भरतनाट्यम नृत्य माहिती Bharatanatyam Information in Marathi

bharatanatyam information in marathi भरतनाट्यम नृत्य माहिती मराठी, आज हा लेख लिहिताना असे म्हणावेसे वाटते कि “सारे जहा से अच्छा हिंदुस्थान हमारा” कारण भारत हा असा देश आहे कि जी संस्कृती, परंपरा आणि धार्मिकता जपणारा देश आहे आणि या देशामध्ये अनेक प्रकारे देशाचे वेगळेपण दर्विले जाते जसे कि भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात तसेचे प्रत्येक राज्यामधील स्वयंपाक पद्धती, कला पध्दती आणि पारंपारिक वेशभूषा पद्धती यामुळे देशाचे वेगळेपण हे अगदी खुलून दिसते आणि म्हणून भारत देश हा विविध गुणांनी नटलेला देश आहे.

आता आपण आपल्या मुख्य लेखाकडे म्हणजेच भारतातील एक प्रसिध्द नृत्य प्रकार ज्याची संपूर्ण भारतामध्ये तर लोकप्रियता आहेच परंतु इतर काही देशांमध्ये देखील या नृत्य प्रकाराविषयी लोकांना माहिती आहे आणि अश्या ह्या भरतनाट्य नृत्य प्रकाराबाबत माहिती घेवूया.

भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा विशेष असा नृत्य प्रकार साजरा केला जातो जसे कि महाराष्ट्र राज्यामध्ये लावणी तसेच प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य प्रकार साजरे केले जातात आणि भरतनाट्य हा देखील तसाच एक नृत्य प्रकार आहे जो दक्षिण भारतामध्ये आणि मुख्यता तामिळनाडू या देशामध्ये सादर केला जातो.

जरी हा नृत्य प्रकार दक्षिण भारतीय असला तरी हा संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय आहे म्हणजेच या नृत्य प्रकाराविषयी भारतामध्ये लोकांना परिचय आहे.

चला तर खाली आपण भरतनाट्य या नृत्य प्रकाराविषयी संपूर्ण माहिती घेवूया म्हणजेच तो कसा केला जातो, त्याचे मूळ काय आहे, त्याच्या कोणकोणत्या मुद्रा केल्या जातात या सर्व गोष्टींच्या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

bharatanatyam information in marathi
bharatanatyam information in marathi

भरतनाट्यम नृत्य माहिती – Bharatanatyam Information in Marathi

भरतनाट्यम विषयी माहिती – bharatanatyam dance information in marathi

भारतामधील कलागुणांचे जितके गुणगान गावे तितके कमीच कमीच आहे आणि ‘भरतनाट्य’ देखील असे एक कला प्रकार आहे जो भारताच्या संस्कृतीला आणि परंपरेला एक बहर आणतो. भरतनाट्य हा एक भारतीय नृत्य प्रकार असून या नृत्य प्रकाराचा जन्म दक्षिण भारतातील तमिळनाडू या राज्यामध्ये झाला.

हा एक शास्त्रीय नृत्यप्रकार असून हा नृत्यप्रकार भारतामध्ये खूप पूर्वीपासून सादर केला जातो त्यामुळे या नृत्य प्रकाराला भारतातील एक प्राचीन नृत्य प्रकार म्हणून ओळख आहे. हा नृत्य प्रकार मुख्यता तमिळ नाडू मध्ये सादर केला जातो आणि हा नृत्य प्रकार ‘महिला’ सादर करतात आणि हा मुद्रांच्या आणि हावभावांच्या सहाय्याने सादर केला जातो.

सध्या जरी हा नृत्य प्रकार सादर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले असले तरी पूर्वी हा नृत्यप्रकार धार्मिक मंदिरांच्यामध्ये सादर केला जात होता आणि हा नृत्य प्रकार खूप जुना आणि पारंपारिक असल्यामुळे या नृत्य प्रकाराला इतर नृत्य प्रकारांची “जननी” म्हणून ओळखले जाते.

भरतनाट्यम नृत्य प्रकारचा इतिहास – history

या नृत्याविषयी इतिहासकार किंवा पुरातन कथा असे सांगतात कि प्राचीन ऋषी भरत यांना साक्षात ब्रह्मदेव यांनी प्रगट केला होता आणि पुढे तो ऋषींनी नाट्य शास्त्रामध्ये आणला आणि म्हणून या नृत्य प्रकारचा परिचय हा संगीतशास्त्रज्ञ आणि नाट्यशास्त्रज्ञ भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या मजकुरामध्ये आढळतो.

भरतनाट्यम या शब्दाची रचना कशी झाली

कोणत्याही नृत्य प्रकाराला जसे वेगवेगळ्या प्रकारची अंग असतात जसे मुद्रा, ताल, भाव आणि राग आणि तसेच भरतनाट्यम या नृत्य प्रकारची तीन अंग आहेत ती म्हणजे भाव, राग आणि ताल आणि हे नृत्य करत असताना या अंगांचा उपयोग करून भरतनाट्य सादर केले जाते.

या नृत्य प्रकारचे म्हणजेच भरतनाट्यम चे नाव हे या तीन अंगांच्यावरून तयार झाले आहे म्हणजेच भाव मधील भ, राग मधील र आणि ताल मधील त या हि अक्षरे घेऊन ‘भरत’ असे नाव पडले आहे आणि त्याला नाट्यम या अक्षराने जोडले आणि त्याचा भरतनाट्यम असा शब्द तयार झाला.

भरतनाट्यम मधील महत्वाच्या गोष्टी

भरतनाट्यम हा नृत्य प्रकार हा अनेक वेगवेगळे भाव, मुद्रा, राग आणि ताल देऊन तर सादर केले जातात परंतु ते सादर करण्यासाठी काही इतर गोष्टी देखील आवश्यक असतात त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • नृत्य : नृत्य हे एक या प्रकाराचे मुख्य अंग आहे आणि नृत्य हे काळजीपूर्वक शिकले जाते आणि ते लोकांच्या समोर सादर केले जाते आणि यामध्ये अवघड शारीरिक युक्ती आणि हालचाल प्रदर्शित केली जाते.
 • हस्त मुद्रा : हा नृत्य प्रकार सादर करत असताना हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा केल्या जातात आणि ह्या मुद्रा करणे हे या नृत्य प्रकारचे महत्वाचे अंग आहे किंवा हा महत्वाचा भाग आहे.
 • नटराज पुतळा : आपण अनेकदा पाहतो कि भरतनाट्य हा नृत्य प्रकार नटराजांच्या पुतळ्या समोर सादर केले जातात आणि त्याचबरोबर प्रथम नटराज पुतळ्यासमोर प्रार्थना केली जाते आणि मग नृत्याला सुरुवात केली जाते.
 • पोशाख : भरतनाट्य हा नृत्य प्रकार करण्यासाठी पोशाख देखील महत्वाचा आहे आणि हा नृत्य प्रकार सादर करत असताना स्त्रिया रेशमी साडी घालतात त्याचबरोबर मनगटावर आणि घोट्यावर दागिने घालातात आणि पोशाखाला एक वेगळे स्वरूप देतात.
 • भाव : भरतनाट्य करत असलेल्या व्यक्तीला गाण्यानुसार किंवा संगीतानुसार किंवा कथेनुसार त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलावे लागतात आणि यामध्ये आनंद, दुख, राग, आश्चर्य या सारखे भाव असतात.
 • कलाकार : पूर्वीच्या काळी भरतनाट्य हा नृत्य प्रकार फक्त स्त्रिया सादर करत होत्या परंतु सध्या हा नृत्य प्रकार स्त्रिया आणि पुरुष देखील सादर करू शकतात परंतु जास्तीत जास्त करून हा नृत्य प्रकार स्त्रियांच्याकडून सादर केला जातो.

भरतनाट्यम विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • भरतनाट्य हा एक असा संगीत प्रकार आहे जो शास्त्रीय संगीतावर आधारित आहे आणि हे नृत्य सादर करण्यासाठी झांजांची जोडी आणि मृदंगम हि मुख्य वाद्ये आवश्यक असतात.
 • या नृत्याच्यावेळी सादर केलेले संगीत, श्लोक किंवा गाणी हि तामिळी, कन्नड किंवा संस्कृत भाषेमध्ये असतात.
 • भरतनाट्य हा खूप जुना नृत्य प्रकार आहे म्हणजेच हा २००० वर्षा पूर्वीचा एक नृत्य प्रकार आहे आणि म्हणून या नृत्य प्रकाराला इतर नृत्यांची जननी म्हणून ओळखले जाते.
 • आपल्याला माहित आहे कि भरत नाट्यम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा केल्या जातात आणि यामध्ये एकूण १०८ मुद्रा आहेत.
 • तमिळ वधूची ज्याप्रमाणे वेशभूषा असते त्याचप्रमाणे भरतनाट्यम नर्तकीची देखील वेशभूषा असते.
 • भरतनाट्यम हा कुचीपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम आणि कथकली या प्राचीन भारतातील नृत्य प्रकारांच्यापैकी एक आहे.
 • काही भरतनाट्यमच्या प्रकारामध्ये साडी, जड दागिने, अंगठ्या, बांगड्या, पायल या सारख्या दागिन्यांचा समवेश असतो.
 • अनेक योगशाळा ह्या भरतनाट्यमच्या काही सुधारित चाली वापरतात ज्याला ध्यानाची परंपरा म्हणून ओळखले जाते.
 • भरतनाट्यम नृत्य हे भारतीय संस्कृतीचे एक चांगले प्रतिक आहे.

आम्ही दिलेल्या bharatanatyam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भरतनाट्यम नृत्य माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bharatanatyam dance information in marathi या bharatanatyam dance information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि bharatanatyam dance information in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bharatanatyam information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!