Alu Vadi Recipe in Marathi Language – Alu Chi Vadi Recipe in Marathi अळू वडी ची रेसिपी अळू वडीला पारंपारिक पदार्थ म्हणून ओळखले जाते कारण हा पदार्थ खूप पूर्वीच्या काळापासून केला जातो आणि आज देखील हा पदार्थ तितक्याच आनंदाने बनवला जातो आणि आवडीने खाल्ला देखील जातो. अळू वडिला गौरी गणपतीच्या सणामध्ये एक महत्वाचे स्थान आहे कारण ह्या सणामध्ये अळूच्या पानाची वडी आणि भाकरी गौरीला नैवैद्य दाखवण्यासाठी केली जाते. अळूची वडी हि अळूच्या पानाच्या पासून बनवली जाते आणि या पानांची पौष्टिक विशेषता म्हणजे ह्या पाने खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी अळूची वडी बनवून खाल्ली तरी झालेल कारण या मुळे आपल्याला काही तरी कामांग आणि स्वादिष्ट खाल्ल्याचा फील येईल आणि वजन करण्यास देखील मदत होईल. इतकेच नव्हे तर अळूची वडी आवडीने खाणारे अनेक कित्येक लोक आहेत आणि जास्तीतर खेडेगावामध्येच अळू वडी जास्त प्रमाणात बनवली जाते, कारण तेथे अळूच्या पानांची उपलब्धता जास्त असते.
अळूची पाने हि दोन प्रकारची असतात पांढऱ्या देठाची आणि लाल देठाची आणि त्यामधील लाल देठाची पाने खाण्यायोग्य असतात आणि तो खाल्ल्यामुळे तोंडामध्ये आग उठत नाही पण पांढऱ्या देठाच्या पानांच्यामुळे काही लोकांना ते खाल्ल्यामुळे तोंडामध्ये आग उठते म्हणून जर तुम्ही बाजारातून पाने विकत घेत असाल तर लाल देठाची पाने घ्या.
अळू वडी ची रेसिपी – Alu Vadi Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
उकडण्यासाठी आणि तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
अळू वडी म्हणजे काय ?
अळू वडी म्हणजे अळूच्या पानावर डाळीच्या पीठाचे मिश्रण बनवून लावायचे आणि त्यांची गुंडाळी करून ते मोदक पात्राच्या चाळणीमध्ये उकडून घ्यायचे आणि त्याच्या वाड्या पडून त्या तळून किंवा भाजून घेवू शकतो.
अळू वडी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य म्हणजे हरभरा डाळीचे पीठ आणि अळूचे पाने हि महत्वाचे घटक आहेत.
- हरभरा डाळीचे पीठ : हरभरा डाळीचे पीठ हे अळूच्या पानाला लावले जाते आणि आणि त्याची गुंडाळी करून ते उकडून तळून किंवा भाजून घेतले जाते.
- अळूचे पान : अळूचे पान हे वडीचे आवरण म्हणून वापरले जाते आणि हे आपल्याला पौष्टिक दृष्ट्या देखील खूप फायद्याचे असते.
अळू वडी हि महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ आहे कारण तो खूप पूर्वीच्या काळापासून केला जातो आणि आज देखील हा पदार्थ तितक्याच आनंदाने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. आता आपण पाहूयात अळू वडी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: कोथिंबीर वडी रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
उकडण्यासाठी आणि तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
आता आपण अळू वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात जे सहजा सहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते. आपण जर शहरामध्ये राहत असाल तर अळूची पाने बाजारातून विकत आणावी लागतील.
- ६ ते ७ अळूची मोठी किंवा मध्यम आकाराची पाने.
- १ वाटी बेसन / हरभरा डाळीचे पीठ.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/२ चमचा गरम मसाला पावडर.
- २ चमचे लसून पेस्ट.
- १/२ मोठा चमचा कोथिंबीर.
- १/४ हिंग.
- १/२ चमचा गरम मसाला.
- २ चमचे शेंगदाण्याचा मोठा कुट.
- १ चमचा गुळ.
- चिंच.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- सर्वप्रथम अळूच्या पानांची देठ काढून घेवून ती पाने स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता एक भांडे किंवा बाऊल घ्या आणि त्यामध्ये डाळीचे पीठ घ्या आणि त्यामध्ये हळद, हिंग, गरम मसाला, लसून पेस्ट, मिरची पावडर, गुळ, शेंगदाण्याचा कुट, कोथिंबीर आणि मीठ (चवीनुसार) घालून हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता त्यामध्ये २ ते ३ चमचा तेल घाला आणि ते तेल चांगले पिठाला लावून घ्या आणि मग त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले घट्ट भिजवून घ्या.
- आणि ते पीठ एक ७ ते ८ मिनिटे भिजवत ठेवा.
- आता अळूची पाने घ्या आणि त्या पानांच्या उलट्या बाजूला चिंचेचे पाणी लावा आणि मग आपण तयार केलेले पीठ सर्व पानावर लावा आणि त्या पानाच्या कडेवर अनेक पान ठेवा आणि त्यावर देखील चिंचेचे पाणी लावून त्याला देखील संपूर्ण पानाला पीठ लावून त्या दोन्ही पानांचा एक रोल बनवा किंवा गुंडाळी करा. ( टीप : पानांची गुंडाळी घट्ट असावी सैल असू नये ).
- या प्रकारे सर्व पानांना पीठ लावून त्याचे रोल बनवा.
- जर तुम्ही वडी उकडण्यासाठी मोदक पात्राच्या चाळणीचा वापर करत असाल तर चाळण वरती झाकणासाठी बसेल अशे भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये २ ते ३ वाटी पाणी घाला आणि ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
- चाळणीला तेल लावून त्यामध्ये बनवलेले अळूचे रोल घालून ती चाळण त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर गच्च झाकण घाला आणि ते ७ ते ८ मिनिटे उकडून घ्या.
- वड्या उकडल्यानंतर त्या थोड्या गार झाल्यानंतर चाळणीतून ताटामध्ये काढून घ्या आणि त्याच्या वड्या पडून घ्या.
- आता कढईमध्ये तेला घाला आणि ते तेला मोठ्या आचेवर गरम करा आणि तेल गरम झाले कि गॅसची आच कमी करा आणि त्यामध्ये जितक्या मावतील तेवढ्या वड्या टाकून त्या चांगल्या कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत भाजा.
- वड्या लालसर झाल्या कि त्या लगेच काढा त्यांचा रंग जास्त काळा होऊ देऊ नका.
- अश्या प्रकारे सर्व वड्या तळून घ्या.
अळू वड्या कश्या सोबत खातात – serving suggestions
अळू वडी आपण भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकतो तसेच हि वडी तशीच देखील खाल्ली तरी छान लागेत.
टिप्स (tips)
- अळू वडी खाताना तुम्हाला जर तोंडाला आग उटत असेल तर वडी करतेवेळी अळूच्या पानांना आमवडीसुलचे किंवा चिंचेचे पाणी लावावे.
- अळू वाडी उकडून त्याला कांदा, तीळ, तिखट, हळद आणि मीठ याची फोडणी देवून वड्या टाळण्या ऐवजी भाजल्या तर ते देखील चांगले लागते.
- ज्यांना सांधेदुखी किंवा गुढघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अळूची पाने खावू नयेत.
- वडीमध्ये २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ देखील वापरले तर चालते.
आम्ही दिलेल्या alu vadi recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अळू वडी ची रेसिपी माहिती मराठी aloo vadi recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या alu vadi recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि alu vadi recipe step by step in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aluwadi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट