सिंधुदुर्ग किल्ला माहिती Sindhudurg Fort Information in Marathi

Sindhudurg Fort Information in Marathi सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती सागरी मार्गातील शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूला परतवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांची किवा जलदुर्गाची निर्मिती करणे आवश्यक आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली त्यामधील एक म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अरबी समुद्रामध्ये कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याला शिवलंका सिंधुदुर्ग किल्ला म्हणून संबोधले जाते.

सिंधुदुर्ग हा किल्ला बनवण्याचे मुख्य कारण भारतामध्ये वाढत असलेल्या विदेशी व्यापाराची संख्या (डच, पोर्तुगाल, जंजीर सिद्दी, मुंबईचे इंग्रज) आणि त्यांचा भारतीय बाजारपेठेवर वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती तसेच या किल्ल्याच्या अवतीभोवती मोठमोठे टोकदार खडक आणि उथळ पाण्याचा समुद्र असल्यामुळे समुद्री शत्रूंना पायबंद घालणे सोपे झाले. या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात इ. स. १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी केली होती.

 sindhudurg fort information in marathi
sindhudurg fort information in marathi
अनुक्रमणिका hide

सिंधुदुर्ग किल्ला माहिती – Sindhudurg Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावसिंधुदुर्ग किल्ला
प्रकारजलदुर्ग
ठिकाणसिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरा जवळ १.६० किलो मीटर अंतरावर.
बेटकुरटे
संथापकछत्रपती शिवाजी महाराज
स्थापनाइ. स. १६६४
एकूण क्षेत्रफळ४५ एकर

या किल्ल्याचे बांधकामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये असणाऱ्या पोर्तुगीजांकडून काही कारागीर मागवून घेतले होते. सिंधूदुर्ग या किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्वाचे स्थान होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे मालवण जवळील अरबी समुद्रात कुरटे बेटावर असणार सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती – information about sindhudurg fort in marathi

इ. स. १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी आज्ञा दिली. सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या (हा किल्ला मालवण बंदरापासून १.६० किलो मीटर अंतरावर आहे ) अरबी समुद्रामध्ये हा किल्ला कुरटे या बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याचे तटबंदीच्या भिंतीची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली होती.

ह्या किल्ल्याचे बांधकाम ३ वर्षाच्या कालावधी मध्ये पूर्ण झाले आणि असे म्हणतात कि हा किल्ला उभारण्यासाठी १ कोटी होन (होन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक चलन होते) खर्च झाले होते. हा किल्ला अरबी समुद्रातील काळभिन्न खडक असणारे कुरटे बेटावर ४५ एकर क्षेत्रफळा वर विस्तारलेला आहे त्याचबरोबर हा किल्ला बांधण्यासाठी त्यावेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून एकूण १०० आर्किटेक्ट आणि ३००० कामगार मागितले होते.

या किल्ल्यावर एकूण ५२ बुरुज उभारण्यात आले आहेत त्याचबरोबर किल्ल्याच्या सुरक्षेसाठी जे किल्ल्याभोवती तट बांधले होते त्या भिंतींची उंची साधारण ३० फुट आणि १२ फुट रुंद अशी भक्कम तटबंदी बांधली होती. या किल्ल्यावरची पाण्याची विशेषता म्हणजे या किल्ल्याच्या सर्व बाजूने जरी खाऱ्या पाण्याचा समुद्र जरी असला तरी या किल्ल्यावर आपल्याला गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतील आणि या विहिरीची वेगवेगळी नावे देखील आहेत ती म्हणजे दुध बाव, दही बाव आणि साखर बाव. 

या किल्ल्यावर ४५ दगडी आणि मजबूत जिने आहेत त्याच बरोबर या किल्ल्याची आणखी एक विशेषता म्हणजे या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींमध्ये ३५ ते ४० शौचालय बांधलेली आहेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज देखील स्वछतेविषयी जागरूक होते. या किल्ल्यावर वेगेवगळ्या ठिकाणी तोफा ठ्वाण्यासाठी जागा करण्यात आल्या आहेत तसेच किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदी भिंतींना छोटी छोटी छिद्रे पाडण्यात आली आहेत त्यामधून बंदुकीने पूर्वी हल्ला केला जायचा.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास – Sindhudurg Fort History in Marathi

हा किल्ला इ. स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आहे. हा किल्ला बनवण्याच मुख्य उद्देश किनाऱ्यावर वसलेल्या मराठी लोकांचे संरक्षण, समुद्री युध्द तसेच समुद्री मार्गातून येणाऱ्या विदेशी व्यापाऱ्यांसाठी हा किल्ला सुमुद्र किनार्यावर बांधला होता.

सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य उद्देश

  • साम्राज्य स्थापन करण्यासाठी
  • सागरी मार्गातून होणारे शत्रूचे हल्ले रोखण्यासाठी.ताब्यात
  • कर वसूल करण्यासाठी ( कारण पूर्वीच्या काळी विदेशी व्यापारी आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी समुद्रमार्गेच येत होते. )
  • भविष्यातील सुरक्षा लक्षात घेवून हा किल्ला बांधण्यात आला.
  • नक्की वाचा: जंजिरा किल्ल्याची माहिती

इतिहास : १६०० च्या काळात ब्रिटीश आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र किनाऱ्यावरील भाग आपल्या घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी हा किनारपट्टी जवळील प्रांत सुरक्षित करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला आणि १६६४ मध्ये बांधकाम सुरु झाले. या किल्ल्यामध्ये बर्याच लढाया झाल्या तरीही हा किल्ला मराठी साम्राजाकडे बरेच वर्ष राहिला त्यानंतर तो १७६५  मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. आता हा किल्ला आता भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आहे.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर :

इ. स. १६९५ मध्ये शिवाजी महारांजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेले आहे. या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ १३ मीटर बाय ७ मीटर आहे आणि हे मंदिर लक्षणीय आहे. हे मंदिर आज देखील आपण किल्ल्यावर पाहू शकतो.

