झोपडपट्टी म्हणजेच कमी गुणवत्तेच्या घरांच्यामध्ये निवास करतात आणि हे क्षेत्र मोठ्या शहरांचा एक भाग असते आणि याला झोपडपट्टी क्षेत्र म्हणतात.
- निकृष्ट दर्जाचे क्षेत्र किंवा ज्या ठिकाणी कमी दर्जाची घरे म्हणजेच तेथे कोणतीही सोय नसते अश्या ठिकाणाला किंवा क्षेत्राला झोपडपट्टी क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
झोपडपट्टी क्षेत्र वाढण्याची कारणे – reasons
झोपडपट्टी हे क्षेत्र भारतामधील मुंबई या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वसलेले आपल्याला पाहायला मिळते आणि तसेच अनेक देशांच्यामध्ये ते मोठ्या शहरांच्या ते ठिकाण वसलेले आहे आणि हे क्षेत्र बनण्याची कारणे अनेक आहेत ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- काही शहरांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांचे क्षेत्र पहायला मिळते आणि याचे कारण म्हणजे एका ठिकाणाहून किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये झोपडपट्ट्यांचे स्थलांतर.
- नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि अनेक प्रकारे नुकसान होते त्यावेळी त्या लोकांना निवासासाठी झोपडपट्टी हा पर्याय निवडावा लागतो.
- देशातील बदलत्या राजकारणामुळे देखील झोपडपट्टी क्षेत्रावर प्रभाव पडण्याची शक्यता असते.
- झोपडपट्टी क्षेत्र वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गरिबी आणि बेरोजगारी.
- झोपडपट्टी क्षेत्र वाढण्याचे आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे ग्रामीण ते शहरी स्थलांतर.
मुंबई झोपडपट्टी विषयी माहिती – mumbai zopadpatti information in marathi
मुंबई झोपडपट्टी क्षेत्र हे भारतातील एक प्रसिध्द आणि सर्वात मोठे झोपडपट्टी क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला धारावी झोपडपट्टी क्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते. धरावी झोपडपट्टी क्षेत्र आहे जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी क्षेत्रापैकी एक मानले जाते आणि धरावी झोपडपट्टी क्षेत्र हे मुंबई शहराच्या मध्यभागी वसलेले आहे.
या ठिकाणी अरुंद आणि छोट्या झोपड्या आहेत तसेच अरुंद गल्ल्या देखील आहेत आणि जे लोक मुंबई शहरामध्ये अनेक दिवस राहतात किंवा पिढ्यानपिढ्या राहतात. अश्या लोकांना हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.
मुंबई मधील धारावी हा भाग १८ व्या शतकामध्ये खारफुटीचे आणि दलदलीचे क्षेत्र होते आणि पुढे ते १९ व्या शतकात गाव बनले आणि ते पुढे धारावी झोपडपट्टी क्षेत्र बनले.
झोपडपट्टी क्षेत्र कमी करण्यासाठी सरकारने सुरु केलेली योजना
भारतामधील काही शहरे हि जरी मोठ मोठ्या इमारतींनी उंच आणि सुंदर अशी दिसत असती, तर त्या सुंदर अश्या शहरामध्ये अशी जागा असते त्या ठिकाणी अनेक लोक झोपडपट्टी मध्ये राहतात.
झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती आणि त्यांची समस्या लक्ष्यात घेवून भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी चांगल्या प्रतीची आणि मजबूत बांधलेली घरे पुरवण्यासाठी सरकारने राजीव गांधी आवास योजना (RGAY).
राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी सरकार २०० हून अधिक शहरामध्ये करणार होते म्हणजेच केंद्र सरकार हि योजना २०० हून अधिक शहरामध्ये राबविणार आहे आणि हि योजना अश्या शहरामध्ये राबवली जाणार आहे ज्या ठिकाणी ५ लाखहून अधिक लोकसंख्या आहे.
झोपडपट्टी क्षेत्राविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- जगामध्ये कराची आणि पाकिस्तान या देशामध्ये काही शहरांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी क्षेत्र आढळतात.
- केप टाऊन (दक्षिण आफ्रिका), पॅरीस (फ्रांस), मॉस्को (रशिया), मुंबई (भारत), नैरोबी (केनिया), बँकॉक (थायलंड), सिएटल (युनायटेड स्टेट्स) ह्या देशांची काही भाग हे झोपडपट्टी क्षेत्रे आहेत.
- मुंबई मधील झोपडपट्टी क्षेत्र हे जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी क्षेत्र आहे.
- आपला देश झोपडपट्टी मुक्त व्हावा म्हणून सरकारने अनेक योजना आणि सोयी राबवल्या आहेत.
- झोपडपट्टी क्षेत्रामध्ये अस्वच्छता असते तसेच पुरेसा पाणी पुरवठ्याचा किंवा स्वच्छ पाणी, नियमित विज पुरवठा या सारख्या चांगल्या सोयींचा त्या ठिकाणी अभाव असतो तसेच या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणीचा देखील अभाव असतो.
- झोपडपट्टी क्षेत्र हे विकसनशील देशांच्यामध्ये तर आढळतातच परंतु हे झोपडपट्टी क्षेत्र विकसित देशांच्यामध्ये देखील आढळतात जसे कि रशिया आणि अमेरिका या विकासित देशांच्यामध्ये देखील झोपडपट्टी क्षेत्र आढळते.
- झोपडपट्टी हि समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने १९५६ मध्ये झोपडपट्टी क्षेत्रे कायदा सुरु केला ज्यामध्ये झोपडपट्टी सुधारणा करण्यात आला.
- झोपडपट्टी क्षेत्रामध्ये सरकारने अनेक वेळा पुनर्जीवन करण्याचे ठरवले म्हणजेच त्या संबधित क्षेत्राचा विकास केला म्हणजेच त्या ठिकाणी झोपडपट्टी पाडून नवीन घरांची बांधणी केली.
आम्ही दिलेल्या zopadpatti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर झोपडपट्टी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zopadpatti information in marathi pdf या dharavi zopadpatti information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि mumbai zopadpatti information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये zopadpatti samasya in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट