अनारसे बनवण्याची रेसिपी मराठी Anarsa Recipe in Marathi

Anarsa Recipe in Marathi अनारस रेसिपी मराठी अनारस हा भारतातील एक पारंपारिक पदार्थ आहे कारण हा पदार्थ खूप पूर्वीच्या काळापासून बनवला जातो. अनारस हा पदार्थ गोड आणि कुरकुरीत असतो त्यामुळे हा पदार्थ खाताना खूप छानवाटते आणि हा तोंडामध्ये टाकताच विरघळतो. दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फराळ बनवतो त्यातील एक सर्वांना आवडणारा फराळाचा पदार्थ म्हणजे अनारस. भारतीय संस्कृती हि वेगवेगळ्या प्रकारे जपली जाते आणि त्यामध्ये अनारस ह्या पदार्थाला खूप महत्व आहे. भारतामध्ये काही ठिकाणी जावयाला अधिक महिन्यामध्ये वाण देण्याची परंपरा आहे.

आणि त्यावेळी जावयाचा पहिला अधिक महिना म्हणून जावयाला काहीतरी वस्तू भेट आणि चांदीच्या ताटातून अनारस देण्याची भारतीय परंपरा आहे. तसेच वैकुंठ चतुर्दशीला देखील अनारसाच्या नैवैद्याला फार महत्व आहे कारण या दिवशी देवाची पूजा करून देवाला ३३ अनारसांचा नैवैद्य दाखवला जातो. अश्या प्रकारे अनारस या पदार्थाला महत्व आहे

आणि हा पदार्थ अश्या वेगवेगळ्या कारणासाठी बनवला जातो आणि आपण आपल्याला खावू वाटल्यास तो पदार्थ करून खावू शकतो. हा पदार्थ बनवण्यासाठी जरी मोजकेच साहित्य लागत असले तरी हा पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ जातो. आज आपण या लेखामध्ये अनारस हा पदार्थ कसा बनवायचा हे पाहूयात.

anarsa recipe in marathi
anarsa recipe in marathi

अनारसे बनवण्याची रेसिपी मराठी – Anarsa Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ७ ते ८ दिवस
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
पाककलाभारतीय
अर्धा किलो मध्ये बनणारे अनारस३० ते २५ अनारस

अनारस म्हणजे काय ?

अनारस हा पदार्थ जवारी तांदूळ भिजवून ते वाळवून ते घरगुती चक्की मध्ये दळून आणले जातात आणि मग त्या पिठामध्ये गुळ घालून ते दडपून ठेवून २ दिवसांनी त्याचे चांगले मऊ पीठ मळले जाते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर खसखस घालून त्यावर गोळा ठेवून ते बोटाने फिरवून गोल बनवले जाते आणि ते तळले जाते.

अनारस बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • तांदूळ : तांदूळ हा पदार्थ अनारस बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. अनारसे बनवताना तांदूळ भिजवून ते वाळवून त्याचे पीठ बनवून ते गुळामध्ये मळले जाते आणि त्याची अनारस बनवली जातात.
  • गुळ : गुळ हा देखील एक महत्वाचा घटक आहे कारण गुळामुळे अनारसाला गोड चव येते.

अनारस रेसिपी कशी बनवतात – recipe of anarsa step by step in marathi

अनारस रेसिपी हि एक गोड डिश आहे जी एक फराळ म्हणून ओळखली जाते. अनारस हा पदार्थ शक्यतो काही खास कारणांच्यासाठी बनवला जातो कारण हा बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. चला तर मग आता आपण पाहूयात अनारस कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ७ ते ८ दिवस
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
पाककलाभारतीय
अर्धा किलो मध्ये बनणारे अनारस३० ते २५ अनारस

अनारस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make anarsa recipe 

अनारस बनवण्यासाठी आपल्याला विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण बाजारामधून विकत अनु शकतो. अनारस बनवण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य लागते आणि तांदूळ आणि गुल हे साहित्य हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. आता आपण अनारस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • अर्धा किलो जवारी तांदूळ किंवा जाडा तांदूळ.
  • ४०० ग्रॅम गुळ.
  • तेल किंवा तूप ( तळण्यासाठी ).
  • १ छोटी वाटी खसखस किंवा तीळ.
  • दीड चमचा वेलदोडे पावडर.

