वाघाची माहिती Tiger Information In Marathi

about tiger information in Marathi वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून त्याचे वाघाचे वैज्ञानिक नाव ‘पँथेरा टीग्रीस’ असे आहे. वाघ हा मांजरीनीच्या कुळातील सर्वात मोठा आणि हिंस्र आणि सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. भारत, बांगलादेश, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, नेपाल आणि भूतान या देशामध्ये वाघ हा प्राणी आढळतो. पण बहुसंख्य वाघांची संख्या भारतातल्या सुंदरवनात आढळते. वाघाला पिवळ्या आणि तपकिरी या दोन रंगांचे मिश्रण असलेला रंग असतो आणि त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात पण ते समान नसतात आणि ह्या पट्ट्यांची संख्या १०० असते. वाघ हा मांसाहारी पाणि आहे आहे आणि तो अतिशय चपळ आहे त्यामुळे शिकार जवळ येताच जलद गतीने धावत जावून आपल्या टोकदार दातांमध्ये शिकार मजबुतपणे पकडून ठेवतो. वाघाचे पंजे आणि जबडे अतिशय बलवान असतात त्यामुळे ते आपला शिकार घट्टपणे पकडून ठेवू शकतात. वाघ हे कळपामध्ये राहत नाहीत ते एकटे राहतात आणि ते जेथे राहतात त्या जागेबद्दल ते खूप आक्रमक जर त्यांच्या भागात जर दुसरा वाघ आला तर ते त्यांना सहन होत नाही पण वाघ आपल्या जागेत वाघिणीला राहू देतात त्याचबरोबर बाछड्यांना सांभाळण्यची आणि शिकार करायला शिकवण्याची जबाबदारी वाघिणीवर असते. (waghachi mahiti)

lion information in marathi

tiger-information-in-marathi
वाघ या राष्ट्रीय प्राण्याबद्दल माहिती

वाघाचे प्रकार (types of tigers) (Tiger Information In Marathi) 

आता जगामध्ये ३००० ते  ४००० वाढ जंगलामध्ये शिल्लक आहेत आणि १९००० पेक्षा जास्त वाघ कैद करून ठेवले आहेत तर काही वाघांच्या जाती नामशेष पावल्या आहेत. त्यामधील काही प्रकार खाली दिले आहेत.

बेंगाल वाघ (Bengal tiger)

या वाघाला रॉयल बेंगाल वाघ किवा इंडीयन वाघ या नावांनी हि ओळखले जाते आणि हे वाघ भारतामध्ये, भुतान, नेपाळ आणि बांगलादेश मध्ये आढळतात. बेंगाल वाघ हा सर्वात नामांकित जातीपैकी एक आहे. या वाघाला कानात पांढर्‍या झुबड्या व मागच्या बाजूला काळ्या रंगाचे पट्टे असलेले नारिंगी फर असते आणि मजबूत जबडे, पाय आणि समोरचे पंजे शक्तिशाली असतात. याव्यतिरिक्त, काही बंगाल वाघ जनुकीय परिवर्तनासह जन्माला येतात ज्यामुळे त्यांना पांढरे फर आणि निळे डोळे असतात. वाघाचे वजन ५६० किलो इतके असते आणि वाघिणीचे वजन ३५० किलो इतके असते. हे वाघ १२० इंच लांब असतात आणि वाघिणी १०५ इंच लांब असतात.

मलयान वाघ (Malayan tiger)

मलयान वाघ आणि इंडोचायनीज वाघामध्ये बरीच साम्य आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस ही वेगळी जात मानली जात नव्हती. या कारणास्तव त्याच्या वैज्ञानिक नावाबद्दल वादविवाद आहेत: जेव्हा त्यास एक विशिष्ट पदनाम देण्याची वेळ आली तेव्हा काही लोकांनी त्याचे भौगोलिक स्थान प्रतिबिंबित करण्यासाठी त्याला मॅलेनेसिस म्हटले आणि इतरांनी मोठ्या मांजरीच्या संरक्षक पीटर जॅक्सनच्या सन्मानार्थ याला जॅक्सोनी म्हटले. आता हे वाघ अडचणीत आहेत. अलिकडच्या वर्षांत ते धोकादायकांपासून गंभीर संकटात गेले आहेत आणि त्यांची संख्या अजूनही कमी होत चालली आहे. हे वाघ मलेशिया, थायलंड या देशांमध्ये आढळतात.

सायबेरियन वाघ (Siberian Tiger)

सायबेरियन वाघाला अमूर वाघ, उसुरीयन वाघ, मंचूरियन वाघ किवा कोरियन वाघ या नावांनी हि ओळखले जाते. हे वाघ रशिया, कोरिया, चीन या देशामध्ये आढळतात. या वाघाचे वजन ४७० किलो इतके असते आणि वाघिणीचे ३०० किलो पर्यंत असते आणि वाघाची लांबी ७० इंच आणि वाघिणीची ६६ इंच असते. सायबेरियन वाघ त्याच्या विस्तृत छाती आणि मोठ्या खोपडीसाठी देखील ओळखला जातो. हे पर्वत, डोंगराळ प्रदेशासह थंड, बर्फाच्छादित प्रदेशात राहत असल्याने कडाक्याच्या हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना जाड फर असते.

सुमात्राण वाघ (Sumatran Tiger)

सुमात्रान वाघ फक्त इंडोनेशियन बेट सुमात्रावर आढळतात. ते इतर जातींपेक्षा आकाराने लहान असतात म्हणजेच ते बंगाल किंवा सायबेरियन वाघांच्या अर्ध्या भाग एवढा त्यांचा आकार असतो. त्यांच्याकडे अतिशय गडद, ​​परिभाषित रेषा आहेत आणि त्या संपूर्ण शरीरावर असतात. त्यांच्या कपाळावर देखील पट्टे आहेत जे पट्टे दुसऱ्या प्रजातीच्या वाघांच्या कपाळावर नसतात. या वाघांचे वजन ३०० किलो असते आणि वाघीनेचे वजन २४० किलो असते. या वाघाची लांबी १०० इंच असते आणि वाघिणीची ९० इंच असते.

बाली वाघ (Bali Tiger)

बाली वाघ हा इंडोनेशियामध्ये आढळत होते आता त्यांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. बाली वाघ, सुमात्रान वाघ आणि जावन वाघासमवेत इंडोनेशियन बेटांवर राहत होते. या वाघांना छोट्या प्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जात असे पण आज जगातील त्याचे अवशेष केवळ कवटी आणि हाडे आहेत जे संग्रहालयात जतन केले आहेत. या वाघांचे वजन २२० किलो होते आणि वाघिणीचे १७६ किलो आणि या वाघाची लांबी ९१ इंच आणि वाघिणीची ८३ इंच होती.

दक्षिण चीन वाघ (South China Tiger)

दक्षिण चीन वाघांना झियामेन वाघ, चिनी वाघ किवा अ‍ॅमॉय वाघ नावांनी हि ओळखले जातात. हे मध्य आणि पूर्व चीन मध्ये आढळतात. दक्षिण चीन वाघ अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. खरं तर, ते कार्यशीलतेने नामशेष देखील असू शकतात. त्यापैकी फक्त 30 – 40 वाघ शिल्लक आहेत आणि ते हि सर्व प्राणीसंग्रहालयात आहेत.

