चित्त्याची माहिती Cheetah Information In Marathi

Cheetah information in Marathi वेगवान प्राणी म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे ‘चित्ता’ होय चित्ता हा प्राणी ताशी ९० ते ११० किलोमीटर धावू शकतो. चिता हा मांसाहारी सस्तन प्राणी आहे आणि तो शक्यतो लहान प्राण्याची शिकार करतो जसे कि पक्षी, ससे, लहान हरीण आणि झेब्रा. चित्त्याचे वैज्ञानिक नाव ‘अॅकिनोनिक्स’ असे आहे हा एक मांजरी कुळातील प्राणी आहे आणि हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा प्राणी आहे. एकेकाळी भारतामध्ये आणि युरेशियामध्ये चित्ता हा प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आढळयाचे पण आत्ता या देशांमध्ये चीत्त्यांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले आहे. आता ते फक्त आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेशातच आढळतात. भारतामध्ये चित्त्याचा एकेकाळी मोठ्या प्रमाणात वावर होता आणि शेवटचा जंगली चित्ता १९५१ च्या दरम्यान आंध्रप्रदेश दिसला होता त्यानंतर तो भारताच्या कोणत्याच जंगलामध्ये आढळला नाही त्यामुळे भारतातून चित्ता  नामशेष झाला आहे असे म्हंटले जाते.(cheetah animal information in marathi)

याचबरोबर वाघाची माहिती वाचा 

cheetah-information-in-marathi
चित्ता प्राण्याबद्दल माहिती

चित्ता प्राण्याबद्दल माहिती Cheetah Information In Marathi

सदरच्या लेखात आपण चित्ता या प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चित्त्याचा आहार (cheetah’s food)

चित्ता हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो फक्त मांस खातो. चित्ता शक्यतो लहान प्राण्यांचे शिकार करतो तो ससे, पक्षी , हरीण किवा इतर लहान प्राण्यांचा शिकार करतो .जर शिकार गटामध्ये करायचा असेल तर ते झेब्रा किवा मोठे हरीण यासारख्या प्राण्यांचा शिकार करतात. चित्ता हा असा प्राणी आहे जो तरुण प्राण्यांचा शिकार करतात ते जास्त वय झालेल्या प्राण्यांचा शिकार करत नाहीत.

चित्त्याची शिकार करण्याची पध्दत (cheetah hunting method)

चित्ता सकाळी लवकर किवा संध्याकाळी उन्ह कमी झाल्यानंतर शिकार करतो तो दुपारच्या उन्हामध्ये शिकार करत नाही त्याचबरोबर गरजेनुसार तो चादन्यांच्या उजेडामध्ये रात्रीही शिकार करतो. चित्ता शिकार करताना हळू हळू गवताच्या किवा झुडुपाच्या आडोशाने त्या प्राण्याच्या जवळ येतात व जवळ आल्यानंतर त्यांचा वेगाने पाठलाग करून शिकार पकडतात. चित्ता जर एकटाच शिकार करत असेल तर तो लहान प्राण्याचे शिकार करतो आणि जर ते गटामध्ये शिकार करत असतील तर ते मोठ्या प्राण्यांचा शिकार करतात.

याचबरोबर सिंहाची माहिती वाचा 

चित्ता कुठे राहतो (cheetah habitat)

जास्ती जास्त चित्ता हा प्राणी झुडूप, सवाना किवा गवताळ प्रदेशमध्ये राहतात. चित्ता उष्ण वातावरणामध्ये किवा वाळवंटामध्ये राहु शकतात आणि ते कधी कधी झाडावरही राहतात.

चित्त्याचे विविध प्रकार ( different types of cheetah)

दक्षिण आणि पूर्व आफ्रीकामध्ये मोठ्या प्रमाणात चित्ता आढळतो तसेच इराण मधेही चित्ता आढळतो. एकेकाळी भारतामध्येही मोठ्या प्रमाणात चित्ता आढळत होता पण आत्ता तो नामशेष झाला आहे. चित्ता हा सडपातळ अंगाचा, अंगावर काळे ठीपके असतात. दोन्ही डोळ्याच्या खाली काळ्या पट्टा असतो आणि ते अश्रू आल्यासारखे दिसतात. काही चीत्त्यांचे प्रकार खाली दिले आहेत.

आशियाटिक चित्ता ( asiatic cheetah information in Marathi )

आशियाटिक चित्ता हा भारतामध्ये, इराण आणि पाकिस्तानमध्ये आढळत होता पण आत्ता ते नामशेष झाले आहेत. आययूसीएनने आशियाटिक चित्त्याचे लुप्तप्राय प्राणी म्हणून वर्गीकृत केले आहे. हा चित्ता फिकट पिवळसर बदामी रंगाचे फार असलेला आणि अंगावर काळे ठीपके असतात. या चित्त्याचे वजन १४३ ते १४५ किलो पर्यंत असते. या चित्त्याची उंची ३१ ते ३२ इंच असते आणि लांबी ५२ इंचापर्यंत असते. चित्त्याच्या शेपटीची लांबी ३० इंच असते.

टांझानिया चित्ता ( tanzanian cheetah information in Marathi )

टांझानिया चित्त्याला केनियन चित्ता असेही म्हणतात. हे चित्ते टांझानिया, सोमालिया आणि केनिया या देशात आढळतात आणि हे गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात. दक्षिण आफ्रिकेच्या चित्त्यानंतर टांझानिया चित्ताची दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या आहे.

वायव्य आफ्रिकन चित्ता (northwest african cheetah information in Marathi )

वायव्य आफ्रिकन चित्ता हा वायव्य आफ्रिकेमध्ये आढळतो आणि हि चीत्त्यामधील सर्वात धोकादायक प्रजात आहे आणि हि चित्त्यांची जात आययूसीएनच्या रेड लिस्ट मध्ये आहे. हा चित्ता पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात आणि पायावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. वायव्य आफ्रिकन चित्त्याला सेनेगल चित्ता किवा सहारन चित्ता या नावांनी हि ओळखले जाते.

दक्षिण आफ्रिका चित्ता (south african cheetah information in Marathi )

दक्षिण आफ्रिकेतील चित्त्याला नामीबियान चित्ता असेही म्हंटले जाते. हा चित्ता आफ्रिकेमध्ये ट्रान्सव्हालच्या गवताळ प्रदेशात, कलहारी भागात किवा नामीबियान भागात आढळतात. ह्या चित्त्यांच्या अंगावर दुसऱ्या चित्त्यां पेक्षा जास्त ठिपके असतात.

सुदान चित्ता (sudan cheetah)

सुदान चित्त्याला मध्य आफ्रिकन चित्ता किवा सोमाली चित्ता असेही म्हणतात. हे चित्ते मध्य आफ्रिकेमध्ये गवताळ भागात किवा वळवंटामध्ये आढळतात. ह्या चित्त्यांची संख्या हि खूप कमी झालेली आहे आणि आफ्रिकेमध्ये काही भागात हि जात नामशेष झालेली आहे. सुदान चित्ते जवळ जवळ टांझानिया चीत्त्यासारखेच दिसतात.

किंग चित्ता (king cheetah information in Marathi )

किंग चित्ता हा आफ्रिकेमध्ये आढळतो आणि त्यांची संख्याही खूप कमी आहे. या चित्त्याच्या अंगावर काळे ठिपके आणि पट्टे असतात जे सामान्य चीत्त्यांपेक्षा वेगळे असतात. या चीत्त्यांचे वजन ८८ ते ८९ किलो इतके असते आणि हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे त्याला दिवसाला ७ ते ८ किलो मांस लागते. हा चित्ता सामान्य चीत्त्यांपेक्षा आकाराने मोठा असतो.

घोड्याची माहिती 

पांढरा चित्ता (white cheetah information in Marathi )

पांढरा चित्त्याची जात हि १६०८ मध्ये सापडली होती आणि हे पांढरे चित्ते नामशेष झाले आहेत. उंच, अरुंद कंबर, मोठी छाती आणि लांब पाय असतात असे या चित्त्याचे वर्णन आहे. या चित्त्याच्या वर्णनावरून असे लक्षात येते कि हा चित्ता वेगासाठी प्रसिध्द असावा.

चित्त्या बद्दलची काही अनोखी तथ्ये (facts of cheetah)

  • चित्त्याला डरकाळी किवा गुरगुरता येत नाही ते मांजराप्रमाणे क्याव क्याव करतात.
  • आशियातील चित्त्याचा वापर ग्रेहाउंड्ससारख्या शिकारसाठी केला जातो.
  • चित्त्याचे फर पाळीव मांजरासारखा असतो.
  • चित्ता जंगलामध्ये १० ते १५ वर्ष जगतो आणि जर कैदेत असेल तर तो २० वर्षापेक्षा जास्त शिकतो.
  • महिला प्रौढ चित्ते बहुतेकदा एकटे राहण्यास पसंत करतात.
  • चित्ता हा जगातील वेगवान प्राणी आहे.
  • नर आणि मादी चित्ते स्वतंत्रपणे जगतात.
  • नर चित्ता गटामध्ये शिकार करतात आणि मादी चित्ता एकटया शिकार करतात.
  • मादी चित्ता एकावेळी २ ते ६ पिल्लांना जन्म देवू शकते.
  • मादी चित्ता एकटे राहायला पसंत करतो.

कुत्रा या प्राण्याविषयी माहिती

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा चित्ता (बिबट्या) प्राणी कसा आहे त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे.cheetah information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही   jaguar animal in marathi राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. तसेच या लेखाचा वापर करून आपण information about cheetah in marathi essay असा देखील करू शकता. या माहिती काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!