Anjali Bhagwat Information in Marathi अंजली भागवत विषयी माहिती, नेमबाजी हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जातो आणि हा खेळ जगभरातील प्रसिध्द खेळांच्यापैकी एक आहे आणि नेमबाजी म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी प्रक्षेपणासाठी नेम धरून मारणे किंवा शूट करण्याची स्पर्धा म्हणजे नेमबाजी. नेमबाजी मध्ये सध्या ऑलिम्पिक खेळामध्ये देखील खेळला जातो आणि या खेळालाही ऑलिम्पिकमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. नेमबाजीचे ऑलिम्पिक अथेन्स १८९६ पासून सुरु झाले त्यानंतर ऑलिम्पिक गेम्स मेक्सिको १९६८ पासून स्त्रिया देखील नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागल्या.
आपल्या भारतातील देखील अनेक महिला खेळाडू आहेत आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि व्यावसायिक नेमबाज म्हणजे अंजली भागवत आणि आज आपण या लेखामध्ये अंजली भागवत हिच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
अंजली भागवत विषयी माहिती – Anjali Bhagwat Information in Marathi
नाव | अंजली भागवत |
जन्म | ५ डिसेंबर १९६९ |
जन्म ठिकाण | मुंबई |
कुटुंब | कोकणी कुटुंब |
ओळख | भारतीय नेमबाज |
अंजली भागवत यांची वैयक्तिक माहिती आणि सुरुवात – information about anjali bhagwat in marathi
अंजली भागवत हि एक प्रसिध्द आणि व्यावसायिक नेमबाज खेळाडू आहे आणि त्यांच्या रायफल शुटर ( riffle shooter ) म्हणून खास ओळख आहे. अंजली भागवत ह्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६९ मध्ये मुंबई मध्ये एका कोकणी कुटुंबामध्ये झाला आणि त्यांना त्यांच्या लहान वयापासून बहुतेक नेमबाजीची आणि खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी लवकरच नॅशनल कॅडेट कॉर्प्स मध्ये प्रवेश घेतला आणि तेथे अनेक खेळांची तसेच नेमबाजीचे कौशल्य देखील वाढवले.
काही दिवसांनी पुढे त्यांना महाराष्ट्र रायफल असोसीएशन मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याठिकाणी त्यांनी नेमबाजीची कौशल्ये दाखवली आणि त्यांनी सात दिवसाच्या सराव करून १९८८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिले आणि नंतर त्यांनी संजय चक्रवर्ती यांच्याकडून नेमबाजीविषयी मुलभूत गोष्टी शिकल्या.
अंजली भागवत ह्यांची नेमबाजीमधील कामगिरी
अंजली भागवत यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्रासाठी रौप्य पदक मिळवले आणि मग त्यांनी नंतर संजय चक्रवर्ती यांच्यासोबत काही मुलभूत गोष्टी देखील शिकल्या. १६६५ मध्ये त्यांनी एसएफ खेळामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी राष्ट्रीय संघासह सुवर्ण, कांस्य आणि स्पोर्ट्स ३पी मध्ये वैयक्तिकपणे रौप्य पदक मिळविले.
पण त्यांना आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपली कामगिरी बजावायची होती त्यामुळे त्यांनी १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळवला आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ३ सुवरण पादन आणि एक रौप्य पदक मिळविले. ऑकलंड या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपच्या एयर रायफल आणि ३ पी स्पर्धा झाली आणि तिने त्या स्पर्धेमध्ये तीन नावे विजय मिळवल्यामुळे ती आणखीन लोकप्रिय झाली.
त्यानंतर त्यांनी आपले कौशल्य दाखवण्यासाठी वैयक्तिक पणे लास्लो साझुक्सक हे एक प्रसिध्द नेमबाजी प्रशिक्षक होते त्यांची तिने भेट घेतली आणि त्यांच्या कडून नेमबाजीचे पुढचे प्रशिक्षण घेत असताना त्यांनी २००० सिडनी ऑलम्पिक मध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवण्यासाठी तिला यश मिळाले आणि त्या स्पर्धेमध्ये ती अंतिम फेरीमध्ये देखील पोहचली.
२००१ ते २००४ या कालावधीमध्ये तिने आपल्या कारकीर्दीमध्ये मोठी कामगिरी केली म्हणजेच २००२ मध्ये एयर रायफल मिश्र स्पर्धेमध्ये आयएसएसएफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि त्या स्पर्धेमध्ये ४०० पैकी ३९९ गुण मिळवून विश्वचषक फायनल स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या तीपिमध्ये असंख्य पंक जोडण्यात आले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट लक्ष्यावर चांगल्या प्रकारे लक्ष देण्याव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक भूमिका बजावल्या.
त्यांनी २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल खेळामध्ये क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांच्यासोबत होस्टिंग केले आहे. तसेच त्या बर्याच काळापासून अंध मुलांना शिकवत आहेत आणि विविध वृतपत्रे आणि मासिकांच्यासाठी लेख लिहितात. बोक्या सातबंडे या मराठी चित्रपटामध्ये देखील त्यांनी पावण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्यांनी फॅशन डिझाईनर विक्रम फडणीस यांच्यासाठी रँम्प वॉक सुध्दा केला आहे.
त्यांनी सहारा आणि रिलायन्स खेळांना देखील प्रोत्साहन दिले आहे आणि सध्या ती नेमबाजांना देखील प्रशिक्षन देते आणि पुण्यामध्ये तिच्या स्वताच्या घरामध्ये नेमबाजी रेंज देखील आहे आणि तिने अनेक मुलैन्च्यासाठी आणि मुलांच्यासाठी प्रेरणा देणारी खेळाडू आहे.
अंजली भागवत यांना मिळालेले पुरस्कार – awards
अंजली भागवत ह्यांनी त्यांच्या खेळामध्ये मोठी आणि चांगली कामगिरी केली आणि त्यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले ते पुरस्कार कोणकोणते आहेत ते आपण आता खाली पाहूया.
२००२ मध्ये त्यांना इंडो अमेरिकन सोसायटी मार्फत यंग अचीव्हर ऑवार्ड देऊन सन्मानित केले तसेच २००० मध्ये भारत सरकारने तिच्या नेमबाजीमधील चांगल्या कामिगीरीसाठी अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला आणि २००३ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी एयर रायफल आणि ३ पी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकांच्यासह एयर रायफल स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आणि आपल्या देशाचे नाव उंचावले.
त्यांनी त्यांच्या राज्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा सुरु ठेवली आणि त्यांच्या नेमबाजीच्या चांगल्या कामगिरीसह ५५ सुवर्ण पदके, ३५ रौप्य पदके आणि १६ कांस्य पदके मिळवून पदक तालिका तयार करण्यास त्या यशस्वी ठरल्या. अश्या प्रकारे त्यांनी खेळामध्ये आपली चांगली कामगिरी किंवा भूमीका बजावून आपले आणि देशाचे नाव मोठे केले.
पुरस्काराचे नाव | वर्ष |
अर्जुन पुरस्कार ( भारत सरकार मार्फत ) | २००० |
यंग अचीव्हर ऑवार्ड (इंडो अमेरिकन सोसायटी मार्फत ) | २००२ |
राजीव गांधी खेलरत्न ( भारत सरकार ) | २००३ |
नेमबाजी विषयी माहिती
नेमबाजी म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी प्रक्षेपणासाठी नेम धरून मारणे किवा शूट करण्याची स्पर्धा. प्राचीन काळी नेमबाजी दगड किवा धनुष्य आणि बाण वापरून नेमबाजी करत होते. बंदूकांचा वापर करून नेमबाजी ची सुरुवात सामान्यता आधुनिक काळात बंदुकांच्या विकासासह १५ व्या आणि १६ व्या शतकात युरोपमध्ये त्याची झाली. ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजी कार्यक्रम म्हणजे पिस्तूल, रायफल आणि शॉटगन या तीन शाखांच्या एकूण १५ कार्यक्रमांचा समावेश असतो. ऑलिम्पियन सहा पुरुष स्पर्धा, सहा महिला स्पर्धा आणि तीन मिश्र संघात भाग घेतात.
नेमबाजी म्हणजे काय ?
नेमबाजी म्हणजे रेंज शस्त्राने (रेंज शस्त्र म्हणजे बंदूक, धनुष्य, दगड, स्लिंगशॉट) प्रक्षेपण सोडण्याची कृती किंवा प्रक्रिया याला आपण नेमबाजी म्हणतात. नेमबाजीचा वापर हा शिकार करण्यासाठी, शेतामध्ये, युध्दामध्ये तसेच नेमबाजीच्या खेळाच्या स्पर्धेमध्ये केला जातो. नेमबाजी करत असलेल्या व्यक्तीला नेमबाज (shooter) म्हणतात.
आम्ही दिलेल्या anjali bhagwat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर अंजली भागवत विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about anjali bhagwat in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि anjali bhagwat information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये anjali bhagwat shooting information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट