ब्रह्मकमळ माहिती मराठी Brahma Kamal Information in Marathi

brahma kamal information in marathi ब्रह्मकमळ माहिती मराठी, आपल्या पृथ्वीतलावर अनेक सुंदर, मनमोहक आणि वेगवेगळ्या रंगाची फुले आहेत आणि त्यामधील एक सुंदर आणि मनमोहक फुल म्हणजे ब्रह्म कमळ आणि आ आपण या लेखामध्ये ब्रह्म कमळ या फुलाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ब्रह्म कमळ हे फुल इतर फुलांच्यापेक्षा आकाराने थोडे मोठे असते आणि हे फुल पांढऱ्या रंगाचे असून हे फुल भारताच्या उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात अढळनारे आणि विशेष फुल आहे. या फुलांच्या बद्दल असे सांगितले जाते कि हि फुले मध्य रात्री फुलतात आणि हि फुले फुललेली पाहणे खूप शुभ मानले जाते.

ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव हे sasaria obovellata असे आहे आणि या फुलाची लागवड हि उत्तराखंड मधील काही भागांच्यामध्ये केली जाते. हे फुल वर्षातून एकदाच फुलते आणि हि फुले ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये येतात. या फुलाचा उल्लेख आह महाभारतामध्ये देखील आढळतो कारण असे म्हटले जाते कि हे फुल मिळवण्यासाठी द्रौपदी देखील हतबल झाली होती.

या फुलाला पौराणिक आणि शास्त्रीय महत्व जरी असले तरी देखील या फुलाच उपयोग हा एक औषधी वनस्पती म्हणून देखील केला जाती म्हणजेच हे फुल आयुर्वेदामध्ये देखील वापरले जाते.

brahma kamal information in marathi
brahma kamal information in marathi

ब्रह्मकमळ माहिती मराठी – Brahma Kamal Information in Marathi

फुलाचे नावब्रह्म कमळ
रंगपांढरा
फुलण्याचा कालावधीऑगस्ट आणि सप्टेंबर
शास्त्रीय नाव सॉस्युरीया ऑब्व्हल्लाटा (sasaria obovellata)
वापरहे फुल शुभ शकून मानले जाते त्याचबरोबर या फुलाचा वापर औषधी फुल म्हणून देखील केला जातो.

ब्रह्म कमळ विषयी महत्वाची माहिती – brahma kamal plant and vastu in marathi

ब्रह्म कमळ हे फुल अॅस्टेरेसि कुटुंबातील असून या फुलाचे वैज्ञानिक नाव सॉस्युरीया ऑब्व्हल्लाटा ( sasaria obovellata). ब्रह्म कमळ हे एक आकर्षक, सुंदर आणि इतर फुलांच्या पेक्षा आकाराने मोठे असणारे फुल आहे आणि हे फुल मुख्यता हिमालय प्रदेशामध्ये आढळते तसेच हे फुल उत्तराखंड राज्यामधील काही भागांच्यामध्ये देखील आढळते.

तसेच या फुलाची लागवड हि भारतातील इतर भागांच्यामध्ये देखील केली जाते. हे फुल वर्षातून एकदाच फुलते अबनी हि फुले ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये येतात. हे फुल ३००० ते ४५०० फुट उंचीच्या डोंगराळ भागामध्ये असतात आणि हे पावसाळ्याच्या दरम्यान उमलतात. ब्रह्म कमळ हे सूर्यास्तानंतर उमलायला सुरवात होते आणि या फुलांना पूर्णपणे उमलण्यासाठी २ तास किंवा त्या पेक्षा अधिक वेळ लागतो.

हिंदू धर्मामध्ये ब्रह्म कमाल या फुलाला खूप महत्वाचे स्थान आहे आणि हे फुल फुललेले पाहणे खूप शुभ मानले जाते तसेच केदारनाथ आणि बद्रीनाथ या ठिकाणी हि फुले देवाच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या फुलाला हिंदू धर्मामध्ये तर महत्व आहे तरी देखील या फुला आणि या वनस्पतीचा वापर हा अनेक औषधी गुणांच्यासाठी केला जातो.

