कमळ फुलांची माहिती Lotus Information in Marathi

Lotus Information in Marathi – Kamal Flower Information in Marathi कमळ फुलांची माहिती मराठी मध्ये कमळ हे एक असे फुल आहे जे आपल्या देशाचे ‘राष्ट्रीय फुल’ आहे आणि हे फुल पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये उमलते तसेच हे फुल बारामाही फुलणारे फुल आहे. नेलुम्बो नुसिफेरा असे या फुलाचे वैज्ञानिक नाव असून हे फुल प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढते. कमाल हे फूल गुलाबी आणि पांढऱ्या रंगात येत असते आणि ही फुले तलाव आणि गढूळ ठिकाणी आढळतात. कमळाच्या झाडाचा व्यास १ मीटर ते ३ मीटर पर्यंत असतो आणि त्याची पाने गोल आणि मोठी असतात.

कमळाच्या पानांचा काही भाग पाण्यात बुडलेला असतो आणि काही भाग पाण्याबाहेर राहतो. हे फुल मुख्यता मार्च महिन्याच्या सुरुवातीस आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलतात आणि या फुलाची खासियत म्हणजे हि फुले सुर्य प्रकाशामध्ये चांगली टवटवीत आणि सुंदर दिसतात आणि ती संध्याकाळच्या वेळी कोळमजतात जातात किंवा पाकळ्या मिटवून घेतात.

कमळाची फुले फक्त तीन दिवस फुलतात आणि तीन दिवसात सर्व पाकळ्या एक एक करून पडू लागतात. फुलाचा फक्त मधला भाग पाण्याबाहेर राहतो. या फुलाला २० ते ७० पाकळ्या असू शकतात या पाकळ्या अनेक पंक्तींमध्ये असतात.

lotus information in marathi
lotus information in marathi

कमळ फुलांची माहिती – Lotus Information in Marathi

नावभारतीय कमळ, कमळ
वैज्ञानिक नावनेलुम्बो नुसिफेरा
निर्मिती केंव्हा झालीइ. स १९५० मध्ये
प्रकारफुल
कोठे आढळतेतलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये
आकारकमळ हे फुल १.५ सेंटी मीटर लांब असते
रंगगुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे असते
पाकळ्यांची संख्या२० ते ७० पाकळ्या असतात
फुलाचे वितरणकमळ हे फुल ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान आणि अमेरिकेत या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

कमळ हे फुल कोठे आढळते 

habitat कमळ हे एक जलीय फुल आहे जे बारमाही आढळते. हि फुले तलाव आणि तलावांसारख्या स्थिर जलाशयांमध्ये चांगल्या प्रकारे येतात आणि हे उथळ हवामानामध्ये गडूळ पाण्यामध्ये येते. 

वितरण

distribution हि फुले अर्ध-उष्णकटिबंधीय हवामान स्थितीत येतात. हे भारत, बांगलादेश आणि म्यानमारसह भारतीय उपखंडात प्रमुख आहेत. तसेच हि फुले ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान आणि अमेरिकेत या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बाली, इंडोनेशिया, मलेशिया आणि इतर दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये हे खूप सामान्य आहेत.

लागवड पद्धत 

जगभरात कमळाची लागवड देठ आणि राईझोमच्या अन्न मूल्यासाठी तसेच फुलांच्या सौंदर्यात्मक मूल्यासाठी केली जाते. या फुलाच्या लागवडी मध्ये फुलांची सुरुवातीला बियाण्यांद्वारे रोपांचा प्रसार केला जातो. बियाणे ओलसर मातीमध्ये पेरणी केली जातात आणि सुरुवातीला दररोज किमान ६ तास सूर्यप्रकाशास ठेवावे लागते आणि सुमारे डिग्री २५ ते ३० सेल्सियस तापमान राखले पाहिजे.

कमळ फुलाचे प्रकार – types of lotus flower in Marathi

कमळ हे फुल वेगवेगळ्या रंगामध्ये तसेच वेगवेगळ्या आकारामध्ये असते हे त्यांच्या जातीवर अवलंबून असते. एशियाटिक कमळ, चेरी कमळ, सूर्यफूल कमळ आणि अमेरिकन कमळ हे काही कमळाचे प्रकार आहेत.

