केळीच्या झाडाची माहिती Banana Tree Information in Marathi

Banana Tree Information in Marathi केळीच्या झाडाची माहिती सर्वाना परिचित असलेले, जवळ जवळ सगळ्यांना आवडणारे, तसेच १२ महिने उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळी. केळीतून शरीराला पोषक घटक मिळतात तसेच भारतीय संस्कृतीमध्ये केळीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. केळीचे झाड हे मूळ दक्षिण पूर्व आशिया मधील असून त्याचे शास्त्रीय नाव मुसा इंडिका असे आहे. केळीच्या झाडाची उंची २-८ मीटर पर्यंत असते. केळीची पाने सरळ खोडातून येऊन ती  गुळगुळीत, लांबट व खोडापाशी निमुळती आणि रुंदीला मोठ्या पात्यांची आयताकृती अशी असतात.

banana tree information in marathi
banana tree information in marathi

केळीच्या झाडाची माहिती – Banana Tree Information in Marathi

नावकेळी
वैज्ञानिक नावMusa indica (मुसा इंडिका )
इंग्रजी नाव Banana
पिक कालावधी १२ महिने

वर्णन

केळीच्या झाडाची उंची २-८ मीटर पर्यंत असते. केळीची पाने सरळ खोडातून येऊन ती  गुळगुळीत, लांबट व खोडापाशी निमुळती आणि रुंदीला मोठ्या पात्यांची आयताकृती अशी असतात. साधारणतः साडेतीन ते चार मीटर इतकी लांब असू शकतात. केळीचा फुलोरा हा जांभळ्या रंगाचा असतो याची फुले देठाच्या बाजूने दिसतात, लोंबत्या केळफुलाच्या म्हणजेच फुलोऱ्याच्या तळाशी मादी-फुले आणि वरच्या टोकाला नर-फुले असतात.

या फुलोऱ्याची सह्पत्रे(पाकळ्या) एकामागे एक गळून पडणारी असतात. केळीला येणारी फळे हि घडामध्ये येतात. याला लोंगर असे म्हणतात. एका घडामध्ये साधारणतः १० फण्या असतात. या प्रत्येक फण्यात साधारणतः १६-१८ केळी असतात. सुरुवातीला हि लांबट आणि आखूड देठाची हिरवी केळी असतात. आणि पिकल्यावर यांचा कलर पिवळा होतो.

केळी लागवड माहिती

केळीच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर व्यापारी दृष्टीने महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. जागतिक उत्पादनापैकी २०% केळी उत्पादन भारतात होते तर भारतातील एकूण उत्पादनापैकी ५०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व यावल हे तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहेत.

भारतात अंदाजे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळीची लागवड कंदांपासून केली जाते. कंदांपासून निघणाऱ्या धुमाऱ्यापासून वातवीय आभासी खोड तयार होते.

  • हवामान : केळी हे उष्ण कटिबंधीय प्रदेशात येणारे पिक असल्यामुळे याच्या उत्तम वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी १०-४०० से. तापमान असणे गरजेचे आहे.
  • जमीन : केळी लागवड करण्यासाठी भुसभुसीत, मध्यम ते भारी प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी, पोयटायुक्त, भरपूर सेंद्रिय कर्ब असलेली जमीन असावी. जमिनीची खोली ६० से.मी. पर्यंत असावी. आणि जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ दरम्यान असावा. क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये.
  • केळीचे वाण : महराष्ट्रात प्रामुख्याने श्रीमंती आणि ग्रँड नैन या वाणांची लागवड केळी जाते.
  • केळीची लागवड जून-जुलै आणि ऑक्टोबर- नोव्हेंबर हे दोन प्रमुख मोसम आहेत. केळीच्या झाडास योग्य सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दोन ओळींचे अंतर १.५ मी बाय १.५ मी ठेवावे. हेक्टर ला ४,४४४ झाडे लावता येतात.
  • कंद निवड : केळी लागवडीसाठी कंद निरोगी आणि जातिवंत निवडावे. कंद पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झालेले कंद वापरू नयेत.
  • लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंदाचा आकार आणि वजन योग्य म्हणजे ४५० ते ७५० gm आणि वय ३ ते ४ महिने असणे महत्वाचे आहे.
  • कंद उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदावर ३ ते ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावेत.
  • कंद लागवडीसाठी १०० लिटर पाण्यात १०० gm कार्बेन्डॅझिम आणि १५० gm एसिफेट मिसळून यामध्ये कंद ३०-४० मिनिटे बुडवावेत.
  • खत व्यवस्थापन : केळीच्या योग्य वाढीसाठी योग्य प्रमाणात खत लागवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय खत, जैविक खत, निंबोळी पेंड आणि रासायनिक खते योग्य मात्रेत द्यावीत. केळीच्या अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचन(फर्टीगेशन) अत्यंत उपयुक्त असून यामधून नत्र व पालाशयुक्त खतांची ७५ टक्के मात्रा द्यावी.
  • केळीची शेती करण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात लागते. केळी पिकास एकूण १८०० ते २२०० मि.मी. पाणी लागते.

केळी झाडाचे प्रकार / जाती  

  • केळीच्या झाडाचे भरपूर प्रकार आहेत. परंतु त्यातील फारच थोड्या जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. केळीच्या ३०-४० जाती असून त्यांना निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी नावे आहेत.
  • भारतामध्ये ज्यांची पिकलेली केळी तशीच खाण्यासाठी वापरतात अशा काही जातींची नावे : बसराई, हरी साल, लाल वेलची, सफेत वेलची, मुठेळी, वाल्हा, राजेळी, लाल केळ.
  • ज्यांची केळी शिजवून किंवा तळून खातात अशा जातींची नावे : राजेळी, बनकेळ.
  • पानांच्या उपयोगाच्या व शोभेच्या जातीची नावे : रानकेळ(म्युझा कॉक्सिनिया).
  • नक्की वाचा: कडुलिंब झाडाची माहिती 

केळी झाडाचे उपयोग

  • हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक कार्यात केळीच्या झाडांना खूप महत्त्व दिले जाते. केळीच्या खांबाना म्हणजे खोडाला शुभसूचक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वाराच्या दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते.
  • पूर्वीपासून केळी फळाचा मुख्य उपयोग खाण्यासाठी केला जातो.
  • केळीपासून केळीची वेफर्स, केळीचा जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीची प्युरी, सुकेळी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रॅन्डी, शिरका, केळी बिस्कीट असे कितीतरी पदार्थ बनवले जातात.
  • कच्च्या केळीची भाजी पूर्वीपासूनच बनवतात.
  • केळीच्या झाडाच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. यामुळे पानात असलेले पोषक तत्वे अन्नात मिसळतात जे शरीरासाठी योग्य असतात. यामुळे आपल्या शरीरावर खाज, डाग, पुरळफोड अशा समस्या दूर होतात.
  • केळी हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि याचा वापर नेहमी आहारात समावेश केल्यास आपले आरोग्य चांगले राहते. कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी, स्टार्च तसेच अँटिऑक्सिडंटस् असतात.
  • केळीच्या वाळलेल्या पानांचा उपयोग आच्छादनासाठी करतात. तसेच वाळलेली पाने इंधन म्हणून वापरता येते.
  • केळीच्या खोडाचे व कंदांचे तुकडे करून त्याचा जनावरांचा चारा म्हणून उपयोग केला जातो.
  • केळीच्या सुकलेल्या पानांचा उपयोग फुले, विड्याची पाने भाजीची पेंडी बांधण्यासाठी व दोऱ्यासारखा करतात.

केळी झाडाचे fact

  • केळीचे शास्त्रीय नाव मुसा इंडिका (Musa Indica) असे आहे.
  • केळीच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला नंबर लागतो.
  • कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी, स्टार्च तसेच अँटिऑक्सिडंटस् असतात.
  • पिकलेल्या केळीमध्ये अ आणि क जीवनसत्वे असतात.
  • भारतात अंदाजे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे.
  • केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिकरीत्या अँटिऑक्सिडंटस् म्हणून काम करतो व रोगप्रतिकारक्षमता वाढवतो.
  • केळीच्या पानांचा उपयोग जेवण जेवण्यासाठी केला जातो.
  • नक्की वाचा: झाडांची माहिती 

केळी झाडाचे पान – Banana Leaves Information in Marathi

  • हिंदू संस्कृतीमध्ये देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केळीच्या पानांचा वापर केला जातो.
  • भारतीय संस्कृती हि निसर्गपूजक आहे. यामागे निसर्गरक्षणाचा विचार आहे तसेच यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत. त्यातून केवळ परंपरा म्हणून नव्हे तर प्रत्येक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी हा नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळतो.
  • केळीच्या पानांवर जेवण जेवणे यामागेही एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीचे पान आकाराने मोठे, लवचिक, तंतुमय आणि सहज उपलब्ध या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीच पान वापरण्याची प्रथा जवळजवळ संपूर्ण भारतात विशेषतः दक्षिण भारतात आढळते. यामुळे केळीच्या पानात असलेले पोषक तत्वे अन्नात मिसळतात जे शरीरासाठी उपयुक्त असतात. यामुळे आपल्या शरीरावर खाज, डाग, पुरळफोड अशा समस्या दूर होतात. तसेच जेवून झाल्यावर केळीची पाने जनावरांना घातली जातात.
  • केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत भारताखेरीज इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशामध्येही आढळते.
  • केळीची पाने हि विघटनशील आहेत त्यामुळे ती पर्यावरणपूरक आहेत.
  • केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिकरीत्या अँटिऑक्सिडंटस् म्हणून काम करतो व रोगप्रतिकारक्षमता वाढवतो.
  • तसेच काही अन्नपदार्थ शिजवताना केळीची पाने तळाशी घालण्याची पद्धत आहे, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास लागतो.
  • शेतकऱ्यांना शहरांमध्ये केळीची पाने विकणे म्हणजे उदरनिर्वाहाच चांगले साधन आहे.

आम्ही दिलेल्या banana tree information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “केळीचे झाड” बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of banana tree in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये banana leaves information in marathi Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about banana tree in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!