रवा लाडू रेसिपी मराठी Rava Ladoo Recipe in Marathi

Rava Ladoo Recipe in Marathi रवा लाडू रेसिपी मराठी रवा लाडू हा पदार्थ कोणाला माहित नाही, हा पदार्थ सर्वांच्या ओळखीचा आहे आणि हा पदार्थ आपण सणाला, आनंदाच्या वेळी किंवा पाहुण्यांना डब्यातून घालून देण्यासाठी देखील आपण रव्याचे लाडू बनवू शकतो. रवा लाडू हा पदार्थ गोड आहे आणि हा आपण बनवतेवेळी सर्वप्रथम रवा भाजून घेतो मग साखरेचा पाक करून घेवून त्यामध्ये भाजलेला रवा घालून ते मिश्रण थोडे घट्ट झाले कि त्याचे लाडू वळतो. रव्याचे लाडू कित्येक लोकांना आवडतात आणि हे लाडू कमी वेळेमध्ये आणि एकदम कमी साहित्यामध्ये एकदम उत्तम बनतात.

रवा लाडू हा पदार्थ पूर्वीच्या काळापासून बनवला जाणारा पदार्थ आहे म्हणून या पदार्थाला पारंपारिक गोड पदार्थ म्हणून ओळख आहे. लाडू बनवताना यामधील सर्वात अवघड प्रक्रिया म्हणजेलाडवाचा पाक बनवणे जर पाक चांगला झाला तरच लाडू चांगले मऊ आणि टेस्टी होतात नाही तर पाक चांगला नाही झाला तर लाडू चांगले होते नाहीत ते घट्ट होवून बसतात.

रव्याचे लाडू आपण पाकचे आणि बिनापाकाचे म्हणजेच पिठी साखर वापरून देखील लाडू बनवू शक्ती आणि आज या लेखामध्ये आपण दोन्ही प्रकारचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोते. चला तर मग पाहूयात रव्याचे लाडू कसे बनवायचे.

rava ladoo recipe in marathi
rava ladoo recipe in marathi

रव्याचे लाडू रेसिपी मराठी – Rava Ladoo Recipe in Marathi

रवा लाडू रेसिपी – rava laddu recipe in marathi

सणामध्ये रवा लाडू हा ठरलेला पदार्थ असतो आणि आमच्या इथे दिवाळीला आणि गणपतीला रवा लाडू हा हमखास बनवला जातो. रवा लाडू हा पदार्थ तोंडामध्ये टाकताच विरघळणारा पदार्थ आहे आणि हा पदार्थ खूप स्वादिष्ट लागतो. म्हणूनच आज या लेखामध्ये रवा लाडू कसा बनवायचा या बद्दल पाहणार आहोत. आता आपण दोन प्रकारचे रवा लाडू पाहणार आहोत एक पाकातले रवा लाडू आणि बिना पाकातले रवा लाडू.

पद्धत १ : पाकातले रवा लाडू – pakatale rava ladoo recipe in marathi

पाकातले रवा लाडू पारंपारिक लाडवाचा प्रकार आहे कारण पूर्वीच्या गगृहिणी हि पद्धत वापरून रवा लाडू बनवत होत्या. पाकातले रवा लाडू इतके मऊ होतात कि ते तोंडामध्ये टाकताच विरघळतात. म्हणून आता आपण पाकातले लाडू कसे बनवायचे हे पाहूयात.

पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make rawa ladoo 

 • अर्धा किलो रवा.
 • ४०० ग्रॅम साखर.
 • १ वाटी तूप.
 • १ वाटी खोबरे ( खिसलेले आणि भाजलेले ).
 • १ चमचा वेलची पावडर.
 • १ वाटी साखर.
 • १ छोटी वाटी बेदाणे ( लाडवाच्या वर लावण्यासाठी )

पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी केली कृती – process to make rawa ladoo

 • सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि आणि मग भांडे थोडे गरम झाले कि त्यामध्ये तूप घाला आणि मग तूप वितळले कि त्यामध्ये रवा घाला आणि रव्यामध्ये तूप चांगले मिक्स करून तो रवा मंद किंवा मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्या. ( टीप : रवा भाजतेवेली तो चमच्याने वर खाली करा ज्यामुळे खालचा रवा करपणार नाही )
 • रवा लालसर आणि खमंग वास येईपर्यंत चांगला भाजा ( टीप : रवा चांगला भाजला नाही तर लाडू चांगले बनत नाहीत ).
 • रवा भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि रवा बाजूला ठेवा.
 • आता एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये ४०० ग्रॅम साखर घालून त्यामध्ये एक वाटी पाणी घ्या
 • आणि हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि साखर विरघळेपर्यंत ते ढवळत रहा आणि या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या.
 • मग हे मिश्रण ३ ते ४ मिनिटे शिजवा आणि एकतारी पाक बनवून घ्या कारण रव्याच्या लाडवासाठी एकतारी पाक लागतो.
 • मग त्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या आणि गॅस बंद करा.
 • तुमचा पाक तयार झाला, आता या पाकामध्ये भाजलेला रवा, भाजलेले खोबरे घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि हे मिश्रण थोडे गार आणि घट्ट होईपर्यंत वाट पहा.
 • आता हे मिश्रण घट्ट झाले कि ते दोन्ही हाताने चांगले फोडून रवा सुट्टा करा आणि हातामध्ये थोडा थोडा रवा घेऊन त्याचे लाडू वळा आणि वळत्ते वेळी त्याला वर एक बेदाणा लावा ज्यामुळे तुमचा लाडू सुंदर दिसेल.
 • अश्या प्रकारे सर्व लाडू वळून घ्या.

पध्दत २ : पिठी साखरेचे किंवा बिना पाकातले लाडू 

जर आपल्याला रवा लाडू पटकन आणि झटपट बनवायचे असल्यास बिना पाकातले लाडू हा चांगला पर्याय आहे. चला तर मग पाहूयात बिना पाकातले लाडू कसे बनवायचे.

बिना पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make rava ladoo 

 • अर्धा किलो रवा.
 • ४०० ग्रॅम पिठी साखर.
 • तूप ( आवश्यकतेनुसार ).
 • २ चमचे वेलची पावडर.
 • १ छोटी वाटी काजू बदाम तुकडे.

बिना पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी केली कृती – process to make rava ladoo 

 • सर्वप्रथम तुपामध्ये काजू आणि बदाम तुकडे तळून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
 • आता एक कढई घ्या आणि ती मंद किंवा मध्यम आचेवर गरम करून त्यामध्ये १ मोठा चमचा तूप घालून त्यामध्ये रवा घालून तो रवा चांगला भाजून घ्या. ( टीप रवा भाजतेवेळी रव्याचा रंग बदलू देऊ नका म्हणूनच रवा मंद आचेवर भाजा त्यामुळे रंगही बदलणार नाही आणि रवा चांगला भाजेल )
 • रवा चांगला भाजला कि त्यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर आणि आणि तळलेले काजू बदाम तुकडे घाला आणि ते चांगले मिक्स करून गॅस बंद करा.
 • आता हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये किंवा परतीमध्ये ओतून घ्या आणि थोडे गार होईपर्यंत वाट पहा.
 • मग हे मिश्रण थोडे गार झाले कि त्यामधील थोड्या थोड्या रव्यामध्ये पातळ तूप घालून ते मिश्रण चांगले ओले करून घ्या आणि त्याचे लाडू वळा. हि प्रक्रिया सर्व रव्यासाठी वापरा आणि त्याची लाडू वळून घ्या.
 • तुमचे बिना पाकातले लाडू तयार झाले.

टिप्स ( Tips ) 

 • आपण जर रव्याच्या लाडवामध्ये थोडा तळलेला डिंक टाकला तर ते लाडू खातेवेळी खूप छान लागते पण ज्यावेळी आपण लाडू वळणार असतो त्याच वेळी त्यामध्ये डिंक घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून मग लाडू वळा ( डींक आपण फक्त पाकाच्या लाडवामध्ये वापरू शकतो ).
 • जर आपण पाकच्या रव्याच्या लाडवामध्ये थोडेसे बेसन पीठ वापरले तर लाडवाला खूप छान चव येते.

आम्ही दिलेल्या rava ladoo recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रवा लाडू रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rava besan ladoo recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ravyache ladoo recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rava laddu recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!