भोर घाट माहिती Bhor Ghat Information in Marathi

Bhor Ghat Information in Marathi भोर घाटाची माहिती पावसाळा आला की सह्याद्रीच्या पाऊलवाटा प्रत्येकाला खुणावत असतात. फेसाळणारे धबधबे, पावसाने तुडुंब भरून वाहणारी भातखाचरे, आल्हाददायक थंड बोचणारा वारा आणि त्यात अंगावर पावसाच्या कोसळणाऱ्या सऱ्या हे कोणालाही मोहात टाकायला पुरेसा आहे. एखाद्या सौंदर्यवतीला जसे रूपाचे देणे लाभलेला आहे तसंच देखन लेन सह्याद्रीला पण लाभलेले आहे. या सह्याद्रीच्या कुशीत तामिनी घाट, माळशेज घाट, आंबोली घाट असे अनेक घाट आहेत. त्यापैकी आणखी एक प्रसिद्ध घाट म्हणजे भोर घाट. या प्रसिद्ध भोर घाटाला खंडाळा घाट असेही म्हणतात.

bhor ghat information in marathi
bhor ghat information in marathi

भोर घाट माहिती – Bhor Ghat Information in Marathi

भोर घाटमाहिती
श्रेणीपश्चिम घाट
दुसरे नावखंडाळा घाट
लांबी18 किलोमीटर
उंची2027 फूट
कोठे आहेया घाटाची सुरुवात रायगड जिल्ह्यातून होते तर शेवट हा पुणे जिल्ह्यातील  लोणावळा या ठिकाणापर्यंत आहे
पाहण्यासारखी ठिकाणेखंडाळा, लोणावळा, राजमाची किल्ला, राजमाची किल्ला
रस्तापुणे व मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा

पुणे व मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा सह्याद्री पर्वतरांग मधील घाट आहे. या घाटाची सुरुवात रायगड जिल्ह्यातून होते तर शेवट हा पुणे जिल्ह्यातील  लोणावळा या ठिकाणापर्यंत आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. या दोन ठिकाणच्या दरम्यान हा घाट येतो. हा घाट म्हणजे कोकणला जोडणारा दुवा आहे असे म्हणायला काही हरकत नाही. या घाटातून प्रवास करत असताना निसर्गाची होणारी उधळण पाहायला मिळते. उंचच उंच कडे, खोल दऱ्या, नागमोडी वळणे,अनेक ठिकाणी नव्याने बांधलेले पूल, रस्त्याचे घाटात वेढलेले जाळे पाहायला मिळते. त्यामुळे या घाटातून प्रवास करणे खूप आनंददायी वाटते.या घाटाचे सौंदर्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

या घाटाचे जेवढे वर्णन करावे तेवढे कमीच आहे. या घाटातील आनंददायी वातावरण वळणावळणाचा रस्ता यामुळे हा घाट कायमच पर्यटकांसाठी आकर्षक ठरतो. हा घाट पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. या घाटात इतिहास काळात बांधलेल्या राजमाची आणि नागफणी या किल्ल्यांचे सुंदर चित्र पाहायला मिळते. तसेच हा घाट रेल्वेमार्गाची जोडला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला या घाटात पळसदरी, ठाकुरवाडी, मंकी हिल आणि खंडाळा यासारखी रेल्वेस्थानके पाहायला मिळतात.

भोर घाट फोटो:

bhor ghat
bhor ghat

रायगड:

हिरव्या हिरव्या गर्द डोंगरी गड राजांचा वसला

काळ्या कभिन रायगडान जनु श्वेत शालू नेसला

रायगड किल्ला पाहताच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो. त्यांच्या पराक्रमाची गाथा आठवते. रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी. स्वप्नातल्या स्वराज्याचा स्वर्ग म्हणजे हा किल्ला रायगड.ज्याची निर्मितीची इतक्या तत्परतेने आणि कोणत्याही सुखाची तमा न बाळगता केलेली आहे. रायगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे 1656 मध्ये बांधकाम केले  या किल्ल्याची उंची 820 मीटर आहे.

गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. रायगडचे जुने नाव रायरी आहे. या गडावर अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.त्यातील काही अशी पाचाडचा जिजाबाईचा वाडा,नाना दरवाजा( नाना दरवाज्याला नाणे दरवाजा असेही म्हणतात), हिरकणी टोक,वाघ दरवाजा, जगदीश्वर मंदिर,महाराजांची समाधी,शिरकाई देऊळ, राज सभा, राज भवन,मेना दरवाजा,पालखी दरवाजा, स्तंभ (गंगासागर याच्या दक्षिणेस असणारे दोन उंच मनोरे),हत्ती तलाव,गंगासागर तलाव,महादरवाजा अशी अनेक ठिकाणे आहेत.

राजमाची किल्ला:

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाट उतरून लोणावळ्याच्या दिशेने जाताना अलीकडेच डाव्या बाजूला किल्ले राजमाचीला जाण्यासाठी रस्ता आहे. महामार्गापासून किल्ल्याचे अंतर अंदाजे 16 किलोमीटर आहे. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रस्ता चांगला आहे. तिथून पुढे 12 ते 13 किलोमीटरचा कच्चा रस्ता थेट किल्ल्या पर्यंत आहे. किल्ल्याच्या पायथ्याला उधेवडी नावाचे गाव आहे. या गडावर अतिशय सुंदर शंकराचे एक मंदीर आहे.

तिथून थोडे समोर जातात भैरवनाथाचे मंदिर लागते. तिथून पुढे दोन रस्ते लागतात. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत त्यातील एका बालेकिल्ल्याची नाव श्रीवर्धन तर दुसऱ्याचे नाव मनरंजन आहे. भैरवनाथ मंदिराच्या डावीकडे जाणारा रस्ता मनोरंजन या बालेकिल्ल्याकडे जातो, तर  उजवीकडे जाणारा रस्ता श्रीवर्धन या बालेकिल्ल्याकडे जातो.  राजमाचीचा परिसर जणू निसर्गसौंदर्याची खाणच आहे. या किल्ल्याची तटबंदी देखील सुस्थितीत आहे. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असे संबोधले जाई.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन बालेकिल्ले मनरंजन आणि श्रीवर्धन. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले मोगलांच्या स्वाधीन करावे लागले होते.या तहानुसार शिवाजी महाराजांच्या ताब्यात उर्वरित जे बारा किल्ले होते त्यामध्ये किल्ले राजमाचीचा समावेश होता.राजमाची आणि त्या लगतचे जंगल, धबधबा आणि तिथे असलेली जैवविविधता नेहमीच खुणावत असते.

लोणावळा:

लोणावळा हे ठिकाण थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे भरगच्च असलेले डोंगरमाथे, दऱ्या,पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे खूपच सुंदर दिसतात. येथे जांभळे आणि करवंद यांची लयलूट असते. मुळशी यावरील पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडताना दिसते. थंड वातावरण पावसाळ्यात खूपच सुंदर असते. तिथे असणाऱ्या टायगर पॉइंट हा तर निसर्गाचे दर्शन देत आहे.येथील मोठमोठे हिरव्या डोंगर-दऱ्या खूप सुंदर दिसताय. छोटे मोठे धबधबे पावसाळ्यात ओसंडून वाहत असतात.

ओसंडून वाहणारा धबधबा आपला मार्ग शोधत खाली कोसळत असतो.तेथील हिरवे डोंगर आकर्षित करतात. मोठमोठे हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारे लहान मोठे धबधबे पाहायला खूप छान वाटते.लोणावळा सारखी हिरवळ कुठे शोधूनही सापडणार नाही.खूप नयनरम्य नजारा आहे. लोणावळ्यात फुलांचे पसरलेले गलीचे,हिरवे पांघरून ओढलेले डोंगर खूप छान दिसतात. लोणावळ्यातील एकविरा आईची देऊळ हे तर लोणावळ्याची शान आहे.

खंडाळा:

लोणावळा पासून पाच किलोमीटर अंतरावर खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे.बोर घाट जिथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. सह्याद्रीच्या पर्वताचा उंच पहाड आणि दऱ्या यांच्या मधे खंडाळा हे गाव आहे.खंडाळा मध्ये अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. त्यातील वाघदरी, अमृतांजन पॉईंट, मंकी हिल, नागफणी, भाजा लेणी, खंडाळा सनसेट पॉईंट अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते. मंकी हिल हे पर्यटकांचे खंडाळ्यातील सर्वात आकर्षक ठिकाण आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, भोर घाट bhor ghat information in marathi wikipedia हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bhor ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही भोर घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या bhor ghat information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही bhor ghat त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “भोर घाट माहिती Bhor Ghat Information in Marathi”

  1. माझ्या माहिती प्रमाणे या घाटाचे नाव
    ‘ भोरघाट’ नाही तर ते ‘बोरघाट’ आहे. जाणकारानी यावर प्रकाश टाकावा.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!