  • ठसे :

आपण किल्यामध्ये प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर महाद्वाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीवर आपल्याला दोन दिवळ्या पाहायला मिळतात त्यामधील एका दिवळीमध्ये शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा ठसा आणि दुसऱ्या दिवळीमध्ये शिवाजी उजव्या हाताचा ठसा आहे असे म्हटले जाते. हे देखील आपल्याला किल्ल्यावर गेल्यानंतर पाहायल मिळेल.

  • सभागृह :

शिवज महाराजांच्या मंदिराच्या थोडे पुढे गेले कि आपल्याला एक सभागृह पाहायला मिळते जे जी कोल्हापूर मधील शाहू महाराजांनी १९०७ मध्ये बांधले आहे.

  • गोड्या पाण्याच्या विहिरी :

जरी किल्ल्याच्या भोवती खाऱ्या पाण्याचा समुद्र असला तरी आपल्याला किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतील आणि या विहिरींना त्या काळी नावे देण्यात आली होती. या विहिरींना दही बाव, दुध बाव आणि साखर बाव अशी खूप चं नावे देण्यात आली होती.

  • किल्ल्यावरील इतर मंदिरे :

सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला इतर छोटी मोठी मंदिरे पाहायला मिळतात ती म्हणजे द्वार रक्षक हनुमंत, महादेव, महापुरुष, भगवती देवी या देवांची मंदिरे या किल्ल्यावर आहेत.

  • बुरुज :

या किल्ल्यावर एकूण ५२ बुरुज आहेत आणि पूर्वीच्या काळी शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बुरुज बांधले जायचे आणि बुरुज अजूनही तेथे आपल्याला पाहायला मिळतात. आपण या बुरुजांवर जावून आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्याचा आणि समुद्रातील पाण्याची सुंदरता पाहू शकता.

  • दुर्गाचा दरवाजा :

दुर्गाचा दरवाजा म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार जे उंबराच्या लाकडापासून बनवलेला आहे. उंबराच्या लाकडाचा वापर करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे उंबराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते आणि त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे हा दरवाजा आपल्याला बाहेरून सहसा दिसत नाही. दुर्गाचा दरवाजा आपल्याला किल्ल्यावर गेल्यानंतर पहिल्यांदा पाहायला मिळतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर दर्शनीय स्थळे जी किल्ल्यापासून अंतरावर आहेत

  • सुनामी बेट :

हे ठिकाण किल्ल्यापासून अर्धा किलो मीटर आहे आणि या भागातील समुद्र शांत असल्यामुळे येथे आपल्याला जेट स्की, कायक रायडर, स्पीड बोट, वाटर स्कूटर आणि बम्पर बोटचा आनंद घेता येतो.

  • तारकर्ली बीच :

तारकर्ली बीच हा किल्ल्यापासून १० किलो मीटर लांब आहे. हा कोकणातील एक सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखला जातो. याठिकाणी आपल्याला सूर्यास्ताची खूप मोहक आणि आश्चर्यकारक दृष्ये पाहायला मिळतात.

  • मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य :

आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती तसेच इतर सागरी वन्यजीव पाहायला मिळतात.

  • इतर बीच :

तलाशील टोंडावली बीच , निवती बीच आणि देवबाग बीच यासारखी ठिकाणे देखील पाहायला मिळतात.

  • कराली बॅकवॉटर्स :

कराली बॅकवॉटर्स हे ठिकाण किल्ल्यापासून २.२ किलो मीटर आहे. कराली बॅकवॉटर्स या ठिकाणी आपण बोट चालवण्याचा आनंद घेवू शकतो. या ठिकाणी कराली नदी अरबी समुद्राला येवून मिळते.

सिंधुदुर्ग किल्ला फोटो:

 sindhudurg fort information in marathi
sindhudurg fort information in marathi

सिंधुदुर्ग किल्ल्यावर कसे जावे 

जर तुम्ही पुण्याहून किवा मुंबईहून सिंधदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाणार असाल तर

रेल्वेमार्गे : जर तुम्हाला पुण्यातून रेल्वेमार्गे जायचे असेल तर पुण्यातून मांडवी एक्स्प्रेस सिंधुदुर्गला जाते.

विमान : जर तुम्हाला विमानाने सिंधुदुर्गला जायचे असेल तर गोयरे फळाईट गोव्याला जाते आणि तेथून तुम्ही टॅक्सीने किल्ल्यापर्यंत जावू शकता.

रस्त्याने : पुण्याहून बसने येण्यासाठी या मार्गावत थेट बस नाहीत त्यामुळे तुम्हाला पुण्यातून कणकवलीला यावे लागते आणि तेथून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी टॅक्सी पकडावी लागते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, सिंधुदुर्ग किल्ला sindhudurg fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत.
sindhudurg information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information on sindhudurg fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सिंधुदुर्ग किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या sindhudurg killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही sindhudurg in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “सिंधुदुर्ग किल्ला माहिती Sindhudurg Fort Information in Marathi”

  1. हा किल्ला मुलांना , दिवाळी मध्ये बनवायचा आहे ! माझ्या संस्कार वर्गातील मुले आहेत . किल्ला भव्य बनवायचा आहे ! नेमका कसा करायचा ? आपले मार्गदर्शन मोलाचे ठरेल ! ही माहिती कृपया मला व्हॉट्सॲप वर पाठवा .

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!