बाबा आमटे यांची माहिती Baba Amte Information in Marathi

Baba Amte Information in Marathi बाबा आमटे यांची माहिती पद्मश्री पुरस्काराचे मानकरी एक जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे. डॉ बाबा आमटे यांच्या बद्दल आपण लहानपणी पुस्तकात वाचलं असेल. बाबा आमटे यांची जीवन कथा खरंच प्रत्येक पुस्तकात छापावी अशीच आहे. बाबा आमटे एक महान मानवतावादी समाज सेवक होते. त्यांची समाज सेवेमधील कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर भरपूर काम केलं त्यांनी कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून दिला कुष्ठरोग्यांना समाजाच्या दृष्ट नजरेतून बाहेर काढण्यासाठी मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून कुष्ठरोग्यांचा विचार करणं आणि उपचारासाठी वेगवेगळे उपक्रम राबवन त्यांनी गरजेचे समजलं.

कुष्ठरोग हा एक भयंकर आजार आहे परंतु प्रत्येकाने प्रत्येकाला समाजामध्ये एका समांतर दृष्टिकोनाने बघणं तितकंच गरजेचं आहे. हीच भावना बाबा आमटे यांनी लोकांपर्यंत कशी पोहोचवली हेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

baba amte information in marathi
baba amte information in marathi

बाबा आमटे यांची माहिती – Baba Amte Information in Marathi

नाव (Name)बाबा आमटे
जन्म (Birthday)२६ डिसेंबर १९१४
जन्मस्थान (Birthplace)महाराष्ट्र मध्ये वर्धा जिल्ह्यात
वडील (Father Name)देविदास आमटे
पत्नी (Wife Name)साधना आमटे
आईचे नाव (Mother Name)लक्ष्मिबाई आमटे
मुले (Childrens)प्रकाश आमटे आणि दुसरे म्हणजे विलास आमटे
मृत्यू (Death)९ फेब्रुवारी २००८

शिक्षण

बाबा आमटे यांना खरंतर डॉक्टर ची पदवी घ्यायची होती परंतु वडिलांचा निर्णयाचा आदर करून त्यांनी वकिलीच शिक्षण घेण्याचं ठरवलं. नागपूरच्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केलं. १९३४ मध्ये त्यांनी नागपूरच्या विद्यापीठातून बी.ए ची पदवी घेतली. १९३६ मध्ये एलएलबी ही पदवी घेतली.

बाकी पुढील वर्ष वकिली करत होते परंतु त्यांचं मन डॉक्टर बनण्याच त्यांना सांगत होतं. शेवटी त्यांनी डॉक्टरकीचा अभ्यास करायला सुरुवात केली. डॉक्टर बनण्यासाठी त्यांनी कुष्ठरोग आणि चिकित्से वरील अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि डॉक्टर ही पदवी संपादन केली.

वैयक्तिक आयुष्य

बाबा आमटे अशी ओळख असणारे महान समाजसेवक यांचे खरे नाव मुरलीधर देवीदास आमटे असे आहे. बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी एका श्रीमंत घरामध्ये झाला. लहानपणी मुरलीधर यांना बाबा असे नाव पडले. बालपण अगदी आरामात आणि सुखात गेलं. त्यांचे वडील एक जमीनदार होते.

त्यामुळे बाबा आमटे यांना हव्या त्या गोष्टी मिळायच्या त्या सोबतच बाबा एकमेव अपत्य होते. बाबांचं लहानपण एखाद्या राजा पेक्षा कमी नव्हतं त्यांच्याकडे अगदी लहान वयामध्ये खरी बंदूक होती ज्यांनी ते कधीकधी जंगलामध्ये शिकारही करायचे. बाबा आमटे यांचा जन्म वर्धा तला आहे त्यामुळे वर्धामध्ये गांधीजींचा सेवाग्राम आश्रम देखील होतं.

