अनुप कुमार माहिती Anup Kumar Information in Marathi

anup kumar information in marathi अनुप कुमार माहिती, आपल्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आता नावारूपाला येत आहेत आणि सध्या प्रसिध्दी वाढणारा खेळ म्हणजे कब्बडी जो भारतभर पूर्वी शाळा आणि कॉलेजमध्ये मध्ये खेळला जायचा जो आता राष्ट्रीय पातळीवर खेळला जातो आणि या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू वेगवेगळ्या टीम मधून खेळ खेळतात आणि त्यामधील एक टीम मध्ये खेळणार कब्बडी खेळाडू म्हणजे अनुप कुमार आणि आज आपण या लेखामध्ये अनुप कुमार या खेळाडू विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

अनुप कुमार हे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कब्बडीपटू किंवा खेळाडू होते आणि त्यांनी या खेळामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांना या खेळामधील बादशाह म्हणून देखील ओळखले जाते. अनुप कुमार यांचा जन्म भारतातील हरियाणा राज्यातील पालरा या गावामध्ये २० नोव्हेंबर १९८३ मध्ये झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव रणसिंग यादव आणि आईचे नाव बल्लो देवी असे होते.

त्यांनी व्यावसायिक खेळामध्ये २००६ मध्ये दक्षिण आशियाई खेळामधून पदार्पण केले आणि त्यांनी प्रो कब्बडी मध्ये पहिले १ ते ५ सीजन यु मुंबा मध्ये खेळले आणि नंतर सहावा सीजन हा त्यांनी जयपूर पिंक पँथर सोबत खेळले आणि ते खेळामध्ये चांगल्याप्रकारे छापा टाकण्यासाठी ओळखले जातात.

anup kumar information in marathi
anup kumar information in marathi

अनुप कुमार माहिती – Anup Kumar Information in Marathi

नावअनुप कुमार
ओळखकब्बडी खेळाडू
जन्म२० नोव्हेंबर १९८३
जन्म ठिकाणहरियाणा राज्यातील पालरा या गावामध्ये
वडील आणि आईचे नावरणसिंग यादव आणि बल्लो देवी
पदार्पण२००६ मध्ये दक्षिण आशियाई खेळामधून
प्रशिक्षकअमरसिंग यादव

अनुप कुमार यांचे प्रारंभिक जीवन – anup kumar information in marathi wikipedia

अनुप कुमार यांचा जन्म २० नोव्हेंबर १९८३ मध्ये हरियाणा राज्यातील पालारा या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव रणसिंग यादव आणि आईचे नाव बल्लो देवी असे होते. अनुप कुमार यांचे वडील भारतीय लष्करामध्ये सुभेदार मेजर होते आणि त्यांची आई गृहिणी होती.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये म्हणजेच पलारामध्ये केले आणि त्यांनी त्यांनी त्यांचे मुलभूत शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००५ मध्ये सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून हजार झाले आणि त्यांनी कब्बडी हा खेळ करियरचा भाग म्हणून कधीच केला नव्हता. त्यांनी पुढे अमरसिंग यादव यांच्याकडू कब्बडी या खेळाचे प्रशिक्षन घेतले आणि त्यांनी कब्बडी या खेळामध्ये २००६ मध्ये पदार्पण केले.   

अनुप कुमार यांची खेळामधील कारकीर्द

अनुप कुमार यांना २००५ मध्ये कॅम्प कॉल आला आणि ज्याठिकाणी त्यांना अनेक संधी दिल्याबद्दल अमरसिंग यादव यांचे आभार मानण्यात आले आणि कॅम्प मध्ये अनुप कुमार यांची अंगभूत प्रतिमा सर्वांना दिसून आली. त्यांनी २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय कब्बडी खेळामध्ये पहिले पाऊल टाकले आणि त्यांनी त्यांची प्रथम कामगिरी श्रीलंकेतील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये केली.

सन २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा झाली आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून सुवर्ण पदक जिंकले आणि येथूनच त्यांच्या सुवर्ण पदार्पणाला सुरुवात झाली. २०१० आणि २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवली आणि २०१४ मध्ये झालेल्या इंचॉन आशियाई खेळाच्या अंतिम फेरीमध्ये इराण विरुध्दच्या सामन्यामध्ये खूप जवळून स्पर्धा केली आणि भारतीय संघाने झुज देत आपला संघ आघाडीवर राहिला.

अश्या प्रकारे अनुप कुमारने खेळामध्ये चांगली कामगिरी केली आणि २०१६ मध्ये आणखीन एक सुवर्ण पदक जिंकले. तसेच ते भारतीय संघाचे कर्णधार देखील होते आणि त्यांनी भारतीय संघाला विश्वचषक देखील मिळवून दिले होते. त्यांनी प्रो कब्बडी मध्ये पहिले १ ते ५ सीजन यु मुंबा मध्ये खेळले आणि नंतर सहावा सीजन हा त्यांनी जयपूर पिंक पँथर सोबत खेळले आणि त्यांनी यु मुंबा या संघाचे कर्णधार पद देखील सांभाळले होते आणि ते खेळामध्ये चांगल्याप्रकारे छापा टाकण्यासाठी ओळखले जातात.

अनुप कुमार यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

 • अनुप कुमार यांचा जन्म भारतातील हरियाणा राज्यातील पालरा या गावामध्ये २० नोव्हेंबर १९८३ मध्ये झाला होता.
 • १९ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी कब्बडी या खेळामध्ये १५ वर्ष महत्वपूर्ण कामगिरी करून कब्बडी मधून निवृत्ती जाहीर केली.
 • अनुप कुमार यांनी व्हीवो प्रो कब्बडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सर्वाधिक स्कोअर बनवला होता ज्यामध्ये त्यांनी १६९ गुण मिळवले होते.
 • त्यांनी कब्बडी या खेळामध्ये २००६ मध्ये पदार्पण केले.
 • त्यांना लांबचा प्रवास करण्यासाठी खूप आवडतो.
 • प्रो कब्बडी लीगच्या पहिल्या सत्रामध्ये त्याने २०१४ चा सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार जिंकला होता.
 • अनुप कुमार या व्यावसायिक कब्बडी खेळाडूने २०१०, २०१४ आणि २०१६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
 • त्यांच्या फिटनेससाठी अनुप कुमार कोणतेही पूरक आहार घेत नाहीत तर ते नैसर्गिक आणि घरगुती जेवणाला प्राधान्य देतात आणि ते आपल्या आहारामध्ये भरपूर ड्रायफ्रूट आणि दुध घेतात.
 • त्यांनी प्रो कब्बडी मध्ये पहिले १ ते ५ सीजन यु मुंबा मध्ये खेळले आणि नंतर सहावा सीजन हा त्यांनी जयपूर पिंक पँथर सोबत खेळले.
 • त्यांनी त्यांच्या कब्बडी खेळाच्या कारकीर्दीमध्ये एकूण ९१ सामने खेळले आणि त्यांनी १३४८ छापे टाकले आहेत.

त्यांनी भारतीय संघासाठी कर्णधार पदभार देखील सांभाळला आणि त्यांनी विश्वचषक देखील जिंकले तसेच त्यांनी प्रो कब्बडी खेळामध्ये यु मुंबासाठी देखील कर्णधार पद सांभाळले आणि त्यांनी ५ वर्ष यु मुंबा साठी खेळले.

अनुप कुमार यांना मिळालेले पुरस्कार – awards

अनुप कुमार हे कब्बडी खेळातील एक लोकप्रिय खेळाडू आहेत आणि त्यांनी २००६ मध्ये दक्षिण आशियाई खेळामधून कब्बडी या खेळामध्ये पदार्पण केले आहे आणि त्यांनी खेळामध्ये चांगले काम करून अनेक पदके आणि पुरस्कार आपल्या नावावर करून घेतले आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.

 • त्यांनी २००६, २०१० आणि २०१६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच २०१० आणि २०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्णपदक जिंकले होते.
 • २०१२ मध्ये त्यांना त्यांच्या कब्बडी खेळामधील मोलाच्या कामगिरीसाठी सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

FAQ

Q1. अनुप कुमार यांचा जन्म कुठे झाला?

हरियाणा राज्यातील पालरा या गावामध्ये झाला.

Q2. अनुप कुमारचे वय किती आहे?

३९ वर्षे त्यांचे वय आहे. (सन २०२३ पर्यंत)

Q3. अनुप कुमार कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?

प्रो कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे.

आम्ही दिलेल्या anup kumar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अनुप कुमार माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anup kumar information in marathi wikipedia या sanup kumar kabaddi information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि anup kumar kabaddi player information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!