आषाढी एकादशी निबंध मराठी Ashadhi Ekadashi Essay in Marathi

Ashadhi Ekadashi Essay in Marathi – Ashadi Ekadashi Speech in Marathi आषाढी एकादशी निबंध मराठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशी या व्रताला अनन्यसाधारण व विशेष असे महत्त्व आहे. खरंतर, संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणतः चौदा एकादशी येतात. पण, या चौदा एकादशींमध्ये येणाऱ्या आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला मात्र खूपच महत्त्व देण्यात आले आहे. मित्रांनो, यादिवशी सगळेजण एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतात. शिवाय, आषाढी एकादशीनंतर लागोपाठ येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.

खरंतर, कित्येक वर्षांआधी उत्पन्न झालेल्या पुराणांपासून आषाढी एकादशीला मानाचे स्थान देण्यात आले आहे. मित्रहो, आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय? हे आता आपण समजून घेऊया, तर मित्रांनो आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हटले जाते.

ashadhi ekadashi essay in marathi
ashadhi ekadashi essay in marathi

आषाढी एकादशी निबंध मराठी – Ashadhi Ekadashi Essay in Marathi

आषाढी एकादशी निबंध मराठी

आपल्या देशात खासकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये आषाढी एकादशीला एक वेगळंच उच्च स्थान आणि महत्त्व देण्यात आलं आहे. आपल्याला माहीत आहे की, पंढरपूरची विठू माऊली ही अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, याठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. खरंतर, एक महिना आधीपासूनच विलक्षण आणि लोकप्रिय अशा या वारीची तयारी सुरू होते.

श्री. हरी विठ्ठलाचा नामघोष करत, अनेक वारकरी पंढरपूरला अगदी मनोभावाने आणि भक्तीभावाने पायी चालत येतात. एकंदरीत, आषाढी एकादशीचा भव्य वारी सोहळा हा सगळ्यांचे डोळे दिपवून टाकणारा असतो. पण मित्रांनो, आषाढी एकादशीचे नेमके महत्त्व काय असते? शिवाय, वारकरी यादिवशी इतकी मोठी वारी आणि ती पण इतक्या जल्लोषात का साजरी करतात? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात उपस्थित झाला असेल.

तर मित्रहो, आषाढी एकादशीच्या यादिवशी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा आपल्या महाराष्ट्रात पूर्वीपासून एक समज आहे. म्हणूनच, तर या एकादशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाय, पंढरपूर हे सर्व भक्तांचे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो; असेदेखील अनेक भक्तांचे म्हणणे आहे.

याखेरीज, वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर हे भक्तिस्थान अस्तित्वात आले असावे, असा इथल्या लोकांचा समज आहे. मित्रहो, अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर या भक्तिस्थानाचा उल्लेख केलेला, आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येतो.

याखेरीज, संत नामदेवांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे “आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी!” असा उल्लेख देखील आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये दिसून येतो. त्याचबरोबर, पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्रे आहेत, जी कधीही नाश पावणार नाहीत किंवा नष्ट होणार नाहीत असं सांगण्यात येते. यांमुळे सुद्धा आषाढी एकादशीला विशेष असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. 

दरवर्षी येणाऱ्या आषाढी एकादशीला अनेक वारकरी संप्रदाय आपापली वारी घेऊन पंढरपूर या ठिकाणी जातात. मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे वारीची ही परंपरा जवळजवळ आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे असे सांगण्यात येते.

तसेच, अगदी पूर्वीच्या काळी सुद्धा जेंव्हा अनेक वारकरी मंडळी आणि संतमहात्मे एकत्र यायचे, तेंव्हा त्यांतील प्रत्येकजण एकमेकांच्या चरणांवर मस्तक ठेऊन, एकमेकांबद्दल असणारा आदर व्यक्त करायचा. खरंतर, एखाद्या व्यक्तीच्या पायावर आपण स्वतःचे डोके ठेवले, तर त्याचा आपल्यालाचं लाभ होतो असा पूर्वीपासून एक समज होता.

त्यामुळे, अनेक ठिकाणी आजदेखील आपल्या घरातील अथवा गावांतील ज्येष्ठ लोकांच्या अथवा थोरामोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. मित्रहो, यामागची अजुन एक समजूत अशी की पायावर डोके ठेवल्याने दोन्हीं व्यक्तींचे तेज वाढते आणि अंगात असणारा मीपणा, अहंकार आणि ताठा कमी होतो.

तसेच, परमेश्वर हा चराचरात आहे ही भावना आपल्यामध्ये अधिक बळावते. पूर्वीच्या काळी अनेक व्यक्ती एकमेकांची भेट घेऊन आपापले अनुभव, कथा, रचना, अभंग अथवा भजने यांची देवाणघेवाण करत असतं. मित्रहो, तीच परंपरा आजदेखील कायम सुरू ठेवली आहे.

कार्तिकी ते आषाढी एकादशीपर्यंतच्या ‘व्यष्टी आणि समष्टी’ या साधनांचा एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीला योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी, आषाढी एकादशी या पवित्र दिवसाला सगळ्यांत जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.

यासोबतच मित्रहो, आषाढी एकादशी महात्म्य कथा म्हणजे नक्की काय आहे? या प्रश्नाबाबत प्रत्येकाला माहिती असायलाच हवी. आषाढी एकादशीला अनादी काळापासून इतकं महत्त्व का आहे, हे आपल्याला समजलं असेल. त्यामुळे, आता आपण आषाढी एकादशी महात्म्य कथा याबद्दल जाणून घेऊयात.

तर मित्रहो, आपल्याकडे पौराणिक तसेच ऐतिहासिक अशा पद्धतीच्या अनेक कथा सहजपणे उपलब्ध होतात. अगदी अशाच प्रकारची आषाढी एकादशीची देखील महात्म्य कथा आहे, ती पुढीलप्रमाणे; एकेकाळी भगवान शंकर प्रसन्न होतं असताना, त्यांनी आपल्या भक्ताला म्हणजे मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाला इतर कुणाकडूनही मरण न येता, केवळ एका स्त्रीच्या हातून मरण येईल असा वर दिला होता.

या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस भयंकर उन्मत्त झाला आणि आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकणार नाही असा त्याने आपल्या मनात अतिविश्वास निर्माण केला. अशा प्रकारचा अतिविश्वास अंगी बाळगून, मृदुमान्य राक्षस अनेक देवांवर स्वारी करू लागला. त्यामुळे, अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा सुरू केली.

परंतू, वर दिल्यामुळे स्वतः शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते. पण, त्यावेळी  देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले.

याखेरीज, या मंगलमय दिवशी तुफान असा पाऊस पडल्याने, सर्व देवतांना एकत्रितपणे स्नानही घडले. तर दुसरीकडे, मृदुमान्य राक्षसाच्या मृत्यूच्या भीतीने सगळे राक्षस गुहेत लपून राहिले, त्यामुळे यादिवशी सर्व राक्षसांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. मित्रांनो, सोन्याच्या पावलांनी उगम पावलेल्या या देवीचे नाव होते एकादशी.

म्हणूनच, यादिवशी एकादशीचा उपवास करण्याचा कायमस्वरूपी प्रघात पडला. यांखेरीज, शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती यादिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते, ती व्यक्ती सर्व प्रकारच्या पापांमधून  मुक्त होते असा समज आहे. शिवाय, सर्व व्यक्तींच्या  उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना खूप कामी येते असाही एक समज आहे.

तसेच, या  एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी उपवास करणाऱ्या संबंधित व्यक्तीने एकभुक्त राहायचे असते. शिवाय, एकादशीला पहाटे उठून, स्नान करून, देवघरातील सर्व देवांना तुळस वाहून विष्णूपूजन करायचे असते आणि संपूर्ण दिवस उपवास ठेवायचा असतो. त्याचबरोबर, या दिवशी रात्री हरिभजन करत जागरण करणे आपल्या सुखी आयुष्यासाठी शुभ  मानले जाते.

खरंतर मित्रांनो, आषाढी एकादशीचा लोकप्रिय दिवस हा विठ्ठल नामाचा जयघोष करत आणि संपूर्ण दिवस केवळ देवाचे नामस्मरण करत घालवायचा असतो. यादिवशी, पंढरपूरामध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष अगदी उत्साहाने आणि मोठमोठ्याने करत असतात.

आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीनंतर आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणो सोडायची एक प्रचलित पद्धत आहे. खरंतर, या दोन्हीं दिवशी विष्णू देवाची पूजा करून, देवासमोर अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीही व्यवस्थितरीत्या पार पाडण्यात येतो. याखेरीज, वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय आहे. परंतू, विठोबा देव हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो.

शिवाय, या वारकरी संप्रदायात वार्षिक आणि सहामाही अशा पद्धतीने वारी काढण्यात येते. तसेच, विशेष म्हणजे जर ही वारी पायी केली तर शारीरिक तप घडते असे म्हटले जाते. अशा प्रकारे, सर्व प्रकारच्या जातींच्या आणि धर्मांच्या लोकांना एकत्रितपणे वारीमध्ये सामील करून घेऊन, आषाढी एकादशीची वारी ही दरवर्षी अगदी आनंदाने पार पडते.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या ashadhi ekadashi essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

Ashadhi Ekadashi nibandh in Marathi मित्रानो तुमच्याकडे जर आषाढी एकादशी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ashadi ekadashi speech in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on ashadhi ekadashi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ashadi ekadashi marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!