bear information in marathi मदारीच्या तालावर नाचणाऱ्या अस्वलाला कोण नाही ओळखत. लहानपणी अस्वलाचा आणि मदारीचा खेळ आपण सगळ्यांनी पहिला आहेच. अस्वल हा शांत प्राणी आहे परुंतु जंगली अस्वल हे माणसासाठी सुद्धा खूप धोकादायक ठरू शकते.(bear in marathi)
अस्वल हा प्राणी असिर्डी कुळातील असून त्यांच्या एकूण जाती ८ आहेत. अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे जो युरोप, आशिया, आणि अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अस्वल हे तात जंगलात राहणारे मांसभक्षक प्राणी असून अस्वलांना मासे खायला खूप आवडतात. त्यामुळे ते नदी काठी किवा तलावा जवळच राहतात.
भारतीय अस्वल (Indian Bear)bear in marathi
भारतीय अस्वल हे काळ्या किवा तपकिरी रंगाचे असतात. भारतीय अस्वलाचे वर्णन करायचे म्हंटले तर पांढऱ्या रंगाचे लांब मुस्कट. खालचा ओठ लांब, नाकपुड्या पुढे आलेल्या तसेच चार पाय असतात पण ते पुढच्या दोन पायाच्या पंजाचा उपयोग हातासारखा करतात आणि ते पाठीमागच्या पायावर उभे राहू शकतात, त्यांची नखे हि खूप भयानक असतात ( पांढऱ्या रंगाची नखे असतात). बहुतेक काळ्या रंगाच्या अस्वलांच्या छातीवर v आकाराची चट असते. भारतामध्ये अस्वल हिमालय पर्वतामध्ये आढळतात.
अस्वलाची माहिती मराठीमध्ये (bear information in marathi)
भारतीय वैज्ञानिक नाव | मेलर्सस अर्सिनस |
उंची | ७० ते ९० सेंटी मीटर |
लांबी | १.८ मीटर |
वजन | १०० ते १२० किलो |
आयुष्य | २५ ते ३० वर्ष |
अस्वलाबद्दल काही तथ्ये ( facts of bear )
- अस्वलाचे हृदय १ मिनिटामध्ये ४० वेळा धडकते.
- धुर्वीय अस्वल हे अर्कटिक भागामध्ये आढळतात.
- अस्वल हे तशी ४० मीटर पळू शकते.
- वन्यजीव तज्ञांचच्या मते उत्तर अमेरिकेतील अस्वल हे सर्वात बुध्दिमान अस्वल मानले जातात.
- धुर्वीत अस्वल हे पूर्णपणे मांसाहारी असतात.
- पांडा आपला आहार म्हणून बांबू खातो.
- सूर्य अस्वलांचे पायाचे पंजे दुसऱ्या जातीच्या अस्वलांपेक्षा मोठे असतात आणि त्यांची जीभ हि लांब असते
- धुर्वीय अस्वल पाण्यामध्ये ८ फुट लांब झेप घेवू शकतो.
- अमेरिकन अस्वल हे रात्रीचे जास्त क्रियाशील असतात.
- धुर्वीय अस्वल हे विश्रांती न घेता १६० किलो मीटर पोहू शकते.
अस्वलांचा आहार ( diet )
अस्वलांचा आहार हा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असतो. ते ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये कश्या प्रकारचा आहार उपलब्ध आहे त्यावर त्यांची आहाराची सवय असते. अस्वल हे शक्यतो मांस, मासे तसेच दुसरे सस्तन प्राणी देखील खातात , काही अस्वल गवत, मुळे, बेरी, किडे, बांबू यासारखे अन्न सेवन करतात.
अस्वल कुठे राहते ( bear habitat)
- अस्वलांचा एक लहान गात असतो आणि ते शक्यतो जंगलामध्ये, पर्वत आणि गवताळ प्रदेशामध्ये राहतात.
- तपकिरी अस्वल हे वायव्य किवा उत्तर अमेरिका, वायव्य आफ्रिका, युरोप आशिया या देशामध्ये आढळतात.
- अमेरिकन ब्लॅक अस्वल हे फ्लोरिडा, उत्तर कॅनडा तसेच अलास्का या देशामध्ये आढळतात.
- त्याचबरोबर धुर्वीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशामध्ये आढळते. अशियाटिक अस्वल हे अफगाणीस्तान, भूतान, बांगलादेश, भारत, कोलंबिया, चीन, इराण, कोरिया, मलेशिया, रशिया, म्यानमार, पाकीस्तान, आणि तैबान या देशामध्ये आढळतात.
- स्लोथ अस्वल भारत, भूतान, श्रीलंका, नेपाल आणि बांगलादेश मध्ये आढळतात.
अस्वलाचे प्रकार ( types of bear or bear species )
बघयला गेले तर जगभरामध्ये अस्वलाच्या वेगवेगळ्या जाती पसरल्या आहेत परंतु अर्कटिक च्या बर्फाळ प्रदेशामध्ये तसेच अमेरिकेच्या वेदांत जंगलामध्ये जास्त प्रमाणात अस्वल आढळतात. अस्वलाच्या एकूण ८ जाती आहेत त्या खाली दिल्या आहेत.
धुर्वीय अस्वल (polar bear information in marathi)
धुर्वीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशमध्ये आढळते खास करून अर्कटिक प्रदेशमध्ये महासागराच्या सभोवताली आढळतात. नर अस्वलाचे वजन ५०० ते ५५० किलो इतके असते. आणि मादी अस्वल हे नर अस्वलापेक्षा आकाराने लहान असतात. त्यांचे वजन २५० ते ३०० किलो असते. या अस्वलाला लातिन मध्ये ‘ sea bear’ असे म्हणतात. IUCN च्या मते या अस्वलाची जात धोक्यात आहे.
