बाळापूर किल्ला माहिती Balapur Fort Information in Marathi

Balapur Fort Information in Marathi बाळापूर किल्ला माहिती बाळापुर हा किल्ला अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्याच्या ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. इतिहासामध्ये असे सांगितले आहे कि हा किल्ला मुघल साम्राज्यातील औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहजादा अजमशहा याने इ. स. १७१२ मध्ये हा किल्ला बाळापुर येथे बांधायला सुरुवात केली होती त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम इ. स. १७५७ मध्ये नवाब इस्माईल खान याने पूर्ण केले. बाळापुर हा किल्ला दोन नद्या जेथे संगम पावतात ठिकाणी आहे आणि नद्यांची नावे माण आणि महिषी असे आहेत. बाळापुर हा किल्ला गजानन महाराजांच्या शेगाव या ठिकाणाहून १९ किलो मीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला २९ ऑगस्ट १९१२ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळालेली आहे.

balapur fort information in marathi
balapur fort information in marathi

बाळापूर किल्ला माहिती – Balapur Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावबाळापुर – balapur fort akola
स्थापना१७१२
संस्थापकशहजादा अजमशहा ( मुगल साम्राज्य )
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील अकोला ( विदर्भ ) जिल्ह्यातील बाळापुर या तालुक्यामध्ये आहे
बांधकाम शैलीइंडो इस्लामिक
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेतहशील कार्यालय, दर्गा, प्रवेशदार, मारुतीची मूर्ती, विहीर, ध्वजस्तंभ बुरुज, छत्री, वाडा, मशीद आणि बाला देवी मंदिर

बाळापुर किल्ल्याबद्दल माहिती – balapur fort akola information in marathi

बाळापुर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अकोला (विदर्भ) जिल्ह्यातील बाळापुर या तालुक्याच्या ठिकाणी हा किल्ला माण आणि महिषी नदीच्या संगम जेथे झाला आहे त्याठिकाणी हा किल्ला थोडा उंचीवर बांधला आहे. बाळापुर या किल्ल्याची बांधणीची शैली हि इंडो इस्लामिक असून हा किल्ला मुघलांच्या काळामध्ये बांधला आहे. हा किल्ला ३०० वर्ष जुना आहे आणि हा किल्ला अकोल्याच्या आक्रमणकर्त्यांपासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारण्यात आला आहे. या किल्ल्याचे बांधकाम इ. स. १७१२ मध्ये सुरु झाले होते आणि ते इ. स. १७५७ मध्ये पूर्ण झाले म्हणजेच हा किल्ला बांधण्यासाठी ४५ वर्ष लागली आणि बाळापुर हा किल्ला ३३ फुट उंचीवर बांधला आहे.

बाळापुर किल्ल्यामध्ये आपण पहिले तर दुहेरी बांधणीची भक्कम अशी तटबंदी बांधलेली आहे आणि या तटबंदीचं भिंतींची रुंदी ३ मीटर आहे आणि तटावर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत आणि तटबंदीच्या भिंतीलाचा ५ बुरुज आहेत. ह्या किल्ल्याचे प्रवेश दार पश्चिम- उत्तर दिशेला आहे. बाळापुर हा किल्ला शेगाव येथून १९ किलो मीटर आहे.

बाळापुर किल्ल्याचा इतिहास – Balapur fort History in marathi

बाळापुर हा किल्ला मुघल साम्राज्यातील औरंगजेबाचा दुसरा मुलगा शहजादा अजमशहा याने इ. स. १७१२ मध्ये हा किल्ला बाळापुर येथे बांधायला सुरुवात केली होती त्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम इ. स. १७५७ मध्ये नवाब इस्माईल खान ( अमरावतीचा नवाब ) याने पूर्ण केले हा किल्ला पूर्ण करण्यासाठी ४५ वर्ष लागली. त्याचबरोबर पुरंदरच्या तहामध्ये ठरल्या प्रमाणे संभाजी महाराजांना बाळापुर परगणा देण्यात आला होता.

किल्ल्याचे महत्वाचा इतिहास

ज्यावेळी पुरंदरची लढाई झाली त्यावेळी खूप सैनिक विनाकारण मारत असल्यामुळे त्यांनी पुरंदरचा तह करायचा ठरवला आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत त्यांनी तहाची बोलणी केली. या तहानंतर छत्रपती शिवाजी महारक आणि संभाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाला भेटण्यासाठी बोलावले पण अग्र्यामध्ये त्यांना कैद करून ठेवण्यात आले पण क्चात्राप्ती शिवाजी महाराज तेथून कसे बसे सुटून औरंगजेबासोबत नमतेपणा पत्करून तहाची बोलणी केली या बोलानीच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना सात हजाराची मनसबदारी देण्यात आली होती आणि या मनसबदारीमध्ये असणाऱ्या सैन्य खर्चासाठी औरंगजेबाने १५ लाख होनांची जहांगीर आणि खानदेश आणि वऱ्हाड हे भाग दिले होते आणि या वऱ्हाड भागामध्ये बाळापुर देखील होते.

बाळापुर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • प्रवेश दार :

बाळापुर किल्ल्याचे प्रवेश दार पश्चिम- उत्तर दिशेला आहे आणि या किल्ल्याचे प्रवेश दार हे लाकडी असून त्याला छोटासा दिंडी दरवाजा देखील आहे त्याचबरोबर या दरवाज्यावर आपल्याला घोडा आणि हत्ती या प्राण्यांचे नक्षीकाम केलेले पाहायला मिळेल दरवाज्याच्या आतमध्ये आल्यानंतर दरवाज्याला लागून असणाऱ्या तटबंदीला पायऱ्या आहेत त्यावरून वरती चढून गेल्यानंतर दरवाज्यावर केलेले नक्षीकाम अगदी जवळून पाहता येईल. या किल्ल्याचे प्रवेशदार इतके उंच आहे त्यामधून हत्ती देखील सहज जावू शकतील.

  • विहीर :

दरवाज्यातून आत किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर एक कोरडी विहीर पाहायला मिळते. त्या विहिरीवर एक सुंदर पोत तयार केलेली दिसते जी विटांनी बनवलेली आहे आणि हि पोत १५ फुट उंच आहे.

  • वाडा :

विहिरी जवळ असणाऱ्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर पडलेल्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.

  • मारुतीची मूर्ती :

बाळापुर या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर आपल्यला एक शेंदूर लावलेली मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.

  • ध्वजस्तंभ :

ध्वजस्तंभ हा आपल्यला प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळतो कारण किल्ल्यावर ज्याचे वर्चस्व आहेत त्याचा ध्वज फडकवण्यासाठी ध्वजस्तंभाचा वापर करता. आपल्यला या किल्ल्यावर महिषी नदीकडे असणाऱ्या बुरुजावर ध्वजस्तंभ पाहायला मिळतो.

  • तहशील कार्यालय :

या किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दारातून आत गेल्यानंतर समोरच एक भव्य इमारत पाहायला मिळते आणि टी इमारत म्हणजे तहशील कार्यालय. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज ह्या इमारतीचा वापर कैद खाणा म्हणून केला जात होता.

  • दर्गा :

या किल्ल्यावर कार्यालाच्या पाठीमागच्या उजव्या बाजूला एक दर्गा पाहायला मिळतो.

  • छत्री :

शहराच्या दक्षिणेस महिषी नदीच्या काठावर आपल्यला मोगलांचे सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेले छत्रीचे शिल्प पाहायला मिळते. मिर्झाराजे जयसिंग याने बांधलेली हि छत्री आपल्यला किल्ल्याच्या बाहेरील भागात पाहायला मिळते.

  • किल्ल्याच्या आवारातील ठिकाणे :

किल्ल्याच्या आवारामध्ये बाला देवीचे मंदिर आणि मशीद आहे.

बाळापूर किल्ला फोटो:

balapur fort akola
balapur fort akola

बाळापुर किल्ल्यावर कसे जायचे ? 

  • बाळापुर किल्ला पाहायला जाण्यासाठी आपल्यला शेगाव रेल्वे स्टेशनाला उतरावे लागते आणि शेगाव पासून बस पकडून बाळापुर गावामध्ये जावे लागते. शेगाव ते बाळापुर मधील अंतर १९ किलो मीटर आहे
  • जर तुम्हाला बसने यायचे असेल तर शेगाव बस आपल्यला कोणत्याही मुख्य शहरामध्ये मिळू शकते आणि शेगाव मधुन टॅक्सी किवा स्थानिक बस पकडून आपण बाळापुर गावामधील बस स्थानकावर येवू शकतो. बस स्थानकापासून हा किल्ला १० मिनिटाच्या अंतरावर आहे.

टीप :

  • बाळापुर हा किल्ला पाहण्यासाठी २ ते ३ तास लागतात.
  • किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.
  • या किल्ल्यावर खाण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि राहण्याची सोय नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, बाळापुर किल्ला balapur fort information in marathi wikipedia हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. raigad information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about balapur fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही बाळापुर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या balapur killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही balapur fort akola information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!