अचानक पडलेला पाऊस निबंध मराठी Akasmat Padlela Paus Essay in Marathi

Akasmat Padlela Paus Essay in Marathi अकस्मात पडलेला पाऊस यावर निबंध अचानक पडलेला पाऊस निबंध मराठी  आज आपण या लेखामध्ये अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर निबंध लिहिणार आहोत. पाऊस पडणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आणि हे पावसाचे जलचक्र चालूच असते आणि पाऊस पडण्याचे दिवस हे जून पासून चालू होतो. पण काही दिवसापूर्वी उन्हाळा सुरु झाला होता आणि कडक उन्ह पडलेले होते आणि आम्हाला वाटू लागले कि आता कडक उन्हाळा सुरु झाला कि काय म्हणून आता माझी आई उन्हाळ्याच्या कामाची तयारी करू लागली होती.

तसे हे कडक उन्ह ४ ते ५ दिवस पडले पण ६ दिवशी सकाळी कडक उन्ह पडले होते आणि त्यामुळे खूप गरम होत होते म्हणजेच अचानक उकाडा खूप वाढला होता आणि म्हणून आम्ही घरातील फॅन आणि कुलर चालू केले कारण एकदम उकाडा खूप वाढला होता आणि अंगावरून घाम खाली गळत होता.

akasmat padlela paus essay in marathi
akasmat padlela paus essay in marathi

अचानक पडलेला पाऊस निबंध मराठी – Akasmat Padlela Paus Essay in Marathi

ह्या अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आईला आणि बाबांना असे वाटू लागले कि बहुतेक आज मुसळधार पाऊस येणार. जस जशी दुपार झाली तस तसा उकाडा वाढत गेला. मग दुपारी मी थोडा झोपी गेलो पण बाहेर खूप म्हणजे भयानक वारे सुटले होते म्हणजे संपूर्ण झाडे हलत होती तसेच धूळ आणि पाला उडत होता आणि हे दृश्य अगदी छोट्या वादळा सारखेच होते.

त्यामुळे मला जाग आली आणि बाहेर पाहतो तर काय पाऊस येणार म्हणून सगळ्या लोकांची नुसती धावपळ चालू होती म्हणजेच बाहेर असणारे सामान किंवा शेतातील काही धान्य झाकून किंवा घरामध्ये आणून ठेवण्याची गडबड करत होते जेणेकरून पावसामुळे काही भिजणार नाही.

बघता बघता हे सर्व थांबले वाऱ्यामुळे उडणारी धूळ थांबली आणि पावसाची सर पडू लागली प्रथम पावसाचा वेग हा कमी होता पण थोडय वेळाने मोठा ( धो धो ) पाऊस पडू लागला आणि त्यामुळे सर्व ठिकाणी पाणी पाणी झाले आणि आमचे घर खाली असल्यामुळे वरून येणारे पाणी हे रस्त्यावरून वाहू लागले आणि हे पाणी इतके वाहू लागले होते कि घरातून पाहिल्यावर वाटत होते कि घरासमोरून वाटत होते कि एक नाला किंवा ओढच जात आहे. आणि आम्ही दारावर उभे राहून बाबा आणि आम्ही दोघे पाहत होतो.

पाऊस पडत असल्यामुळे सर्व लोक आप आपल्या घरामध्ये बसून हे सर्व पाहत होती पण पाऊस काय थांबायचे नाव घेत नव्हता तो धो धो पडताच होता त्यामुळे शेतातातून, डोंगरातून तसेच सगळीकडचे पाणी गोळा होवून येत होते. सकाळपासून खूप गरम होत होते म्हणजेच उकाडा खूप वाढला होता त्यामुळे उष्णतेने जीव अगदी कासावीस झाला होता पण अचानक पावूस पडला आणि सगळे चित्रच बदलून गेले.

पाऊस पडत असल्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलले आणीन थंडगार झाले आणि सगळीकडे उत्साहाचे वातवर झाले. आपल्याला अकस्मात किंवा अचानक पाऊस पडला कि वातावरण एकदम बदलते आणि आपल्याला काही गरमागरम खावू वाटते तसेच त्यावेळी आमची चाची वेळ देखील झाली होती आम्ही आईला कांदा भजी करण्यासाठी सांगितली आणि कांदा भजी करण्यासाठी मदत देखील केली.

आईने कांदा चिरून त्यामध्ये बेसन आणि इतर साहित्य घालून पीठ भिजवून ठेवले आणि भजी टाळण्यासाठी गॅसवर कढई ठेवली मी आईला म्हंटले मी भजी तळून घेतो. माझी आईला घरामध्ये एकटीला काम करावे लागते म्हणून आम्ही दोघेही भाऊ आमच्या आईला घर कामामध्ये मदत करतो आणि आता देखील आम्ही मदत केली मग भजी तयार झाले आणि आईने चहा देखील तयार केला आणि आम्ही आम्ही चहा आणि भजीसोबत पावसाचा आनंद घेत आमच्या घराच्या बाहेर असणाऱ्या पोर्चमध्ये खुर्च्या टाकून बसलो आमच्या पोर्चलावर चहात होते त्यामुळे तेथे पाऊस लागत नव्हता.

आता पावसाचा थोडा जोर कमी झाला होता आणि लोक देखील घराबाहेर छत्री घेऊन पडत होती कारण पावसाचा वेगव थोडा कमी झाला होता तसेच आमच्या घर शेजारील लहान मुलांना पाऊस पडल्यानंतर खूप आनंद झाला होता आणि ती देखील पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये खेळत होते तसेच बारीक पडणाऱ्या पाण्यामध्ये नाचत होते आणि पावसाचा आनंद घेत होते आणि हे पाहून मनाला खूप आनंद झाला आणि आमचे लहानपणीचे दिवस आम्हाला आठवले.

एक ते दीड तास जोरदार पडलेला पाऊस थोडा कमी झाला पण आता तास ते दीड तास पडलेल्या पावसाचे पाणी एकत्र गोळा होऊन जात होते. त्याचबरोबर आता मात्र लोकांची गडबड चालू होती ती नदीचे पाणी कितपत वाढले आहे ते पाहण्यासाठी कारण आमच्या गावामध्ये एक नदी आहे आणि एक ते दीड तास पाऊस धो धो पडल्यामुळे लोकांना भीती होती कि आता नदीला पाणी येणार आणि तसेच झाले होते.

नदीला पाणी आले होते आणि नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कि नदीला आणखीन पाणी वाढेल का किंवा पुन्हा मोठा पाऊस पडेल का कारण अजून देखील पावूस थांबायचे नाव घेत नव्हता म्हणजे पाऊस येऊन दोन ते अडीच तास उलटून गेले तरी पाऊस काय थांबायचे नावच घेत नव्हता. नदीला पाणी वाढले होते आणि त्यामुळे गावातील लोकांची नदी काठी पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती पण नशिबाने पाऊस थांबला.

आणि नदीचे पाणी देखील तितकेच राहिले ते वाढले नाही आणि गावावर येणारे संकट टळले तसेच वातावरण देखील नॉर्मल झाले आणि लोकांचे रोजचे रुटीन परत सुरु झाले आणि परत लोकांची कामाची गडबड सुरु झाली. पण या अकस्मात पडलेल्या पावसामुळे वातावरण अगदी थंड झाले होते आणि चार दिवसाच्या उष्णतेपासून आराम मिळाला होता आणि हा दोन तासाचा वेळ देखील खूप छान गेला.

अनेक ठिकाणी अकस्मात किंवा अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक प्रकारचे नुकसान होते पण या वेळी पडलेल्या पावसामुळे काही नुकसान झाले नाही तर या पावसामुळे आम्हाला काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले तसेच वातावरणामध्ये देखील जो बदल हवा होता तो मिळाला.

आम्ही दिलेल्या akasmat padlela paus essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अचानक पडलेला पाऊस निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!