त्यामुळे गांधीजींची भेट झाल्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव बाबा आमटे यांच्यावर पडला त्यांच्यामध्ये देखील एक सामाजिक कार्याची जाण जी आधीपासूनच होती तिला एक वेगळं वळण मिळालं. बाबांनी स्वतःचे जीवन जरी आयुष्य आरामात काढलं असेल तरी त्यांच्यामध्ये गोरगरिबांसाठी काही करण्याची ताकद होती. तसेच त्यांनी घेतलेला अभ्यासाचा ज्ञानाचा वापर त्यांना करायचा होता.

साधना आमटे यांनी बाबांची जीवन साथी बनून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये खूपच आधार दिला आणि साथ दिली. बाबांना दोन अपत्य देखील आहेत प्रकाश आमटे आणि विकास आमटे. बाबा आमटे यांना त्यांच्या कार्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. १९७१ मध्ये ते पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले.

१९८६ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. असे अनेक महान पुरस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मिळाले आहेत.

राजकीय आयुष्य

बाबा आमटे यांनी कुष्ट रोगाबद्दल ची समाजाच्या मनात असलेली तुच्छ भावना काढून टाकण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्यांनी लोकांना कुष्ठ रोग होण्याची कारणं लक्षणं समजावून सांगून कुष्ट रोगाबद्दल लोकांना ज्ञान दिलं. समाजाच्या मध्ये कुष्ठरोग हा पापी लोकांना होतो किंवा कुष्ठरोग झालेली लोक पापी असतात असा समज होता.

जो काही लोक आजही पाळतात हा समज बाबा आमटे यांनी दूर करून समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाचा मानसिक आधार देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले. फक्त कुष्ठरोग्यांसाठी नाहीतर गरजू आणि गरीब लोकांसाठी तसेच मूखभदिरांसाठी, अंधांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा सुरु केल्या.

इतकंच नव्हे तर अपंग लोकांना त्यांनी व्यवसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःला आर्थिक रित्या स्वावलंबन करण्याच शिकवलं. इतकच नव्हे तर कुष्ठरोग्यांना शेतीचे प्रशिक्षण दिलं त्यांच्याद्वारे शेती द्वारे दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आणि कुटीरोद्योग या सगळ्या व्यवसायांचा देखील प्रशिक्षण दिलं.

भामरागड येथील आदिवासी यांच्या विकासासाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प राबवला. या प्रकल्पामध्ये बाबा आमटे यांनी आदिवासी यांना शेती बद्दल प्रशिक्षण दिलं हा प्रकल्प गेले पस्तीस वर्षांपासून त्यांचे पुत्र प्रकाश आमटे सांभाळत आहेत. बाबा आमटे यांनी आदिवासी जमातीसाठी देखील वेगवेगळे प्रकल्प राबवले आहेत.

बाबा आमटे यांनी स्वातंत्र्य आंदोलन चळवळीमध्ये देखील घेतला होता वंदे मातरम अशी घोषणा केल्यामुळे त्यांना २१ दिवसांचा तुरुंगवास देखील झाला होता सामाजिक कार्य सोबतच त्यांच्या देशाबद्दल देखील प्रेम होतं.

बाबा आमटे यांच्या मोठ्या मुलाचे नाव काय ?

बाबा आमटे यांना दोन मुलं आहेत एक प्रकाश आमटे आणि दुसरे म्हणजे विलास आमटे. प्रकाश आमटे हे डॉक्‍टर आहेत आणि विलास आमटे हे इंजिनियर आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांची बायको मंदाकिनी आमटे हे दोघं जणं बाबा आमटे यांनी सुरू केलेली आनंदवन आश्रम व महारोगी सेवा समिती त्याची काळजी घेत आहेत.

तसेच प्रकाश आमटे हे त्यांच्या पत्नी सोबत आदिवासी जमाती साठी मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांना मॅगसेसे रोमन पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

महारोगी सेवा समितीच्या किती उपशाखा आहेत ?

१९४९ मध्ये बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समिती ची स्थापना केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आनंदवन वरोरा येथे स्थापन केली आहे. अंध, अपंग, लाचार, कुष्ठरोगी, कर्णबधिर आदिवासी या सगळ्या लोकांना जीवनाचा खरा अर्थ कळावा आणि त्यांना समाजामध्ये ताठ मान करून वावरण्यासाठी बळ दिलं.

या घटकांसाठी बाबा आमटे एक प्रेरणा स्त्रोत ठरले आणि त्यांनी आनंदवन या आश्रमाची स्थापना केली. हेच आश्रम हीच सेवा पुढे नेण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर याचा विस्तार व्हावा म्हणून महारोगी सेवा समिती ची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेली ही महारोगी सेवा समिती आज वेगवेगळ्या भागांमध्ये पसरली असून तिच्या अनेक शाखा आणि उपशाखा अस्तित्वात आहेत.

बाबा आमटे यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल किती साली झाला ?

कुष्ठरोग हे नाव ऐकलं की लोक आज पण नाक मुरडतात याचं कारण असं की कुष्ठरोग हा महाभयंकर रोग आहे. आणि स्वातंत्र काळापूर्वी हा रोग खूप मोठ्या प्रमाणात पसरत होता आणि त्या वेळी या रोगावर जास्त उपचार देखील उपलब्ध नव्हते. एखाद्याला कुष्ठरोग झाला तर त्याच्या घरचे त्याला घराबाहेर काढायचे आणि समाज अशा व्यक्तीला वाळित टाकायचा.

एकदा बाबा आमटे रस्त्यावरून घरी जात होते तेव्हा त्यांनी पावसामध्ये भिजणारा एक कुष्ठरोगी रस्त्यामध्ये पाहिला आणि त्यांच्या अंगावर जणू शहारे आले आणि मनामध्ये अनेक प्रश्न येऊ लागले त्यावेळी बाबा आमटे यांची कुठलाही विचार न करता त्या कुष्ठरोग्याला उचलून घरी आणलं. त्याच क्षणी बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठरोग या रोगाचा अभ्यास करायला सुरुवात केली. 

कुष्ठरोग्यांना एक नवीन आशा देण्याचं ठरवलं. कुष्ठरोग झाला की आपलं जीवन संपत अशी भावना रोगांच्या मनात होती. ती भावना नष्ट करून टाकण्यासाठी बाबा आमटे यांनी खूप प्रयत्न केले आणि कुष्ठरोग्यांना मानसिक आधार दिला. ह्या कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी त्यांनी १९५२ मध्ये आनंदवन या आश्रमाची स्थापना केली.

आनंदवन – baba amte anandvan information in marathi

आनंदवन एक सेवाभावी संस्था आहे. जिथे कुष्ठरोग्यांना आसरा दिला जातो व त्यांच्यावरती उपचार केले जातात. त्यावेळी समाजामध्ये कुष्ठरोग हा मोठ्या प्रमाणावर पसरत होता आणि बऱ्याच लोकांना कुष्ठरोगाची लागण होत होती. कुष्ठरोग हा त्यावेळी आपण काहीतरी पाप केलं असेल म्हणून होतो अशी अंधश्रद्धा होती आणि या रोगावर त्यावेळी काही उपचार वगैरे देखील नव्हते.

कुष्ठरोग्यांना तुच्छ वागणूक मिळायची. त्यांच्या घरातले देखील त्यांना घराबाहेर काढायचे. अशावेळी बाबा आमटे यांनी अशा कुष्ठरोग्यांसाठी स्वतःची वेगळी संस्था स्थापन केली जिथे त्यांना कुष्ठरोग्यांवर उपचार करता येतील आणि त्यांना जीवनात एक नवीन आनंद देता येईल.

बाबा आमटे यांनी इसवीसन १९५२ मध्ये वरोड्या जवळ आनंदवन या आश्रमाची स्थापना केली. पुढे जाऊन २००८ पर्यंत हे आनंदवन १७६ हेक्टर पर्यंत असलं आणि या आनंद वनांमध्ये ३५०० कुष्ठरोग्यांवर उपचार केले जात होते.

आम्ही दिलेल्या baba amte full information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “बाबा आमटे” यांच्या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या baba amte marathi mahiti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dr prakash baba amte information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about baba amte in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!