bank of maharashtra home loan information in marathi बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्ज योजना, बँक हे असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकतो किंवा मग आपल्याला जर पैशाची गरज असेल तर आपण बँकेतून कर्ज घेवू शकतो आणि तसेच बँका ह्या वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देतात जसे कि सोने तारण कर, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्जे, गृहकर्ज आणि व्यवसाय कर्ज अश्या वेगवेगळ्या प्रकारची कर्जे देतात परंतु आज आपण या लेखांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या गृहकर्ज योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्ज काय आहे, त्याचा व्याजदर काय आहे, फायदे आणि त्यांच्या योजना काय आहेत या विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.
गृहकर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे जे संपर्श्विक म्हणून ऑफर करून मालमत्ता खरेदी करण्यासाठी मिळवले जाते. जर आपल्याला स्वताच्या मालकीच्या जागेवर जर घर बांधायचे असल्यास जर आपल्याला आर्थिक मदत हवी असल्यास आपल्याला बँकेकडून नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा त्या स्वताच्या रिकाम्या जागेमध्ये घर बांधण्यासाठी कर्ज देते आणि त्यालाच गृहकर्ज म्हणून ओळखले जाते.
या प्रकारच्या कर्ज मंजुरीची प्रक्रिया हि इतर कर्ज प्रकारापैकी खूप वेगळी असते आणि गृहबांधणी कर्जासाठी अर्ज करताना सर्वात महत्वाचे कलम हे आहे कि प्लॉटची किंमत हि एका वर्षाच्या आत कर्जाच्या रकमेमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र हि बँक देखील लोकांना घर घेण्यासाठी किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी, घर बांधण्यासाठी जागा घेण्यासाठी आणि घराची डागडुजी करून घेण्यासाठी कर्जे देते.
बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे, जलद कर्ज प्रक्रिया, सानुकुलीत परतफेड पर्याय, आकर्षक व्याजदर साधे आणि त्रासमुक्त दस्ताऐवज या सारखे अनेक फायदे प्रधान करते. चला तर आता आपण खाली बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जाविषयी सविस्तर माहिती घेवूया.
बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्ज योजना – Bank of Maharashtra Home Loan Information in Marathi
कर्जाचे नाव | गृहकर्ज |
व्याजदर | ७.८० टक्के |
कमाल कार्यकाळ | ३० वर्ष |
प्रक्रिया शुल्क | नाही |
गृह कर्ज म्हणजे काय ?
गृहकर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे आणि जर आपल्याला स्वताच्या मालकीच्या जागेवर जर घर बांधायचे असल्यास, किंवा घर बांधण्यासाठी जागा घ्यायचा असल्यास आणि आणि घराची डागडुजी करायची असल्यास जर आपल्याला आर्थिक मदत हवी असल्यास आपल्याला बँकेकडून नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा त्या स्वताच्या रिकाम्या जागेमध्ये घर बांधण्यासाठी कर्ज देते आणि त्यालाच गृहकर्ज म्हणतात.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज योजनेविषयी माहिती – information about bank of maharashtra home loan in marathi
बँक ऑफ महाराष्ट्र हि मुख्यता महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे आणि हि बँक वेगवेगळ्या प्रकारची कर्ज देते आणि हि बँक माफक आणि लोकांना किंवा ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये गृहकर्ज देते. बँक ऑफ महाराष्ट्र बँक हि पात्र ग्राहकांना ७.८० टक्के व्याजदराने गृहकर्ज ऑफर करते आणि कर्जाची पुढे उच्च रक्कम प्रदान केली जाते आणि परतफेडीचा कालावधी हा ३० वर्षापर्यंत असतो.
जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी किंवा स्वताच्या जागेवर घर बांधण्यासाठी पैशाची मदत हवी असेल तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र कडून गृहकर्ज घेवू शकता आणि त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो.
जो आपण बँकेच्या आपल्या जवळ असणाऱ्या शाखेमध्ये जाऊन करू शकतो किंवा मग ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो आणि संरक्षण वैयक्तिक आणि महिलांना ०.०५ टक्के सवलत दिली जाते.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून गृहकर्ज मिळवण्यासाठी पात्रता निकष – eiligibility
कोणत्याही प्रकारची कार्ज योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आपल्याला आपल्याला त्या संबधित बँकेने ठरवलेल्या कोणते ना कोणतेतरी पात्रता निकष पार करावे लागतात आणि तसेच गृह कर्ज घेण्यासाठी देखील आपल्याला काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते पात्रता निकष काय काय आहेत ते आपण पाहूया.
- बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून एखाद्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी किंवा घराचे नुतनीकरण करण्यासाठी कर्ज घ्यायचे असल्यास तो संबधित व्यक्ती त्या बँकेचा ग्राहक असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज घेऊन जर घर बांधायचे असल्यास त्या व्यक्तीचा घर बांधण्यासाठी स्वताचा जागा असली पाहिजे तर त्या व्यक्तीला बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्जे देते.
- गृहकर्ज देताना त्या व्यक्तीचा किमान वार्षिक पगार किंवा उत्पन्न देखील तपासले जाते आणि त्याच्या कामाचा अनुभव किती वर्षाचा आहे हे देखील तपासले जाते.
- जर एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीचे वय हे १८ ते ६५ इतके असावे तरच त्या व्यक्तीला गृहकर्ज मिळू शकते.
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या वेगवेगळ्या योजना – schemes
बँक ऑफ महाराष्ट्र हि बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या गृहकर्ज योजना ऑफर करते आणि खाली आपण त्या कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत.
- बांधकामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र महा सुपर हाऊसिंग कर्ज योजना प्रधान करते आणि यामध्ये ३० वर्षापेक्षा जुने नसलेले नवीन किंवा विद्यमान फ्लॅट/ घर बांधणे किंवा संपादन करण्याच्या हेतूने आणि जुण्या घराच्या विस्ताराच्या उद्देशाने ग्राहकाला दिले जाते.
- घराच्या नुतनीकरनासाठी बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्ज देते आणि या कर्जाचा कालावधी हा २० वर्षाचा असतो.
- बँक ऑफ महाराष्ट्र टॉप – अप होम लोन बयोजना देखील प्रधान करते. इतर बँकांच्या गृहकर्जाच्या टेकओव्हर किंवा शिल्लक हस्तांतरणासाठी आणि तुमच्या घराच्या दुरुस्ती. फर्निशिंग आणि नूतनीकरणासाठी टॉप अप कर्जाचा अतिरिक्त लाभ मिळतो.
- बँक ऑफ महाराष्ट्र महा कॉम्बो कर्ज योजना देखील या बँकेकडून पुरवली जाते आणि या योजनेमध्ये घर आणि कारसाठी कॉम्बो कर्ज योजना पुरवली जाते. कॉम्बो कर्जे योजनेमध्ये जास्तीत जास्त रुपये २५००० च्या अधीन असलेल्या कर्जाच्या रकमेच्या ०.१५ टक्के प्रक्रिया शुल्क आहे आणि महिला कर्जदारांच्यासाठी कोणताही प्रक्रिया शुल्क नाही.
- बँक ऑफ महाराष्ट्र मालमत्तेवर कर्ज किमान वार्षिक उत्पन्न रुपये ५ लाख असणे आवश्यक आहे आणि यामध्ये कर्जाच्या रकमेच्या १ टक्के अधिक जीएसटी (GST) कर्ज म्हणून प्रदान करणे आवश्यक आहे.
आम्ही दिलेल्या bank of maharashtra home loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्ज योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bank of maharashtra home loan documents या information about bank of maharashtra home loan in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि bank of maharashtra home loan interest माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट