Puri Bhaji Recipe in Marathi – Poori Bhaji Recipe in Marathi पुरी भाजी रेसिपी मराठी पुरी भाजी हि एक भारतामध्ये नाश्त्यासाठी बनवली जाणारी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वजन या डिशचा आनंद घेवू शकतात. पुरी आणि भाजी ह्या दोन्ही वेगवेगळ्या डिश आहेत आणि ह्या दोन्हीही डिश वेगवेगळ्या पध्दतीने बनवल्या जातात. भाजी हि बटाट्याची बनवलेली असते आणि हि हिरवी मिरची वापरून किंवा लाल चटणी वापरून बनवलेली असते आणि पुरी साठी गव्हाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ वापरले जाते. पुरी भाजी हि जरी महाराष्ट्राची प्रसिध्द डीश असली तरी भारतामध्ये काही इतर ठिकाणी देखील हि डिश आवडीने बनवली जाते.
आणि खाल्ली देखील जाते. पुरी भाजी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये बनते. चला तर मग आज आपण या लेखामध्ये पुरी भाजी कशी बनवायची ते पाहूयात.

पुरी भाजी रेसिपी मराठी – Puri Bhaji Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | भाजीसाठी १० मिनिटे पुरीसाठी ८ ते १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | भाजीसाठी १५ मिनिटे पुरीसाठी १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | भाजीसाठी २५ मिनिटे पुरीसाठी २० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( भारतीय ) |
पुरी भाजी रेसिपी – poori bhaji
पुरी भाजी हि रेसिपी महाराष्ट्रामध्ये नाश्त्यासाठी बनवली जाते आणि लोक हि रेसिपी खूप आवडीने खातात. पुरी आणि भाजी हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत आणि जी पुरीसोबत भाजी खाल्ली जाते ती दोन प्रकारे बनवली जाते. हिरवी मिरची घालून किंवा लाल मिरची घालून. भाजीच्या दोन्ही पध्दती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत आणि पुरीची रेसिपी देखील पाहणार आहोत. चला तर मग पुरी भाजी रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- नक्की वाचा: ब्रेकफास्ट रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | भाजीसाठी १० मिनिटे पुरीसाठी ८ ते १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | भाजीसाठी १५ मिनिटे पुरीसाठी १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | भाजीसाठी २५ मिनिटे पुरीसाठी २० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( भारतीय ) |
आता आपण हिरवी मिरची वापरून बटाट्याची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.
- ३ ते ४ बटाटे
- ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- ७ ते ८ कडीपत्ता पाने.
- १/४ चमच्या हिंग.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
- १ मोठा चमचा तेल.
- नक्की वाचा: रवा इडली रेसिपी मराठी
- सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल. ( टीप : आपण बटाटे भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून त्यावर झाकण घालून देखील शिजवू शकतो ).
- कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि कडीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा.
- त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
- आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि मिक्स करा.
- तुमची पुरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार झाली.
आता आपण लाल मिरची पावडर वापरून मसालेदार आणि चमचमीत भाजी कशी बनवायची ते पाहूयात.
- ३ ते ४ बटाटे
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- १/४ चमच्या हिंग.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा गरम मसाला.
- अर्धी छोटी वाटी वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १ मोठा चमचा तेल.
- सर्व प्रथम बटाटे घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- मग कुकरमध्ये पाणी घाला आणि ते बटाटे त्यामध्ये टाकून कुकरचे झाकण घालून त्याला ३ ते ४ शिट्या द्या त्यामुळे बटाटे चांगले शिजण्यास मदत होईल.
- कुकर गार झाल्यानंतर त्यामधील बटाटे काढून घेवून त्याची साल काढा आणि ते चिरून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, आलं लसून पेस्ट, हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर घालून ते चांगले एकत्र करा.
- आता त्यामध्ये उकडलेले आणि चिरलेले आणि थोडेसे पाणी घाला आणि ते मिक्स करा.
- आता त्यामध्ये वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
- आणि या भाजीच्या भांड्यावर झाकण ठेवून भाजी ५ ते ६ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा आणि मग गॅस बंद करा.
- पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची लाल भाजी तयार झाली.
- नक्की वाचा: रवा डोसा रेसिपी मराठी
आता आपण बटाट्याच्या पिवळ्या किंवा लाल भाजी सोबत खाल्ली जाणारी पुरी कशी बनवायची ते पाहूयात.
- २ वाटी गव्हाचे पीठ.
- २ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- पुरी बनवतेवेळी सर्वप्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ, तेल आणि मीठ घाला आणि ते मिक्स करून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ मळून घ्या.
- आता ह्या पिठावर एक सुती कापड घालून ते १० ते १५ मिनिटे भिजू द्या.
- त्यानंतर हाताला तेल लावा आणि ह्या पीठाचे छोटे छोटे ( पेढ्या एवढे ) गोळे करून ठेवा.
- मग गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- आता आपण बनवून ठेवलेल्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटा आणि त्या तेलामध्ये घालून एक एक करून दोन्ही बाजूनी चांगल्या तळून घ्या
- अश्या प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्या.
- भाजीसोबत खाण्यासाठी पुऱ्या तयार झाल्या.
सर्व्ह कसे करावे – serving suggestion
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल किंवा पिवळी बटाट्याची भाजी बनवा आणि पुरी सोबत सर्व्ह करा.
आम्ही दिलेल्या puri bhaji recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पुरी भाजी रेसिपी मराठी maharashtrian puri bhaji बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या puri bhaji recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि puri bhaji recipe in marathi madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये recipe of puri bhaji in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट