कडुलिंब झाडाची माहिती Neem Tree Information in Marathi

Neem Tree Information in Marathi कडुलिंबाच्या झाडाचे फायदे व माहिती आपल्या आजूबाजूच्या परिसरात कडुलिंब हा नैसर्गिकरीत्या उगवणारा मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा वृक्ष आहे. हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळतो. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये कडूलिंबाला ‘सर्वरोग निवारण’ म्हणून ओळखले जाते. चवीला अतिशय कडवट असणारा कडुलिंब neem in marathi हा आपल्या शरीर, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कडुलिंब हि एक रक्तशोधक औषधी वनस्पती आहे.

neem tree information in marathi
neem tree information in marathi

कडुलिंब झाडाची माहिती – Neem Tree Information in Marathi

नावकडुलिंब, निंब, लिंब, बाळंतलिंब  
शास्त्रीय नावAzadireactha indica
उंची३०-६० फुट
आयुष्यदीर्घायुष्य
औषधी घटक अँन्टी बॅक्टेरिअल, अँन्टी फंगल, अँन्टी ऑक्सिडेंट आणि अँन्टी व्हायरल

कडुलिंब झाडाचे वर्णन

neem tree information in marathi कडुलिंबाचे झाड आकाराने मोठे, साधारण ३०-६० फुट (आठ ते दहा मीटर) उंच वाढणारा सदा हरित वृक्ष छायादार आहे. याचे खोड सरळ वाढते, नंतर याला लांब फांद्या फुटतात. या झाडाची साल काळी व खरबरीत असते. याला साधारणतः ९-१५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची मध्यम आकाराची २-३ सेमी लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९-१५ पाने येतात.

पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या सुरु होतात. कडुलिंबाला पांढरी लहान व सुगंधित फुले येतात. आणि फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. या फळात प्रत्येकी एक बी असते. त्या बियांना निंबोळी किवा लिंबोणी असे म्हणतात.

कडूलिंबाचा रस प्यायल्याने काय होते?

  • कडूलिंबाच्या रसामध्ये गुळ घालून प्यायल्यास पोटातील कृमी बाहेर पडतात.
  • अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किवा अंगोळीच्या गरम पाण्यास दहा-बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
  • कडुलिंबाची पाने, काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होतो. तसेच यामुळे बुद्धी तल्लख होते.
  • डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाचा रस दोन-दोन थेंब डोळ्यात टाकावा. यामुळे डोळ्यांचे विकार दुर होण्यास मदत होते.
  • कानात किडा गेला असेल तर कडुलिंबाच्या पानांचा रस कोमट करून त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून कानात थेंब सोडले असता किडा मरतो.

कडूलिंबाच्या पाण्याचे फायदे

  • आयुर्वेदात कडुलिंबाचे पाणी हे अनेक वेगवेगळ्या आजारांवर औषधी असल्याच सांगितल आहे.
  • कडुलिंब हे रक्त-शोधक औषध आहे. हे रक्तातील बॅड कोलेस्टेरोल कमी करण्यास मदत करते.
  • कडुलिंबाचे पाणी हे मलेरिया आणि कावीळ यासारख्या आजारांवर रामबाण उपाय आहे.लिंबामध्ये असणारा अॅन्टि बॅक्टिरिअल गुणधर्म मलेरियासाठी जबाबदार असणाऱ्या व्हायरसला नष्ट करून लिव्हर मजबूत करतात.
  • कावीळ झाल्यास लिंबाच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून त्याचे सेवन केल्यास कावीळ नष्ट होते.
  • कडुलिंबाच्या पाण्याने मसाज केल्यास कांजण्या आणि चिकन पॉक्सचे डाग नष्ट होतात.
  • कडुलिंबाचे पाणी गर्भावस्थेमध्ये प्यायल्याने त्यांना होणारा त्रास कमी होतो.
  • लिंबाचे पाणी हे नैसर्गिक पद्धतीने त्वचा उजळण्यास मदत करते. लिंबाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. तसेच मुरुमाच्या समस्या दूर होतात.
  • नक्की वाचा: तुळशीची माहिती 

कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे – कडुलिंबाच्या पानांची माहिती

  • कडुलिंबाची पाने खाण्याने अनेक फायदे आहेत. कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, पायरीया या समस्यांपासून आराम मिळतो. यामुळे हिरड्या आणि दात मजबूत होतात.
  • कडुलिंबाची पाने बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग नाहीशे करण्यास मदत होते.
  • डोळ्यांना सूज आली असेल तर कडुलिंबाच्या पानांचा उपयोग होऊ शकतो.
  • कडुलिंबाची पाने खाल्याने नैराश्य, उदासीनता कमी होण्यास मदत होते.
  • कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आपल्या पोटात बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
  • केसाच्या सौंदर्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा वापर केला जातो. कडुलिंबाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाद जोमाने होते.

कडुलिंबाच्या झाडाचे – fact

  • कडुलिंबाच्या झाडाला “सर्वरोग निवारण” असे म्हंटले जाते.
  • कडुलिंब हा नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहुउपयोगी झाड आहे.
  • कडुलिंबाला लिंबाच्या रंगाची छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याला कडुलिंब म्हणतात.
  • अँन्टी बॅक्टेरिअल, अँन्टी फंगल, अँन्टी ऑक्सिडेंट आणि अँन्टी व्हायरल असे महत्वाचे गुणधर्म कडुलिंबामध्ये असतात.
  • विटामिन ए, विटामिन सी, पोटॅशियम, केल्शियम, सोडियम, प्रोटीन, गंधक हि पौष्टिक तत्वे कडुलिंबामध्ये असतात.
  • कडुलिंबाची सावली थंड असते. या झाडाच्या सावलीतील घर उन्हाळ्यात थंड राहते.
  • नक्की वाचा: नारळाच्या झाडाची माहिती 

कडुलिंबाच्या झाडाची शेती

  • कडुलिंब हे झाड भारतीय उपखंडातील आहे. कडुलिंबाचे झाड हे भारत, थायलंड, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश मध्ये सर्वाधिक आढळते. परंतु आता याची लागवड इतर भागात देखील केली जाते.
  • कडुलिंबाचे झाड हे त्याच्या बियांपासून उगवते. साधारण ७५ ते ९० टक्के बिया रुजतात. कमी पावसाच्या भागातही हे झाड चांगले वाढते. ३ वर्षात ४-७ मीटर पर्यंत झाडाची वाढ होते.
  • अति पावसाच्या भागात हि झाडे चांगली वाढत नाहीत. कोकणात हि झाडे आढळत नाहीत. पाणथळ जागेवर कडुलिंब जगात नाही.
  • या झाडांना जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. या झाडाची मुळे चाळीस फुटापर्यंत खोल जातात.
  • या झाडाला तोडल्यानंतर मुळापासून फुटवे फुटतात.
  • नक्की वाचा: वडाच्या झाडाची माहिती 

कडुलिंबाच्या झाडाचे उपयोग / फायदे

  • कडुलिंब हे बहुउपयोगी असे झाड आहे. याच्या अनेक उपयोगामुळे या झाडाची तुलना ‘औषधी कल्पवृक्ष’ अशी केली जाते.
  • जंतुनाशक हा कडुलिंबाच्या झाडाचा प्रमुख गुणधर्म आहे. कडुलिंबाची झाडे ज्या भागात जास्त प्रमाणात असतात तिथे ओक्शिजनचे प्रमाण जास्त असते, तसेच तेथील हवा शुद्ध राहते.
  • भारतीय संस्कृतीमध्ये हि कडुलिंबाच्या झाडाला खूप महत्त्व दिले जाते. रोगप्रतिकार शक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यदायी जावे म्हणून मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडवाच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सैंधव मीठ, ओवा, गुळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.
  • माणसे, पशु- पक्षी या सर्वासाठी या झाडाचा उपयोग होतो. तसेच साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन, यामध्ये सुद्धा कडुलिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
  • कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे. याची कडूलिंबाची पाने, काड्या, साल, रस या सगळ्याचा अनेक आजारांवर औषध म्हणून वापर केला जातो. कडुलिंबाची पाने धान्यात घातल्याने धन्याला कीड किवा अळी लागत नाही.
  • कडुलिंबाच्या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. या तेलाचा वापर सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.
  • कडुलिंबापासून तेल काढून त्याचा उपयोग दिव्याचे इंधन म्हणूनही केला जातो.
  • लिंबाच्या झाडाचे लाकूड दर्जेदार मानला जाते. लिंबाच्या झाडाचे लाकडाचा वापर इमारतीसाठी व पेट्या वगैरे बनविण्यासाठी केला जातो.

आम्ही दिलेल्या neem tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कडुलिंबाच्या झाडाची अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या neem information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kadulimbache fayde Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about neem tree in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!