हिमालय पर्वत माहिती मराठी Mountain Information in Marathi

Mountain Information in Marathi हिमालय पर्वत माहिती मराठी पर्वत म्हणजे नैसर्गिकरीत्या जमिनीपासून उंच असलेली भौगोलिक रचना होय. समुद्रासापासून उंचीनुसार पर्वत हे डोंगर व टेकडीपेक्षा उंच असतात. पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखरा सारखा असतो. तसेच बहुतांशी पर्वत हे एखाद्या पर्वतरांगेचा भाग असतात. सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. त्यापैकी आशिया खंडात ६४ टक्के, युरोप खंडात २५ टक्के, दक्षिण अमेरिका खंडात २३ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये १७ टक्के तर आफ्रिकेत ३ टक्के जमिनीचा समावेश होतो. मंगल ग्रहावरील ऑलिम्पिस मॉन्स हा २१,१७१ मीटर उंची असलेला सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत मानला जातो.

mountain information in marathi
mountain information in marathi

हिमालय पर्वत माहिती मराठी – Mountain Information in Marathi

महाराष्ट्रातील पर्वतांची नावेपर्वताची/ शिखराची उंची (मीटर)जिल्हा
कळसुबाई१६४६नगर
साल्हेर१५६७नाशिक
महाबळेश्वर१४३८सातारा
हरिश्चंद्रगड१४२४नगर
सप्तशृंगी१४१६नाशिक
तोरणा१४०४पुणे
राजगड१३७६पुणे
रायेश्वर१३३७पुणे
शिंगी१२९३रायगड
नाणेघाट१२६४पुणे
त्र्यंबकेश्वर१३०४नाशिक
बैराट११७७अमरावती
चिखलदरा१११५अमरावती

पर्वतांची निर्मिती कशी होते ?

पर्वतांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला ओरोजेनेसिस असे म्हणतात. पृथ्वीच्या कवचात झालेल्या हालचालीमुळे हि प्रक्रिया घडून आली.

पृथ्वीवर निर्माण झालेल्या पर्वतांचे ३ प्रकार आहेत.

ज्वालामुखी पर्वत 

हे पर्वत जिथे २ भूखंड एकत्र येतात किंवा एकमेकांपासून दूर होतात, त्याठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होतो आणि ज्वालामुखी पर्वत तयार होतात.

फोल्ड किवा घडीचे पर्वत – fold mountain

ज्या ठिकाणी भूखंड एकत्र येतात आणि ते खडकांना वरच्या दिशेला ढकलतात तिथे फोल्ड पर्वत निर्माण होतात. ज्या ठिकाणी भूपृष्टाचे आवरण कमी घनता असलेल्या भूपृष्टीय आवरणाशी एकत्रित होते, तेव्हा सागरी भूपृष्ठीय आवरणाखाली जाते. त्यामुळे भूपृष्ठीय आवरण वरच्या दिशेला सरकते. उत्तर अमेरिकेतील अपॅलाचियन पर्वत रांगांची निर्मिती या प्रकारे झाली आहे. हिमालय पर्वत हा घडीचा पर्वत आहे.

ब्लॉक पर्वत – block mountain

ज्यावेळी एखादा भूखंड २ देशांच्या मध्ये उंचावला जातो, त्यावेळी ब्लॉक पर्वत तयार होतो.

हिमालय पर्वत – Himalaya Mountain Information in Marathi

हिमालय हि आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वाधिक उंच विशाल पर्वतप्रणाली आहे. हिमालय हा एक वलय प्रकारचा पर्वत आहे. हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य या दोन संस्कृत शब्दांनी ‘हिमालय’ हा शब्द तयार झाला आहे. हिमालय हि एक अतिसुंदर पर्वत शृंखला आहे, कायमस्वरूपी बर्फाच्छादित असलेला पर्वत.

