अल्बर्ट आईनस्टाईन निबंध Albert Einstein Essay in Marathi

Albert Einstein Essay in Marathi अल्बर्ट आईनस्टाईन निबंध आज आपण या लेखामध्ये अल्बर्ट आईनस्टाईन (albert einstein essay) या प्रसिध्द शास्त्रज्ञा विषयी निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून विज्ञान क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावली. अश्याच प्रकारे विसाव्या शतकातील एक लोकप्रिय शास्त्रज्ञ ज्यांची ओळख करून देण्याची देखील गरज नाही असे शास्त्रज्ञ म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईन हे होय. अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म जर्मन मधील उल्म येथे १४ मार्च १८७९ रोजी झाला आणि त्यांच्या वडीलांचे नाव हर्मन आणि आईचे नाव पॉलीन असे होते.

अल्बर्ट आईनस्टाईन यांचे इ.स १९०३ मध्ये मिलेव्हा मॅरिक हिच्या सोबत लग्न झाले आणि त्यांना २ मुले हान्स आणि एडूआर्ड अशी नावे होती आणि त्यांनी मिलेव्हा मॅरिक घटस्पोट घेऊन एल्सा लाव्हेन्थ हिच्याशी लग्न केले होते.

albert einstein essay in marathi
albert einstein essay in marathi

अल्बर्ट आईनस्टाईन निबंध – Albert Einstein Essay in Marathi

Essay On Albert Einstein in Marathi

त्यांनी झुरीच येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण घेतले. अल्बर्ट आईनस्टाईन हे शाळेपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी शाळेमध्ये असतानाच गणित आणि भौतिकशास्त्रा मध्ये प्राविण्य मिळवले होते म्हणजेच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

त्यांना भौतिकशास्त्र हा विषय खूप आवडत होता आणि त्यांचा हा विषय खूप चांगला असल्यामुळे त्यांनी त्या विषयाचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी इ.स १८९६ मध्ये स्विस पॉलीटेक्नीक मध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी इ.स १९०१ मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित मध्ये डिप्लोमा प्राप्त केला. त्यांनी इ.स १९०१ मध्ये बर्न पेटंट कार्यालयामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केले. पेटंट अॅप्लिकेशन्सचे ज्यावेळी ते विश्लेषण करत होते त्यावेळी त्यांनी विशेष सापेक्षता आणि भौतिकशास्त्राच्या इतर क्षेत्रामधील कार्य देखील त्यांनी विकसित केले ज्यामुळे त्यांना त्यामध्ये नंतर पासिद्धी मिळाली.

त्यांनी इ.स १९०५ मध्ये झुरीच विद्यापीठातून डॉक्टरेट हि पदवी मिळवली. १९०९ मध्ये त्यांनी झुरीच मध्ये प्राध्यापक या पदावर काम केले होते आणि त्यांनतर १९११ मध्ये प्राग येथे एक वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले आणि मग त्यांनी परत झुरीच विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी त्यांची इ.स १९०५ डॉक्टरेट पदवी मिळाल्या नंतर त्यांनी सापेक्षता वाद, प्रकाश विद्युत परिणाम, वस्तुमान आणि उर्जा या मधील समतुल्याता असे चार शोधनिबंध प्रसिध्द केले. इ.स १९१६ मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांची फिजिकल सोसायटीच्या अध्यक्ष पदी नेमणूक झाली तसेच त्यांनी १९१४ मध्ये बर्लिन युनिव्हर्सिटी मध्ये शिकवण्यास सुरुवात केली.

त्यांनी विज्ञानामध्ये भरपुर योगदान दिले आहे आहे. त्यांची सापेक्षतेच सिद्धांत असो किवा केशिका गति, क्रिटिकल सबडक्शन, अणूंची ब्राउनियन गती, एक अनु वायूचा क्वांटम सिद्धांत तसेच अणूंची उत्परिवर्तन संभाव्यता, कमी रेडिएशन घनतेसह प्रकाशाचे थर्मल गुणधर्म, रेडिएशनचे सिद्धांत, रिलेटीवीटी चा सिद्धांत यासारखे बरचसे शोध त्यांनी लावले.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध तसेच वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगणारे सिध्दांत मांडले जसे कि त्यांचा सर्वात लोकप्रिय असणारा सिध्दांत म्हणजे वस्तू आणि उर्जा यांच्यातील सिध्दांत आणि ह्याच्यासाठी त्यांनी एक सूत्र देखील मांडले होते ते म्हणजे E= Mc2 आणि हा त्यांनी मांडलेला सिध्दांत हा संपूर्ण जगामध्ये प्रसिध्द झाला होता.

तसेच त्यांनी आपल्या सिद्धांतातून त्यांनी वेळ आणि वेग (सापेक्षतावाद) यांच्यामधील संबध देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी अनु वायूचा क्वांटम सिद्धांतामध्ये उर्जेच्या छोट्या भागाला त्यांनी फोटॉन म्हटले आणि त्याच्या तरंगाचे वैशिष्ठ्य सांगितले तसेच त्यांनी फोटो इलेक्ट्रिक आणि धातूचे इलेक्ट्रॉनिक उत्सर्जन यांच्यामधील परिणामाची रचना देखील समजावून सांगितले. त्याचबरोबर त्यांनी रेफ्रेरीजीरेटर, आकाशाचा रंग निळा का असतो आणि दूरदर्शन याचा शोध लावला आणि अश्या प्रकारे त्यांनी इतर शोध आणि सिध्दांत मांडले.

अल्बर्ट आईनस्टाईन हे हे त्यांच्या सापेक्षतावाद ( वेळ आणि वेग ) ह्या सिद्धांतासाठी आणि E = Mc2 ( वस्तू आणि उर्जा ) या शोधांच्यामुळे किंवा सिध्दांतांच्या मुळे खूप प्रसिध्द झाले आहेत. अल्बर्ट आईनस्टाईन यांना लहान असताना त्यांच्या वडिलांनी म्हणजेच हर्मन यांनी एक होकायंत्र दिले होते जे दिशा दर्शवते आणि त्यावेळी पासून त्यांना यासारख्या गोष्टींच्यामध्ये आवड निर्माण झाली होती आणि सिध्दांत मांडण्याची तयारी हि लहानपणी पासूनच केली होती म्हणजेच त्यांना भौतिकशास्त्रा विषय आवड निर्माण झाली.

E = Mc2  हे सूत्र त्यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताचा एक भाग बनला आणि त्यावर अल्बर्ट आईनस्टाईन यांनी दहा वर्ष काम केले. तसेच अनेक शास्त्रज्ञ याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल माहित घेण्यासाठी प्रयत्न करत होते पण अल्बर्ट आईनस्टाईन हे पहिले होते ज्यांनी संपूर्ण गोष्टी एकत्र केल्या होत्या आणि सिध्दांत मांडला.

तसेच त्यांनी आपल्या सिध्दांतामध्ये असे स्पष्ट केले कि गुरुत्वाकर्षनाच परिणाम हा जागा आणि वेळेवर देखील परिणाम करतात. अश्या प्रकारे अल्बर्ट आईनस्टाईन यांनी आपल्या लहानपणी पासून भौतिकशास्त्र या विषयी आवड निर्माण केले आणि त्यांनी त्याच्यावर कार्य करून अनेक वेगवेगळे सिध्दांत मांडले जसे कि सापेक्षता वाद सिद्धांत तसेच वस्तू आणि उर्जा ( E = Mc2  ) हे सिध्दांत मांडले तसेच त्यांनी सापेक्षता वाद हा सिध्दांत वयाच्या २६ व्या वर्षी मांडला होता.

त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या चांगल्या कामगिऱ्या केल्या आणि त्यांनी त्यामुळे त्यांना इ.स १९२१ मध्ये भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार मिळाला तसेच त्यांना इ.स १९२५ मध्ये कोपले हे पदक कामगिरीबद्दल कौतुक करण्यात आले होते. तसेच त्यांना इ.स १९२१ मात्त्युक्की हे पदक देवून देखील त्यांचा गौरव करण्यात आले होते कारण त्यांनी तशी मोलाची कामगिरी केली आहे.

तसेच त्यांना इ.स १९२९ मध्ये मेक्स प्लांक हे पदक देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते. अल्बर्ट आईनस्टाईनब ज्यावेळी जर्मनी सोडून अमेरिकेमधील न्यू जर्शी याठिकाणी राहायला गले होते त्यावेळी ते प्रीस्टन या विद्यालयामध्ये काम करत होते. अल्बर्ट आईनस्टाईन हे १८ एप्रिल १९५५ साली मरण पावले.

आम्ही दिलेल्या albert einstein essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अल्बर्ट आईनस्टाईन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on albert einstein in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि albert einstein essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये big essay on albert einstein in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!