इंडोचायनीज वाघ (Indochinese Tiger)

इंडोचायनीज वाघ हे थायलंड, लाओस, चीन, बर्मा, पूर्वी कंबोडिया या देशांमध्ये आढळतात. या वाघांना कधी कधी कॉर्बेटचे वाघ म्हणून ओळखले जाते. सर्व जिवंत वाघांच्या प्रजातींप्रमाणेच इंडोचायनीज वाघही धोक्यात आला आहे आणि त्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या वाघाचे वजन ४३० किलो आहे आणि वाघिणीचे वजन २९० किलो असते आणि वाघाची लांबी ११२ इंच आणि वाघिणीची लांबी १०० इंच असते.

horse information in marathi

वाघ कोठे राहतात (tiger habitat)

वाघ आश्चर्यकारकपणे विविध वस्तींमध्ये आढळतात जसे कि पावसाळी जंगले, गवतमय प्रदेशात, सवाना आणि अगदी मॅनग्रोव्ह दलदली मध्ये सुद्धा . दुर्दैवाने, ऐतिहासिक वाघाच्या ९३ टक्के  जमिनी प्रामुख्याने मानवी क्रियाकलाप वाढविण्यासाठी नष्ट केल्या आहेत.

वाघाचे शरीराचे भागांपासून कोणकोणती उत्पादने बनवली जातात

वाघाचे डोळे, अवयव, रक्त, मांस, मेंदू आणि हाडे जवळजवळ प्रत्येक अवयवाचा वापर आजाराच्या उपचारांसाठी, दातदुखीच्या उपचारांसाठी, डोकेदुखी, टक्कल पडणे, वेदनाशामक, कामोत्तेजक आणि आळशीपणाचा उपचार करण्या साठी केला जातो.

  • वाघाच्या त्वचेचा वापर मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी होतो.
  • वाघाच्या दातांचा वापर रेबीज, दमा हे रोग बरे करण्यासाठी होतो.
  • वाघांच्या हाडांचा वापर वाइन तयार करण्यासाठी केला जातो.
  • वाघाच्या शेपटीचा वापर त्वचेच्या विविध आजार बरे करण्यासाठी होतो.
  • वाघाच्या रक्ताचा वापर इच्छाशक्ती मजबूत करण्यासाठी केला जातो.
  • मेंदूचा वापर आळशीपणा आणि मुरुम बरे करण्यासाठी होतो.

वाघाची काही मनोरंजक तथ्य (some interesting facts of tiger) (waghachi mahiti)

  • वाघ हा प्राणी ताशी ६४ किलोमीटर वेगाने धावू शकतो.
  • वाघ चंगल्या प्रकारे पोहू शकतो.
  • नर हा वाघ असतो आणि मादी हि वाघीण असते. मादी एकावेळी ३ ते ४ बाछाड्यांना जन्म देते.
  • वाघांच्या अजूनही सहा उपप्रजाती जिवंत आहेत.
  • वन्य वाघांची लोकसंख्या आत्ता ३८९० इतकी आहे.
  • १०० वर्षापूर्वी वन्य वाघांची लोकसंख्या १००००० होती.
  • वाघांना अँटिसेप्टिक लाळ असते.
  • वाघ उन्हाळ्यामध्ये आपली उष्णता कमी करण्यासाठी तासंतास पाण्यामध्ये बसून राहू शकतात.
  • वाघ सुमारे 25 वर्षे जगू शकतात.
  • वाघाची डरकाळी २ मैल दूर ऐकू येते.
  • वाघ हा मांसाहारी प्राणी आहे तो फक्त मांस खातो.
  • कोणत्याही दोन वाघांना समान पट्टे नसतात.
  • वाघ निशाचर प्राणी आहे.
  • वाघांना पाण्यात पोहणे आणि खेळायला आवडते.
  • वाघ एकटे राहायला पसंत करतात.
  • वाघ इतर प्राण्यांच्या आवाजाचे अनुकरण करू शकतात.

dog information in marathi

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा वाघ प्राणी कसा आहे त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. tiger information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही waghachi mahiti/ Information about tiger in Marathi राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. तसेच या लेखाचा वापर करून आपण tiger information in marathi essay

असा देखील करू शकता. या माहिती काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!