ब्रह्म कमळ या फुलाविषयी पौराणिक कथा

ब्रह्म कमळ या फुलाचाउल्लेख हा महाभारतामध्ये देखील झाला आहे म्हणजेच द्रौपदीला देखील हे फुल हवे होते आणि ती हे फुल मिळवण्यासाठी हतबल झाली होती असे म्हटले जाते. त्यावेळी भीम हा ते फुल आणण्यासाठी हिमालयाच्या खोऱ्यामध्ये गेला होता आणि त्यावेळी त्याला हनुमानजी भेटले होते.

आणि त्याला वाटले कि हे साधारण वानर आहे आणि म्हणून त्यांनी त्याची शेपूट काढण्यास सांगितली आणि हनुमानाजीनी देखील त्याला म्हणाले कि तू सामर्थ्यवान असशील तर तू माझी शेपूट काढून टाक परंतु भीम हे करू शकला नाही आणि मग त्याला खात्री पटली कि हे हनुमानाजी आहेत मग त्याला त्याची चूक लक्षात आली.

ब्रह्म कमळ या फुलाचे औषधी उपयोग – medical uses 

 • या फुलांचा आणि वनस्पतीचा वापर हा सर्दी, खोकला आणि हाडदुखी या वर उपचार करण्यासाठी वापरला जातो.
 • या फुलांचा उपयोग हा जखमांच्यावर उपचार करण्यसाठी केला जातो.
 • आतड्यासंबधित समस्या दूर करण्यासाठी देखील या फुलांचा आणि पानांचा वापर केला जातो.

ब्रह्म कमळ विषयी महत्वाची आणि मनोरंजक तथ्ये – facts 

 • ब्रह्म कमळ हे हिमालयामध्ये उंच डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात उमलते आणि या फुलाला हिमालयीन फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते आणि हे फुल उत्तराखंड राज्याचे राज्य फुल आहे.
 • ब्रह्म कमळ हे फुल अॅस्टेरेसि कुटुंबातील असून या फुलाचे वैज्ञानिक नाव सॉस्युरीया ऑब्व्हल्लाटा ( sasaria obovellata )
 • या फुलाचा उपयोग हा अनेक वेगवेगळ्या आयुर्वेदिक कारणासाठी खूप पूर्वीपासून केला जातो म्हणजेच ह्या फुलांचा उपयोग हा जखमांच्या वर उपचार करण्यासाठी केला जात होता.
 • ब्रह्म कमळ या फुलाची वनस्पती हि काटेरी झुडुपातील वनस्पती आहे.
 • हि फुले पावसाळ्याच्या मध्यभागी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये ४००० मीटर उंचीवर डोंगरावर उमलतात.
 • ब्रह्म कमळाला १५ ते ४५ सेंटी मीटर लांब फांदी असते.
 • ब्रह्म कमळ सामान्यता जाड आणि सपाट असलेल्या पानामधून बाहेर पडतात आणि पाने देठ झाकतात. वनस्पती कलामांच्यापासून वाढते आणि हि झाडे कधीच उंच होत नाहीत. या झाडांची लागवड हि हिवाळ्यामध्ये करणे आवश्यक आहेत तरच या वनस्पतीची वाढ चांगली होते.
 • ब्रह्म कमळ हे एक आकर्षक, सुंदर आणि इतर फुलांच्या पेक्षा आकाराने मोठे असणारे फुल आहे आणि हे फुल मुख्यता हिमालय प्रदेशामध्ये आढळते तसेच हे फुल उत्तराखंड राज्यामधील काही भागांच्यामध्ये देखील आढळते.

आम्ही दिलेल्या brahma kamal information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ब्रह्मकमळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या brahma kamal flower information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि brahma kamal plant and vastu in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!