गरम मसाला रेसिपी मराठी Garam Masala Recipe in Marathi

Garam Masala Recipe in Marathi गरम मसाला रेसिपी मराठी गरम मसाला हे वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाल्यांचे पावडर केलेले मिश्रण आहे जे आपण पदार्थामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठी घालतो. जसे आपण गोडा मसाला, काळा मसाला बनवतो त्याच प्रमाणे गरम मसाला देखील बनवला जातो. गरम मसाला आपण कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी म्हणजेच हा मसाला तिखट भाज्यांच्यामध्ये वापरला जातो जसे कि लाल बटाटा भाजी, दम आलू, भरली वांगी, काजू कुर्मा, मसाला पनीर, काजू करी, भिंडी मसाला तसेच हा मसाला चिकन मसाला, चिकन सुक्का, चिकन फ्राय या सारख्या नॉनव्हेज रेसिपीमध्ये देखील वापरला जातो म्हणजेच हा मसाला शाकाहारी तसेच मांसाहारी रेसिपी मध्ये वापरला जातो.

गरम मसाला हा बदाम फुल, दालचिन, जिरे, वेलदोडे यासारखे काही खडे मसाले कढई मध्ये कोरडे भाजले जातात आणि मग ते मिक्सरला फिरवून त्याची बारीक पावडर बनवली जाते. गरम मसाला हि एक भारतीय पाककृती आहे आणि हे मसाल्याचे मिश्रण भारतामध्ये बहुतेक भागामध्ये जेवणामध्ये वापरला जातो. चला तर मग एकदम सोपा आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा गरम मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.

garam masala recipe in marathi
garam masala recipe in marathi

गरम मसाला रेसिपी मराठी – Garam Masala Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ७ ते ८ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १२ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१७ ते २० मिनिटे
पाककृतीभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

गरम मसाला म्हणजे काय ?

गरम मसाला हे वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाल्यांचे पावडर केलेले मिश्रण आहे जे आपण पदार्थामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठी घालतो. गरम मसाला हा बदाम फुल, दालचिन, जिरे, वेलदोडे यासारखे काही खडे मसाले कढई मध्ये कोरडे भाजले जातात आणि मग ते मिक्सरला फिरवून त्याची बारीक पावडर बनवली जाते.

घरगुती गरम मसाला कसा बनवायचा – how to make homemade garam masala powder 

भारतीय स्वयंपाक घरांमध्ये वेगवेगळ्या तिखट भाज्यांच्या मध्ये गरम मसाला वापरला जातो कारण कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला घातल्यामुळे भाजीची चावा वाढते. गरम मसाला हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर आता आपण घरच्या घरी गरम मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

खाली आपण घरगुती गरम मसाला कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणारा आहोत. त्यासाठी खाली साहित्य आणि कृती दिलेली आहे.

तयारीसाठी लागणारा वेळ७ ते ८ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १२ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१७ ते २० मिनिटे
पाककृतीभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

गरम मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य – garam masala ingredients

गरम मसाला बनवण्यासाठी आपल्याला विशेषत सर्व प्रकारचे खडे मसाले आवश्यक असतात आणि ते आपल्या घरामध्ये बहुतेकदा उपलब्ध असतात आणि जर ते आपल्या  घरामध्ये उपलब्ध नसतील तर ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग गरम मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ ते ३ कांड्या दालचिन.
  • ३ ते ४ वेलदोडे.
  • १०० ग्रॅम खसखस.
  • १ मसाला वेलदोडा.
  • २ बदाम फुल.
  • १ चमचा जिरे.
  • २ तमाल पत्रीचे पाने.
  • ६ ते ७ चमचा काळी मिरी.

घरगुती मसाला बनवण्याची केली जाणारी कृती – process to make garam masala at home 

आता आपण वर दिलेल्या खड्या मसाल्यांच्या सहाय्याने बाजारामध्ये जसा गरम मसाला मिळतो तसा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण आता पाहूयात

  • सर्वप्रथम सर्व मसाले म्हणजेच जिरे, दालचिन, मसाला वेलदोडे, बदाम फुल, काळी मिरी, साधे वेलदोडे आणि तमाल पत्रीचे पाने हा सर्व मसाला स्वच्छ निवडून घ्या.
  • आणि मग तो एका ताटामध्ये घालून २ ते ३ तास चांगला वळवून घ्या.
  • आता एक कढई घ्या आणि ती मधयम आचेवर गॅसवर ठेवा मग त्यामध्ये दालचिन, वेलदोडे, बदाम फुल, मसाला वेलदोडे, तमाल पत्रीचे पान, जिरे, काळी मिरी घाला आणि ते चांगले भाजून घ्या. हे मसाले जोपर्यंत भाजा कि त्याचा खमंग वास येणार नाही.
  • आता त्याचा मस्त खमंग वास यायला लागला कि ते एक ताटामध्ये काढून ठेवा.
  • मग आता कढई तापलेली असते गॅस बंद करा आणि त्या कढई मध्ये खसखस घाला आणि ती गरम करून घ्या आणि ती देखील गरम झाल्यानंतर आपण भाजलेल्या मसाल्यांमध्ये मिक्स करा.
  • आणि हा मसाला थोडा वेळ गार होऊ द्या.
  • भाजलेला मसाला गार झाला कि तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या सर्व मसाल्याची बारीक पूड करून घ्या.
  • बारीक पूड केल्यानंतर तो मसाला चाळून घ्या. तुमचा घरगुती गरम मसाला तयार झाला.
  • हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही नॉनव्हेज डिश मध्ये घालू शकता.

टिप्स (Tips) 

  • मसाले उन्हामध्ये चांगले वाळवून घेतल्यामुळे ते जर हवेमुळे मऊ झाले असतील तर चांगले कडकडीत होतात आणि मग ते भाजून मिक्सरला फिरवले कि त्याची बारीक पावडर होते.
  • हा मसाला बनवताना त्यामध्ये जर आपण २ ते ३ लवंग घातल्या तरी चालतात.
  • गरम मसाला बनवण्यासाठी ताजे मसाले वापरा म्हणजेच घरामध्ये जर तुम्ही खूप दिवसाचे आणून ठेवलेले मसाले वापरले तर गरम मसाला इतका खमंग होत नाही त्यामुळे बाजारातून आणलेले ताजे मसाले वापरा.
  • ह्या मसाल्याची एकदम बारीक पावडर करा.

आम्ही दिलेल्या garam masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गरम मसाला रेसिपी मराठी 1 kg garam masala recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malvani garam masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि garam masala list in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये garam masala powder recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!