  • एशियाटिक कमळ

एशियाटिक कमळ हे आशियामध्ये मोठ्या प्रमाणात येते आणि या प्रकारची कमळ फुले ३ ते ४ फुट उंची पर्यंत वाढतात आणि हि फुले पांढरट गुलाबी रंगाची फुले असतात आणि हि सुवासिक असतात. या प्रकारच्या कमळाचे उत्पादन वर्षभर मोठ्या प्रमाणात केले जाते.

  • चेरी कमळ

चेरी कमळ जांभळ्या लाल आणि फिकट गुलाबी रंगाची असतात हे फुल ७ ते ८ इंच आकाराचे असते आणि त्याला १७ ते १८ पाकळ्या असतात आणि या फुलाची खडबडीत पाने असतात आणि रूड पाकळ्या असतात. चेरी कमळ हि फुले शक्यतो जुलैच्या अखेरीस ते ऑगस्टच्या अखेरी पर्यंत फुलायला सुरु होतात. याच्या या जांभळ्या लाल आणि फिकट गुलाबी रंगाच्या एकत्रित पणामुळे हे फुल अगदी सुदर दिसते.

  • लाल गुलाबी रंगाचे कमळ

हे कमळ फुल लाल गुलाबी रंगाचे असते आणि या फुलाला ३०० ते ६००० हजार पाकळ्या येवू शकतात आणि हि फुले शक्यतो ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस लागायला सुरुवात होते. या फुलाच्या झाडाची पाने मऊ असतात आणि त्याचे पुनरुत्पादन मुळांद्वारे होते बियांद्वारे होत नाही.

सुर्यफुल कमळ हे सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे या फुलाला सूर्यफूल कमळ असे नाव पडले. या फुलाची योग्यरीत्या फुलण्यासाठी आवश्यक तो काळ द्यावा लागतो. ह्या फुलांचा आकार मध्यम असतो आणि या फुलाच्या पाकळ्या गडद गुलाबी रंगाच्या असतात म्हणजेच हे फुल गडद गुलाबी रंगाचे असते आणि त्याचा मध्य पांढऱ्या रंगाचा असतो. हि फुले उष्ण तसेच थंड हवामान देखील सहन करू शकतात.

  • टोकदार पाकळ्या असणारे कमळ

या फुलाला टोकदार पाकळ्या असतात आणि ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात. त्याचबरोबर या फुलाची पाने आकाराने मोठी आणि २ फुट व्यासाची असतात आणि हि गोल आणि हिरव्या रंगाची असतात. या फुलांचा व्यास १० इंच इतका असतो आणि हि फुले अत्यंत सुगंधी असतात.

  • अमेरिकन कमळ

अमेरिकन कमळ हे एक सामान्य कमळ आहे कारण हे अमेरिका तसेच इतर देशामध्ये देखील आढळते आणि हे इतर देशांमध्ये देखील आढळण्याचे कारण हे विविध हंगामामध्ये चांगल्या प्रकारे येवू शकतात. त्याची पाने गोलाकार आहेत आणि निळ्या हिरव्या रंगाची असू शकतात.

जरी त्याची फुले अत्यंत नाजूक असली तरी, त्याची देठ साधारणपणे खरोखर कडक असतात. अमेरिकन हे फुल पांढऱ्या रंगाचे असते आणि त्याला १५ ते २० पाकळ्या असू शकतात.

कमळ फुलाविषयी काही अनोखी तथ्ये – interesting facts about lotus flower

  • कमळ हे फुल भारताचे राष्ट्रीय फुल आहे.
  • कमळ हि फुले पांढऱ्या, लाल, गुलाबी, पिवळ्या रंगामध्ये असतात.
  • इजिप्शियन पौराणिक कथांमध्ये, कमळ सूर्याशी संबधित आहे कारण ते दिवसाच्या वेळी फुलते आणि रात्री बंद होते.
  • तलावातील पाणी जितके गडूळ तितकेच कमळ फुल चांगल्या प्रकारे उमलतात.
  • कमळ हे फुल भारतासोबत व्हिएतनामचे देखील राष्ट्रीय फुल आहे.
  • कोरिया, चीन आणि जपान या देशांमध्ये कमळाचे महोत्सव साजरे केले जातात जे या फुलाचे सौंदर्य साजरे करतात.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये lotus information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर kamal flower information in marathi म्हणजेच कमळ फुलांची माहिती मराठी मध्ये kamal chi mahiti यांबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या lotus flower information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information of lotus in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!