अनारस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make anarsa recipe 

  • आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून गोड, खुशखुशीत आणि खमंग अनारस कसे बनवायचे ते पाहूयात.
  • सर्वप्रथम अनारस बनवण्यासाठी जवारी तांदूळ किंवा जाडा तांदूळ आवश्यक असतो या व्यतिरिक्त कोणताही तांदूळ वापरला तर आपले अनारस चांगले होऊ शकणार नाहीत म्हणून तुम्ही शक्यतो जवारी तांदुळच घ्या.
  • आता हे तांदूळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेवून त्यामधील ते पाणी काढून त्यामध्ये तांदूळ बुडतील इतके स्वच्छ पाणी घाला आणि ते भांडे झाकून ठेवा.
  • हे तांदूळ आपल्या ४ दिवस भिजत ठेवावे लागतील आणि त्यामधील पाणी रोज बदलावे लागेल म्हणजेच तांदूळ आपल्याला रोज धुवावे लागतील.
  • ५ व्या दिवशी ह्या तांदळामधील पाणी काढून घेवून त्यामध्ये स्वच्छ पाणी घाला आणि ते तांदूळ धुवून घेवून त्यामधील सर्व पाणी काढून टाका.
  • आता हे तांदूळ सावलीमध्ये पसरून किंवा उन्हामध्ये पसरून त्यावर पातळ कापड झाकून ते ५ ते ६ तास वाळवा ( टीप : हे तांदूळ थेट सूर्यप्रकाशामध्ये वाळवू नका ).
  • मग वाळलेले हे तांदूळ तुम्ही घरगुती चक्कीतून किंवा छोट्या चक्कीतून दळून अनु शकता किंवा जर तांदूळ थोडेसेच असतील तर तुम्ही ते मिक्सरवर देखील बारीक करू शकता.
  • आता हे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या आणि ते एक भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये बारीक चिरलेला ४०० ग्रॅम गुळ घालून ते पीठ चागले एकत्र करून दडपून ठेवा. हे पीठ २ ते ३ दिवस दडपून ठेवा.
  • २ ते ३ दिवसांनी ते पीठ काढून घेवून ते थोडे थोडे घेवून त्याचे मऊसर आणि घट्ट गोळे बनवून घ्या.
  • आता त्या पीठाचे अनारस बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवा आणि पोळपाटावर थोडीसी खसखस घालून त्यावर गोळा ठेवून त्या गोळ्याला दोन्ही हाताच्या बोटांनी फिरवून त्याचा गोल बनवा. अश्या प्रकारे जितके अनारस तुम्हाला बनवायचे आहेत तितके बनवून घ्या. ( तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकता आणि तुम्हाला जेंव्हा अनारस खावेसे वाटतात त्यावेळी ताजे अनारस बनवून खावू शकता ).
  • आता कढईमध्ये अनारस तळण्यासाठी तेल किंवा तूप मध्यम आचेवर ठेवा आणि ते गरम झाले कि त्यामध्ये अनारस सोडून ते चांगले लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • तुमचे कुरकुरीत, खमंग आणि गोड अनारस तयार झाले.

टिप्स ( Tips ) 

  • तुपातले तळलेले अनारस चवीला खूप चं लागतात म्हंणून तुम्ही जास्त करून अनारस तळण्यासाठी तुपाचा वापर करण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्ही अनारसाला खाली साखर लावून देखील आकार देवू शकता.

आम्ही दिलेल्या anarsa recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अनारसे बनवण्याची रेसिपी मराठी anarse recipe marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या recipe of anarsa step by step in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि instant anarsa recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtrian anarsa recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!