तपकिरी अस्वल ( brown bear information in marathi )
तपकिरी अस्वल हे अलास्का, युरोप, वॉशिंगटन, रशिया आणि भारत या देशामध्ये आढळतात. हि अस्वल तपकिरी आणि काळ्या रंगाचे असतात आणि यांचा कर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असतो कारण ज्या ठिकाणी जसा आहार मिळेल तसे त्यांचे शरीर बनते. हे अस्वल सर्वभक्षक असतात.
अमेरिकन ब्लॅक अस्वल ( american black bear )
अमेरिकन ब्लॅक अस्वल हे फ्लोरिडा, उत्तर कॅनडा तसेच अलास्का या देशामध्ये आढळतो. हे अस्वल काळ्या रंगाचे असते. त्याचबरोबर कॅनडा आणि ब्रिटीश कोलंबिया मध्ये या जातीचे अस्वल पांढऱ्या रंगाचे असते. या स्वलांचे वजन २७० ते २८० किलो इतके असते आणि हि अस्वले जंगलामध्ये २५ वर्ष जगू शकतात.
अॅडीयन अस्वल ( andean bear information in marathi )
अॅडीयन अस्वल हे फक्त अमेरिकेतील अॅडीन पर्वतामधेच आढळतात. शक्यतो हे अस्वल काळ्या रंगाचे असते. आणि कुठे कुठे या अस्वलाचा रंग गडद तपकिरी किवा लालसर रंगाचे असतात. नर अस्वलाचे वजन १०० ते २०० किलो असते आणि मादी अस्वलाचे वजन ४० ते ८० किलो असते. या अस्वलचा चेहरा दुसऱ्या अस्वलांच्या तुलनेने लहान आणि रुंद असतो.
अशियाटिक ब्लॅक अस्वल ( asiatic black bear )
अशियाटिक अस्वलाला काळ्या रंगाचा लांब फर असतो आणि या अस्वलाच्या छातीवर पांढऱ्या रंगाची v आकाराची छटा असते. अशियाटिक अस्वल हे अफगाणीस्तान, भूतान, बांगलादेश, भारत, कोलंबिया, चीन, इराण, कोरिया, मलेशिया, रशिया, म्यानमार, पाकीस्तान, आणि तैबान या देशामध्ये आढळतात. यावरून असे समजते कि हे अस्वल जगभरामध्ये पसरले आहेत.
सूर्य अस्वल ( sun bear )
सूर्य अस्वल हे आकाराने दुसऱ्या जातीच्या अस्वलांपेक्षा लहान असतात. ह्या अस्वलाची लांबी १२० ते १५० सेंटी मीटर असते आणि नर अस्वलाचे वजन २५ ते ६५ किलो असते त मादी अस्वलाचे वजन २५ ते ५० किलो असते. या जातीच्या अस्वलांचे फर लहान असते आणि ते काळ्या किवा गडद तपकिरी रंगाचे असते. हि अस्वल कोलंबिया, मलेशिया, म्यानमार, भारत, चीन , इंडोनेशिया आणि थायलंड मध्ये आढळतात. त्यांची ८ ते १० इंच लांब असणारी जीभ त्यांना मधमाश्यांच्या पोळ्यातील मध खाण्यासाठी उपयोगी असते. या अस्वलांना ‘Honey Bear’ असे हि म्हणतात.
स्लोथ अस्वल (sloth bear information in marathi)
स्लोथ अस्वलाचे वैज्ञानिक नाव मेलुरस युरेनस असे आहे. या अस्वलाच्या दोन उप प्रजाती आहेत त्या म्हणजे इंडिअन स्लोथ अस्वल आणि श्रीलंका स्लोथ अस्वल. या अस्वलाची शरीराची लांबी १४० ते १९० सेंटी मीटर असते. मादी अस्वलाचे वजन ५० ते ९० किलो इतके असते तर नर अस्वलाचे वजन ७५ ते १३५ किलो असते. या अस्वलाला लांब झुबकेदार काळे केस असतात तसेच छातीवर पांढऱ्या रंगाची U आकाराची छटा असते. या जातीची अस्वले भारत, भूतान, श्रीलंका, नेपाल आणि बांगलादेश मध्ये आढळतात.
पांडा अस्वल (panda bear information in marathi)
पांडा अस्वल हे आपला आहार म्हणून बांबू सेवन करतात आणि त्यांना रोज २० किलो पर्यंत आहार लागतो. या अस्वलाची लांबी १.५ मीटर असते. नर अस्वलाचे वजन ११० ते ११५ किलो असते आणि मादी अस्वलाचे वजन ९५ ते १०० किलो असते. पांडा अस्वल हे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असतात चार पाय आणि पायाचे वरील शरीर काळ्या रंगाचे असते आणि चेहरा आणि उरलेला भाग पांढऱ्या रंगाचा असतो तसेच त्यांच्या डोळ्याभोवती काळ्या रंगाचा गोल असतो.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा अस्वल प्राणी कसा आहे त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. meaning of bear in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा.
तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही aswal in marathi / information on bear in Marathi राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. तसेच या लेखाचा वापर करून आपण information about bear in marathi essay असा देखील करू शकता. या माहिती काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट