अल्बर्ट आईनस्टाईन Albert Einstein Information in Marathi

Albert Einstein Information in Marathi अल्बर्ट आईनस्टाईन मराठी असीम बुद्धिमत्तेचे उदाहरण म्हटलं की आपल्याला आठवतात ते म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन, ज्यांनी मॅटर एनर्जी मध्ये कन्वर्ट करणारा जगप्रसिद्ध फॉर्मुला E=mc2 मांडला. अल्बर्ट आईन्स्टाईन हे सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी भौतिकशास्त्रमध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. सार्वकालिक शास्त्रज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकपैकी एक म्हणजे आईन्स्टाईन. यांचे अनेक सिद्धांत प्रसिद्ध आहेत. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे, सापेक्षतावादाचा सिद्धांत, गुरुत्वाकर्षण, फोटोईलेक्ट्रिक इफेक्ट, प्रकाश, क्वांटम एनर्जी. त्यामुळे सदर लेखात आपण अल्बर्ट आईनस्टाईन यांचे बालपण, शिक्षण, त्याने लावलेले सिद्धांत इत्यादि माहितीवर थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत .

albert einstein information in marathi
albert einstein information in marathi

अल्बर्ट आईनस्टाईन माहिती – Albert Einstein Information in Marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन (albert einstein in marathi)माहिती
जन्म14 मार्च 1879
जन्म ठिकाणजर्मनीतील उल्म येथे झाला
पालकहरमन आईन्स्टाईन
सिद्धान्तE=mc2
फील्ड्सगणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी

बालपण :

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 मध्ये जर्मनीतील उल्म येथे झाला. त्यांचे वडील हरमन आईन्स्टाईन हे विक्रेते होते.  नंतर त्यांनी विद्युत रासायनिक पदार्थांची निगडित कारखाना काढला. त्यांच्या आईचे नाव पैलीन होते. ते एक ज्यू कुटुंब होते.

शिक्षण :    

अल्बर्ट आईन्स्टाईनने एका कॅथोलिक प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी तंतुवाद्य आणि व्हायोलिनचे देखील धडे घेतले. जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे त्यांचे शिक्षण झाले. 1901 साली स्वीस फेडरल पॉलीटेक्निक मधून त्यांनी गणित व भौतिकशास्त्राच्या अध्यापनाची पदविका संपादन केली. आईन्स्टाईन यांना 1905 मध्ये ‘अ न्यू दीटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर डायमेन्शन’ प्रबंधासाठी झुरिक विद्यापीठाने त्यांना पीएचडी ही पदवी प्रदान केली.

करियर :  

अध्यापकाची पदवी संपादन करून त्यांना अध्यापक म्हणून नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्विस पेटंट कार्यालयात नोकरी केली. विद्युत चुंबकीय उपकरणांच्या पेटंटसाठी आलेल्या अर्जांचे मूल्यमापन करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांचे हे काम विद्युत संदेशांचे संप्रेषण आणि काळाचे विद्युत यांत्रिकी संकलन यांच्याशी संबंधित होते. 

1905 मध्ये त्यांनी प्रकाश विद्युत परिणाम, सापेक्षतावाद सिद्धांत, ब्राऊनीय गती, वस्तुमान आणि ऊर्जा यातील समतुल्यता असे चार शोधनिबंध प्रसिद्ध केले. 1908 मध्ये आईन्स्टाईन बर्न विद्यापीठात रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी झुरिक विद्यापीठात भौतिक शास्त्र अध्यापनाला सुरवात केली. 1911 साली आईन्स्टाईन यांनी प्राग मधील कार्ल फर्डिनेण्ड विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक पदाचा पदभार स्वीकारला.

त्यांची 1916 साली जर्मन फिजिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच ‘प्रशियन अकॅडमी ऑफ सायन्स’ चे ते सदस्य झाले. 1914 साली त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन येथे शिकवणे सुरू केले. त्यांच्या हुशारीची कीर्ती जगभर पसरली होती. म्हणून त्यांना लेक्चर देण्यासाठी जगभरातून आमंत्रित करण्यात येत होते.

1933 साली ते अमेरिकेला एका लेक्चरसाठी गेले होते, तेव्हाच जर्मनीवर ॲडॉल्फ हिटलर चे राज्य आले. तेव्हा ते ज्यू असल्यामुळे त्यांनाही टार्गेट करण्यात येईल म्हणून त्यांनी जर्मनीत परत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते.

योगदान :  

त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब होय. सिद्धांत : प्रकाश विद्युत परिणाम सिद्धांत: हेनरीच हर्टझ यांनी 1887 मध्ये प्रकाश विद्युत परिणाम सिद्ध केला, मात्र त्यांना त्याचे स्पष्टीकरण देता आले नाही. आईन्स्टाईन यांनी या परिणामाचे स्पष्टीकरण देणारा सिद्धांत मांडला. आईन्स्टाईन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर कमी तरंगलांबी चा प्रकाश आपातीत झाला असता त्यातील फोटोंस च्या ऊर्जे इतकी ऊर्जा धातूतील इलेक्ट्रॉनकडे संक्रमित होते आणि धातूच्या पृष्ठभागावरून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात. 

उत्सर्जित झालेल्या इलेक्ट्रॉनची उर्जा प्रकाशाची तरंगलांबी आणि धातूंचे गुणधर्म यांवर अवलंबून असते. धातूच्या पृष्ठभागावरून मुक्त झालेल्या या इलेक्ट्रॉन मुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. या सिद्धांताद्वारे आईन्स्टाईन यांनी प्रकाश केवळ तरंगांच्या स्वरूपातच नाहीतर फोटॉन या ऊर्जा कणांच्या स्वरूपातही अस्तित्वात असतो हे सिद्ध केले. या संशोधनामुळे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकआणि सौर विद्युत घट यांच्या निर्मितीस चालना मिळाली.

सापेक्षतावाद सिद्धांत :  

सापेक्षतावादाच्या शोधनिबंधात आईन्स्टाईन यांनी विश्वाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन वैज्ञानिक जगताला दिला. निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाची गती निरपेक्ष असते व कोणत्याही संदर्भ चौकटीत ती तेवढीच असते. अवकाश, वस्तुमान आणि काल या तिन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून असतात.

जडत्विय आणि अजडत्विय संदर्भ चौकटीमध्ये भौतिक शास्त्राचे नियम वेगवेगळे असतात. काल, वस्तुमान आणि लांबीमध्ये पडणारा फरक त्या वस्तूचा वेग आणि प्रकाशाचा वेग यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो. जर एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाने गतिमान झाली तर तिचे वस्तुमान अनंत होईल आणि म्हणूनच कोणतीही वस्तू प्रकाशाच्या वेगाने किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गतिमान होऊ शकत नाही हे त्यांनी दाखवून दिले. 

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि अल्बर्ट आईनस्टाईन कोण होते albert einstein information in marathi त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. albert einstein short information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच albert einstein theory of relativity information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही अल्बर्ट आईनस्टाईन या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about albert einstein in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!