आदित्य L1 मोहीम Aditya L1 Information in Marathi

aditya L1 information in marathi आदित्य L1 मोहीम, गेल्या काही दिवसात आपण चंद्रयान ३ च्या प्रक्षेपणाविषयी आणि त्यांचे यशस्वीरित्या चंद्रावर झालेले लँडिंग देखील झाले आणि या यशामुळे भारतामध्ये याचे खूप कौतुक झाले कारण आपला देश हा चंद्रावर पोहोचला तसेच या यशानंतर इस्रो (ISRO) ने असे ठरवले आहे कि चंद्राच्या या यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या मोहिमेनंतर आता इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल१ चे प्रक्षेपण करणार आहे आणि आज आपण या लेखामध्ये आदित्य एल १ विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

भारताने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी २ वेळा अवकाशामध्ये यान सोडले होते परंतु ते अयशस्वी झाले होते, परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले आणि हे २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी चंद्रावर प्रक्षेपित झाले तसेच आता भारताची अंतराळ संशोधन संस्था सूर्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी सूर्यावर एक यान सोडणार आहेत.

ज्याला इस्रोने आदित्य एल १ असे नाव दिले आहे आणि यामुळे सूर्याविषयीच्या अनेक गोष्टी समजण्यास तसेच त्याची प्रक्रिया काय आहे आणि सूर्य कसा काम करतो या सर्व गोष्टींच्याबद्दल माहिती करून घेण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला उपयोगाचे ठरेल.

हे यान पृथ्वीपासून पंधरा किलोमीटर असणाऱ्या लँगरेंज पॉइंट जो सूर्याजवळील एक भाग आहे ज्याला लँगरेंज पॉइंट १ असे नाव दिले आहे त्या ठिकाणी हे आदित्य एल१ हे यान प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) असणार आहे.

aditya L1 information in marathi

आदित्य L1 मोहीम – Aditya L1 Information in Marathi

यानाचे नावआदित्य एल १
प्रक्षेपण ठिकाणीलँगरेंज पॉइंट १ (सूर्य)
प्रक्षेपण करणारी संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
प्रक्षेपण दिवस – aditya l1 launch date२ सप्टेंबर

आदित्य एल१ विषयी महत्वाची माहिती – information about aditya L1 in marathi

आदित्य एल१ हे यान पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलो मीटर अंतरावर असणाऱ्या सूर्य – पृथ्वी प्रणालीच्या लँगरेंज पॉइंट १ वर प्रक्षेपित करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे आणि हे यान २ सप्टेंबर दिवशी श्रीहरीकोटा या ठिकाणाहून प्रक्षेपित केले जाईल.

या यानाच्या प्रक्षेपणामुळे सौर क्रीयाकालापांचे निरीक्षण करण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर आणि अवकाशातील हवामानावर होणाऱ्या परिणामांचा देखील अभ्यास करता येईल.

आदित्य एल१ म्हणजे काय – aditya l1 meaning in marathi

आदित्य एल१ हा एक अंतराळ यानाचा प्रकार आहे जो इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था सूर्यावर प्रक्षेपित करणार आहे किंवा हे लँगरेंज पॉइंट १ या ठिकाणी किंवा बिंदूभोवती कक्षेत ठेवले जाणार आहे. जे कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचे निरक्षण आणि अभ्यास करू शकेल आणि ती माहिती इस्रोला पोहचवू शकेल.

आदित्य एल१ ची मुख्य उदिष्ठ्ये – main objectives

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आदित्य एल१ हे सूर्यावर प्रक्षेपित करण्याचा निर्णय हा अनेक उदिष्ठ्ये डोळ्यासमोर ठेऊन केला आणि ती उदिष्ठ्ये काय आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • सूर्यापासून कणांच्या गतीशिलतेच्या अभ्यासासाठी डेटा प्रदान करणारे इन-सिटू कण आणि प्लाझ्मा वातावरणाचे निरीक्षण करणे.
  • आदित्य एल१हेलँगरेंज पॉइंट १ वर प्रक्षेपित केले तर त्यामुळे सौर कोरोनाचे भौतिकशास्त्र समजून घेण्यास मदत होईल तसेच सूर्याची गरम यंत्रणा कशी काम करते याचा अभ्यस करण्यास देखील सोपे होईल.
  • क्रोमोस्पियर, बेस आणि विस्तारित कोरोना या स्थरावर होणाऱ्या प्रक्रियांचा क्रम ओळखण्यासाठी याची मदत होईल.
  • त्याचबरोबर सौर कोरोनामध्ये चुंबकीय क्षेत्र टोपोलॉजी आणि चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी मदत होते.
  • क्रोमोस्पेरिक आणि कोरोनल हिटिंगचा अभ्यास अंशात आयणीकृत प्लाझ्माचे भौतिकशास्त्र कोरोनल मास इंजेक्शनची सुरुवात.

आदित्य एल१ विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रो (ISRO) ने सूर्यावर यान प्रक्षेपित करून सूर्याचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे आणि हा इस्रोच पहिलाच प्रयत्न आहे.
  • लँगरेंज पॉइंट १ हे अंतराळामधील एक स्थान अही ज्या ठिकाणी दोन मोठ्या वस्तूंचे गुरुत्वाकर्षण लहान वस्तूला त्याच्याबरोबर फिरण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रमुख बलाच्या बरोबरीचे असते.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने असे ठरवले आहे कि आदित्य एल१ हे यान लँगरेंज पॉइंट १ या ठिकाणी उतरवण्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून सूर्याचे संपूर्ण दृश्य दिसते त्यामुळे या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास करणे सोपे आहे.
  • आदित्य एल१ चे पेलोड्सचे सूट कॉरोनल मास इंजेक्शन, कोरोनल हिटिंग, प्री फ्लेअर आणि फ्लेअर क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ठ्ये तसेच हवामानाची गीतीशीलता या बद्दलच्या समस्या आणि महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इस्रोला मदत होईल.
  • आदित्य एल१ चे प्रक्षेपण हे २ सप्टेंबर रोजी ११.५० मिनिटांनी प्रक्षेपित केले जाणार आहे.

जर भारताला आदित्य एल१ हे अंतराळ यान लँगरेंज पॉइंट १ मध्ये सोडायचे असेल तर हि मोहीम फते करण्यासाठी इस्रोला ४९ ते ५० कोटी किंवा त्या पेक्षा अधिक रुपये खर्च करावे लागतील.

आदित्य एल१ मध्ये कोणत्या प्रकारचे पेलोड वापरले जातील ?

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने असे सांगितले आहे कि सूर्याचा अभ्यास करणाऱ्या यान मध्ये रिमोट सेन्सिंग पेलोड वापरले जातील आणि या रिमोट सेन्सिंग पेलोडमध्ये फोटोस्पियर आणि क्रोमोस्पियर इमेजिंगसाठी सौर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, तसेच स्पेक्ट्रोस्कोपिसाठी यामध्ये लाईन कोरोनाग्राफ, एक्स रे स्पेक्ट्रोमीटर, अर्बिटिंग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर यांचा समावेश आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारे काम करण्यास मदत करतात.

आम्ही दिलेल्या aditya L1 information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आदित्य L1 मोहीम माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aditya l1 meaning in marathi या aditya l1 launch date article मध्ये update करू, मित्रांनो हि information about aditya L1 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Aditya l1 information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!