म्हणनूच या पर्वताला हिमालय हे नाव पडल्याचे मानले जाते. हिमालय पर्वताला भौगोलिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय, सामाजिक, पर्यटन, धार्मिक, भूराजनैतिक, संरक्षण आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हिमालय पर्वतरांगा या पश्चिम पूर्व पसरल्या असून त्यांची लांबी सुमारे २५०० किमी आणि रुंदी सुमारे १५०-४०० किमी आहे. हिमालय पर्वतरांगांचे क्षेत्रफळ सुमारे ५,००,००० चौ.किमी. आहे. हिमालय पर्वतरांगा भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान या देशांमधून पसरलेल्या आहेत. जगातील सर्वात उंच असलेली शिखरे हि हिमालय पर्वतरांगेत असून त्याची उंची हि ८००० मीटर पेक्षा जास्त आहे.

हिमालयातील माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असून त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मीटर (२९,०२९ फुट) इतकी आहे. हा पर्वत हिमालयाच्या हिमाद्री – ग्रेटर हिमालय रांगेत नेपाल तिबेट सीमेवर आहे. त्याखालोखाल के २ आणि कांचनगंगा ह्या पर्वतांचा क्रमांक लागतो. हिमालय पर्वतरांगा हि एक अशी शृंखला आहे जी भारतीय उपखंडाला मध्य आशिया आणि तिबेटच्या पठारापासून वेगळे करते.

हिमालय पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. या पर्वताच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो. आणि हिमालयाच्या उंचीमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड कायम उष्ण आणि उबदार राहण्यास मदत होते.

हिमालय पर्वताची निर्मिती

हिमालय पर्वत हा मुख्यत्वे गाळाने बनलेला पर्वत आहे. आणि हा पर्वत जगातील सर्वात तरुण पर्वत असल्याचे मानण्यात येते. भारतीय द्वीपकल्प हा मूळतः गोंडवन या महाखंडचा भाग होता जो साधारणपणे आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या जवळ होता. हिमालय पर्वतरांगा ज्या ठिकाणी पसरलेल्या आहेत. त्या ठिकाणी पहिले टेथिस नावाचा समुद्र अस्तित्वात होता.

साधारणपणे १ कोटी वर्षापूर्वी भारत व युरेशियन प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने टेथिस समुद्राचे अस्तित्व नष्ट झाले. परंतु यामुळे तयार झालेला गाळाचा भाग उंचावला गेला आणि जसा जसा भारतीय उपखंड अजून आत येत गेला तसतसा हा भाग अजून उंचावला आणि हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झाली.

हिमालय पर्वत चंद्रकोरीच्या आकाराचा असून तो दक्षिणेकडे बहिर्वक्र आहे. त्याची दक्षिण सीमा ३०० मीटर उंचीची असून लांबी १५० किमी आणि उंची ८००० मीटर आहे. हिमालय हा वर्षाला साधारणपणे ५ मिलीमीटर उंच वाढतो. यामुळे हिमालयाचा भाग हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय नाजूक मानला जातो.

हिमालय पर्वतरांगेतील शिखरे

शिखरेउंची (मीटर )
माउंट एव्हरेस्ट८८४८
के २८६११
कांचनगंगा८५९८
नंगा८१२६
बारवा७७५६

हिमालयातील काही प्रमुख शिखरांमध्ये सागरमाथा हिमाल, अन्नपूर्णा, शिवशंकर, गणय्या, लँगतांग, मनस्लू, रवळलिंग, जुगल, गौरीशंकर, कुम्भू, धौलागीरी हि आहेत.

हिमालयातील नद्या / हिमनद्या

हिमालय पर्वतरांगेत अनेक नद्या उगम पावतात. आणि हिमालयातील बहुतांश नद्या बारमाही वाहतात. पावसाळ्यात होणाऱ्या पर्जन्यामुळे आणि उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फामुळे. यामध्ये गंगा, ब्रम्हपुत्रा, सिंधू या प्रमुख नद्या आहेत. ह्या नद्या भारत, पाकिस्तान, बांग्लादेश व चीन मधील जवळपास १५० कोटीहून अधिक लोकांसाठी (जवळपास ३० ते ३५ टक्के) पाण्याचा मुख्य स्रोत आहे.

म्हणूनच जगातील सर्वात महत्त्वाच्या पर्वतरांगामध्ये हिमालयाचा समावेश होतो. सिंधू नदी हि जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. हि तिबेटमधील मानसरोवराजवळ उगम पावते.

हिमालयामध्ये १५ हजार हून अधिक हिमनद्या आहेत, ज्यामध्ये १२००० वर्ग. किमी. इतके पाणी सामावलेले आहेत. ७२ कि.मी. लांबीची सियाचीन हिमनदी हि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लांबीची हिमनदी आहे.

उत्तराखंडातील गंगोत्री, यमुनोत्री, पिंदारी व काफनी हिमनदी, नेपाळ मधील एव्हरेस्टच्या सानिध्यातील खंबू हिमनदी ह्या काही प्रसिद्ध हिमनद्या आहेत.

हिमालय पर्वतरांगेतील धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे

भारतातील ऋषी मुनींच्या तपश्चर्येचे हिमालय हे प्रमुख केंद्र आहे. भारतात हिमालय पर्वताला हिंदू धर्मात देवासमान मानले जाते. महाभारतात सांगितल्याप्रमाणे स्वर्गाला जाण्याचा मार्ग हिमालयातून जातो म्हणून पांडवांची शेवटची यात्रा हिमालयातून केली होती. भारतात हिमालय पर्वतरांगेचा विस्तार जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांत झालेला आहे.

हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक भारतामध्ये हिमालयाला बघण्यासाठी तर अनेक गिर्यारोहक इथे चढाई करण्यासाठी येतात. हिमालयातील शिमला, नैनिताल, मसुरी, दर्जीर्लिंग हि थंड हवेची ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

हिमालय पर्वत शृंखले मध्ये अनेक धार्मिक स्थळ आहेत. त्यामध्ये हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, गोमुख, देव प्रयाग, ऋषीकेश, कैलास, मानसरोवर किंवा अमरनाथ, शाकम्भरी हि धार्मिक स्थळे प्रमुख आहेत.

कैलास पर्वत जो ऐतिहासिक पर्वत मानला जातो, जिथे भगवान महादेव स्वतः विराजमान आहेत. माउंट एव्हरेस्ट पेक्षा कमी उंच असून देखील हा पर्वत कोणताही गिर्यारोहक आजतागायत सर करू शकला नाही.

हिमालयातील वनसंपदा  

भारतातील एकूण जंगल क्षेत्रापैकी ५२ टक्के क्षेत्र हिमालयात आहे. यामध्ये ४ प्रमुख प्रकार आहेत. उष्णकटीबंधीय, उपोष्णकटीबंधीय, समशीतोष्ण आणि पर्वतीय. यामध्ये अनेक प्रकारच्या औषधी तसेच इतर उपयुक्त वनस्पती आढळतात. पर्वतीय जंगल सुमारे ३४०० मीटर उंचीवर सुरु होतात आणि पश्चिम व पूर्व हिमालयात ४५०० मीटर पर्यंत वाढतात.

  • येथील अरण्यात सिंकोना, इपिकक, सर्पगंध यांसारख्या अनेक औषधी वनस्पती भरपूर प्रमाणात सापडतात.
  • सफरचंद, संत्री, अलुबुखार, द्राक्ष, सप्ताळू. चेरी, अक्रोड, बदाम इत्यादीच्या बागा हिमालयात आहेत.
  • विविध उपयुक्त प्राणी कस्तुरी मृग सारखे प्राणी येथे सापडतात.
  • चहा हे येथील मळ्याच्या शेतीतील सर्वाधिक महत्वाचे उत्पादन असून दार्जीलिंग आणि आसाम त्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • दगडी कोळसा, जलोढीय सोने, चांदी, तांबे, इंद्रनील मणी, जस्त, बॉक्साईट, अभ्रक, ग्राफाईट, गंधक, इत्यादी खनिजांचे साठे हिमालयात आहेत.

sahyadri mountains information in marathi

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये mountain information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information on mountain in marathi म्हणजेच “हिमा दास यांची माहिती” information about mountain in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या सुवर्णकन्या हिमा दास या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि 5 mountain and information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!